भारत पाक संबंध कसे असावेत? मतदान.

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
Time to
read
2’

भारत पाक संबंध.

मुंबई वरील हल्ल्यात पाकचा हात आहे हे सिध्द होतेच आहे. अश्या अनेक हल्यांमध्ये पाकचा हात असतोच. दर हल्ल्यानंतर आपण जाउ द्या म्हणून सोडून देतो. गेल्या ८ वर्षात अनेकदा आपनच पुढाकार घेउन दोन्ही राष्ट्रांमध्ये समझोता घडवुन आनतो ( मुशरफ बोलनी करायला येउन मध्येच न सांगता पळून जातात), बस सेवा, रेल्वे सेवा, पाकचे गायक, क्रिकेट इ इ आपण सर्व चालू करतो. पण ह्या समझोत्याचा फायदा तूम्हाला होताना दिसतो का?

ह्या पुढे भारताने पाक शी कसे संबंध ठेवायला पाहीजेत ह्यावर तूमचे मत द्या. सध्या मायबोलीवर ऑनलाईन पोलीगं नाही म्हणूण पर्याय आणि मत इथेच द्या. मत देताना ते का दिले ते ही लिहा.

भारत पाक संबंध कसे असावेत? ( surveys)

मतदान वरही दिलेल्या लिंकवरही येईल.

पर्याय.

१. भारताने पाकशी सर्व संबंध तोडले पाहीजेत. (ह्यात त्यांचे कलाकार, रेल्वे, विमान, बिझनेस इ इ सर्व गोष्टी, शत्रू तो शत्रूच. त्यात भेदभाव नको. मग बिझनेसमन असो का झि वर येनारा गायक)

२. भारताने पाकशी संबंध न तोडता ते अजुन दृढ कसे होतील ते पाहीले पाहीजे. (कारण पाक नागरिकांचा ह्यात काही हात नाही. फक्त काही लोकांनी त्यांचा जनतेला वेठीस धरले आहे त्यात त्यांचा काय दोष )

३. काही बाबतीत संबध तोडून काही बाबतीत दृढ करायला पाहीजेत. ( कूठले तोडायचे व कूठले ठेवायचे ते लिहा)

४. पाक वर सैन्याने चढाई करुन पाकला नामशेष करावे.

५. मला कुठलाच पर्याय मान्य नाही.

कृपया हे वैयक्तीक मत असल्यामूळे दुसर्‍या मायबोलीकराने पहिल्याला दोष देउ नये वा त्यावरून भांडन सुरु करु नयेत.

प्रकार: 

इथे हिंदुत्वाची टिमकी वाजवणार्‍यांत आणि इस्लामच्या नावाखाली लोकांना मारणार्‍यांत फारसा फरक नाही. >> सिरिअयली?? प्लिज थिंक अबाऊट इट >>>
ट्वाईस प्लिज. मी देखील हिंदू पुरस्कर्ता आहे पण त्यासाठी मुसलमान वा इतर धर्मीयांना मारा अश्या मताचा नाही. हिंदू म्हणल की काही लोकांना तो माणूस बाकीच्या धर्मांचा विरोधकच असे का वाटते बॉ हे कळले नाही. आणि मलाही तूम्ही हे लिहीलेले रुचले नाही म्हणून हा शांत विरोध. तूम्ही लिहीलेल्या वाक्याचा शांतपणे विचार करा.

आणि मायबोलीची काळजी ऍडमीन घेतील. आरती तूमचही चूकलचं. तूम्ही इतक्या टोकाची भूमीका घेऊ नका. त्यामूळे फक्त eye for eye होइल.

जगातील पहीले आत्मधातकी पथकाबद्दल इथे पाहायला मिळेल. ते हिंदू न्हवते.

http://wiki.answers.com/Q/Who_was_the_first_suicide_bomber

मी त्या पुस्तकाचे नाव देखील टाकेल, त्यासाठी थोडा वेळ हवा आहे. क्रुसेड वर ते पुस्तक आहे.

___________________________________
"अहिंसेची नशा दारूपेक्षाही घातक असते. अट्टल अहिंसाबाज नशेत वाट्टेल ते बरळत सुटतो"
आमचे प्रेरणास्थान प्र.के.अत्रे

चिनूक्सच्या पोस्टमधले काही मुद्दे चुकीचे असतीलही पण इथली किंवा 'अतिरेकी हल्ला बीबी'वरची काही पोस्ट उघडउघड चिथावणीखोर आहेत, त्याचं काय? झालेल्या घटनेमुळे प्रचंड प्रमाणात जनक्षोभ आहे, भावनोद्रेक होतोय हे समजतं पण आंतरजालावरचा पब्लिक फोरम ही तो व्यक्त करायची जागा नव्हे.
किमान याने मायबोलीसारख्या पब्लिक फोरमला त्रास होऊ शकतो, ही शक्यताही कुणी ध्यानात घेत नाहीय का? अर्थात, ऍडमिन यांनी स्वतः लिहिले येथे की, अशा प्रकारची पोस्ट चालू राहू शकतात, मायबोलीला काही त्रास होण्याची शक्यता नाही; तर माझे हे पोस्ट डिलिट केले जावे.

तळटीप: या पोस्टमध्ये कुणासही उद्देशून असांसदीय, असभ्य शब्द वापरलेले नाहीत. या पोस्टाला उत्तर द्यायचे असेल तर हे भान पाळले जावे.

