भारत पाक संबंध कसे असावेत? मतदान.

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

भारत पाक संबंध.

मुंबई वरील हल्ल्यात पाकचा हात आहे हे सिध्द होतेच आहे. अश्या अनेक हल्यांमध्ये पाकचा हात असतोच. दर हल्ल्यानंतर आपण जाउ द्या म्हणून सोडून देतो. गेल्या ८ वर्षात अनेकदा आपनच पुढाकार घेउन दोन्ही राष्ट्रांमध्ये समझोता घडवुन आनतो ( मुशरफ बोलनी करायला येउन मध्येच न सांगता पळून जातात), बस सेवा, रेल्वे सेवा, पाकचे गायक, क्रिकेट इ इ आपण सर्व चालू करतो. पण ह्या समझोत्याचा फायदा तूम्हाला होताना दिसतो का?

ह्या पुढे भारताने पाक शी कसे संबंध ठेवायला पाहीजेत ह्यावर तूमचे मत द्या. सध्या मायबोलीवर ऑनलाईन पोलीगं नाही म्हणूण पर्याय आणि मत इथेच द्या. मत देताना ते का दिले ते ही लिहा.

भारत पाक संबंध कसे असावेत? ( surveys)

मतदान वरही दिलेल्या लिंकवरही येईल.

पर्याय.

१. भारताने पाकशी सर्व संबंध तोडले पाहीजेत. (ह्यात त्यांचे कलाकार, रेल्वे, विमान, बिझनेस इ इ सर्व गोष्टी, शत्रू तो शत्रूच. त्यात भेदभाव नको. मग बिझनेसमन असो का झि वर येनारा गायक)

२. भारताने पाकशी संबंध न तोडता ते अजुन दृढ कसे होतील ते पाहीले पाहीजे. (कारण पाक नागरिकांचा ह्यात काही हात नाही. फक्त काही लोकांनी त्यांचा जनतेला वेठीस धरले आहे त्यात त्यांचा काय दोष )

३. काही बाबतीत संबध तोडून काही बाबतीत दृढ करायला पाहीजेत. ( कूठले तोडायचे व कूठले ठेवायचे ते लिहा)

४. पाक वर सैन्याने चढाई करुन पाकला नामशेष करावे.

५. मला कुठलाच पर्याय मान्य नाही.

कृपया हे वैयक्तीक मत असल्यामूळे दुसर्‍या मायबोलीकराने पहिल्याला दोष देउ नये वा त्यावरून भांडन सुरु करु नयेत.

प्रकार: 

अरे मित्रा इथे एका वाक्यात (आकड्यात) उत्तरे द्या म्हणतायत केदार मास्तर अन तू लेका निबंध लिहीतोयस >> Lol अरे नाही. तर्कशुध्द मत व प्रतिक्रिया द्या हेच म्हणायचे आहे मला. त्यामूळे निबंध लिहीला तरी हरकत नाही. Happy

इथे देशांतर्गत काय करायचे हे लिहीनेच अभिप्रेत नाही. फक्त भारत व पाक संबंध.
http://www.hotklix.com/?ref=link/167516 हे ही वाचा. बरीच माहीती आहे ह्या कटा बद्दल.

आपण खालील e-mail address वर आर्मीला आपला सपोर्ट व त्यांच्या शौर्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि कौतुक करु शकता.

indianarmy@bol.net.in

------------------------------
श्री राम राम रणकर्कश राम राम

भारत पाक संबंधाबाबत:

माझा पर्याय सगळ्यांचा नावडता: २
_________________________
-Impossible is often untried.

