दहि-बुत्ती

Submitted by मामी on 16 November, 2010 - 19:17
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तांदूळ, दूध, दहि, कोथिंबीर (बारीक चिरून).
फोडणीकरता (अंदाज आणि आवडीप्रमाणे) - तेल, मोहरी-जिरे, सुक्या लाल मिरच्या (लहान तुकडे करून), हिरव्या मिरच्या (अगदी बारीक कापून किंवा उभ्या अर्ध्या कापून), कढिपत्ता.

प्रमाणः दोन माणसांकरता
तांदूळ - एक वाटी
दूध - दोन ते अडीच वाट्या (गरम करून, साईसकट)
दही - २-३ टेबलस्पून

क्रमवार पाककृती: 

तांदूळ धुऊन काहीसा मऊ भात करून घ्यावा. तो होत असतानाच दुसर्‍या भांड्यात तेल घालून गरम झाल्यावर मोहरी-जिरे (हिंग नको), सुक्या मिरच्या, हिरव्या मिरच्या, कढिपत्ता घालून फोडणी करून घ्यावी. भात गरम असतानाच फोडणीत घालावा. चवीप्रमाणे मीठ घालून कालवून घ्यावा. त्यात दूध कोमट करून घालावे. साय असेल तर ती सुध्दा घालावी. पुन्हा कालवून झाकून ठेवावे. ५-७ मिनिटांत सगळे दूध भातात शोषले जाते. गार झाल्यावर आयत्यावेळी जेवढे हवे तेवढे दही घालून, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून नीट कालवून वाढावा.

अधिक टिपा: 

- आवडत असेल तर तळणीच्या मिरच्या वेगळ्या तळून कुस्करून घालाव्यात.
- ऑफिसमध्ये किंवा सहलीला वगैरे घेऊन जाताना थोडेच दही घालून करावा. म्हणजे आंबट होत नाही.

माहितीचा स्रोत: 
मूळ कृती आईची, त्यात स्वतः केलेले बदल
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय गंमत आहे नाही..दही भाताच्या रेसिपीच्या सुद्धा केवढ्या पद्धती! काय जबरदस्त आयडिया दिल्या आहेत. Only on Maayboli!

उसळी मिरच्या म्हणजे भरलेल्या सुक्या मिरच्या का? तळून, चुरडून खातात त्या? दही भाताबरोबर अत्यंत आवश्यक (मला).

कल्पु, त्या सांडगी मिरच्या. उसळी मिरच्या ह्या मिरचीच्या लोणच्यासारख्या असतात. खार असलेल्या. पण घरगुती उसळी मिरच्या विकतच्या लोणचाच्या तोंडात मारतील अशा असतात चवीला.

तुपावर हिंगजिर्‍याची फोडणी करून त्यात हिरव्या मिरच्या खरंगटून घालूनही छान लागतो दहीदूधभात. कोथिंबीर मस्ट!
याच रेसिपीत भाताऐवजी जाडे पोहे भिजवूनही मस्त लागतात.

मला दही भातात किसलेलं आलं पण आवडतं.
फोडणीत वर सगळ्यांनी लिहिलय तसं मोहरी, कढीपत्ता, भरलेली मिर्ची किंवा ती नसेल तर हिरवी मिर्ची, हिंग, उडिद-चणा डाळ घालून केलेली फोडणी आवडते.( पण तूपाचा वास नाही आवडत फोडणीत Sad )
गार्निश करताना कोथिंबीर + किसलेलं गाजर किंवा किसलेली काकडी.
डाळींबाचे दाणे दहीवड्याच्या दह्यात आवडतात :).

मला दही भातात किसलेलं आलं पण आवडतं.>>> मलापण... आणि तमिळ लोकांमधे अशीच रेसिपी असते. आम्ही नेहमी करतो. चांगली रेसिपी आहे ही पण...

