भारत पाक संबंध कसे असावेत? मतदान.

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

भारत पाक संबंध.

मुंबई वरील हल्ल्यात पाकचा हात आहे हे सिध्द होतेच आहे. अश्या अनेक हल्यांमध्ये पाकचा हात असतोच. दर हल्ल्यानंतर आपण जाउ द्या म्हणून सोडून देतो. गेल्या ८ वर्षात अनेकदा आपनच पुढाकार घेउन दोन्ही राष्ट्रांमध्ये समझोता घडवुन आनतो ( मुशरफ बोलनी करायला येउन मध्येच न सांगता पळून जातात), बस सेवा, रेल्वे सेवा, पाकचे गायक, क्रिकेट इ इ आपण सर्व चालू करतो. पण ह्या समझोत्याचा फायदा तूम्हाला होताना दिसतो का?

ह्या पुढे भारताने पाक शी कसे संबंध ठेवायला पाहीजेत ह्यावर तूमचे मत द्या. सध्या मायबोलीवर ऑनलाईन पोलीगं नाही म्हणूण पर्याय आणि मत इथेच द्या. मत देताना ते का दिले ते ही लिहा.

भारत पाक संबंध कसे असावेत? ( surveys)

मतदान वरही दिलेल्या लिंकवरही येईल.

पर्याय.

१. भारताने पाकशी सर्व संबंध तोडले पाहीजेत. (ह्यात त्यांचे कलाकार, रेल्वे, विमान, बिझनेस इ इ सर्व गोष्टी, शत्रू तो शत्रूच. त्यात भेदभाव नको. मग बिझनेसमन असो का झि वर येनारा गायक)

२. भारताने पाकशी संबंध न तोडता ते अजुन दृढ कसे होतील ते पाहीले पाहीजे. (कारण पाक नागरिकांचा ह्यात काही हात नाही. फक्त काही लोकांनी त्यांचा जनतेला वेठीस धरले आहे त्यात त्यांचा काय दोष )

३. काही बाबतीत संबध तोडून काही बाबतीत दृढ करायला पाहीजेत. ( कूठले तोडायचे व कूठले ठेवायचे ते लिहा)

४. पाक वर सैन्याने चढाई करुन पाकला नामशेष करावे.

५. मला कुठलाच पर्याय मान्य नाही.

कृपया हे वैयक्तीक मत असल्यामूळे दुसर्‍या मायबोलीकराने पहिल्याला दोष देउ नये वा त्यावरून भांडन सुरु करु नयेत.

प्रकार: 

क्रमांक (२), पण केदारने जे कारण दिले आहे त्यासाठी नव्हे.

    blackribbon1.jpg

    माझा पर्याय क्रमांक तीन. पाकीस्तानशी आर्थिक व राजनैतिक संबंध जरूर तोडावे. युनो, सार्क ह्यांमार्फतही दडपण आणावे. पुरावे सगळ्या जगापुढे उघड करावे. अगदी अमेरीकेवरही दबाव आणावा की त्यानी पाकिस्तानला ह्या सगळ्या कारवायांची किंमत मोजायला लावावी. पण त्याच वेळी खेळाडू आणि कलाकारांमार्फत पाकीस्तानी जनतेची दुवा साधावा. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी जरुर धावुन जावे. वेळोवेळी पाकीस्तानी जनतेला ही जाणिव करुन द्यावी की भारतीय जनता तुमच्याशी बंधुभावाने वागेल मात्र तुम्ही तुमच्या राजकारण्यांवर दबाव टाका भारताच्या वाटेला जाऊ नका. मला जाणीव आहे हे खुप कठीण टास्क असेल आणि त्यासाठी खुप प्रगल्भ राजकारणाची गरज आहे.. पण wish list हीच आहे माझी...

    पर्याय १ व ४

    ------------------------------
    श्री राम राम रणकर्कश राम राम

    पर्याय निवडताना आपल्या इच्छेबरोबरच खरोखर तो पर्याय अस्तित्वात येणे शक्य आहे का हे विचारात घेणे मह्त्वाचे आहे असे माझे मत आहे.. पर्याय क्र. ४ हा त्यामुळेच माझ्यादृष्टीने बाद ठरतो .. कारण आपली लाख इच्छा असेल की आपल्या सैन्याने पाकिस्तानवर हल्ला करून त्यांना नामोहरम करावे पण सध्याची एकुणच जागतीक परिस्थिती पाहता ते शक्य नाहीये..
    पण हे मात्र नक्की की पूर्वीची गुळमुळीत धोरणे, सलोख्याच्या चर्चा वगैरे उपाय बाजूला ठेवुन आता कडक पाऊले उचलण्याचीही तितकीच गरज आहे.. आजपर्यंत आपण त्यांना खूप संधी दिली आहे पण प्रत्येक वेळी त्यांनी तिचा गैरफायदा घेतला आहे.. तेव्हा आता आपले पाकिस्तानविषयीचे राजकीय धोरण आमूलाग्र बदलण्याची आवश्यकता आहे.. पर्याय क्र. १ हे त्या दृष्टीने पहिले पाऊल असेल.. पण केवळ तेवढे करून थांबुन चालणार नाही.. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आक्रमकपणे पावले उचलुन ज्या ज्या ठिकाणी त्यांची मुस्कटदाबी करता येईल तिथे करून सतत त्यांना सार्‍या
    जगासमोर उघडे केले पाहिजे.. जेणेकरून एक जबरदस्त आंतरराष्ट्रीय दबाव सतत त्यांच्यावर राहील आणि त्यांना त्यांची धोरणे बदलण्यास भाग पाडेल.. मे बी त्या केसमध्ये दहशतवादी अड्डे ऊध्वस्त करण्याच्या दृष्टीने पाकीस्तानात एंट्री करायची संधीही मिळु शकेल असं माझं मत आहे.