भारत पाक संबंधाबाबत:
१) मला वाटते की पाकिस्तानसोबत आपण संबंध अधिकाधिक वाढवत नेले पाहिजे. त्यातला सगळ्यात पहिला प्रयत्न म्हणजे दोन्ही देशांत रोटी-बेटी व्यवहार सुरू झाले पाहिजेत.सुरवातिला मुस्लिमांमध्ये आणि पुढे जाऊन हिन्दू-मुस्लिम असेही विवाह व्हायला हवेत. असे विवाह करणार्यांस सरकारतर्फ़े मदत देण्यात यावी.
२)आपल्याकडे नेहेमी म्हटले जाते की समान नागरी कायदा ठेवावा.त्याला मुस्लिमांचा विरोध असतो असे मला वाटते. कारण त्यांना वाटते की समान नागरी कायदा म्हणजे साधारणतः हिन्दू स्वरुपाचा नागरी कायदा. पण मला वाटते की आपला नागरी कायदा मुस्लिम स्वरुपाचाच करून टाकावा.. पुरुषांनी अनेक लग्ने करण्याला सरकारला काय बरे हरकत असावी? करू द्या की लोकांना अनेक लग्ने! आता भारत पाक संबंधात याचा काय संबंध म्हणून विचाराल तर आहे तसा! भारतिय पुरुषांना दोन किंवा अधिक पाकिस्तानी स्त्रियांशी विवाहास भारत सरकारने परवानगी द्यावी.यामुळे अनेक पाकिस्तानी स्त्रिया राजरोसपणे भारतिय होतिल आणि त्यांचे अनेक नातेवाईक भारतात ये-जा करू शकतिल.काही जण इथेच राहतिल त्यांना भारतिय नागरिकत्व देऊन आपल्यात सामाऊन घेता येईल.
३) बऱ्याच जणांना आवडलेला पर्याय ४ हा काही उपयोगाचा नाही.शेकडो वर्षांपासून ख्रिश्चन जिहादींपासून हिटलरपर्यंत अनेकांनी शत्रूराष्ट्राला नेस्तनाबूत करण्याचे अयशस्वी प्रयत्न केले आहेत. इतिहास साक्षी आहे की अश्याने काही होत नसते. ताजे उदाहरण बुश साहेबांचे आहेच! त्यामुळे भारताने अनेक वर्षे वापरलेला संबंध दृढ करण्याचा ,रोटी-बेटी व्यवहाराचा पर्याय अतिशय योग्य असाच आहे.सम्राट अशोकानेही धर्मप्रसारासाठी याचा वापर केलाच होता.शत्रू नष्ट करण्यापेक्षा हे अधिक सोपे असते.
असेही अनेक मुस्लिम चालीरिती आपण आपल्या धर्मात घेतल्या आहेतच.अजून काही साध्या सोप्या चाली घ्याव्यात.काय हरकत आहे. मुळात वैदीक काळात असणाऱ्या संकल्पना आज काही आप्ण वापरत नाहीतच.
४)असेही अनेक घुसखोर भारतात येत असतातच.ते रोखणे तसे अवघड आहे तर मग सरसकट भारत- पाकिस्तान,भारत बांग्लादेश,भारत-अफ़गाणिस्तान सीमा सरळ खुल्या कराव्यात.सांस्क्रुतिक देवानघेवाण चालू करावी.घुसखोरांना आधी मेहमान म्हणून मान द्यावा आणि मग नागरिकत्व देऊन त्यांचा घुसखोरीचा उद्देश्यच हाणून पाडावा.गुपचूप प्रेम करण्यात मजा असते तशीच गुपचूप घुसखोरी करण्यात असते.हा देश तुमचाच आहे म्हटले की हवाच निघून गेली की! शत्रूच नाही तर लढणार कुणाशी! यात अहिंसा वगैरे काही नाही. उलट खूप उच्च स्तरिय हिंसा आहे.अश्या रितीने आपण अफ़गाणिस्तानपासून थेट मलेशिया पर्यंत आपला विस्तार करू शकू.
५) भारतिय कार्पोरेट क्षेत्राने पाकिस्तानी कंपन्या ताब्यात घेण्यास सुरवात करावी आणि आपले मोठमोठे कारखाने पाकिस्तानात चालू करावे.अनेक भारतिय उत्पादने वापरू लागल्याने पाकिस्तानी लोकांना स्वतःची ओळख राहणार नाही.त्यामुळेही ते मनाने भारतियच होऊन जातिल. भारतिय की पाकिस्तानी हा वाद बिहारी की मराठी या पातळीवर आणून त्यातली हवा काढून घेण्यासाठी प्रयत्न करावेत.

रोटी बेटी व्यवहाराची सुरवात मोठ्या लोकांपासून करायला हरकत नाही. तेव्हा आपल्या राहुल गांधींचे लग्न पाकिस्तानी कन्यकेशी लावण्यात यावे. भुत्तोंच्या कन्यका आहेतच.यामुळे दोन देशांत संबंध दृढ होण्यास मदत होईल.ईतरही नेत्यांच्या मुलामुलींसाठी असे प्रस्ताव तयार करणारे एक खातेच भारत सरकारने उघडायला हवे.त्यात दोन्ही देशांतील नागरिकांना सामावून घेता येईल.

