मोड.... (अनपेक्षीत वळण, Turning Point).....

Submitted by गिरिश देशमुख on 16 November, 2010 - 06:51

imagesCAYEG12T.jpg

नकळत जीवनात
मोड असा लागला
गेले सारे कसे कुठे
राहिलो मी एकला...

गरजेस्तव जो तो
संगती ने चालला..
मखरात स्थापुनी मला
कुठे चालता जाहला...

शिखरावर भोगतो मी
एकान्ती असली सजा
मीच इथे माझा राजा
मीच असे माझी प्रजा...

गुलमोहर: 

छान Happy
दुसरी ओळ वाचताना जरा गडबडले होते......मराठीत ' मोड ' शब्दाचे दोनच अर्थ माहीत आहेत मला.
१. सुट्टे पैसे
२. कडधान्याला येतात ते मोड Proud Light 1

छान स्मित
दुसरी ओळ वाचताना जरा गडबडले होते......मराठीत ' मोड ' शब्दाचे दोनच अर्थ माहीत आहेत मला.
१. सुट्टे पैसे
२. कडधान्याला येतात ते मोड

>>>

अजुन एक अर्थ आहे मोड ह्या शब्दाचा Proud