LT, तुमचे सर्व मुद्दे पटले. आज भारतात कुठलीही आणिबाणी ओढवल्यास काय करावे, हे सर्व जनसामान्यांना माहीत असले पाहिजे. राजकारणी किंवा पोलीस किंवा इतर कुठलीही मदत मिळेपर्यंत प्रतिकार किंवा सुरक्षेचे उपाय करता आले पाहिजे. मुख्यत्वे शाळकरी मुलांना असे प्रशिक्षण देवून त्याची जमेल तेव्हा रंगीत तालिम करायला हवी.
सीमेची सुरक्षा आणि त्यासाठी लागणारी कुमक सर्वात महत्वाचे. ही सीमा गुजरातची, ती महाराष्ट्राची असे न करता एका अधिपत्याखाली नियंत्रण हवे. जहाज असो वा माणूस कुठेही गेला, भरकटला तरी त्याच्याविषयी माहीती/नोंद अधिकार्‍यांकडे हवी. सर्वांनाच ओळखपत्र हवे. ssn सारखा नंबर हवा, ज्या द्वारे त्या व्यक्तीची नुसती ओळख नाही पण इतर माहीती (background, नागरिकत्व ई.) एखाद्या सुरक्षा यंत्रणेला काढता यावी. यामुळे शिरकाव करून शिरणार्‍यांवर थोडा तरी control ठेवता येइल.
भारताने स्वतःला सर्व बाबतीत स्वावलंबी करावे. नोकर्‍या, शिक्षण, सुरक्षा असे आपले प्रश्न आपण सोडवण्याच्या योजना राबवाव्या. प्रत्येक नागरीकाने उच्च अधिकार्‍याच्या भेटीसाठी व मदतीसाठी ताटकळत न राहता, आपल्याकडून जेवढे होईल ते करावे.
आताचा हल्ला भारताच्या tourism आणि म्हणून economy वर सरळ हल्ला आहे. आपले अंतर्गत प्रश्न सुटून आपण स्वावलंबी झाल्यास बरे.

मला gs1 चे सर्व मुद्दे पटलेले आहेत.....

भारत-पाक संबंध कसे असावेत, यावरचं भारताच्या दृष्टीने त्यातल्या त्यात बरं आणि व्यवहार्य उत्तर ठरवताना चाळणी लावून एकेका उपलब्ध पर्यायावर काट मारत येणं मला सयुक्तिक वाटतं. माझी यासंबंधी कारणमीमांसा मी अशी मांडेनः

१. पर्याय क्र. ४, "पाक वर सैन्याने चढाई करुन पाकला नामशेष कराव" : संयुक्त राष्ट्रे, सुरक्षा समिती, नेटो/युरोपीय संघ वगैरे ससैन्य आंतरराष्ट्रीय समुदाय/संघटना, व्यापार-अर्थव्यवस्थेबाबत देशा-देशांचं परस्परावलंबित्व या सर्वांमुळे सध्याच्या जगात कितीही धर्म्य वाटलं तरी 'एक घाव दोन तुकडे' या न्यायाने वागणं अवघड होऊन बसलंय. एखाद्या देशावर उघड हल्ला करायला जितकी सैन्यतयारी लागेल, त्याहून कैक पटींनी राजनैतिक फील्डिंग लावायला तयारी लागते. मासल्यादाखल अमेरिकेने इराकावर, अफगाणिस्तानावर हल्ले करताना आखलेल्या योजनांचे पॅटर्न आठवून बघा. इराकातली सद्दाम हुसेन राजवट कशी जुलमी आहे, रासायनिक/जैविक अस्त्रांचा विनाशकारी साठा विकसवणारी आहे, कुवेतासारख्या शेजार्‍यांच्या सार्वभौमत्वावर घाला घालण्याइतपत विस्तारवादी अन इराकी कुर्दिस्तानात मानवी हक्क तुडवण्याइतपत राक्षसी आहे हे हळूहळू वाढत्या तीव्रतेने/गांभीर्याने ठसवत अमेरिकेने भविष्यकालीन सशस्त्र कारवाईची आपली भूमिका समर्थनीय ठरवत नेली. हुसेनी राजवटीला खलनायक रंगवण्याची ही पद्धतशीर मोहीम राबवूनदेखील त्यांनी लष्करी कारवाईकरता कुवेती संघर्षाचं निमित्त शोधलं. प्रत्यक्ष लष्करी कारवाईतही केवळ इराक-अमेरिका युद्ध वाटू नये, म्हणून राजनैतिक प्रयत्नांद्वारे ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, नेटो या राष्ट्रांचा/संघटनांचा सक्रिय सहभाग या कारवाईत घुसवला. थोडक्यात आपलं ध्येय साधायला त्यांनी बरीच फील्डिंग लावून, कारवाई करतेवेळी बंदूक ठेवायला आंतरराष्ट्रीय संघटनांचे खांदे वापरले. अफगाणिस्तानातही साधारण याच स्वरूपाचा पॅटर्न राबल्याचा दाखला दिसतो. फक्त थोडा फरक असा की, ९/११ च्या हल्ल्यांमुळे केवळ अमेरिकी सुरक्षेलाच थेट झळ पोचली असूनही, त्यांनी आपल्यावरच्या घावाला जागतिक दहशतवादाचे व्यापक परिमाण दिले. त्याकरता गुप्तवार्तासंकलन, राजनैतिक व्यूहरचना, प्रसारमाध्यमांचा धूर्त वापर, काही प्रमाणात काल्पनिक बागुलबुवा उभा करणं अशा सर्व मार्गांचा वापर करून त्यांनी अल कायदा, आणि त्यांना पोसणारी अफगाणिस्तानातली तालिबानी राजवट खलनायकी रंगवली (साधारण याच सुमारास भारतातला काश्मिरी मुजाहिदिनांचा दहशतवादी फुटीर लढयाचा, तालिबानांशी संबंध असून भारताची समस्या आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा एक भाग असल्याची उपरती अमेरिकेला झाली. :फिदी:). मग पुढची स्वत:च्या आणि नेटो, ब्रिटन, जपान, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स वगैरे आंतरराष्ट्रीय सैन्याद्वारे त्यांनी तालिबानांवर चाल केली. सध्या अमेरिका काही प्रमाणात अशीच प्रचारकी मोहीम इराणाविरुद्ध, उत्तर कोरिया, सुदान वगैरे त्यांच्या दृष्टीने 'उपद्रवी' असलेल्या देशांविरुद्ध राबवत आहेत. रशियानेही नुकत्याच जॉर्जियात केलेल्या चढाईकरता छोट्या प्रमाणात हा पॅटर्न वापरायचा (अपयशी) प्रयत्न केला होता.