नविनच प्रकार आहे हा माझ्यासाठी. मी नुसतं दही घालायचे. दुध माहीत नव्हत. आता नक्की करुन बघणार Happy

हायला काय लोकं आहेत. जरा मेला डायेटिंगचा विचार मनात आला, की झालेच सुरु मस्त रेसिपीज टाकणे अन त्यावर खमंग चर्चा करणे Angry

यम्मी यम्मी.... मामी Happy

हा तर 'दही बुत्ती फॅ क्ल' झालाय की Lol

एक से एक ग्रेट आयडियाज Happy

आता इथे उन्हाळा सुरु झाला की दही बुत्ती, दही भात... नेहमीच Happy

माझी पण एक आयडिया - फोडणीत थोडी हळद, मोहरी, हिंग, कढीपत्ता घालायचा आणि मग ती दहीभातात कालवायची. सोबत छोटे छोटे पांढरे कांदे कच्चेच, बुक्की मारुन फोडुन ... किंवा इथल्यासारखे गलेलठ्ठ असतिल तर बारीक चिरुन... आणि ताजी कोथिंबीर.... अहाहा... तोंपासु Happy

दहीबुत्तीत ताज्या पुदिन्याचा स्वाद पण मस्त लागतो Happy

असाच एक मस्त मस्त, सोपा आणि झटपट-विदाउट-मच-खटपट प्रकार म्हणजे, दही-ब्रेड.

याचे दोन उपप्रकार पडतात. पहिल्या प्रकरात घट्ट असे दही घ्यावे आणि त्यात फोडणी (तेल, हिंग, मोहरी-जिरे, ला. आणि हि. मिरच्या, कढीपत्ता व.) यात किसलेलं आलं (हे मस्ट) आणि मीठ घालून फेटून घ्यावे. एका ब्रेड स्लाइसला हे सारण लावून त्यावर दुसरी बसवावी आणि तव्यावर थोडे तेल वा तूप सोडून दोन्ही बाजूंनी शेकून घ्यावी. जरा स्किल लागतं पण दही घट्ट असेल तर सहज होतं. मस्त लागतं.

दुसरा प्रकार म्हणजे ज्यावेळी दही घट्ट नसेल त्यावेळी करता येण्यासारखा. यात वरिल प्रमाणे फोडणी करून त्यात ब्रेड्चे चौकोनी तुकडे करून परतावेत. खुसखुशीत आणि हलका ब्राऊन कलर आला की बास. मध्येच आलं आणि मीठ ही मिसळावे (पण हे पाहिजे तर दह्यातही घालता येईल). गरम असतानाच दही घालून खावेत.

याच सदराखाली घालता येईल अशी अजून एक पाककृती आहे. ती म्हणजे 'ओट्सचा उपमा'.

वर सांगितल्याप्रमाणे फोडणी करून त्यात किसलेले आले, मीठ घालून पाणी घालावे (दोन माणसांकरता अडीच वाटी). त्यातच दही (साधारण २ चमचे) घालून उकळी आणावी. मग त्यात ओट्स (एक वाटी) घालून एक वाफ आणावी. देताना कोथिंबीर घालावी.

हा प्रकार मायबोलीवर आधी आला असण्याची शक्यता आहे. पण या इथे ओघाने आलाय म्हणून उल्लेख करत आहे.

मस्त्!!आज संध्याकाळ्चा बेत ठरला!!!!
उसळी मिरच्या म्हणजे लोणच्याच्या मिरच्या चिरुन घ्यायच्या, त्यात मिरची लोणच्याचा मसाला मिक्स करायचा, वरुन तेल गरम करुन गार झालं की ओतायचं. मस्त लागतात!!

भारतात जीरा बटर म्हणून एक टोस्ट बन मिळतो. तो दहीवड्याच्या दह्यात घालून इंस्टंट दहीवडा बनवता येतो.

तो दहीवड्याच्या दह्यात घालून इंस्टंट दहीवडा बनवता येतो. >> अहाहा काय मस्त लागते हे.. हो पण बटर चांगल्या क्वालीटीचे हवे. मला देसाईबंधुंकडे मिळतात ते आवडतात. ( हा प्रकार दहीवड्यापेक्षा जास्त छान ल्लागतो.. हे माझे मत Happy )

दही-भातासारखाच ताकभात पण करायच्या वेगवेगळ्या पध्दती आहेत. ज्यांना अशा पध्दती माहीत आहेत त्यांनी लिहा पाहू....

