Submitted by पुरंदरे शशांक on 17 November, 2010 - 02:12
सखी
सावळ गालावरी उमलली प्राजक्तासम मृदू फुले
नभि नक्षत्रे जशी उगवली मुखावरी ते हास्य खुले
सावळ तरिही सतेज कांती जाईची जणु वेल झुले
पदन्यास तो दिसे मनोरम रसिकाला करतोच खुळे
रेखिव भिवई किंचित उडवुन नजरेला ती नजर मिळे
हृदयी वाजे सतार झिणझिण नजर फिरूनी तेथ खिळे
मनी उमटती शब्द कितितरी ओठावरती अडखळले
विलग अधर होताच तरी ते नि:श्वासी संपुन गेले
केश रेशमी भालावरती क्षणभर जरि का भुरभुरले
अंगुलि-विभ्रम दिसे लाघवी जंव तू त्याते सावरले
सखी दिसशी तू रम्य उपवनी सघन, मनोरम, नितळ तळे
मंद मंद हास्याच्या लहरी निवविती तप्तसे मनोमळे
गुलमोहर:
शेअर करा
सुंदरच जमली आहे.
सुंदरच जमली आहे.
मनापासून धन्यवाद - सहेलि
मनापासून धन्यवाद - सहेलि
व्वा ..... अप्रतिम स्त्री
व्वा ..... अप्रतिम स्त्री सौंदर्याचं तितकच सुंदर वर्णन

आणि ते देखील संयत !
व्वा! अगदी कवीश्रेष्ठ
व्वा! अगदी कवीश्रेष्ठ बोरकरांची आठवण झाली.
आह्हा! मस्त कविता अगदी अगदी
आह्हा! मस्त कविता अगदी अगदी बोरकर आठवले
उमेश व श्यामली -
उमेश व श्यामली - अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद, पण एकच वाटते - कुठे कवीश्रेष्ठ बोरकर व कुठे मी. "पायीची वहाण पायी बरी". बाकी परिस्थिती आपण सूज्ञ जाणताच.
उल्हासकाका -काय म्हणू तुमच्या
उल्हासकाका -काय म्हणू तुमच्या "जाणकार" प्रतिसादाला ?
सावळ गालावरी उमलली
सावळ गालावरी उमलली प्राजक्तासम मृदू फुले
नभि नक्षत्रे जशी उगवली मुखावरती ते हास्य खुले
सावळ तरिही सतेज कांति जाईची जणू वेल झुले
पदन्यास तो दिसे मनोरम रसिकाला करतोच खुळे
या चार ओळी छान आहेत.
कुठे कवीश्रेष्ठ बोरकर व कुठे मी. "पायीची वहाण पायी बरी". >>> १००% अनुमोदन.
छानच.... पण मीटर आणि यती मधे
छानच.... पण मीटर आणि यती मधे कुठे कुठे गडबड होते आहे असं वाटलं. उदा.
सावळ गालावरी उमलली प्राजक्तासम मृदू फुले
नभि नक्षत्रे जशी उगवली मुखावरती ते हास्य खुले
मधे मुखावरती च्या ऐवजी मुखावरी योग्य वाटेल. त्याने लय पण सांभाळली जाइल...
बघा विचार करून... माझं काची चुकत असेल तर सांगा
आनंदजी - तुम्ही कायमच कविता
आनंदजी - तुम्ही कायमच कविता पूर्ण वाचून, अभ्यासपूर्वक मत मांडता - मग ते चूक कसे असेल. मी तुमच्या सांगण्यानुसार चूक दुरुस्त करत आहे. तुमचे मनापासून आभार. असेच सांभाळून घ्या, सुधारणा असेल तर तसे सांगा. मा बो वर हा संवाद आहे म्हणून येथे कविता सादर करायला आवडते.
मनापासून धन्यवाद शिंदेजी
मनापासून धन्यवाद शिंदेजी