थोडक्यात सांगायचं तर अमेरिकेसारखं बडं राष्ट्रही एखाद्या देशावर हल्ला चढवायच्या आधी एवढा सापळा लावतं, तर भारताला पाकिस्तानाविरुद्ध अशी काही कारवाई करायची असल्यास मोठ्ठी राजनैतिक फील्डिंग दीर्घकालीन उद्दिष्टे डोळ्यांपुढे ठेवून राबवावी लागेल. तसेच त्याला केवळ खासगी आकसाचे स्वरूप येऊन आपली आंतराष्ट्रीय प्रतिमा डागाळू नये याकरता बंदूक ठेवायला आंतरराष्ट्रीय खांदे हुडकावे लागतील. तर हे काम मनाजोगतं फत्ते होईल. तूर्तास भारतातर्फे या सार्‍या आघाड्यांवर मोठे प्रयत्न होताना दिसत नाहीयेत. त्यामुळे हा पर्याय तूर्तास अनुसरणं अशक्य ठरतं.

२. पर्याय क्र. २, "भारताने पाकशी संबंध न तोडता ते अजुन दृढ कसे होतील ते पाहीले पाहीजे": या पर्यायात व्यावहारिक अडचणी दिसतात. दोन्हीकडच्या जनतेला एकमेकांबद्दल कितीही उमाळा दाटून आला, तरीही २६/११ किंवा तत्सम घटनांमुळे राजकीय, सामरिक पातळ्यांवर संशयाचं वातावरण अधूनमधून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे समजा भारताने हा पर्याय अवलंबला तरीही त्याचं फलित पूर्णपणे आपल्या नियंत्रणात नाही (आणि पाकिस्तानातल्या सरकारी गोटांच्या खासगी निर्वाळ्यानुसार त्यांच्याही नियंत्रणात पूर्णपणे नाही.. Proud .. खुद्द अख्खा पाकिस्तानतरी त्यांच्या नियंत्रणात आजमितीला कुठे आहे? Wink ).

३. पर्याय १, "भारताने पाकशी सर्व संबंध तोडले पाहीजेत." : या पर्यायाला अनुसरण्यानं प्रश्न सुटणार नाही. जन. झियांच्या लष्करी राजवटीत दीर्घ काळ भारत-पाक संबंध थिजलेले होते. काहीही निष्पन्न झालं नाही. भारत-पाकच काय कुठल्याही आंतरराष्ट्रीय संबंधात कट्टी-बट्टीचा मनस्वीपणा सहसा परिणामकारक ठरत नाही.

४. पर्याय ५, "मला कुठलाच पर्याय मान्य नाही." : म्हणजे काय करायचं हे मला कळलं नसल्याने मी याबद्द्ल काही बोलू शकणार नाही. Proud

५. पर्याय ३, "काही बाबतीत संबध तोडून काही बाबतीत दृढ करायला पाहीजेत": मला या पर्यायाची वाक्यरचना सुधारून "पाकिस्तानी सरकाराशी संबंध ठेवाताना प्रसंगानुरूप सोयीस्कर भूमिका घेत आपले हितसंबंध रेटावेत" अशी करावीशी वाटते. या सुधारित पर्यायाच्या अनुषंगाने काही कल्पना मांडाव्याश्या वाटतात.