माझी आजी ताक भात असा कालवायची..... एका मोठ्या भांड्यात गार झालेला भात मोकळा करून घ्यायचा. त्यात थोडे दूध, जास्त ताक, मीठ घालून एकजीव कालवायचे. अगदी किंचितसा मिरचीचा खर्डा घालायचा. कधी ती दाण्याचे कूटपण घालायची किंवा शेंगदाण्याची चटणी. आणि चिमटीभर साखर. हे सर्व एकत्र कालवायचे भरपूर. आणि मग असा घास घास भात जरी खाल्ला तरी जीव तृप्त व्हायचा.

जीरा बटर >>>> यम्मी.. ते आणले तर असे संपतात की काही कळतच नाही. पण आता करुन बघीन इंस्टंट दहीवडा

माझ्या एका साऊथ इंडियन मित्राने आम्हाला एकदा राजेशाही दही बुत्ती करून खिलवली होती. राजेशाही का?
तर दूध सायीसकट, साय जिरवत गरम केले. नंतर ते गार झाल्यावर जेवढे दूध तेवढेच दही घेऊन ते एकत्र फेटले, एकजीव केले. भात आधीच शिजवून गार झाल्यावर मोकळा करून ठेवला होता. दुसरीकडे कांदा बारीक चिरलेला, काकडी बारीक कोचवून, डाळिंबाचे व द्राक्षाचे दाणे वेगळे करून ठेवलेच होते. भातात ते दही+दुधाचे एकत्र फेटलेले मिश्रण घालून त्याने भात कालवून घेतला. त्यात चिरलेला कांदा, कोचवलेली काकडी, द्राक्षे, डाळिंब दाणे घातले. मग शुध्द तुपात जिरे, उडदाची डाळ व भिजवलेली हरबर्‍याची डाळ, भरपूर कढीपत्ता व काश्मिरी मिरच्यांची फोडणी केली. ती गार झाल्यावर ह्या भातात हलक्या हाताने कालवली. चवीनुसार मीठ, थोडीशी साखर घातली. वरून भ र पू र कोथिंबीर. अ ल्टि मे ट चव! हा आयटम तो मित्रमंडळींच्या पार्टीसाठी खास फर्माईशीनुसार तयार करतो. त्याची सर्व पूर्वतयारी आपण करायला लागते. हे साहेब नुसते येऊन मिक्सिंगचे काम करतात!!! Happy

सायो Happy

माझ्या भावाची ताकपोहे रेसिपी आठवल्याशिवाय राहू शकत नाही हे सगळे वाचून Happy

http://vadanikavalgheta.blogspot.com/2009/06/taak-pohe.html

आणि आमचे धनी ब्येष्ट दहीवडा करतात. पेशल रेसिपी - मी पण केलेलाच खाल्लाय केलेला कधी पाहिला नाहीये Proud

मामी, तांदूळ, दूध दही यांचे प्रमाण सांगणार का, तुम्ही घेतलेले?

>>>>> भरत मयेकर, तुम्ही खरचं विचारताय हे की चेष्टा करताय? असं काही दहीभाताकरता प्रमाण सांगणं कठीण आहे. पण समजा एक वाटीचा भात केला तर त्यात दोन ते तीन वाट्या गरम दूध आरामात शोषले जाते. मग आवडीप्रमाणे दही घालायचे. २-३ टेबलस्पून खूप झाले.

बर्‍याच जणांनी हा बेत करण्याचा संकल्प केलेला. खरंच कोणीकोणी केली दहीबुत्ती गेल्या दोन दिवसांत ते सांगा बरं........

दहीबुत्त्ती पहिल्यांदाच ऐकलंय! >>>> चिंगे, तुला एवढं लाजायला काय झालं ग? उगी उगी..... माझी गुणाची बाय ती..... आता तर ऐकलंयस ना. करूनही बघ मग.

Pages