    >>योग आणि बी, मी देखील त्या बाफ वर घरातला कचरा साफ करा हे लिहीलेच आहे. भारतीय सुरक्षा व्यवस्थेत आमुलाग्र बदल करावे लागतीलच. पण फक्त ते करुन भागनार नाही तर "पाक" बाबतीत काही तरी पावले उचलावी लागनार नाहीत का? ती काय असावीत हाच ह्या पोलचा उद्देश
    बर मग पर्याय क्र. ६: (निदान) भारतातील पाकीस्ताने उध्वस्त करा. Happy (आजचे सामना चे संपादकीय वाच)

    योगला अनुमोदन! Happy
    १. पाकबरोबर युद्ध छेडल्यास चीन कडून जो धोका निर्माण होईल, अरब कन्ट्रिज बरोबर तेल सप्लायसन्दर्भात जो ताण निर्माण होईल, त्यास द्याव्या लागणार्‍या उत्तराची तयारी होत नाही तोवर पाक नष्ट करणे वा भारतात समाविष्ट करणे शक्य होणार नाही
    २. पाकबरोबर युद्ध केल्यास, "देशान्तर्गत अस्तित्वातील पाकिस्तानात" जे उठाव व दन्गली होतील त्याचा बन्दोबस्त करण्याचे दृष्टीने आपण प्रशासनिक दृष्ट्या व जनता या नात्याने कुठेही तयार नाहीहोत
    ३. राजकीयदृष्ट्या वरील बाबी अमलात आणायच्या का असा नुस्ता विचार जरी केला तरी सद्य कॉन्ग्रेसी कडबोळ्याच्या सरकारची बोबडी वळते आहे, तेव्हा दीर्घकालीक धोरण आखुन त्यानुसार कार्यवाही होणे हे अशक्य कोटीतले, निदान आजतरी वाटते आहे.
    ४. वरील पर्यायच विचारात घ्यावे लागणार कारण "पाक" नावाचा अस्तनीतला निखारा कायमस्वरुपी जपत बसणे भारताला परवडणार नाही.
    ५. त्याकरता, सर्वप्रथम, अजुनही शिल्लक असलेल्या "अलिप्ततावादाच्या" धुन्दीतून थोडे बाहेर पडून "शत्रूचे शत्रू ते आपले मित्र" या नात्याने जास्तीत जास्त मित्र गोळा करुन, थोडे त्यान्चे खान्दे पण वापरायला सुरुवात केली पाहिजे! या बाबतीत सद्ध्यातरी नन्नाचा पाढा हे!
    ६. युद्ध वा युद्धजन्य परिस्थितीला सामान्यातला सामान्य माणूस मानसिक व जमल्यास शारिरीक दृष्टीने सामोरा जाण्यास तयार असावा म्हणून आत्ता पासून ताबडतोब ठराविक वया आतिल सर्वान्ना लष्करी/पोलिसी शिक्षण व दुर्घटनाप्रसन्गी वागावयाचे प्रशिक्षण देणे अत्यावश्यक हे, हे जर आज सुरू केले तर पाच वर्षानन्तर येणार्‍या/पाच वर्षात येऊ घातलेल्या परिस्थितीला सामना देण्यास एक राष्ट्र म्हणून आपण तयार असू! (ग्यानबाची मेख तिथेच आहे की नेहेरून्पासून, मिलिटरी/पोलिस यन्त्रणेला "डोईजड (?)" न होऊ देण्याच्या धोरणापाई, आज आपला १०० कोटी लोकसन्ख्येचा देश संरक्षण व "प्रतिकार" या बाबतीत सर्वाधिक कमजोर भासतोय्/आहे.
    ७. रोजगाराची निर्मिती/उपलब्धता करुन देणे व वरील प्रशिक्षण अमलात आणण्यासाठी, युद्धपातळीवर, देश्/राज्यातील प्रशासन यन्त्रणान्ना काबूत आणून वेळेस तिथली "साफसफाई" सुनिश्चितपणे पार पाडली पाहिजे, अन्यथा राजकीय धोरणान्चा बट्ट्याबोळ भ्रष्टाचारी प्रशासकीय यन्त्रणा कशा पद्धतीने आत्ता देखिल करते आहे, त्याचीच पुनरावृत्ती व्हायची.
