भारत पाक संबंध कसे असावेत? मतदान.

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

भारत पाक संबंध.

मुंबई वरील हल्ल्यात पाकचा हात आहे हे सिध्द होतेच आहे. अश्या अनेक हल्यांमध्ये पाकचा हात असतोच. दर हल्ल्यानंतर आपण जाउ द्या म्हणून सोडून देतो. गेल्या ८ वर्षात अनेकदा आपनच पुढाकार घेउन दोन्ही राष्ट्रांमध्ये समझोता घडवुन आनतो ( मुशरफ बोलनी करायला येउन मध्येच न सांगता पळून जातात), बस सेवा, रेल्वे सेवा, पाकचे गायक, क्रिकेट इ इ आपण सर्व चालू करतो. पण ह्या समझोत्याचा फायदा तूम्हाला होताना दिसतो का?

ह्या पुढे भारताने पाक शी कसे संबंध ठेवायला पाहीजेत ह्यावर तूमचे मत द्या. सध्या मायबोलीवर ऑनलाईन पोलीगं नाही म्हणूण पर्याय आणि मत इथेच द्या. मत देताना ते का दिले ते ही लिहा.

भारत पाक संबंध कसे असावेत? ( surveys)

मतदान वरही दिलेल्या लिंकवरही येईल.

पर्याय.

१. भारताने पाकशी सर्व संबंध तोडले पाहीजेत. (ह्यात त्यांचे कलाकार, रेल्वे, विमान, बिझनेस इ इ सर्व गोष्टी, शत्रू तो शत्रूच. त्यात भेदभाव नको. मग बिझनेसमन असो का झि वर येनारा गायक)

२. भारताने पाकशी संबंध न तोडता ते अजुन दृढ कसे होतील ते पाहीले पाहीजे. (कारण पाक नागरिकांचा ह्यात काही हात नाही. फक्त काही लोकांनी त्यांचा जनतेला वेठीस धरले आहे त्यात त्यांचा काय दोष )

३. काही बाबतीत संबध तोडून काही बाबतीत दृढ करायला पाहीजेत. ( कूठले तोडायचे व कूठले ठेवायचे ते लिहा)

४. पाक वर सैन्याने चढाई करुन पाकला नामशेष करावे.

५. मला कुठलाच पर्याय मान्य नाही.

कृपया हे वैयक्तीक मत असल्यामूळे दुसर्‍या मायबोलीकराने पहिल्याला दोष देउ नये वा त्यावरून भांडन सुरु करु नयेत.

प्रकार: 

मला नंबर १ चा पर्याय मान्य आहे. गांधीजींचं अहिंसा नको छाप गुळमुळीत धोरण सोडून देऊन कडक मार्ग/धोरण अवलंबायची वेळ आलेली आहे.

पर्याय क्र. २.
.....
An eye for an eye makes the whole world blind.

सायोला अनुमोदन. गेली कित्येक वर्षे, त्यांनी जे काही किळसवाणे प्रकार आरंभले आहेत, अश्यांना परत परत संधी देणे म्हणजे स्वतःच्या पायावर कितीतरी धोंडे पाडून घेणे.

केदार, माझा पर्याय क्र.५ : न्युक्लिअर बाँबने पाकिस्तान आणि बरोबर अफगाणिस्तान पार उडवून टाका.नामोनिशाण रहाता कामा नये. ह्यामुळे बाकीच्या मुस्लिम देशांनाही दहशत बसेल.

क्र. १ भारताने पाकशी सर्व संबंध तोडले पाहीजेत.

Lol सायो, बर्‍याच देशी लोकांनी आणि शिकागोच्या मराठी लोकांनी असेच बोलून दाखविले. मला ह्यात काही आश्चर्य वाटले नाही कारण आता हिच भावना दूढ होत चाल्लीये. हे करणे शक्य नाही पण ते तूझे मत आहे म्हणून मी तो पर्याय ऍड करतो. (४ नं)

माझे स्वतचे मत. पर्याय क्रं १ का ते ही लिहीतो.