वर 'क्र. १' मध्ये नोंदवलेल्या कारणांना अनुसरून, भारताला पाकिस्तानातील/पाकव्याप्त काश्मिरातील दोषी घटकांवर कारवाई करायची असेल तर उघड युद्ध करता येणार नाही. पण अमेरिकन/पाकिस्तान सरकरांच्या खाद्यांवरून बंदूक चालवता येईल किंवा फील्डिंग लावून ठेवल्यास अड्ड्यांची पक्की खबर असलेल्या एक-दोन ठिकाणांवर हवाई हल्ला चढवण्याची तोलून-मापून जोखीमही पत्करता येईल. नुकत्याच ओबामांनी केलेल्या वक्तव्यांवरून आणि त्यांचे दक्षिण आशिया-विषयक सल्लागार ब्रूस रीडल यांच्या भूमिकेवरून मला दुसर्‍या शक्यतेबद्दलही धूसर आशा बाळगता येईल असं वाटतंय (मागच्या आठवड्यातल्या माझ्या आडाख्यांमध्ये नवीन भर. :फिदी:). 'सीआयए'चे माजी विश्लेषक असलेल्या ब्रूस रीडल यांना पाकिस्तानातल्या आय.एस.आय.च्या तालिबान, काश्मिरी मुजाहिदीन, अल कायदा यांच्याशी असलेल्या लाग्याबांध्यांची आणि त्याबद्दल गेल्या काही वर्षांत हाती आलेल्या गोपनीय धाग्यादोर्‍यांची कल्पना आहे. रीडल यांच्या मते १९८० च्या दशकातल्या सोव्हिएत-अफगाण मुजाहिदिनांमधल्या युद्धातून आय.एस.आय.चा अफगाण राजकारणात हस्तक्षेप वाढू लागला. याचदरम्यान आय.एस.आय.च्या भारतलक्ष्यी भूमिकेमुळे काश्मिरातल्या इस्लामी फुटीरतावाद्यांनाही सहानुभूती मिळाली. अन पुढे जाऊन आय.एस.आय.च्याच हातभाराने अल कायदा-तालिबान-पाकिस्तानातले कट्टरपंथी-काश्मिरी मुजाहिदीन असा अक्ष आकाराला आला. रीडल यांनी बिल क्लिंटनांनादेखील आय.एस.आय. डोकेदुखी ठरण्याबद्दल सूतोवाच केले होते. परंतु अमेरिकेच्या तत्कालीन हितसंबंधांमध्ये हा अक्ष आणि दक्षिण आशिया-पश्चिम आशियातला दहशतवाद हे प्रश्न ऐरणीवर नव्हते. गेल्या दीडेक वर्षांत अमेरिकी राजनैतिक वर्तुळातून या विषयाला कार्यक्रमपत्रिकेवर प्राधान्य मिळू लागल्याने आय.एस.आय.कडे उघड उघड रोख येऊ लागलाय. 'करंट हिस्टरी' या आंतरराष्ट्रीय राजकारणविषयक अमेरिकन मासिकाच्या नोव्हेंबर २००८च्या अंकात रीडलांनी 'पाकिस्तान: द क्रिटिकल बॅटलफील्ड' या लेखात अमेरिकेच्या पाकिस्तानविषयक संभाव्य ध्येयधोरणांबद्दल चर्चा मांडतानाही आय.एस.आय.च्या दहशतवादाच्या जाळ्याशी असलेल्या सहभागावर आक्षेप घेतले आहेत. ओबामांनी रीडलांच्या धोरणांनुसारच मतप्रदर्शन केले असण्याची शक्यता आहे. त्यानुसार भारताला हे संकेत पोषक आहेत. पण तरीही भारताला पक्की खबर असल्याशिवाय, तद्विषयक पुरावे अमेरिका/रशिया/अफगाणिस्तानातलं करझाई सरकार/ब्रिटन/जपान या सध्याच्या राजनैतिक सहकार्‍यांना पटवून दिल्याशिवाय पुढची पावले उचलता येणार नाहीत. या सहकारी राष्ट्रांशी लावलेल्या फील्डिंगीनुसार एखाद-दुसरीच कारवाई (तीही पाकिस्तानातल्या लोकशाही सरकाराला राजनैतिक पातळीवर सांभाळून घेता येईल याची खात्री करूनच) करता येईल. खुद्द अमेरिकेने या वर्षाच्या पूर्वार्धात पाकिस्तानातल्या बलोच भागांत अफगाण सीमेजवळच्या मुजाहिदीन आश्रयस्थळांना खणून काढण्यासाठी एक-दोन हवाई हल्ले करून पाहिले होते. पण त्यावरून पाकिस्तान-अमेरिकी सैन्यांदरम्यान काही दिवस सीमापार चकमकीदेखील झडल्या. पाकिस्तानाने आपल्या सार्वभौमत्वावर अमेरिकेने अधिक्रमण केल्याची तक्रार राजनैतिक पातळीवर अमेरिकेवर गुदरली. पण अमेरिकेने मग बा़जू सावरून घेत पाकिस्तानी सरकाराला राजनैतिक प्रयत्नांतून व्यवस्थित मॅनेज केलं. अमेरिकनांच्या धाडसावरून भारतालादेखील असं काही धाडस योजायचं असल्यास सोपं ठरणार नाही हे उघड आहे.. राजनैतिक प्रयत्नांची पद्धतशीर तयारी करूनच हे धनुष्य पेलायला जावं अन्यथा जाऊ नये.

जर भारताने थेट धाडस केलं नाही, तर आगामी ओबामा सरकाराचा कल पाहता त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानाश्रित दहशतवादाचा डांगोरा पिटून (अमेरिकेने जसा अफगाणिस्तानाबाबत केला तसा) झरदारी-गिलानी सरकारावर घरातली घाण निस्तरण्याकरता दबाव तरी आणला पाहिजे. अमेरिकेलाही आय.एस.आय-तालिबान-अल कायदा या अक्षाचं गांभीर्य पदोपदी जाणवून देऊन त्यांच्या देखरेखीखाली पाकिस्तानी सरकाराच्या खांद्यावर बंदूक ठेवून काम करवून घेणे सोपे जाईल. २६/११ मधल्या पुराव्यांचा तसेच जुलै २००८ मधल्या काबुलातल्या भारतीय वकिलातीतल्या बाँबस्फोटांतल्या तपासावरून आय.एस.आय.कडे अंगुलिनिर्देश होतोय. याकरता पाकिस्तानाच्या दुसर्‍या शेजार्‍याला - अफगाणिस्तानालाही राजनैतिक दबाव वाढवायला चुचकारता येईल. मध्यंतरी करझाईंनीदेखील अमेरिकेला आय.एस.आय.च्या उपद्रवी कारवायांना आवर घालायची निकड बोलून दाखवली होती; त्याचा फायदा व्हावा.

पाकिस्तानातलं लोकशाही सरकार आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तरदायी धरले जाईल अश्याही काहीतरी व्यूहात्मक तरतुदी करायला हव्यात. म्हणजे नुकतंच झरदारींनी 'पाकिस्तान अण्वस्त्रांचा प्रथम वापर करणार नाही' असं वक्तव्य केल्याचं माध्यमांमध्ये आलं होतं. याचा पाठपुरावा करून पाकिस्तानाकडून प्रथम वापर नाकारणारा आण्विक जाहिरनामा जाहीर होण्याकरता प्रयत्न करावेत (म्हणजे नेमके काय करायला हवं, याचं मला सध्यातरी आकलन नाही :फिदी:). भारताने अण्वस्त्रप्रसारबंदी करारावर सही करण्याच्या दिशेने काही पावले पुढेमागे उचलली तर पाकिस्तानी सरकाराच्या गळ्यातही ती धोंड अडकवण्याकरता राजनीती अवलंबावी. अमेरिका, पाकिस्तान, अफगाणिस्तानाबरोबर दक्षिण आशियाई दहशतवादविरोधी फोरम उभारून एतद्विषयक गुप्तवार्तासंकलन, संयुक्त कारवाई वगैरे गोष्टी पाक सरकाराच्या गळ्यात बांधता आल्या तर त्यांच्या आय.एस.आय./लष्करातल्या भारतविरोधी, मुजाहिदीनधार्जिण्या घटकांना जखडता येईल.