त्यामुळे शुभस्य शीघ्रम!चट मंगनी पट ब्याह! सगळ्या मिडिया वाल्यांना यावर पोल घेण्यास सांगण्यात यावे. अगदी पुढच्या निवडणुकांत मुख्य निवडणूकांत राहूल गांधी यांनी पाकिस्तानी कन्यकेशी शक्यतो भुत्तोंच्या कन्यकेशी लग्न करावे का? यावरही मतदान घ्यावे. कोन्ग्रेस जनतेच्या मतांचा अनादर करणार नाहीच.

_________________________
-Impossible is often untried.

वा वा छान ! तुझ्यापासूनच कर ना सुरुवात ..., तू तुझं नाव बदलून गफूर ठेव ... ( सुन्ता देखील करून घे हवा तर ) Happy

ता.क.

१. राजकारणी आणि अतिरेकी याना मेंदू नसतात, त्यामुळे त्याना उपहास समजत नाही ! !

२. आणि मुळात राहूल गांधीच्या 'अशा' लग्नाने 'हिंदु मुस्लिम ' समन्वय कसा साधणार बाबा ? राजीव गांधीनी सोनियांशी लग्न करताना ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे. आता आई बाप दोन्ही ख्रिश्चन , त्यामुळे मुले हिंदु असायचा प्रश्नच नाही, या दोन्ही मुलांची कागदोपत्री नावे रॉल आणि बियान्का आहेत, राहूल आणि प्रियान्का हा त्या नावांचा भारतीय अवतार आहे .... कसा साधणार 'हिंदु-मुस्लीम ' संगम यातून ?

मी कुठे म्हटलेय की आपणही मुस्लिम व्हा म्हणून!
राहुलबाबांना कोन्ग्रेसजन आतापासून पंतप्रधान मानत आहेतच... त्यांची पोरेही पीएम होतिल.. त्यामुळे जसे पूर्वीचे राजेलोक उर्फ सत्तधीश आपला राज्यविस्तार करत तद्वतच आपल्या अनभिशिक्त राजघराण्याने करावे की जेणेकरून भारतिय राज्यविस्तार होईल!

माझ्यापासून म्सुरवात करायची म्हणत असशील तर मी कायद्यात बदल होऊन एकापेक्शा अधिक लग्ने करण्यास परवानगी दिली (सरकार आणि आमचे सरकार दोघांनी !:)भारतिय्मी तयार आहे! Happy
_________________________
-Impossible is often untried.

>माझ्यापासून म्सुरवात करायची म्हणत असशील तर मी कायद्यात बदल होऊन एकापेक्शा अधिक लग्ने करण्यास परवानगी दिली (सरकार आणि आमचे सरकार दोघांनी !:)भारतिय्मी तयार आहे!
भलताच पुढारलेला आहेस की.. एव्हडा मोठा सर्वव्यापी बदल.. अन मि बदला का बदल यातच अडकून पडलो आहे. Happy
यापुढचा बदल काय असेल..? असे हिंदू मुस्लीम ख्रिश्चन खिचडी लग्ने झाल्यावर नक्की पुढील पिढीचा धर्म काय यात गोन्धळ उडाल्याने खरा "मनावता" धर्म प्रस्थापित होईल अन पर्यायाने दहशतवाद समाप्त होईल..
वाह गुरू! बडी दूरकी सोची है... (admin ची warnig वाचली आहेस ना..? वक्फ बोर्डाकडून तुझी चौकशी झाली तर आम्हाला ओळखत नाहीस म्हणून सांग रे बाबा..) Happy

त्यांची पोरेही पीएम होतिल..
---- त्यांची पोरे कर्तुत्ववान असतील तर होतीलही पीएम. मला फक्त एव्हढच म्हणायचं आहे पोरांतील नैसर्गीक कर्तुत्वाला "केवळ त्यांची पोरे आहे" ह्या कारणामुळे वेसण नको पडायला, तसे होणे त्यांच्यावर अन्यायकारक ठरेल. पण हा प्रश्न भविष्यात म्हणजे किमान २५ वर्षानंतर पडावा, आजचा मुख्य प्रश्न येणार्‍या निवडणुका कशा जिंकता येतील आणि भारतीय जनतेची पुन्हा सेवा (पिळवणुक) करायची संधी मिळेल हा आहे.