इतके दिवस मला स्वतःला पाक सोबतचे संबध खुप चांगले राहून सलोख्याने हा प्रश्न सुटावा असेच वाटत होते. संसद हल्ल्या नंत्तर सुध्दा मी ते मत फक्त थोडेच बदलले होते. पण आता खरच डोक्यावरून पाणी गेलेय.
एकीकडे म्हनायचे की जनता विरोधी नाही, दुसरीकडे जनता म्हणनार ये सियासती लोगोंका काम है हमारा नही. अरे पण वो सरकार तो तूम्हाराही है. हमे क्या लेना देना. आमच्या दृष्टीने आम्ही पाक जनता व पाक सरकार असा भेदभाव का करावा? आणी कितीदा करावा? तूमच्या लोकांना आम्ही इकडे गाने गाण्यापासून ते क्रिकेट खेळन्या पर्यंत बोलावत असतो, डोक्यावर घेतो पण पाक नेहमी काहीतरी खुसपट काढत असते. ह्याचा निषेध म्हणून आपण सर्व व्यवहार ठप्प पाडायला पाहीजेत. आजच्या काळात युध्द हे फक्त शस्त्रानेच लढावे असे काही नाही, इकॉनॉमी नेस्तनाबूत करुन पण ते लढता येते. मग जर तूमचे नागरीक भारताच्या सामान्य लोकांचा विरोधात असतात तर भारतीय लोकांनी तरी तूमच्या बाजूने का उभे राहावे. शिवाय इतके दिवस माझ्यासारखे "हिंदू" देखील तूमच्याशी सलोखा ठेवायला तयार होते. मग तूम्ही का नाही? ईंटंरनॅशनल मिडीया मध्ये सध्या एक लेख गाजतोय तो म्हणजे इंग्रजांनी १९४७ ला मुस्लीमांना सत्ता न दिल्यामूळे बरेच प्रश्न उभे राहिलेत कारण भारतावर इंग्रजांचा आधी मुस्लीमांचे राज्य होते. कमाल आहे? हे लोक ऐकून तरी कसे घेतात? काल अजुन एक लेख वाचला त्याचा विषय होता, आता भारतात मुस्लीमांचे शिरकाण होणार. लेखक अमेरिकन. च्यायला बास झाल हे. माझ्याक्डून मी कूठल्याही पाकी नागरिकाला, कसल्याही प्रकारचा सपोर्र्ट करनार नाही. मग ते झि टिव्ही वर त्यांचे गाणे पाहने असो वा अमेरिकेतील पाक दुकानात जाउन ग्रोसरी घेणे. माझ्या सहनशिलतेचा अंत होत आहे. उद्या चिन्ह बदलली तर नक्कीच मी स्वत पुढाकार घेउन त्यांचा जनतेला साथ देईन पण तो पर्यंत ......

पर्याय क्रं १. हे माझे मत आहे.

पर्याय १. केदारशी पूर्ण सहमत.

पर्याय क्र. १...
'कलेला प्रांताच बंधन नसत' असे असले तरीही मला अस वाटत याच कारण पाक कलाकारांना, खेळाडूना आपल्या भारत देशातुन किवा अनिवासी भारतियांकडुन जो पैसा मिळतो , त्याचा फायदा कराच्या रुपाने तरी पाक ला होतो, त्याच पैश्याचा वापर भारतात बाँबस्पोट इतर दहशती कारवाया करण्यासाठी होतो.
म्हणुनच कुठल्याही पाक कलाकाराच्या कार्यक्रम, मेड ईन पाक गोष्टींवर बहिष्कार घातला पाहिजे असे माझे मत आहे.

माझ्या मते खेळ, संगीत, संस्कृतीची आदानप्रदान ही प्राथमिक सुरक्षे नंतर येते. तीच आत्तानाही त्यामूळे मी पण पर्याय क्रं १ ला मत दिले. मला ४ न ही आवडला. चिन्नू ने लिहील्याप्रमने त्या संधी मिळालेल्या आहेत गेल्या ८ वर्षात, आणि गेल्या दोन वर्षात त्यांचा दहशतवाद फार वाढला आहे.

