सत्यजित यांचे रंगीबेरंगी पान

प्रतिज्ञा

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago

आपल्या देशाच्या अधोगतीला आणि आपल्या अधोगतीला आपणच जबाबदार आहोत आणि नसलात तरी तुम्ही कुणाच काही उखाडू शकत नाही.
महागाई, बॉबस्फोट, घोटळे, आतंकवाद, टोल नाके, टॅक्स, भ्रष्टाचार, भोंदू महाराज, रेप, खुन, दरोडे, अप्लसंख्यांक, गलथानपणा, कचरा, घाण, पाण्याची कमतरता, विजेची कमतरता ह्या सवयीच्या गोष्टी आहेत. ह्या बद्दल उगाच टाहो फोडू नये.
तुम्ही तुमच बघा दुसर्‍याच्या गोष्टीत नाक खुपसायची गरज नाही.
बेसिक सुविधा काय असतात हे तर आपल्याला माहितच नाही, आपले हक्क काय आहेत? हे जाणुन घेण्यची गरज नाही आणी घेतलीतर तरी आम्ही अशा गोष्टींना फाट्यावर मारतो.

विषय: 
प्रकार: 

क्षणभर जिंदगी

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

उन्ह कोवळं कोवळं
तुझ्या कांतीहुन सावळं
तुझ्या ओल्या केसां मध्ये
दडे दवाचं सोवळं

एका सुंदरश्या सकाळी नववधू प्रमाणे दवाचा घुंगटा ओढुन बसलेली धरा, तिचा घुंगटा उलघडण्यासाठी आतुर झालेली सुर्याची कोवळी किरण पुढे सरसावतात आणि तू दिसतेस. आत्ता न्हाउन निघालेली, ओले केस हळुवार बांधलेली. त्या सोनेरी किरणां पेक्षा तुझं रुप अधिक मोहक दिसतंय आणि वाटतंय...

तुझ्या पापणीशी झुले
एक दवबिंदू प्यारा
तुझ्या पापण्यांनी उडे
फुलपाखरी मोहोळ

प्रकार: 

कटींग विथ सत्या...

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

हिंवाळ्यात गुलमोहर बहरला आहे ( http://www.maayboli.com/gulmohar ) हे अस होत कधी कधी.. ऑक्टोबर हीट मुळे तो कन्फ्युस झाला असावा कदाचीत.

विषय: 
प्रकार: 
Subscribe to RSS - सत्यजित यांचे रंगीबेरंगी पान