प्रतिज्ञा

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago
Time to
read
<1’

आपल्या देशाच्या अधोगतीला आणि आपल्या अधोगतीला आपणच जबाबदार आहोत आणि नसलात तरी तुम्ही कुणाच काही उखाडू शकत नाही.
महागाई, बॉबस्फोट, घोटळे, आतंकवाद, टोल नाके, टॅक्स, भ्रष्टाचार, भोंदू महाराज, रेप, खुन, दरोडे, अप्लसंख्यांक, गलथानपणा, कचरा, घाण, पाण्याची कमतरता, विजेची कमतरता ह्या सवयीच्या गोष्टी आहेत. ह्या बद्दल उगाच टाहो फोडू नये.
तुम्ही तुमच बघा दुसर्‍याच्या गोष्टीत नाक खुपसायची गरज नाही.
बेसिक सुविधा काय असतात हे तर आपल्याला माहितच नाही, आपले हक्क काय आहेत? हे जाणुन घेण्यची गरज नाही आणी घेतलीतर तरी आम्ही अशा गोष्टींना फाट्यावर मारतो.
काय अपराध केल या पेक्षा कोणी केला ह्या वरुन त्याच गांभिर्य ठरत,
मिडीया आणि व्रुत्त्पत्र तर राजकारण्याच्या हातातल्य बाहूल्या, व्रुत्त पत्रात जर हेडलाईन मध्ये चांगलं छापुन आलं तर ती अ‍ॅड आहे कि भ़कसं केली आहे म्हणुन आपण इतर पान चाळतो. आजूबाजुला काय अघटीत घडलय की किंवा घडतय घे बघण्यासाठीच आपण बातम्या बघतो किंवा पेपर चाळतो.
शाळा आणि कॉलेज हा धंदा आहे, गप्प फी भरा आणि मुल्लांना महागड्या क्लासेस ना पाठवा.
कोण कधी येईल आणि कीड्या मुंग्या सारख चिरडुन जाईल, मुंगीवर वारुळावर पाय पडला तर त्याही चावतात पण माझ्या देश लाथाडायला निघालेल्या भडव्यान्ना आम्ही नेते म्हणतो, आणि नेते हे भडवेच असतात. त्यांना चावण्यासाठी आपण मुंग्या नाही आहोत. आणि चावायला गेलात तर तुम्ही चिरडलेले जाऊन तुम्ही मुंगी आहात हे सिद्ध होईल त्या मुळे माणुस होण्याची जबाबदारी ही तुमची आहे.
सरकारी खातं हे फक्त पैसे खातं. पैसा दिला की ह्या देशात तुम्ही काहीही करु शकता.
ट्रफिक हवालदार आणि पोलिस ह्या पैसे खाणार्‍या आणि सर्व सामान्यांना त्रास देणार्‍या संस्था आहेत अशी आपली ठाम समजूत.
डोनेश दिल्या शिवाय शाळेत अ‍ॅडमिशन आणि लाच दिल्या शिवाय सरकारी काम होउच शकत नाही हा ह्या देशाचा कायदा आहे.
दारात मतं मागायला आलेला उमेदवार उद्या बक्कळ पैसा कमवण्यासाठीच निवडणुक लढवतो आहे आणि निवडणुका ह्या त्याच साठी असतात हीच आपली शिकवण आणि समजूत आहे.
समोर उभा असलेला मुसलमान हा आतंकवादी असण्याचा संशय इथे प्रत्येकाला वाटतो.
मी हिंदु आहे म्हणणं म्हणजे जतियावाद होतो.
हिंदू आणि मुस्लिम ह्या दोहों मधली दरी तशीच रहावी म्हणुन ह्या देशातले नेते जिवापाड मेहनत घेतात, झालचं तर गावंच्या गाव उध्वस्त करतात. हिंदू आणि मुसलमान मग अनेक जाती आहेत पोट जाती आहेत भाषा आहेत प्रांत आहेत राज्य आहेत, येवढच काय तर स्त्री आणि पुरूष अशा कुठल्या ना कुठल्या कारणावरुन समाजात फुट पाडण्याच काम सर्व प्रांतातली नेते मंडळी फार छान करतात.
देशाभिमान म्हणजे पंधरा ऑगस्ट आणि सव्विस जानेवारीला पाच रुपयचा झेंडा (महाग झालाय म्हणुन) घेउन सकाळी दोन तास मिरवणे, त्या नंतर तो झेंडा कुठे लोळतो ह्याच आपल्याला भानही नसत आणि ते नसण म्हणजे देशाभिमान.
एजंट ही ह्या देशात संकृती आहे ते सगळी कडे असतात, अगदी पोस्टा पासुन ते मंत्रालया पर्यंत. तिकीट बुकींग पासुन ते बँके पर्यंत
. देवळातल्या रांगांच व्यवस्थापना पासुन ते, टीसी, हवलदार, रेशनिंग ऑफिर्सस ते कार्यालयातला पिऊन, सरकारी दवखान्यातला वॉर्डबॉय ज्य ज्या माणसाकडे व्यवस्थापन आलं तो पैसे खायला मोकळा, पैसे देऊनही त्यांची हाजी हा़जी करण प्रत्येक सांमान्याच कर्तव्य आहे.
ह्या देशात कुणी कुणावर विश्वास ठेवत नाही आणि तुम्ही ठेवलात तर तुम्ही मुर्ख ठरता.
अडचणितल्या कोणाला मदत करण म्हण्जे नको ते व्याप मागे लाऊन घेणं आहे आणि हे आमच्या मनात कोरलेलं आणि अनुभवाने आलेल शहाणपण आहे.
अन्याया विरुद्ध आवाज उठवण हे मुर्खपणाच लक्षण मानल जातं, आणि अन्याय करण हे भुषणास्पद आहे.
तुमच्या वर अन्याय झाला ही तुमची चुक आहे आणि त्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार असता.
प्रतिकार न करणं म्हणजेच सुशिक्षित आणि सुसंस्कृत असणं आहे.
सिमेवर शहीद झालेल्या जवाना पेक्षा क्रिकेट मध्ये पडलेली विकेट आपल्या जास्त दु:खद असते. ते तसच असायला हवं क्रि़केट हा आपला धर्म आहे.
गांधीजी राष्ट्रपिता आणि सोनिया राष्ट्रमाता आहे.
चेतनाहीन आणि कणाहीन हा प्रत्येक भारतियाचा खरा गुणधर्म आणि खरी ओळख आहे.