ते सगळ 'आदानच' करतात 'प्रदान' काहीच नाही. त्या दाउद बद्दल कितीदा पुरावे दिले तरी तो काही मिळत नाही. आता त्यांचाकडुनही काही प्रदान होउदेत मग आम्ही त्यांना देऊ.

पर्याय १.

केदार,
तूझ्याशी सहमत. काही वर्षापूर्वी जेव्हा माझा क्लासमेट मला सांगायचा की कुठलेही पाकीस्तानचे प्रॉडक्ट घेवू नकोस त्यातला किमान ५% पैसा दहशतवादासाठी जात असेल. पाकीस्तानी वस्तू विकत घेणे म्हणजे प्रत्यक्ष दहशतवादाला पैसे देणे. तो स्वतः कधीच पाकचा माल विकत घ्यायचा नाही कितीही स्वस्त मिळाला तरी. तेव्हा हे सगळे ऐकुन मला वाटायचे की हा किती अयोग्य सांगतोय, माझ्या मित्राचे वागणे बायस्ड आहे. पण खर तर आता तसे नाही वाटत. माझा मित्रच बरोबर होता असे म्हणायची वेळ आलीये.
माझ्यामते भारताने पाकशी व्यापारी संबंध तोडावेत. It should affect their economy. आपला एक नया पैसा सुद्धा पाकिस्तानला जायला नको, कुठल्याच मार्गाने.
मला वाटते ते क्रिकेट खेळाडु, गायक पाठवणे, बस-ट्रेन सेवा इ. इ. हे सगळं प्रसिद्धी, पैसा, राजकीय फायदा (आम्ही प्रयत्न करतोय असे दाखवणे) डोळ्यासमोर ठेवुन ऑर्गनायझर करतात. त्याचा देशहिताशी काही संबंध नव्हता, नाही. फक्त त्यांचा स्वतःचा स्वार्थ आणि स्वार्थच आहे.

Yes It should affect their economy. ते जर भारताच्या इकॉनॉमीला गाळात नेत असतील तर आपणही त्यांचा इकॉनॉमीला गाळात नेन्याचा हातभार लावला पाहीजे. ऍरो, टॉमी, अश्या अनेक कंपनीचे बरेच टि शर्ट पाक मधून आयात केले जातात. पुढच्या वेळी खरेदी करताना 'मेड इन' कंट्री पाहूनच खरेदी करा. पाक आणि बांग्लादेश. नो मॅटर व्हॉट. निदान तेवढं तर तूम्ही परदेशात राहून करुच शकता.
मला नाही वाटत बिसीसीआय आता पाक मध्ये दौरा काढेल. त्यांनी तो रद्द केला पाहीजे.

तात्याविंचु ना अनुमोदन. माझि पहिलि पसंति क्रमांक ५ ला आहे कारण दोन्हि देशांत व्यापारि सबंध प्रस्थापित झाले तर दोन्हि बाजुंचे हितसंबंध मिळुन दहशतवादि कारवाया होउ देणार नाहित अस माझ मत आहे. पण सध्याच्या परिस्थितित ते शक्य होइल अस वाटत नाहि. मुळात तिथल्या सरकारचा या दहसशतवाद्यांवर नियंत्रण नाहिये आणि (भारताच्या बाबतित) ते आणु इछ्छित नाहित हे उघड आहे.

सध्याच्या परिस्थितित रुपालिच्या मित्राच मत हि वस्तुस्थिति वाटते. एकंदर पाकिस्तान वेगाने फाळणिच्या दिशेने चालला आहे अस बर्‍याच तज्ञांच मत आहे त्यात मला बरच तथ्य वाटते अश्या परिस्थितित पर्याय क्र. १ कदाचित काळाचि गरज ठरावा, माझ मत मात्र मी क्र. ५ ला दिल.