पाकिस्तानात लोकशाही सरकार राहणं हे आपल्या दृष्टीने सोयीचं राहील. कारण उत्तरदायित्वाची कंकणं अशा सरकारांना सहज झुगारता येत नाहीत. पाकिस्तानी लष्करशाहीचा दुटप्पी अनुभव भारताला आहेच... तसाच मुशर्रफांच्या बाबत अमेरिकेलाही आलाय. दहशतवादविरोधी आहोत, असे भासवत एकीकडे आपल्याच भूमीवरच्या दोषी घटकांकडे काणाडोळा करायचा; अंगलट आलंच तर ते घटक आमचं ऐकतच नाहीत वगैरे कांगावा करायचा हा पॅटर्न ठरलेला. त्यापेक्षा लोकशाही सरकार आंतरराष्ट्रीय स्तरावर जबाब देण्याकरता बांधील असल्याने हाताळायला सोपं.

आर्थिक/व्यापारी पातळ्यांवर परिणाम करण्याइतपत भारत-पाक संबंध आतादेखील प्रभावी नाहीयेत. पाकिस्तानाचे मोठे व्यापारी भागीदार असलेले अमेरिका, ब्रिटन, चीन, सौदी अरेबिया, अफगाणिस्तान या देशांपैकी सौदी वगळता बाकी देशांतली सरकारे भारताची वर्तमान (आणि नजीकच्या भविष्यकाळात) सहकारी आहेत. त्यामुळे कठीण प्रसंगात त्यांच्या लॉबीद्वारे काही घडवता येऊ शकेल.. एरवी नाही. आताच्या प्रसंगातही पाकिस्तानातल्या लोकशाही सरकारावर ठपका ठेवणे अवघड असल्याने आर्थिक/व्यापारी पातळीवरून राजकारण खेळणे शक्य नाही.

सामाजिक पातळीवरचे संबंध हा हितसंबंधांच्या दृष्टीने तसं म्हटलं तर निष्प्रभ पण म्हटलं तर सोयीस्कररित्या ब्रँडेबल बनवून खपवता येण्याजोगा मुद्दा आहे. क्रिकेट डिप्लॉमसी, समझोता एक्सप्रेस वगैरे ब्रँडांना हितसंबंधांच्या दृष्टीने काहीही महत्त्व नाही; पण सलोख्याच्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर यांचं थोडंफार जाहिरातमूल्य आहे एवढंच. बेबनावाच्या काळात या गोष्टी बासनात गुंडाळल्या तर त्यात कुणाला गैरही वाटत नाही इतक्या या गोष्टी वरकरणी आहेत.

याव्यतिरिक्त भारताने स्वतःत बरेच बदल घडवून आणायला हवेत. पण त्याबद्द्ल नंतर कधीतरी.

-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

आरती ची पोस्ट काय होती..? उडवली का..? इतकी प्रक्षोभक वगैरे होती का...? सर्वांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे त्यामूळे असेल, असो.
gs1,
नेहेमीप्रमाणेच अभ्यासपूर्ण अन मुद्देसूद..

बरं, एक विनंती करावीशी वाटते. २६/११ च्या घटनेनंतर आपणा सर्वांनाच खूप काही करावंसं, बोलावंसं, लिहावंसं, घडवावंसं वाटत असणार. हात शिवशिवत असणार. प्रत्येकाची आपापली विचारसरणी असणार हेही कबूल. पण मुस्लिमदहशतवादधार्जिणे/हिंदुत्ववादधार्जिणे असं एकमेकांना लेबलं लावणं, 'हान तेच्या xxxx' छाप आवेशात लिहिणं टाळावं अशी विनंती. इथे सर्वांची वैयक्तिक मतं मांडावीत असं केदाराने म्हटलंच आहे. पण तरीही, मतं मांडताना खांद्यावरचा भाग आपण सर्वजण वापरूया. Proud

-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

माझ्यामते आरतीची पोस्ट 'ठराविक ठिकाणी भारतातल्या मुसलमानांना प्रवेश नाकारावा/किंवा ओळखपत्राखेरीज प्रवेश देऊ नये 'अशी होती. तसं करणं शक्य नसलं तरीही मला काही प्रक्षोभक वगैरे काही वाटली नाही.
फ, पोस्ट छान आहे. खूप मोठं आहे. सावकाश पुन्हा एकदा वाचेन.

. पाकबरोबर युद्ध केल्यास, "देशान्तर्गत अस्तित्वातील पाकिस्तानात" जे उठाव व दन्गली होतील त्याचा बन्दोबस्त करण्याचे दृष्टीने आपण प्रशासनिक दृष्ट्या व जनता या नात्याने कुठेही तयार नाहीहोत
अनुमोदन. जीएस१ यांची मते पण पटली. कुणीहि इतर लोकांना सक्तीने हिंदू धर्मात ओढलेले नाही. ओढा असेहि म्हंटले नाही.
मुस्लिमांचे असे एक खोटेच मत आहे की भारतात त्यांना संधि मिळत नाही. वास्तविक ते चुकीचे आहे. ते लोक शिकले, दहशतवादी कारवायांऐवजी शालेय शिक्षण घेतले तर त्यांचीहि उन्नति होऊ शकते. 'तेंव्हा समाजात आमची परिस्थिती दयनीय आहे' असे ते म्हणतात नि त्यांच्या जोडीला महाराष्ट्रातील माझे 'विचारवंत' मित्रहि म्हणतात, त्यांना ठणकावून सांगितले पाहिजे की अभ्यास करा, काम करा, उगाच दहशतवाद माजवू नका. नि तुमचे कल्याण एका वर्षात होणार नाहीये, अनेक वर्षे लागतील, तेंव्हा फुकट फालतू अपेक्षा बाळगू नका. नि इथे जर तुम्हा मुसलमानांना त्रास होत असेल, तर जेंव्हा हाज ला जाण्याचे फुकट तिकिट मिळेल तेंव्हा कुठल्या तरी मुसलमान देशात जाऊन तिथे मरा. आम्हाला त्रास नको.

फ च्य post नंतर ह्या BB ला टाळे लावून टाकायला हरकत नाही.

