rar यांचे रंगीबेरंगी पान

आईना देखकर तसल्ली हुई...

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

कॅमे-यामधून पाहताना अचानक माझ्या मनाची अवस्था अशी माझ्यासमोर प्रतिबिंबासारखी सामोरी आली..क्षणभर दचकायला झालं स्वतःलाच असं समोर पाहून.. त्या क्षणी ही 'खिडकी' माझ्यासाठी माझ्या मनाचा 'आरसा' बनून गेली... गुलजारच्या 'आईना देखकर तसल्ली हुई...' ह्या ओळी आणि कॅमे-याचं बटन एकाच वेळी क्लिक झालं !

DSC_0177c.jpg
Grand Canyon, North Rim

शब्दखुणा: 

लता revisited...

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

२० वर्षापूर्वी म्हणजे १९८९ मध्ये, लतादीदींचा साठावा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला होता.
'महाराष्ट्र टाईम्स' तर्फे दरवर्षी घेण्यात येणा-या वक्तृत्व स्पर्धेत त्या वर्षी विषय होता - आमच्या मनातील लता मंगेशकर. निमित्त होतं अर्थातच लताबाईंच्या साठाव्या वाढदिवसाचं.

प्रकार: 

राहत ही राहत...

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

२००६ सालापासून ज्या गाण्यानं मला वेड लावलंय आणि आजही दरवेळी ऐकताना नव्यानं ज्या गाण्याच्या मी प्रेमात पडते ते गाणं म्हणजे 'ओंकारा' मधलं 'नैनोंकी मत माणियो रे, नैना ठग लेंगे'!

प्रकार: 

पुस्तक परिचयः आपले मराठी अलंकार..

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

'भारद्वाज प्रकाशन' माझ्या वडिलांचं असूनही आणि पुस्तकांबद्दल प्रचंड ओढ असूनही - प्रत्यक्ष 'प्रकाशनाच्या' कामात माझा आजवर फारसा हातभार नव्हता. पण 'काहीतरी वेगळं करावसं वाटतंय' ह्या विचारानी जेव्हा मी अस्वस्थ व्हायला लागले, तेव्हा 'आता प्रकाशनाच्या कामाची जबाबदारी आपण स्वीकारायची' असं ठरवलं.
हे क्षेत्र माझ्यासाठी खूपच नवीन आहे...पण लहानपणापासून परीक्षेला, कोणत्या स्पर्धेला जायला निघालं की बाबा सांगायचे "लढ बाप्पू...जा आणि बिनधास्त batting करून ये...आगे जो होगा देखा जायेगा".
हे प्रकाशनाचं काम हातात घेतलंय ते ही 'लढ बाप्पू..." या शब्दांच्या आधारावरच Happy

प्रकार: 

Take a bow master!

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

'हल्ली तू क्रिकेटबद्दल लिहित नाहीस का?'
माझ्याकडून लिखाण का होत नाही किंवा मी लिहित का नाही? याबद्दल आस्थेने चौकशी करणारा अजून एक प्रश्न मला एका मित्रानी अगदी कालच विचारला.
आणि ...त्याला मी उत्तर दिलं ...
' लिहावसं खूप वाटतं. हेडन, गिलख्रिस्ट निवृत्त झाले तेव्हा, सचिन तेंडूलकरने क्रिकेट कारकीर्दीची २० वर्ष नुकतीच साजरी केली तेव्हा, शाहीद आफ्रीदीनी नुकताच 'बॉल खाल्ला (की हुंगला?), ...आणि असं काही 'खास' घडत नसतानाही मला क्रिकेटबद्दल खूप लिहावसं वाटतं.

विषय: 
प्रकार: 

पिया बिना... बासिया बाजे ना?

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

गाणी ऐकताना कधीकधी हे iPod, CD player वगैरे सगळं बाजूला ठेवून मी जुन्यापुराण्या cassettes च्या विश्वात जाते. खरं सांगायचं तर हे digitally modified mp3 format नव्या गाण्यांना suit होतात, पण जुन्या गाण्यांना नाही, असं मला मनापासून वाटतं. त्या digital modifications/cleaning मुळे त्या वेळच्या live recording चा effect कमी होतो. चार सतारी आणि पंधरा व्हायोलिनचा एक जो वेगळाच, धुंद करणारा संमिश्र आवाज तयार होतो तो कुठेतरी ह्या cleaning मधे हरवतो, असं मला कायम वाटत राहतं. मग अशी अस्वस्थता आली की मी आपोआपच घरातल्या त्या जुन्या cassettes ऐकायला घेते.

विषय: 
प्रकार: 

तेरा इमोसनल अत्याचार !!!

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

आज १० सप्टेंबर, २००९.
आत्ता NFL kickoff चा pregame show चालू आहे. Pittsburgh downtown, आकाशाचा केशरी रंग, हजारो Steelers fans, Black and gold च्या लाटेवर हलणारे पिवळ्या रंगाचे असंख्य terrible towels... Oh my god, I am missing Pittsburgh a lot! आम्ही फिनिक्समधे, पण मन मात्र त्या Pittsburgh मधे Heinz Field च्या भोवती रेंगाळतय!
८ वाजून ३० मिनिटे ... Pittsburgh च्या Heinz Field मधे NFL चा अजून एक season चालू होतोय. परत एकदा ह्या खेळातली kick नव्यानी अनुभवतीये मी आत्ता.... दरवर्षी हे असंच होतं - नवीन season, नव्या आशा, एक नवीन सुरुवात.

विषय: 
प्रकार: 

माचिस...

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

दहा वर्षापूर्वीची गोष्ट. पुण्यातल्या 'डेक्कन'ला माझ्या दोन मित्रांबरोबर मी हा सिनेमा पाहायला गेले होते. चित्रपट tax free होता... साडेतीन रुपये तिकीट, संपूर्ण थेटरमधे आम्ही तिघे धरून जेमतेम १०-१२ माणसं असतील.

विषय: 
प्रकार: 
Taxonomy upgrade extras: 

Pages

Subscribe to RSS - rar यांचे रंगीबेरंगी पान