विषयांतरा बद्दल क्षमस्व.

>>भारतिय पुरुषांना दोन किंवा अधिक पाकिस्तानी स्त्रियांशी विवाहास भारत सरकारने परवानगी द्यावी.
>>त्यामुळे शुभस्य शीघ्रम!चट मंगनी पट ब्याह!

Lol

छ्या.. या गफूरभाईना 'विषय' बाधला अन बी बी चा विषय 'भारत पाक ( लैंगिक) संबंध ' असा होत चाललाय ..! आता या विषयावर पुढच्या पोस्ट लिहिणार्‍याना 'एक किंवा दोन पुरेत' असं बंधन घालायला हवं मॉड्सनी... Happy

पाकीस्तान बरोबर संबंध ठेउन आपल्याला काय फायदा?

मी तर खालिल मताची आहे.

१. भारताने पाकशी सर्व संबंध तोडले पाहीजेत. (ह्यात त्यांचे कलाकार, रेल्वे, विमान, बिझनेस इ इ सर्व गोष्टी, शत्रू तो शत्रूच. त्यात भेदभाव नको. मग बिझनेसमन असो का झि वर येनारा गायक)
४. पाक वर सैन्याने चढाई करुन पाकला नामशेष करावे.

नुकतीच जनरल हमीद गुल नावाच्या पाकिस्तानी आय एस आय चा माजी चीफ ची मुलाखत एन डी टी वी वर पाहिली. ( ह्याचे नाव " मोस्ट डेंजरस " माणुस म्हणुन भारत आणि अमेरिकेच्या लिस्ट मधे आहे.) मी नुकतेच वाचलय ते लिहित आहे.

हा हमीद गुल २००१ पर्यंत ओसामा बीन लादेन चा प्रमुख सल्लागार म्हणुन काम पाहात होता. ९/११ चा मुख्य सुत्रधार म्हणुन अमेरिकेला हा माणुस हवा आहे. अमेरिकेच्या अहवाला नुसार तालिबान चा प्रमुख मुल्ला ओमर ह्याच्याशी ह्याच्या अनेक भेटी झालेल्या आहेत.

अजुन एक म्हणजे ए क्यु खान हे पाकिस्तान चे सर्वोच्च अणुशास्रज्ञ गेली १० वर्शे अणु तंत्र आणि मिसाईल्स चे सुपर मार्केट चालवत होते हे देखील उजेडात आलेले आहे. उत्तर कोरिया , इराण, इराक,लिबिया ही राष्ट्रे मुख्य खरीददार होती.

तर अशा ह्या हमीद गुल ने स्थापन केलेली " मुत्तेहिद मजलिस्-इ-अमल" ( एम एम ए) ही राजकिय संघटना , निवडणुकिच्या राजकारणात उतरुन प्रभावी राजकिय पक्ष बनला आहे. हा एम एम ए पक्ष अल कायदा चा पुर्णपणे समर्थक आहे.

लिऑन हेडर, केटो इन्स्टिट्युट परराष्ट्रनिति विभागाचे फेल्लो आणि " मध्यपुर्वेत अमेरिका" ह्या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आपल्या विश्लेशणात स्पष्ट्पणे म्हणतात कि लवकरच अल कायदा आणि मंड्ळी पाकिस्तान सीमेतुन अफगाणिस्तान मधील अमेरिका समर्थक सरकार उडवुन लावुन तेथे पाकिस्तान चे बाहुले आणण्याचा प्रयत्न करतील... आणि ही कारवाई लवकरात लवकर व्हावी म्हणुन अल कायदा पाकिस्तान वर दबाव टाकत आहे.

आणि म्हणुनच अमेरिकन अहवालाने पाकिस्तान ला "टेररिस्ट ट्राफिकर" असे म्हटले आहे. म्हणुन अश्या ह्या पाकिस्तान ला आताच रोखले नाहि तर हाहाकार उडेल. देवाच्या क्रुपेने अजुन पर्यंत अतिरेक्यान्च्या हातात " मास डिस्ट्रक्शन" वेपन आलेली नाहित. पण आताच जर आपण पाकिस्तान ला नामशेष केले नाही तर हे घडायला वेळ लागणार नाहि.