    ८. भारत व पाकिस्तानातील देखिल, बहुसन्ख्य मुस्लिम हे पुर्वाश्रमीचे हिन्दूच आहेत, ते बाटलेले/जबरदस्तीने बाटवलेले आहेत, व मूळात ते आमचेच आहेत, त्यान्ना आम्ही दूर लोटणार नाही, त्यान्चे अहित करणार नाही, हे सर्वदूर ठसवले पाहिजे, हा मुद्दा मी पाकमधी "मुहाजीर व अन्य" या वादा सन्दर्भाने पुढचे पाऊल म्हणून मान्डत आहे. पाकी तसेच अन्य मुस्लिमान्ची भिस्त भारतातील १५ टक्क्यान्च्या आसपास असलेल्या मुस्लिम जनशक्तिच्या उपद्रवमुल्यावर आहे हे विसरुन चालणार नाही, तेव्हा राजनैतिक्/भावनिक पातळीवर त्याचा मुकाबला करावाच लागेल.
    ९. इन्धनाबाबतीतले परावलम्बित्व टाळण्यासाठी, सध्याच्या उद्योगजगताला "कामाला" लावले पाहिजे! त्यान्च्या असेट्स्/यन्त्रणा यातिल इन्व्हेस्टमेण्ट वाया जाऊ नये म्हणून केवळ पेट्रोल्/डिझेलवर चालणारी कार व तत्सम श्रेणीतली असन्ख्य वाहने तयार करून, देशाची इन्धनाबाबतची परावलम्बित्व वाढवण्याच्या त्यान्च्या, केवळ स्वतःच्या "नफेखोरीच्या" धोरणास आळा घातला गेलाच पाहिजे, त्याकरता, सौरउर्जेच्या संशोधन व वापराबद्दल प्रोत्साहन दिले पाहिजे वा सक्ती केली पाहिजे व केवळ मालवहातूक व मोठ्या प्रमाणावरील सार्वजनिक वाहतुकिसच क्रुड ऑईल व त्याच्या बायप्रॉडक्ट्स्ना इन्धन म्हणून वापरण्यास परवानगी दिली पाहिजे. हे होण्यास सुरुवात झाल्यापासून किमान पाच वर्षे तरी लागतील.
    आजवर रेल्वे मन्त्र्यान्नी, आपापल्या राज्यातून, मुम्बई व महाराष्ट्रात बेकारान्चे लोन्ढे कसे जातील त्यास सहाय्यभूत तेवढ्या एक्स्प्रेस गाड्या वाढविण्याव्यतिरिक्त काही एक केले नाही. स्वस्त माल-जन वाहतुकीस नविन रेल्वेमार्ग तयार करणे हे गेल्या साठ वर्षात फारसे कुठे झालेच नाही (कोकण रेल्वे हा अपवाद समजावा)
    रस्त्यान्बाबत सुवर्णचतुष्कोन बीजेपीने सुरू केला खरा, पण तेच सत्तेत राहिले नाहीत, तरीही, आत्ता आत्ता रस्त्यान्बाबत जाग येते आहे असे दिसुन येते आहे.
    १०. देशात येणारे "बान्गलादेशीय" वा अन्य मजुर, टाकाऊ/परके न समजता त्यान्च्या स्वस्त मजुरी मार्फत देशात शहराशहरातून भुमिगत रेल्वे, रस्ते, पुल यान्चे जाळे निर्माण करावे लागेल. लन्डनचे दुसर्‍या महायुद्धात टिकून रहाण्याचे एक रहस्य भुमिगत रेल्वेचे बोगदे हे होते, ते विसरुन चालणार नाही. चैनिच्या बाबीन्वर उत्पादन यन्त्रणा वापरण्यापेक्षा सिमेण्ट्/पोलाद सारख्या उद्योगान्वर जास्त लक्ष केन्द्रीत करावे, वेळेस "चायनिज" मालाचे सहाय्य अन्य बाबीन्करता घेवून, एकावेळेस दोनचार ठिकाणी शह द्यावा
    ११. देशातिल शैक्षणिक धोरणात आमुलाग्र बदल करावा लागेल, त्याचबरोबर कुत्र्यान्च्या छत्र्यान्प्रमाणे उगवलेले आधुनिक शिक्षणसम्राटान्चा बिमोड करुन शिक्षण सर्वान्ना स्वस्तात वा विनामोबदला उपलब्ध करुन द्यावे लागेल. असे झाले तर शिक्षणात देखिल घुसलेल्या आरक्षण वगैरे बाबीच कालबाह्य ठरतील. (असे आत्ता होत नाही कारण, शिक्षण महाग करून एकीकडे कमाई, दुसरी कडे जनतेला जातीजातीत भान्डवून मतान्च्या कमाईद्वारे सत्तेचा सोपान, अशी परिस्थीती आहे)

    अजुन बरेच मुद्दे आहेत!

    या व अशाच तयार्‍या केल्यास, पाकबरोबरचे सम्बन्ध कसे असावेत हा भारताचा प्रश्न न रहाता, भारताबरोबर सम्बन्ध कसे ठेवायचे हा पाकचा प्रश्न बनेल. जेव्हा बनेल तो सुदिन.