पर्याय क्र. १

भारताने काही धर्मशाळा उघडून ठेवलेली नाहिये दुसर्‍या देशाच्या जनतेची काळजी घ्यायला.... त्यामुळे त्यांच्या देशातल्या नागरिकांचा प्रत्यक्ष संबंध असो वा नसो, सर्व मार्ग बंद केले पाहिजेत.... त्यांनी आपला विकास स्वतः करावा...

कला, क्रिडा, उद्योग आणि इतर कोणत्याही क्षेत्रात भारताला पाकिस्तानची तिळमात्र गरज नाहिये.... जेव्हा गरज भासू लागेल तेव्हा क्र २ चा विचार करता येईल....

पर्याय १ आणि ४ दोन्हि अमलात आणावे अस माझ प्रामाणिक मत आहे.
सर्व प्रकारचे संबध तोडुन टाकुन सैन्याने पुर्ण तयारिनिशि हल्ला करावा...एकंदरित पाकड्यांना जरब बसेल अशि कोणतिहि कारवाइ करावि.

प्राजक्ताला अनुमोदन. आता डोक्यावरुन पाणी जाऊन जाऊन डोक्यावर महासागर झाला आहे. आपण पडलोय तळाशीच.
माझं मत पर्याय १ आणि ४ दोन्हीला

पर्याय क्र.४ आगोदर आणि क्र.१ त्यानंतर. खूप लाड झाले पाकिस्तानचे आणि त्यांच्या भारतिय नागरिकांचे. क्राईम ब्रांच मधे एक खूप जवळचा मित्र आहे तो म्हणाला गेल्या २० वर्ष पोलिस सेवेत आहे पण बुधवारि रात्रि व्हि.टी. स्टेशन वरील द्रुश्य (प्रत्यक्श) पाहून भडाभडा ओकलो. प्रोझॅक घेतल्याशिवाय झोप येत नाही.
कल्पू

सारेगमप किंवा तत्सम दुसर्‍या रिऍलिटी शोजमध्ये पाकिस्तानी कंटेस्टंट्स असतील तर त्यांना वोट करणं पूर्ण बंद करा आणि आपल्या माहितीतल्यांना ही सांगा.

पाकीस्तानवर हल्ला करू नये. गरज नाही. ते आपणहून स्वतःचा नाश करताहेत. यापुढे त्यांच्याशी क्रिकेट, संगीत, व्यापार इ. सर्व बंद करावे. जसा दक्षिण अफ्रिकेवर बहिष्कार घातला होता तसा त्यांच्यावर बहिष्कार घालावा! आपल्या राजकीय सामर्थ्याच्या (?!) जोरावर इतरहि राष्ट्रांवर दबाव आणावा की पाकीस्तानशी संबंध ठेवल्यास त्यांच्याशीहि संबंध तोडून टाकू.

पण तसे होणे नाही. पैशामागे लागलेले लोक, आपल्याच कस्टमला लाच देऊन पाकशी चोरटा व्यवहार चालूच ठेवतील. नि पाकहून शस्त्रे, पैसा येणे थांबणार नाही, सध्या कुठे परवानगी आहे एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर शस्त्रे आणण्याची? पण आलीच ना? ते कसे थांबेल? उलट अधिक्रूत बंदी जाहीर केली की पैसे खाणारे अधिकारी जास्त पैसे मिळण्याच्या आशेने आणखी मोठ्या प्रमाणावर बेकायदा व्यवहार करतील पाकशी.

दहशतवाद, अतिरेकी हल्ले हे सगळे भारतात खोलवर रुजले आहेत. निष्काळजी पणा, पैसे खाऊ पणा, सत्ता मिळवण्यासाठी देशद्रोही लोकांची मदत घेणे, बरेचसे अज्ञान अश्या गोष्टी ज्या समाजात शेकदो वर्षे खोलवर रुजल्या आहेत त्या, पाकशी लढाई करून थांबणार नाहीत, जरी पाकीस्तान नि बांगला देश जमीनदोस्त केले तरी भारतातल्या मुसलमानांच्या कारवाया जोरात चालू रहातीलच, कारण त्यांचे मूळ आपल्याच देशात आहे.