म्हणुनच भारत सरकारने जबरदस्त राजकिय फिल्डिंग लावुन सर्व बाजुने जगाला आपल्या बाजुला केले पाहिजे.

अमेरिका आणि भारत मिळुन सर्व अतिरेकी तळाना नेस्तनाबुत करु शकतात आणि अशा करुयात की ते हे करतीलच.

सध्या तरी क्र. १ - संबंध बंद ठेवणे. - कारण सध्या जगाचे लक्ष आहे ह्या कडे आणि त्या मुळे जगाला आपला मार्ग कळेल आणि कदाचित अजुन कोणी देश पण काही प्रमाणात पाकिस्तान शी संबंध कमी करु शकतील (स्वप्न?) आणि मग पा.ची अजुन गोची होईल (अजुन १ स्वप्न?).
फारेंड चे पटले ह्या बाबत लिहिलेले.

विषय नसला तरी लिहुनच टाकते -
इट्समी चा मुद्दा खरे तर सर्व भारतीयांना लावावा. महत्वाच्या ठिकाणी सर्वांचीच ओळखपत्रे पाहावीत. किंवा जिथे शक्य आहे तिथे.. मग ते ठिकाण महत्वाचे नसले तरी.

नोकरी देताना, मग ती सरकारी असो, ताज मधे असो किंवा माझ्या घरी धुणे-भांडी करायला असो, मागील ५-७ वर्षाचे पत्ते (खासगी आणि नोकरीतले), नोकरी मागायला आलेल्यांच्या २-३ ओळखी, हाताचे ठसे, फोटो इत्यादीची पोलिसात वा वकील वा बँक लॉकर कोठेतरी नोंद करुन ठेवावी.

ह्म्म, खरंय सुनिधी. इकडेही नॅनी,बेबी सीटर ठेवताना ह्या सगळ्या गोष्टींची खातरजमा केली जाते.

इथे अमेरिकेत करतात background checking and drug testing नोकरीच्या ठिकाणी मग भारतात का नाही होत? नोकरी कुठल्याही स्वरूपाची असो वा सरकारी असो, असे चेकींग झाले पाहीजे.
वरती कोणी तरी म्हटल्याप्रमाणे नागपूरात होत तसे रोजच्या रोज चेकींग म्हणजे आणखी लाचलूचपतीचा एक counter वाढणार तर नी भ्रष्टाचारास निमत्रंण. Wink
त्यात फक्त मुस्लिमांचे चेकींग केले तर इथेच एक अतीरेकी टोळी निर्माण होइल रागाने आम्हाला हा त्रास सहन करावा लागतो म्हणून....

इट्समी चा मुद्दा खरे तर सर्व भारतीयांना लावावा. महत्वाच्या ठिकाणी सर्वांचीच ओळखपत्रे पाहावीत. >>
ही सुध्दा एकदम चांगली कल्पना आहे. आणि मला असे वाटते सर्व सुशिक्षीत - सुसंस्क्रुत लोक याबाबतीत सरकारला सहकार्य नक्कीच करतील, अजिबात न रागवता Happy

संबध कसे असावेत हे आपण दळतोय खरे पण ते कसे हवेत ते त्यांनी आधीच ठरवले आहे त्याचे काय?

त्यामुळे 'जशास तसे' संबंध असावेत.

१. त्यांचे दहा आले की आपले १०० पाठवा.
२. राष्ट्रसंघाच्या दबावाला बळी पडु नका.
३. सापडलेल्या अतिरेक्यांना सार्वजनिक ठीकाणी फासावर लटकवा व त्याचे चित्रण घेऊन प्रसिद्धी द्या.
४. त्यावर भडक विधाने करणार्‍या व्यक्तीला १४ वर्ष कारावास द्या.
५. घराला लागलेली किड काढा. घरभेदी लोकांना पण कठोर शिक्षा करा.
६. हे असे १-२ वर्ष केले आणी सुधारणा होते का बघा.
७. होणार नाहीच त्यामुळे हल्ला करा.

~~~~~~~~~~~~
ज्याचा त्याचा प्रश्न!!
~~~~~~~~~~~~

Pages