प्रजासत्ताक दिन

३० वर्षांपासून अखंडित....

Submitted by पराग१२२६३ on 26 January, 2024 - 04:09

सव्वीस जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधानाचा अंमल सुरू झाल्यावर भारत सार्वभौम, प्रजासत्ताक झाला. तेव्हापासूनच दरवर्षी 26 जानेवारीला देशभर प्रजासत्ताक दिनी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जाऊ लागलं. त्या कार्यक्रमांपैकी सर्वात मुख्य कार्यक्रम असतो नवी दिल्लीत आयोजित होणारे संचलन आणि अन्य कार्यक्रम. हा सोहळा मी 30 वर्षांपूर्वी पहिल्यांदा दूरदर्शनवर पाहिला होता आणि तेव्हाच मला तो प्रचंड भावलाही. पुढच्या काळात या सोहळ्याविषयी कुतुहल वाढत गेलं आणि कधीही न चुकता या सोहळ्याचं फक्त दूरदर्शनवरच थेट प्रसारण पाहण्याचा पायंडा पडला.

स्वातंत्र्य व प्रजासत्ताक दिनावर निबंध

Submitted by अनुराधा म्हापणकर on 27 January, 2015 - 04:58

स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन अनुक्रमे १५ ऒगस्ट व २६ जानेवारीला येतात. या दिवशी आम्ही व्होट्सअप फेसबुक ट्विटरवर अनेक पेट्रिऒटिक सॊन्ग्ज आणि फोटो "शेअर" "अपलोड" आणि फोरवर्ड करतो. तिरंग्याच्या फोटोला "लाइक" करतो. देशभक्तीच्या पोस्टसवर "कमेन्टस" करतो. यादिवशी टीव्हीवर स्वदेस, तिरंगा, क्रांतीवीर, चकदे, बॊर्डर असे अनेक देशभक्तीचे सिनेमेही लागतात. त्यातले सन्नी देओल आणि शाहरुख खान आम्हांला विशेष आवडतात. नाना पाटेकरच्या डायलॊगला आम्ही हटकून टाळ्या वाजवतो.

विषय: 

प्रजासत्ताक दिन

Submitted by पराग१२२६३ on 25 January, 2015 - 11:27

प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीत होणारे संचलन आणि त्यानंतरचे बिटींग रिट्रीट न चुकता (दूरचित्रवाणी/नभोवाणीवर पाहिले/ऐकले, तर ते केवळ दूरदर्शन/आकाशवाणीवरच किंवा प्रत्यक्ष) पाहण्याची यंदा माझी २१वी वेळ आहे. जागतिकीकरणाच्या वाऱ्याने आपल्या देशात प्रवेश केला तसा एक विचार आपल्याकडे जोमाने फोफावण्यात आला. तो म्हणजे कोणत्याही व्यवस्थेला सरकारी असे लेबल लावून कमी लेखत राहायचे आणि खासगीकरणाचा जप करायचा. त्या पार्श्वभूमीवर मी हे सोहळे केवळ दूरदर्शनवरच पाहण्यामागच्या महत्त्वाच्या कारणांपैकी एक कारण म्हणजे या राष्ट्रीय सणाच्या प्रसारणाच्यावेळी दूरदर्शन/आकाशवाणीवर आढळणारे भाषेचे मार्दव्य आणि गांभीर्य.

विषय: 

प्रजासत्ताक दिनाचा भव्य सोहळा

Submitted by पराग१२२६३ on 22 January, 2014 - 01:19

राजधानी नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन आणि इंडिया गेट यादरम्यान पसरलेल्या राजपथावर दरवर्षी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे भव्य संचलन पार पडते. हे संचलन म्हणजे भारताची लष्करी क्षमता, विविध क्षेत्रांमधील प्रगती, इतिहास, संस्कृती, परंपरा अशा अनेक गोष्टींची माहिती करून घेण्याचे एक महत्त्वाचे साधन असते. इतके वैविध्य असलेले आणि विविध रंगांची उधळण करणारे हे आज जगातील एकमेव भव्य संचलन ठरले आहे. गेली वीस वर्षे मी हा सोहळा न चुकता पाहत आहे. हा सोहळा मला कायमच प्रेरणा देत राहिला आहे, इतका की वर्षभर मला केवळ या सोहळ्याचीच प्रतीक्षा असते. माझ्या पीसीचे वॉलपेपरही याच सोहळ्याशी संबंधित असतात.

विषय: 

’जनगणमन ’,रविंद्रनाथ टागोर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर

Submitted by दामोदरसुत on 26 January, 2012 - 07:29

आज प्रजासत्ताक दिन! तो प्रजासत्ताक झाला स्वातंत्र्यप्राप्तीमुळे! स्वातंत्र्य मिळाले ते सशस्त्र क्रांतिकारक, जहाल, मवाळ, समाजसुधारक अशा सर्वांच्या प्रयत्नांमुळे! या प्रजासत्ताकाचे राष्ट्रगीत होण्याचे भाग्य ज्या काव्याच्या वाट्याला आले त्या ’जनगणमन ’ ची शताब्दी नुकतीच धूमधडाक्यात साजरी झाली. त्याचवेळी ’वंदेमातरम’ या गीताचीही आठवण झाली; आणि जाणवले की ’जनगणमन’ चे भाग्य त्याच्या रचनाकाराच्या भाग्याशी तर ’वंदेमातरम’चे विधिलिखित क्रांतिकारकांच्या विधिलिखिताशी जोडले गेले आहे.
आणी म्हणून आठवण झाली स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेले रविन्द्रनाथांचे अभिनंदन !

गुलमोहर: 
Subscribe to RSS - प्रजासत्ताक दिन