एनडी टीव्ही.कॉमवर कुठेतरी बरखा दत्तचा टॉक शो आहे असं मैत्रिण म्हणाली. कुणाला माहित असेल तर प्लीज लिंक टाका.

जसा दक्षिण अफ्रिकेवर बहिष्कार घातला होता तसा त्यांच्यावर बहिष्कार घालावा! >> तोच विचार करुन मी पर्याय १ निवडला. शिवाय १९९८ ला जेव्हां बुध्द परत हसला तेव्हा प्रगत राष्ट्रांनी आपल्यावरही ट्रेड बहिष्कार घातला होता.

लोकांची विस्मरण शक्ती खुप जास्त आहे. किंवा ते अज्ञानात सुख मानतात.

___________________________________
"अहिंसेची नशा दारूपेक्षाही घातक असते. अट्टल अहिंसाबाज नशेत वाटेल ते बरळत सुटतो"
आमचे प्रेरणास्थान प्र.के.अत्रे

मला वाटतं संबन्ध तोडून काही फार बदल होणार नाहीत. इतर पर्यायांपैकी युद्ध, हल्ला हे पर्याय पटत नाहीत कारण हे विसरता कामा नये की अत्त्ता १९७१ ची परिस्थिती नाहिये. पाक पण आपल्याप्रमाणे अण्वस्त्रसज्ज आहे. मान्य आहे आपली आर्मी जास्त शक्तिशाली आहे, ते जास्त टिकाव धरणार नाहीतही. पण आपल्याला हरवू शकले नाहीत तरी आपली बहुतेक महत्वाची शहरं त्यांच्या अण्वस्त्राच्या मार्‍याच्या टप्प्यात आहेत अन त्याचा वापर करायला ते जराही कचरणार नाहीत! हे परवडेल का आपल्याला अत्ता ?
माझे मत ५. आपण आताच्या परिस्थितीचा फयदा घेऊन, आपले political, economic जे शक्य ते वजन वापरून गरज लागल्यास अमेरिकेसारख्या इतर राष्ट्रांची मदत घेऊन जगात विविध आघाड्यांवर पाकविरोधी लॉबी बनवावी. त्या द्वारे पाक वर दबाव आणावा, दाऊद व इतर या कटात सामील असलेल्यांना आपल्या हवाली करायला लावावे अन सद्दाम च्या फाशीला जशी प्रसिद्धी दिली तशी गाजावाजा करून दाऊद सकट सर्वांना फाशी द्यावी!! मीडिया ला म्हणावे करा प्रसिद्ध !! त्याचं पूर्ण साम्राज्य पाक च्याच हस्ते उखडावं, सर्व मालमत्ता जप्त करावी, सर्व इमारतींवर बुलडोझर फिरवावे, मिडिया ला म्हणावे करा आता थेट प्रक्षेपण!! पाक ला एकाच वेळी आपल्याला, जगाला अन दाऊद , इतर दहशतवाद्यांना तोंड द्यावं लागेल, देऊ देत!! मग बघू आपण मजा!!

मैत्रेयी, एक विसरते आहेस की दाऊद जर पकडला गेला तर राजकारण्यांचं काय होईल नी बॉलिबूडचं काय होईल? त्यांचा फायदा दाऊदला न पकडून देण्यातच आहे. असं ऐकलं की पाकमधून की दुबईमधून आम्ही तुम्हांला दाऊद देतो त्याबदल्यात त्या देशातल्या कोणत्यातरी गुन्ह्यात अडकलेला आणि भारतात असलेला (त्यांचा) नागरीक आम्हांला द्या अशी ऑफर आपल्याला आली होती पण त्याकडे चक्क दुर्लक्ष करण्यात आलं. हे जर खरं असेल तर काय बोलायचं?

हो गं, ते आहेच. त्याचं नेटवर्क इतकं आहे की मुळावर घाव घातला तर च उखडणे शक्य!! हे होणार नाही हे अपेक्षित च आहे,आपण फक्त जर तर चे स्वप्न बघत बसणार!