फ मत आवडले. पण तूझ्या पाक कडून फारच अपेक्षा आहेत बॉ. Proud ( पण तरीही मी नं १ वर कायम)

असामी हा बाफ नाही रंगीबेरंगी आहे.

असामी हा बाफ नाही रंगीबेरंगी आहे. >> मी प्रतिक्रियांबद्दल बोलत होतो रे.

.. .... ...

मला वाटते सध्या सर्व संबंध स्थगित करावेत (पर्याय १, पण तात्पुरता). त्यांचे सरकार सहकार्य करत आहे असे निष्पन्न झाले तर पुन्हा चालू करावेत. त्यांच्या कलाकारांनी, क्रिकेटपटूंनी भारतात काय मिळू शकते याची टेस्ट पाहिलेली आहे - चॅनेल्स मधल्या स्पर्धा, स्पॉन्सरशिप, आयपीएल ई. या संधी बंद झाल्या तर ते लोक तिकडे दबाव आणू शकतात आणि त्यांची लॉबी जोरदार असेल तर थोडाफार परिणाम होउ शकतो (यात बिझिनेसमन ही आले). खासगी चॅनेल्स वर भारत सरकार नियंत्रण करू शकत नाही पण व्हिसा नाकारू शकते. जानेवारी तील क्रिकेट दौरा सुद्धा स्थगित करावा. त्यांचे क्रिकेट मंडळ पूर्णपणे डबघाईला आलेले आहे. कोणताही देश तेथे जात नाही आणि या भारताच्या दौर्‍याच्या भरवशावर ते आहेत. भारत गेला नाही तर आणखी १-२ वर्षे तेथे कोणीही जाणार नाही.

कदाचित हा फार किरकोळ मुद्दा असेल आणि त्यांना या बाबतीत तिकडे कोणी विचारणार नाही, पण आवर्जून सद्ध्या संबंध ठेवण्याची भारताला काहीच गरज नाही (पाक ने भारतीय उत्पादनांना मार्केट खुले केले आहे का माहीत नाही, तसे असेल तर आपली व्यापारी लॉबी कदाचित विरोध करेल), त्यांनाच जास्त आहे.

कदाचित ही गोष्ट त्यांच्या सरकारशी negotiations मधे उपयोगी पडेल.

काही तरी तर करायलाच हवे, सध्यापुरता क्र. १.

प्रत्येक वेळी भारतात खुट्ट झाले की आपले गृहखाते, पोलीस हे पाकला दोष देतात. पाकचा नागरिक असणे आणि पाक सरकारचा सहभाग असणे यांत फरक करायला हवा. आपला भारतीय पण ऑस्ट्रेलियात अडकला होता, केवळ अपुर्‍या पुराव्यामुळे सुटला. ब्रिटन मधे पण बंगलोरच्या डॉ. चा बेत फसला. आता ऑस्ट्रेलिया/ ब्रिटन यांनी भारत सरकारला दोष थोडी दिला होता (आपले परराष्ट्र खाते तर किती ठवळा-ठवाळ करत होते, आपल्या प्रधानांना रात्रीची झोप लागली नव्हती ह्या गंभीर प्रकरणाने). पुढे भविष्यात भारतीय नागरिकांचा असल्या घटनांत सहभाग असणारच नाही असे म्हणणे धाडसाचे ठरेल. अर्थात भारत हा तपासात पुर्ण सहकार्य करतो, दुबळा पाक ते करु शकत नाही.

मला पाक सरकारचा शब्द प्रयोग stateless actors पटतो. पाक सरकारचे या अतिरेक्यांवर नियंत्रणच नसेल (लाल मशीद प्रकरण, ५०० Kg स्फोटके भरलेला ट्रक राजधानीच्या शहरात हॉटेलवर नेला जातो, भुट्टो यांच्या वरचा भिषण हल्ला... अजुन अनेक) तर ते काय यांच्या विरुद्ध करणार आहेत. मला असे वाटत रहाते, पाक लष्कर/ आय एस आय हे ह्या सर्व घटनेतील पडद्या मागचे सुत्रे हलवतात, ते पाक सरकारला अडचणीत आणण्याची एकही संधी सोडत नाही. जगाला दिसणारे पाक सरकार हे केवळ कळसुत्री बाहुले आहे. मी कुठेतरी वाचले होते, 'जगातील प्रत्येक देशासाठी सैन्य आहे, तर पाकमधे सैन्यासाठी एक देश आहे'.

रोग महाभयंकर आहे, त्याचे परिणाम (निरपराध नागरिकांचे वेगवेगळ्या पद्धतीने शिरकाण) दिसतात पण अजुनही पुर्ण निदान (खरा शत्रु कोण, त्याच्याशी कसा सामना करायचा) झालेले नाही.

असाम्या,
मॉड मंडळात आहेस काय सध्ध्या? ... Happy

>>आरतीची पोस्ट 'ठराविक ठिकाणी भारतातल्या मुसलमानांना प्रवेश नाकारावा/किंवा ओळखपत्राखेरीज प्रवेश देऊ नये 'अशी होती.
छ्या फारच मवाळ पोस्ट टाकतात बा लोक...:)

फ,
अरे मित्रा इथे एका वाक्यात (आकड्यात) उत्तरे द्या म्हणतायत केदार मास्तर अन तू लेका निबंध लिहीतोयस..