    पण ह्या सगळ्याकरता सत्ताबदल आवश्यक हे!
    त्याकरता "लिम्बूटिम्बू' सत्तेत यायला हवा! हो की नाही??? Proud
    ...;
    आपला, लिम्बुटिम्बु

    मयूरेशला अनूमोदन. पर्यायाचा विचार करताना त्याच्या व्यवहार्यतेचाही विचार व्हायला हवा.
    यामूळे माझ्या मते, ४ हा जितका अशक्य आहे, तितकाच २ हाही.

    पर्याय क्रमांक १ सुत्रबध्द रीतीने राबवावा. यामध्ये वेळेची मुदत देऊन आपल्या मागण्या मान्य न झाल्यास क्रमाक्रमाने खालीलप्रमाणे संबंध बंद करावेत.

    अ) क्रीडा-सांस्कृतिक संबंध बंद
    ब) व्यापारी संबंध
    क) राजनैतिक संबंध
    ड) दळणवळण (रेल्वे, विमान, बस इ.). पाणी, नैसर्गिक वायू यासरख्या गोष्टींबद्दलचे परावलंबित्व (असल्यास)
    हे सर्व करताना आंतरराष्ट्रीय संबंध व मुत्सद्देगिरीचा वापर करून इतर देशांवर दबाव आणणे चालू ठेवावे.

    युध्द करायची कितीही इच्छा झाली तरी शेवटी काय होणार? आपलेही नुकसान होणारच. अंतर्गत यादवी अन अस्थिरता माजेल, ते वेगळेच. २६/११ मुळे नेत्यांची लायकी उघड झालीच आहे. हे लढवय्ये आणि जनतेला धीर वगैरे देणार्‍यातले नेते आहेत, असे वाटत नाही.

    बाकी 'कचरासफाई' च्या मुद्द्यालाही अनूमोदन. पण इथला विषय तो नाही, हेही खरेच.

    --
    .. नाही चिरा, नाही पणती.

    लिम्ब्या,
    तू रहाच उभा, माझ एक मत नक्की! Happy
    केदार,
    "सुपंथ" नावाचा पक्ष स्थापन करूयात काय..? (एक सेरियस स्माइली आहे़ का इथे?)
    >अंतर्गत यादवी अन अस्थिरता माजेल, ते वेगळेच.
    SAJIRA,
    सद्य परिस्थिती काही वेगळी नाहीये... I would prefer a Lost War to the Lost Cause!
    असो. भारताचा वर्षानुवर्षाचा problem हाच आहे की नुसत्या वल्गना, ठोस कृति शून्य. या घडीला आवश्यकता आहे एका ठोस कृतिची. एकदा कृती केली की अपोआप लोकमत त्या मार्गाने वळवता येते, channelise करता येते. मुख्ख्य म्हणजे कृती केली की त्या अनुशंगाने आता "पुढे काय" व "कसे" याची पुन्हा धोरणे अन मार्ग ठरवता येतात. पण नुसतेच पोल-खोल चालू आहे..
    त्या पाच मृतांच्या अंतयात्रेत जमलेला लक्ष लोकांचा काळा (ज्युवीश) इसराईली समुद्र बघितला का? स्वाभिमान, देशाभिमान अन बन्धुभाव कशाशी खातात यांच्याकडून शिकावे. ढेकुणा एव्हडा देश पण भल्या भल्यांची वाकडी शेपटे यन्नी नळीत घातली आहेत..
    केदारभाऊ,
    माफ कर रे तुझ्या या "लोकमत" channel चा आम्ही NDTV करून टाकलाय..(ती बरखा येन केन प्रकारेण राज ठाकरे वर घसरतीये.. बाईंन्ना कुणितरी समजवा म्हणाव "घसरगुंडी" खेळायच हे वय, वेळ अन आपली तब्येत नव्हे.)

    Mala No. 4 cha Paryay Manya aahe. karan aata bharpur zal ,aata pakistan che he bhyad halle nahi sahan hot.aapan aata tari kiti nishpap jivanche pran gamavayche tyanchya prananchi kahich kimat nahi, kiti shurviraana gamavayche. sarkar la tar hya goshtincha kahich parinam hot nahi , aani haich nuksan phyada hot nahi karan tyanchyparyant ha halla kadhi pohochatach nahi, mhnun aapanach aaple sarkar banun aapala nirnay aapanach ghyala pahije. karan he musalman lok aata sampurna jagavar rajya karayala baghat aahet , aani mhunun tyanan dhada ha shikvayala havach. aani tysathi pahile paul aapan pudhe karayal have. aani Jagachya nakashavarun pakistanche navach mitvayle have.

    केदार,
    ताजा खबरः (TOI) "२० अतीरेकी तुम्हाला देत नाही जा" अस झरदारी (पाक प्रेसीडेंट) यान्नी ठणकावून सांगितले आहे.

    आता, या पोल मधे काही फेरबदल करायचा विचार आहे का..? भारताचे पुढील पाऊल काय असेल यावर पोल्/बेटींग घ्यायचय का..? गम्मत आहे हे म्हणजे गल्लीतील क्रिकेट भांडण आहे: घाबरत घाबरत भारत म्हणतोय ए बर्‍या बोलाने माझा चेंडू परत दे ह..पाक म्हणतय, आधी तुझा चेंडू माझ्याकडे आहे याचा पुरावा दे अन असला तरी नाही देत जा.. आता पुढ काय? भारत स्टंप्स उखडून मारामारी करणार का कंडोलिसा, ओबामा या अंपायर कडे तक्रार करणार? का थर्ड अंपायर च्या निर्णयाची वाट बघणार?
    मला तर हा सामना fixed वाटतोय..