सर्वप्रथम पर्याय क्रमान्क १ अमलात आणावा
संबंध द्रुढ करण्याचा खटाटोप बंद करावा
बांगला देशातुन परवान्याशिवाय आलेल्याना परत पाठवावे
मुम्बई किती लोकाना सामावु शकते याचा अंदाज घ्यावा व नियमाविरुद्ध रहाणार्याना स्वस्थानि पाठवावे
सध्या चढाई न करता सर्व सीमा सुरक्षित ठेवण्यावर भर द्यावा
भारतातिल निरपराध मुसलमानावर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी
भारतातिल मुसलमानाना विश्वासात घ्यावे . त्यांच त्यांच्याच धर्मगुरु कडून प्रबोधन करवाव.
काश्मिरसह पुर्ण देशात दहशतवादाचा शिर्काव होणार नाही अशी यंत्रणा सक्षम करावी
काळाबाजार ,भ्रश्टाचार ,करचुकवेगिरी, जातियवाद या किडीला ठार करावे
वरील सर्व कामासाठी पर्याप्त धन नसल्यास शक्य असेल तिथून दान घ्यावे

पर्याय क्र.४ .. ह्या मुसुनमान देशांना धडा शिकवायची वेळ आली आहे .

पर्याय १ तर हवाच.. पण आता पर्याय ४ पण अमलात आणायची वेळ आलेली आहे.

-क्षण दरवळत्या भेटींचे अन हातातील हातांचे
हे खरेच होते सारे का मृगजळ हे भासांचे

फक्त २५ अतिरेकींना आणि तेही भारतातल्या भारतात, आपण थोपवू शकलो नाही मग सीमेवर जाऊन काय युद्ध करणार!!!!

केदार सध्या तरी मला एकही पर्याय मंजूर नाही: माझे मत असे आहे:
१) भारताने आपल्याला सुरक्षित करावे.
२) भारतानी आपल्या देशातील घाण नष्ट करावी आणि ही घाण भारतीयांनीच निर्माण केली आहे. तेंव्हा आधी भारतीयांनी आपल्यात सुधारणा करावी. मग आपोआप इतर मार्ग मोकळे होतील.

केदार,
मलाही कुठलेच पर्याय मंजूर नाहीत.. मला जे वाटते ते मि येथे http://www.maayboli.com/node/4687 लिहीले आहे
सध्ध्या भारताची परिस्थिती स्वताचे घर वर्षानुवर्षे घाणीत बुडलेले असताना, बाहेरच्यांन्नी आमच्या घरी येवून घाण करू नये असे म्हणण्यासारखे आहे.
मुळात अतीरेकी बाहेरून आले तरी ते फक्त निमित्त होत, या घटनेचा दोष बहुतांशी भारतातच आहे.. तू "भारत पाक" संबंधांवर पोल घेतो आहेस तेव्हा अधिक काही लिहीत नाही. मला तरी वाटते निदान आता तरी "आधि गरज"आपले घर साफ करायची आहे हे आपल्याला कळेल. पाक वा pok जगाच्या नकाशावरून उध्वस्त करून भारतातील अंतर्गत स्थिती कायदा सुव्यवस्था सुधारेल असे कुणाला वाटत असेल तर तो एक मोठ्ठा सुशीक्षीत भ्रम असेल.. त्या अर्थाने तूर्तास I agree with Bee.

योग आणि बी, मी देखील त्या बाफ वर घरातला कचरा साफ करा हे लिहीलेच आहे. भारतीय सुरक्षा व्यवस्थेत आमुलाग्र बदल करावे लागतीलच. पण फक्त ते करुन भागनार नाही तर "पाक" बाबतीत काही तरी पावले उचलावी लागनार नाहीत का? ती काय असावीत हाच ह्या पोलचा उद्देश.
___________________________________
"अहिंसेची नशा दारूपेक्षाही घातक असते. अट्टल अहिंसाबाज नशेत वाट्टेल ते बरळत सुटतो"
आमचे प्रेरणास्थान प्र.के.अत्रे

Pages