विषय: 
प्रकार: 

सत्यजीत.. खरं आणि पोटतिडिकीचं किती अप्रिय वाटतं ऐकायला.. Sad

हे म्हणजे 'सहन तर होत नाही पण प्रतिवाद ही करता येत नाही' अशा स्वरुपाचे लेखन आहे.

आपल्यातल्या प्रत्येक हळव्या व संवेदनशील, तसेच जबाबदार व कर्तव्यदक्ष माणसांना अशा हताश, असहाय्य आणि मानहानीकारक वाटणार्‍या परिस्थितीतून काही एक काळ तरी जावेच लागते.

अर्थात आपल्या आणि आपल्या देशाच्या अधोगतीला आपणच जबाबदार आहोत हे सत्यवचन! आणि कुठल्याही बदलाची सुरुवात स्वत:पासून करावी हे ही सत्यवचन!

सद्यपरिस्थितीत चांगला बदल घडावा असे वाटत असेल तर, स्वतःला जबाबदार नागरिक म्हणवणार्‍या सगळ्यांनी, आत्मपरिक्षण केले तर असे आढळून येईल की प्रत्येकात सुधारणा घडवून आणण्यास चांगलाच वाव आहे. प्रत्येकाला असे आत्मपरिक्षण करावे लागेल, त्याप्रमाणे स्वतःमधे वैयक्तिक पातळीवर बरेच छोटे छोटे बदल घडवून आणावे लागतील.

असे खरोखरच मनावर घेतले गेले आणि चांगल्या लोकांनी चांगल्या गोष्टींसाठी पुढाकार घेतला व आपापल्या परिघात त्याचा आग्रह धरला तरी परिस्थितीत बदल होऊ शकतो असा माझा विश्वास आहे.