    योग, अगदी. कोणत्या तरी वाहिनीवर असंही दाखवत होते आताच की ह्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात नाही. राईस बाई ने चावी फिरवली वाटतं..

    शक्य आहे.
    for a change हा सामना पंचांन्नीच fix केला आहे..
    पा़कला: हे पहा भारताने मारामारी केली तर क्रिकेट खेळायला तुम्हि शाबूत रहाणार नाही. या खेळावर तुमच्या राष्ट्राची, जनतेची economy चालेत आहे, तेव्हा चेंडू परत द्यावाच लागेल, निदान चेंडू चोरांचा अता पता द्यावा लागेल
    भारताला: मारामारी करून पिच उखडून काही उपयोग नाही. इथे तुम्हा दोघांन्ना खेळायला एकच पिच उपलब्ध आहे.
    या पेक्षा जे सतत चेंडू लपवतायत, त्रास देत आहेत त्यांन्ना शोधून ठोका..
    बर आहे: तिघेही मान डोलावतात अन चेंडूचोर अन खेळात विघ्न घालणार्‍या LET, LASHKAR, JAISH इत्यादी गल्लितील दादा टोळीन्ना कायमचे ठोकून काढण्याचे मान्य करतात.
    पंच जाता जाता: Al Kayda को हात लगानेका नही बे..वो मेरा शिकार है!!!

    पर्याय क्र. १ .. शिवाय पुढे जाउन भारतातल्या सर्व अती महत्वाच्या ठिकाणी मुसलमानांना प्रवेश बंद करावा valid identity proof नसेल तर.

    त्या proof वर ते ज्या भागात रहातात तिथल्या 'नगरसेवकाची' शिक्का,सही असावी. आणि त्यात काही गडबड आढळल्यास सही करणार्‍यास जबाबदार धरावे. त्यायोगे सुरक्षिततेची जबाबदारी ज्यांना आपण निवडुन देतो त्यांच्यावर असेल.

    काही निरपराध लोकांना त्रस होईल पण पर्याय नाही.

    <<शिवाय पुढे जाउन भारतातल्या सर्व अती महत्वाच्या ठिकाणी मुसलमानांना प्रवेश बंद करावा valid identity proof नसेल तर.

    त्या proof वर ते ज्या भागात रहातात तिथल्या 'नगरसेवकाची' शिक्का,सही असावी. आणि त्यात काही गडबड आढळल्यास सही करणार्‍यास जबाबदार धरावे. त्यायोगे सुरक्षिततेची जबाबदारी ज्यांना आपण निवडुन देतो त्यांच्यावर असेल.<<>>>

    भारत हिंदूंना आंदण दिला आहे का कोणी? या देशात राहणार्‍या नागरिकांची अशी प्रतवारी करण्याचा कोणालाही हक्क नाही.
    प्रत्येक मुसलमान हा गुन्हेगार, अतिरेकी असतो हे गृहितक चुकीचे आहे. प्रज्ञा, पुरोहित यांचे धर्म काय आहेत?
    ग्रंथालये जाळणं, नाटक पटलं नाही म्हणून रंगमंदिरात बाँबस्फोट घडवणं, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणं, शिक्ष़कांना काळे फासणं हासुद्धा दहशतवाद आहे, आणि गेली अनेक वर्षं निर्लज्ज हिंदुत्ववादी तो करत आले आहेत.

    जगातले पहिले आत्मघातकी दहशतवादी हे हिंदू होते. ULFA, नक्षलवादी, विरप्पन यांचा धर्म काय होता?

    इथे हिंदुत्वाची टिमकी वाजवणार्‍यांत आणि इस्लामच्या नावाखाली लोकांना मारणार्‍यांत फारसा फरक नाही. दोन्ही ठिकाणी सहिष्णुता, इतरांबद्दल आदर अस्तित्वात नाही. तिथे बंदुकी, ग्रेनेड्स वापरले जातात. इथे कीबोर्ड हाताशी आहे म्हणून बडवला जातो. तो तसा वापरता येतो त्याला कारणही सॅम पित्रोदा आणि डॉ. कलाम हे दोन अ-हिंदू आहेत, हे लक्षात घ्यावे.

    आज भारताची जी काही प्रगती झाली आहे, त्यात या देशातील प्रत्येक धर्मीयांचा सहभाग आहे. आणि सतत हिंदुत्वाची टिमकी वाजवणार्‍यांनी हे वेळीच ध्यानात घ्यावे.

    .....
    An eye for an eye makes the whole world blind.

    क्र. १ भारताने पाकशी सर्व संबंध तोडले पाहीजेत........

    Those who wish, write directly to Prime Minister *ATTACK PAKISTAN* on http://pmindia.nic.in/write.htm

    ------------------------------
    श्री राम राम रणकर्कश राम राम

    जगातले पहिले आत्मघातकी दहशतवादी हे हिंदू होते. ULFA, नक्षलवादी, विरप्पन यांचा धर्म काय होता?