मि एव्हडच म्हणेन की वरील सर्व पर्याय आजतागायत वापरून झालेले आहेत. आपले लोक नुकतेच झोपेतून उठल्यामूळे (अतिरेक्यांन्नी कोजागिरी मांडली अन गाढव नेत्यांन्नी त्यांच्या महान आचार विचारातून चालू ठेवली..) आता नव्याने पुन्हा त्याच पर्यायांकडे आपण पहात आहोत.. इतका कीस तर देवाने सृष्टी निर्माण करायच्या आधीही पाडला नसेल (कसा पाडेल तेव्हा हितगुज नव्हते!). हे पाक ऑपरेशन करायचे तर निदान भूल द्यायचे इंजक्शन (pok मधिल अतीरेकी कॅम्प्स वर हल्ला) तरी हातात घ्या.. we are after treating symptoms..we should treat real disease (or "International Migrane" in Albrights words)
तेव्हा तूर्तास माझा पर्याय ४अ: pok मधिल टेररीस्ट कॅम्प्स उध्वस्त करावेत. कारण यात "आम्ही पण अतीरेक्यांविरुध्ध लढतच आहोत, भारताला या लढ्याविरुध्ध सहकार्य करू" हे पाकचे शब्द आपल्या फायद्यासाठी वापरून घेता येतील. असेही कंडोलीसा मदाम ने पाक ला या त्यांच्या भूमीवरील non state actors चा बंदोबस्त करावाच लागेल हे ठामपणे जाहीर केलेच आहे. (काय तर म्हणे non state actors: "हमारा अब उससे कोई लेना देना नही" आपल्या गुन्हेगारी मुलाबद्दल निरुपा रॉय ने असंख्य हिंदी चित्रपटात रटलेला डायलॉग आहे हा...)

>>>>> अन तू लेका निबंध लिहीतोयस.. Lol
खीखीखीखी, वाण नाहीतरी गुण लागायला नको का? Proud
बाकी चालूद्यात, मी वाचतोहे! Happy
...;
आपला, लिम्बुटिम्बु

माझा पर्याय क्रमांक ३
पुर्ण संबध तोडल्याने होणारे आयसोलेशन आपल्याला काहिच फायद्याचे नाही,त्यापेक्षा क्रमाक्रमाने म्हणजे आधी सांस्क्रुतिक मग आर्थिक आणी शेवटी राजकिय संबध तोडावेत.
भारतातल्या सर्व मुस्लिमांना दुय्यम दर्जाचे नागरिक करावे असा सुर काही जणांनी लावला आहे वर पुन्हा हा पर्याय लॉजिकल असल्याचाही दावा केला आहे.माझ्या मते अस्ल्या आत्यंतिक प्रतिक्रिया तेच लोक देउ शकतात जे अत्यंत झापडबंद संस्कार आणि वातावरणात वाढलेले असतात.अशा सर्वांसाठी तात्काळ उपायात आणता येईल अशी यादी देत आहे.
१] कोणत्याही मुस्लीम कलाकाराच्या कलेचा आस्वाद घेणे बंद करावे.उदा. रहमानच्या कोणत्याही गाण्यावर ताल धरु नये. महंमद रफी, साहिर वगैरे एकदम बकवास कारण ते आज जिवंत नसले तरी जेंव्हा होते तेंव्हा ते जिहादीच असणार.
२] आजपर्यंत कितीही आवडीचा असला तरी कोणत्याही मुस्लीम अभिनेत्याचा (जिवंत वा म्रुत) चित्रपट यापुढे पाहणे बंद करावे,मग तो 'ए वेन्सडे' मधला नासीर का असेना (उद्या उलटला म्हणजे?)
३] जो पर्यंत भारतीय क्रिकेट संघात सर्व खेळाडू हिंदु असणार नाहीत तो पर्यंत कोणताही सामना बघु नये किंवा त्याच्या यशात आनंद मानु नये,जिहादींच्या मदतीशिवाय पराभव आला तरी चालेल-पहिले झहीर खानला बाहेर काढा, पाकिस्तान्यांसारखा रिव्हर्स स्विंग टाकतो म्हणजे तो त्यांच्यातलाच.
४] आपल्यामधे आलेल्या सगळ्या मुस्लिम गोष्टी सोडून द्या,लग्नात शहनाई ,मेंदी काढणे एकदम बंद.
५] आपल्या भाषेत जेवढे घाणेरडे ़़जिहादी शब्द असतील त्यांची हकालपट्टी करावी.
ही यादी अर्थातच अपुर्ण आहे,गरजूंनी भर टाकत रहावी.
*************************************************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

तुमचे सर्व पर्याय हितगुजच्या अस्तीत्वाच्या विघातक आहेत.. अशाने मायबोली अडचणीत येवू शकते:
>रहमानच्या कोणत्याही गाण्यावर ताल धरु नये: "मला ऐकू आलेली चुकीची गाणी" हा फेमस bb बंद पडेल.
>कोणत्याही मुस्लीम अभिनेत्याचा (जिवंत वा म्रुत) चित्रपट यापुढे पाहणे बंद कराव>: "मि पाहिलेला चित्रपट" हा bb बंद पडेल. श्रेयस तळपदे अजून तितका फेमस नाही इथे
>तो पर्यंत कोणताही सामना बघु नये>: क्रिडाविषयक अख्खा विभागच बंद पडेल. बाकी कुठल्या खेळावर चर्चा करतो का आपण?
>मेंदी काढणे एकदम बंद: हा तर इथल्या अखिल महिला वर्गाच्या स्वातंत्र्यावर घाला आहे.. DJ ची परवानगी घेतली आहे काय?
>़़जिहादी शब्द असतील त्यांची हकालपट्टी करावी: अशक्य! अशाने इथेल्या साहित्त्यिक मूल्यात घट होईल.

असो. अधिक काय ते admin लिहीतीलच..
दिवे घ्या.

केदार ह्यातला कुठला पर्याय निवडावा तेच कळत नाही. पर्याय १ चा उपयोग नाही, दोन आणि तीन नकोच, कारण त्याचाही फायदा नाही.

चार सध्याच्या काळात कठीण आहे, एकतर मंदी आणि कुठले देश पाठीशी राहतील हे सांगता येत नाही. शिवाय कुठलाही पक्ष येउ दे, सगळे नेते जुनेपाने, थकलेले आणि मिळमिळित. त्यामुळे युद्धासाठी लागणारे कणखर नेतृत्व कोणात आहे असे वाटत नाही.
आणि आपण युद्ध पुकारले, तरी आतल्या वाळवीचे काय? ते काय युद्धाच्या वेळेस भारताच्या बाजूने असतील?

मग पुढे काय????

