सुप

नागपुरी वडाभाता बरोबरचा चींचेचा सार!

लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अर्धा कप चींच
लाल तिखट
गुळ (चींचे बरोबरीचा)
तेल, मोहोरी, जीरं, हिंग, लाल मिर्च्या, कढीपत्ता
थोडी चिरलेली कोथिंबीर
मीठ

क्रमवार पाककृती: 

चींच गरम पाण्यात भीजवुन कोळुन घ्या.
गाळुन घेतल्यास उत्तम.
त्यात हवे तेव्हढे पाणी घाला (जवळपास ४ कप)
फोडणी साठी, तेल गरम करा
मोहोरी, जीरं घाला, तडतडल्यावर हिन्ग घाला.
कढीपत्ता, लाल मिर्च्या घालुन तळल्यासरखे करा.
आता त्यात कोळ, गुळ, तिखट, मिठ घाला.
छान उकळी येउ ध्या. ५ मिन. पर्यंत. ( एक जीव झाले पाहीजे)
कोथिंबीर घालुन वडाभाता बरोबर साईड डीश म्हणुन हाणा!!

वाढणी/प्रमाण: 
२ व्यक्तींना पुरेसे
अधिक टिपा: 

गुळाचे प्रमाण अवडीनुसार बदला.. नाही तर पीयुश लागेल हे! :ड
बित्तु च्या मिर्च्यांना घबरणार्यांना धीर येइल. फोडणीतल्या मिर्च्या पचवायला औषध! स्मित

माहितीचा स्रोत: 
आई, नेट साभार!

लीक चे सूप

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

लीक ची एक जुडी ( ३-४ मध्यम आकाराचे लीक )
१ पांढरा कांदा
१ मध्यम बटाटा
कपभर दूध
१ चमचा बटर
१ चमचा ऑलिव्ह ऑइल
मीठ, मिरपूड

क्रमवार पाककृती: 

लीकचा पांढरा भाग कापून स्वच्छ धुउन घ्यावा. त्यात चिकार वाळू असते. त्यामुळे व्यवस्थित धुणे मस्ट आहे.
लीक, कांदा , बटाटा ( साल काढून) बारिक चिरावा.
पातेल्यात तेल व बटर गरम करुन त्यावर कांदा व लीक पारदर्शक होईपर्यंत परतावे. मग बटाटे घालून जरा परतावे. मग दूध व २ कप पाणी घालून मंद आचेवर बटाटा शिजेपर्यंत शिजवावे. दूध उतू जाणार नाही याकडे लक्ष असू द्यावे. चवीप्रमाणे मीठ व मिरपूड घालावी.
बटाटे शिजले की सुप थोडे गार होऊ द्यावे व इमर्शन ब्लेंडर ने मिसळून घ्यावे. हे सूप रुम टेम्परेचर ला सर्व्ह करतात

वाढणी/प्रमाण: 
२-३ लोक
अधिक टिपा: 

ही अगदी लो कॅल रेसिपी आहे. मूळ रेसिपीमधे भरपूर क्रीम , बटर असते.

माहितीचा स्रोत: 
नेट, फूड नेटवर्क वर पाहून प्रयोग