    ........ विरप्पन आत्मघातकी पथकात होता हे मला तरी बुवा माहीत नव्हते ! Happy

    त्या proof वर ते ज्या भागात रहातात तिथल्या 'नगरसेवकाची' शिक्का,सही असावी. आणि त्यात काही गडबड आढळल्यास सही करणार्‍यास जबाबदार धरावे. त्यायोगे सुरक्षिततेची जबाबदारी ज्यांना आपण निवडुन देतो त्यांच्यावर असेल.<<>>>

    भारत हिंदूंना आंदण दिला आहे का कोणी? या देशात राहणार्‍या नागरिकांची अशी प्रतवारी करण्याचा कोणालाही हक्क नाही...........

    ..... प्रतवारी करण्याचा हक्क नाही, मग खोटी आयडेंटी घेऊन राहिले तर ते तुम्हाला चालेल का? तुमच्या घरात नेऊन का नाही ठेवत असले लोक ?

    हिंदुत्व वादी टिमकी वाजवतात... !

    हिंदुत्व वादी टिमकी नाही ढोल वाजवतात... शंख फुंकतात... रणवाद्ये वाजवतात .

    ( आणि तुम्ही जी टिमकी वाजवता आहात, ती कशापासून केली आहे हो ? मला तरी 'सुमार केतकरच्या' कातड्याचा वास यायला लागलाय!)

    ४ ......... कयामत का दिन.... अंतिम युद्ध !

    इट्समी, तुम्ही लिहिले आहे, ते केवळ अशक्यप्राय आहे. ते 'मानवी हक्क', 'सहिष्णूता' वगैरे दुर ठेवलं तरी.
    व्यवहार्य अशाच गोष्टी इथे सुचवल्या जाण्याची अपेक्षा आहे.

    बाकी मुद्द्यांबद्दल चिन्मयला अनूमोदन.
    जामोप्या अरे 'विरप्पन आत्मघातकी पथकात होता' असे कुठे म्हटलेय चिन्मयने?

    --
    .. नाही चिरा, नाही पणती.

    एक मिनिट, आपण बीबीच्या विषयाशी प्रामाणिक राहूया का?

    आरती, तू म्हणतेस ते शक्य नाही, अन् योग्यही नाही. अश्याने नसलेला असंतोष फोफावेल आणि लाभ कोणाचा होईल? इथे पाकिस्तानशी भारताचे संबंध कसे असावेत हा मुद्दा आहे. त्यावर इलाज केला, तर बाकीचे प्रॉब्लेम आपोआप सुटतील.

    भारतामधल्या मुसलमानांचा विषय प्रचंड गुंतागुंतीचा आहे. भारतामध्ये काय परिस्थिती आहे, आणि भारताचे पाकिस्तानशी कसे संबंध आहेत किंवा असावेत हा वेगळ्या बाबी आहेत.

    आपण एका संवदनशील विषयावर बोलत आहोत. सर्वांनीच थोडे सबूर.

    माझाही पर्याय १- सध्या. काही वर्ष कडक धोरण हवेच हवे. सर्व संबंध संपुष्टात आणले पाहिजेत. कठोर होण्याची वेळ आली आहेच. त्याचबरोबर त्यांचा दुटप्पीपणा जगजाहीर करून खासकरून अमेरिकेचेही तोंड बंद केले पाहिजे. त्यांना जी मदत अमेरिकेकडून होते, ती थांबली तरी पाकिस्तान बराच मवाळ होईल. अर्थात, चीन आणि रशियाची मदत होत राहीलच, पण त्याकडेही दबावतंत्र वापरता येईल.

    मग, क्र. ३- जिथे नागरी संबंध असतील, ते अंमलात आणता येईल.
    ------------------------------------------

    मी पन्त प्रधानाना संदेश पाठवला... घन्यवाद आश्विनी....

    Dear Sir,

    Terrorists kill innocent citizons in our country. On the other hand we are nursing so many terrorists in our jails. I request you to kill them immidiately so that our hard earned money will not be wasted.

    I also demand for immidiate hanging of Afjal Guru. If you are so innert about a person who can ruin our Parliament, how to beleive that you are sensitive to the terrorists who ruin the common men ?

    Dr. Gajanan

    मला नं. १ चा पर्याय मान्य आहे आणि पुर्ण पाठींबा.
    देशहित सर्वात आधी नंतर कलाप्रेम वैगेरे....

    The strength of a nation derives from the integrity of the home.

    कृपया हे वैयक्तीक मत असल्यामूळे दुसर्‍या मायबोलीकराने पहिल्याला दोष देउ नये वा त्यावरून भांडन सुरु करु नयेत - केदार. >>>

    चिनुक्स, साजिरा तुम्ही दोघांनीही हे वाचले नाही का ?? नसेल तर वाचा.

    माझे मत मी संगितले.

    आरती, तू म्हणतेस ते शक्य नाही, अन् योग्यही नाही. >> मला तरी योग्य वाटते.

    आरती,
    मी व्यवस्थितच वाचलं. पण पब्लिक फोरमवर काय लिहावं व काय लिहू नये, याला मर्यादा असतात. त्याचं इथे उल्लंघन झालं आहे.
    आपल्यावर व मायबोलीवर अशा लिखाणामुळे पोलीस केस होऊ शकते, याची आपल्याला कल्पना आहे का?
    ....
    An eye for an eye makes the whole world blind.

