पत्रकारितेची कमाल - मांजरीचे सूडनाट्य

Submitted by निंबुडा on 1 December, 2010 - 04:13

सकाळ वृत्तपत्रात दि. २४ नोव्हेंबर २०१० रोजी आलेली ही बातमी वाचा. या प्रकारच्या पत्रकारितेला काय म्हणावे??? Uhoh

नाग आणि मांजरीच्या झटापटीचे अगदी साद्यंत वृत्त देण्यामागचा हेतू आणि लॉजिक नक्की काय ते केवळ या पत्रकारालाच ठाऊक Rofl

वाचताना डोळ्यांत हसून हसून पाणी आले. Biggrin

Serious issue.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मांजर आणि नाग, हि कशाची प्रतीके असतील बरं ? या कथेतून काय बोध घ्यावा बरं ? यामागे एकादी परकीय शक्ती तर कार्यरत नाही ना ? कि होऊ घातलेल्या घटनांचे सूचन आहे हे ?

विनोद कोळसे, संदेश किटे , माणिकराव बुराडे या मंडळींची नावे वगैरे छापल्यामुळे किती फेम मिळालाय नै या लोकांना Biggrin

मी एक सिनेमाचे स्क्रीप्ट लिहायला घेतेय. - "बदला बिल्ली का "
यात वरील थरारक प्रसंग घालायचा मानस आहे. त्यासाठी संबंधित वृत्तपत्राची आणि पत्रकाराची अनुज्ञा घेणे आवश्यक आहे का?? Rofl

निंबे Lol त्या पत्रकारालाच घे की तुझा असिस्टंट म्हणुन हा.का.ना.का.
किशोर कारंजेकर - म्हणजे आपला किश्या तर नव्हे???:अओ:

आता ते 'इंडिया टिव्ही' वाले 'स्पेशल रिपोर्ट' या सदराखाली या घटनेचे घाणे काढतील काय?????

मी एक सिनेमाचे स्क्रीप्ट लिहायला घेतेय. - "बदला बिल्ली का "
>>> निंबुडा, लै झ्याक आयडिया ग. पण ते शिनेमाचं राहू दे. एक सिरियल काढ. नाग आणि मांजर वि सासू-सुन अशी पॅरलल स्टोरी चालू दे.

ह्या अर्धवट बातमी आहे...त्या नागाने बरोबर विनोद कोळसे यांच्याच दुकानात का जायचा प्रयत्न केला. त्यांचे काही हितसंबंध गुंतले होते का, तो नाग कोळसे यांनी पाळला होता का आणि मग ती मांजर कुणाची होती याचा काही खुलासा बातमीदाराने केलेला नाही...

Lol Lol Biggrin Biggrin
दिनेशदा,श्री...:फिदी:
...बदला बिल्ली का Proud

मूळ बातमी हास्यास्पद आहेच आणि वर इथल्या प्रतिक्रिया म्हणजे Biggrin Rofl Proud अश्या आहेत.

ते ईंडिया टिव्हीवाले तर अश्या प्रकारच्या बातम्या देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. मागे एकदा या चॅनलवर मी स्वर्गात जाणारा रस्ता पण बघितला होता आता बोला...

मागे एकदा या चॅनलवर मी स्वर्गात जाणारा रस्ता पण बघितला होता आता बोला...>> मी पण बघितला होता तो रस्ता Biggrin

मागे एकदा या चॅनलवर मी स्वर्गात जाणारा रस्ता पण बघितला होता आता बोला...>> मी पण बघितला होता तो रस्ता खो खो

मग, काम चालू रस्ता बंद ची पाटी होती की काय? Happy

Pages