२ पाउंड चिकन -( शक्यतो बोनलेस घेऊ नये)
३ मध्यम लाल कांदे
आले-लसूण पेस्ट २ टेस्पून
ओले खोबरे २ टे स्पून
सुके खोबरे कीस दोन टे स्पून ,
हिरव्या मिरच्या २-३
कोथिंबीर बारीक चिरून -४-५ काड्या.
दगडु तेली मसाला दोन टेस्पून भरून
हळद, ब्याडगी मिरची पावडर, मीठ , तेल
चिकनचे लहान तुकडे करून त्याला हळद तिखट मीठ आले-लसूण पेस्ट व एक चमचा दगडू तेली मसाला लावून ठेवावा.
एक कांदा बारीक चिरून थोड्या तेलात परतून घ्यावा. कांदा ब्राउन झाला की त्यातच ओले खोबरे परतुन घ्यावे. मग सुके खोबरे घालून परतून घ्यावे.
गार झाल्यावर कांदा खोबरे बारिक वाटून घ्यावे.
उरलेले कांदे बारीक चिरून तेलात परतून घ्यावेत. कांदा पारदर्शक झाला की चिकन व हिरव्या मिरच्या घालून परतावे व मंद आचेवर शिजू द्यावे. शिजत आले की त्यावर कांदा खोबरे वाटण व उरलेला मसाला घालावा. शेवटी बारिक चिरलेली कोथिंबीर घालावी.
भाकरी ,पाव याबरोबर अगदी मस्त लागते.
नाशिकला रविवार कारंजाच्या जवळ दगडू तेली म्हणून एक जुनं अन प्रसिद्ध मसाल्याच्या सामानाचं दुकान आहे. हा तिथला गोडा /काळा मसाला.