    नंबर ५,

    भारताची आर्थिक स्थिथी भक्कम करणे. तसे करताना देशच्या सिमेवर डोळ्यात तेल घलुन नजर ठेवणे व कायदे कड्क करणे हा उपाय आहे. हे सर्व करताना पाक कडे लक्ष देउ नये. Just ignore them. Try to compete with them where they are strong in export. Make sure they will become financially weak & you are strong. Increase military over period of time with the improved economy

    देशाची आर्थिक स्थिथी जर भक्कम असेल तर लोकामध्ये पण संमजसपणा वाढतो.

    २० वर्षापुर्वी पाक जिकल्यावर फटाके फोडणारे आता दिसत नाहीत. या उलट अतिरेक्याना पुरायला पण जागा देत नाही आहेत.

    भारताला अमेरिकेसारखे प्रगत नाही तर चिन किवा मलेशिया सारखी प्रगती आणली तरी खुप आहे.

    लिंबुटिंबु, मुद्दे चांगले लिहीले आहेत. अनुमोदन.
    .
    पर्यायांच्या बाबतीत मला कुठलाच पर्याय मान्य नाही. कुठलाही पर्याय क्रं. २ सोडल्यास इतर अवलंबले तर रोगावर ईलाज होण्याएवजी रोग जास्त बळावु शकतो. आणि क्र. २ फार प्रभाव पाडु शकत नाही.

    LT.. योग्य मुद्दे लिहिले आहेत..

    योग चे मुद्दे पण पटले..

    जामोप्या च्या 3 डिसेंबर, 2008 - 04:51. च्या पोस्ट ला अनुमोदन...

    आरती तू सुचवलेला मार्ग लॉजिकल असला तरी सरकारला प्रत्यक्षात आणता येईल असा नाही. अर्थात इथे केलेया इतर सर्व सूचना लगेच प्रत्यक्षात आणल्या जाण्यासारख्या आहेत असेही नाही.

    मात्र तू 'सर्व मुसलमानांना कैदेत टाकाचे वगैरे' सारखे काहीतरी भयंकर अमानवी सुचवले आहेस असा आव आणून जे घसा ताणून लगेच तुटून पडले आहेत त्यांना अर्थातच इतिहास वा वस्तुस्थितीचा अभ्यास करायची व त्याद्वारे मत मांडायची आवश्यकता वाटत नसावी. तसेच दुसर्‍यांना 'पब्लिक फोरमवर काय लिहावं व काय लिहू नये' वगैरेच्या मर्यादा शिकवतांना स्वतःही दुसर्‍यांना निर्लज्ज वगैरे संबोधून त्या मर्यादा ओलांडत आहोत का याचेही भान दिसत नाही. आणि आपल्यालाच मायबोलीची काळजी असल्याचा आव आणण्याच्या अज्ञानाधारित गिमिकबद्दल तर न बोलणेच बरे.

    आता तुझ्या मुद्द्याबद्दल...

    (१) भारतात या घडीला दोन कोटींहून अधिक बांगलादेशी मुसलमान घुसखोरी करून वास्तव्यास आहेत. अनेक महत्वाच्या शहरांना त्यांनी अक्षरशः विळखा घातला आहे.

    (२) सौदी अरेबियाच्या पैशांवर चालणारे हजारो वहाबी मदरसे सध्या भारतीय भूमीवरच जिहादचे शिक्षण देण्यात, आणि कडवे मुसलमान घडवण्यात मग्न आहेत.

    (३) भारतातील अति महत्वाची ठिकाणी उडवणे, तिथे हल्ले करणे यात जिहादी अतिरेक्यांचाच सहभाग आढळून आला आहे. हे वाढण्याची शक्यता आहे.

    (४) तेंव्हा सावध असण्याची गरज आहेच. अशा अतिमहत्वाच्या ठिकाणी एखादी व्यक्ती संशयास्पद रित्या घुटमळतांना दिसली तर सावध व्हायला हवेच. सद्य परिस्थितीत ती व्यक्ती मुसलमान असेल तर बघणार्‍याने अधिक सावध होणे ही अगदी सहज प्रतिक्रिया आहे, तशी आपापली होईल की नाही ही प्रत्येकाने आपपल्या मनाशी कबूल करायची गोष्ट आहे.

    (५) शिवाय हे काही पहिल्यांदाच सुचवले गेले नव्हते. थोडे मागे जाऊन पाहिले, तर लक्षात येईल की १९७१ च्या युद्धाच्या वेळेस मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या धरणांच्या, व तत्सम महत्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षा व्यवस्थेत असलेल्या मुसलमानांना दूर करण्यात यावे असे खुद्द इंदिरा गांधींनी आदेश दिले होते. हे नंतर उजेडात आल्यावर त्यावर मुस्लिमवाद्यांकडून थोडा गदारोळही झाला होता.