आहे की माझे पोस्ट .. पान नं १ वर.

जे मायबोलीच्या काळजित बुडाले आहेत ते सर्व .. admin ने जहिर केलेच आहे की इथे प्रकशित होणार्‍या

लिखाणाशी / विचारांशी मायबोली सहमत असेलच असे नाही [शब्द थोडे वेगळे असतिल, अर्थ हाच]

त्यामुळे मायबोलीची काळजी नसावी. शिवाय गेली ६ वर्ष मझा मायबोलीवरचा माझा वावर सर्वच बाफ वर अतिशय जबाबदार असाच आहे याची नोंद घ्यावी.

गेल्या आठवड्यापासुन लोकं आपल्या भावना ज्या शब्दांत व्यक्त करत आहेत ते एकदा 'बारकाईने' वाचले तर उदा. मुन्डी छाटणे,जाहीर जाळणे, सोलुन काढणे, समुद्रात ढकलुन देणे, गोळ्या घालणे किंवा
या मूर्ख लोकांना गोळ्या लागल्या तरी मला वाईट वाटणार नाही, शिवीगाळ [हा एकप्रकारचा गुन्हाच आहे] etc etc.

असे काहीही हिंसक मी लिहीलेले नाही हे लक्षत येते, त्यामुळे जर केस झालिच तर या सगळ्यांचा नंबर पहिला असेल. so माझी पण काळजी नसावी.

GS, उत्क्रुष्ट पोस्ट.

योग Happy

एक मिनिट.. एक तर आपण सर्व जण इथे पाकिस्तानशी संबंध कसे असावेत ह्या विषयावर मतदान करतोय. त्या विषयावर बोलताना भारतातल्या नागरिकांमध्ये धर्मावर आधारित भेदभाव करण्याचा संबंध येतोच कसा?

भारतात, भारताचेच नागरीक असलेल्या एका विशिष्ट धर्माच्या लोकांना भारतातल्या दुसर्‍या धर्माच्या लोकांनी दुय्यम वागणुक द्यावी हा पर्याय योग्य कसा असु शकतो? भारतात रहाणार्‍या १०% मुस्लीमांचा पाठींबा दहशतवादी कारवायांना असेल तर पूर्ण मुस्लीम समाजाला आपण दोषी का समजायचे. तोच न्याय मग हिंदूना (आणि इतर धर्मांनाही) लागू का नसावा? १९९३च्या बाँबस्फोटात मदत करणारे काय फक्त मुस्लीम होते? कस्टम्स अधिकारी, पोलिस अधिकारी यांची नावं आपण विसरलो आहोत का?

पाकीस्तान जिंकल्यावर फटाके वाजवणारे मुस्लीम आपल्याला दिसतात पण भारताचे कितीतरी खंदे खेळाडूही मुस्लीम आहेत ह्याच्याकडे आपण सोयिस्कर दुर्लक्ष करायचं का? भारतासाठी लढुन परमवीर चक्र मिळवणारे मुस्लीम लष्करी अधिकारीही आपण दहशतवादाला पाठींबा देणारे असं समजायचं का?

मागच्या आठवड्यात मुंबईत आतंकवादीयांनी केलेल्या हत्याकांडात मारल्या गेलेल्या नागरीकांत ४६ मुस्लीम होते. (रविवारच्या लोकमत मध्ये ही यादी आली होती) तेही सगळे दहशत्वादीच??

नाही मित्रानो, आपल्याला दहशतवादाशी आणि दहशतवाद्यांशी लढा द्यायचा आहे. हा लढा धर्मातीत आहे. टोकाचे हिंदुत्ववादी विचार आपण सुजाण नागरीकांनी न करता हा लढा धर्मवाद, भाषिक वाद यांच्या परे नेऊन जास्तीत जास्त व्यापक करायला पाहिजे. आपल्या अशा मतप्रदर्शनाने आपण स्वतःच मुस्लीम समाजाला 'वेगळं' असल्याचं फील देतोय. ते खरंच थांबवुया..

मायबोली हा फोरमही मराठी बोली असलेल्या कोणत्याही धर्माच्या व्यक्तीसाठी खुला फोरम आहे. तिथे एखाद्या धर्मावर अशी टीका योग्य नाहीच...

>>एक तर आपण सर्व जण इथे पाकिस्तानशी संबंध कसे असावेत ह्या विषयावर मतदान करतोय. त्या विषयावर बोलताना भारतातल्या >>नागरिकांमध्ये धर्मावर आधारित भेदभाव करण्याचा संबंध येतोच कसा?
सरिविनेशी सहमत.
योगः केदाराने त्याचा पर्याय क्र. ३ "३. काही बाबतीत संबध तोडून काही बाबतीत दृढ करायला पाहीजेत. ( कूठले तोडायचे व कूठले ठेवायचे ते लिहा)" असा लिहिलाय. माझं मत पर्याय क्र. ३ असल्याने त्यानुसार मी सविस्तर लिहिले. असो.

-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

तुमचे सर्व पर्याय हितगुजच्या अस्तीत्वाच्या विघातक आहेत.. अशाने मायबोली अडचणीत येवू शकते:
योग तुम्ही स्माईली द्यायला विसरलाय की खरच सिरियस आहात?
पण माझं पोस्ट इतकं 'मायबोलीविघातक' असेल असं वाटलं नव्हतं.:-P
*************************************************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

१. भारताने पाकशी सर्व संबंध तोडले पाहीजेत. (ह्यात त्यांचे कलाकार, रेल्वे, विमान, बिझनेस इ इ सर्व गोष्टी, शत्रू तो शत्रूच. त्यात भेदभाव नको. मग बिझनेसमन असो का झि वर येनारा गायक)
२. पाक वर सैन्याने चढाई करुन पाकला नामशेष करावे.

>>योग तुम्ही स्माईली द्यायला विसरलाय की खरच सिरियस आहात?
माझी पोस्ट तितकीच सिरीयस आहे जितकी तुमची पहिली पोस्ट Wink

Pages