    (६) ऑपरेशन ब्लू स्टार नंतर इंदिराजींच्या व्यवस्थेत असलेल्या शीख अंगरक्षकांना दूर केले जावे अशी सूचना केली गेली होती, दुर्दैवाने 'मी त्यांना चांगले ओळखते' असे म्हणून इंदिराजींनी ती फेटाळली होती.

    (७) थोडक्यात काय तर रेशियल प्रोफायलिंग भारतात सरकारी पातळीवरही नवे नाही. अगदी आज सुद्धा आमदार निवासात एकाला रात्री प्रवेश नाकारला आणि त्याच्याकडून काही मराठी वाक्ये व अस्सल मराठी शिव्या वदवून घेतल्यावरच त्याला आत सोडले गेले.

    (७)सर्व ११० कोटी लोकांवर नजर ठेवणे साधनसंपत्तीच्या दृष्टीने अशक्यच असते, त्यामुळे संभाव्य धोका कोणाकोणापासून आहे, यांचे प्रोफायलिंग ही अगदी सहज आणि आवश्यक अशी प्रक्रिया आहे. ती जगभरच केली जात आहे. त्या प्रोफाइलिंग मध्ये 'धर्म' ही सुद्धा एक मुख्य बाब असणे हे साहजिकच अशासाठी आहे, की जगभर इस्लामच्या नावाने दहशतवाद सुरू आहे.

    (८)एखादा दहशतवादी एका धर्माचा असणे आणि धार्मिक आधारावर दहशतवाद व त्याचे तत्वज्ञान उभे असणे यात फार मोठा फरक आहे. आता नक्षलवाद्यात बहुसंख्य कदाचित धर्माने हिंदू असतील, पण ते हिंदू तत्वज्ञानासाठी वा एखाद्या हिंदुत्ववादी कामासाठी दहशतवाद माजवत नाही आहेत, तर कम्युनिस्ट राज्यक्रांतीसाठी दहशतवाद माजवत आहे. एलटीटीई हा श्रीलंकेत वेगळ्या तामीळ राज्यासाठी सुरू झालेला राज्यांतर्गत फुटीरतावाद आहे. पण हे समजून घेण्यासाठी आवश्यक तेवढा अभ्यास न करता सोयिस्करपणे त्याला हिंदू दहशतवाद असे नाव देणे या वॄत्तीची निंदा करण्याकरता मी अधिक वेळ व जागा वाया घालवत नाही. शिवाय तशा भाषेत लिहिण्याचा मला सराव नाही.

    (९) मात्र अधिकृतपणे एकाच धर्माच्या लोकांना ओळखपत्रे देणे वगैरे शक्य नाही, सध्याच्या राजकीय वातावरणात तर अजिबात नाही. कुठलेच सरकार असे जाहीरपणे करणार नाही.

    (१०) थोडक्यात आरतीने काहीतरी भयंकर आक्षेपार्ह लिहिले आहे असे भासवून ती संधी साधून जो फुकाचा गहजब माजवला आहे, तो अर्थहीन आहे. मतभेद असू शकतात पण त्याबद्दल वैयक्तिकरित्या तुटुन पडून तिला वा मुसलमानांचे सतत समर्थन न करणार्‍यांना थेट जिहादी दहशत्वाद्यांच्या पंक्तीत नेऊन बसवण्याच्या असंस्कृत भुमिकेला प्रत्युत्तर द्यायची मला इच्छा नाही. पण नोंद घेतली आहे एवढेच नमूद करू इच्छितो.

    जगातले पहिले आत्मघातकी दहशतवादी हे हिंदू होते >> चिन्मय न्हवते. प्लिज तू पण बेजवाबदार विधाने करु नकोस. पहिले आत्मघातकी ख्रिश्चन होते. हिंदू न्हवते. अशा विधानांमूळे होते काय की वाचन कमी असनारे लोक ते विधान खरे समजतात आणी दिशाभूल होते.

    इथे हिंदुत्वाची टिमकी वाजवणार्‍यांत आणि इस्लामच्या नावाखाली लोकांना मारणार्‍यांत फारसा फरक नाही. >> सिरिअयली?? प्लिज थिंक अबाऊट इट. तू देखील सर्वांना एकाच नावेत बसवत आहेस अस वाटत नाही का? असे जनरल स्टेटमेंट जे हिंदूत्ववादी करतात तसाच तू पण झाला नाहीस काय? मग तूझ्या विचारसरनीत आणी इतरांचा फरक तो काय?

    ('तू पण' ह्यासाठी लिहीले की तू नेहमी करत नाहीस म्हणून आणी त्या पण ला महत्व आहे त्यामूळे गैरसमज (त्या बीबी सारखा) करुन घेउ नकोस)

    योग तू म्हणतोस तशी पार्टी काढायला पाहीजे.
    झरदारींनी आपल्याच देशात खटला चालविला जाईल असे सांगीतले आहे. म्हणजेच चित भी मेरी और पट भी.

    जनता वादविवाद नको. मत द्या. इतर बाफ वर आपन ती खोडतंच असतो.

    ___________________________________
    "अहिंसेची नशा दारूपेक्षाही घातक असते. अट्टल अहिंसाबाज नशेत वाट्टेल ते बरळत सुटतो"
    आमचे प्रेरणास्थान प्र.के.अत्रे

    Pages