ओटमील

पीनट्बटर-ओटमील कुकीज

लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

३/४ कप मैदा ( सेल्फरायजिंग )
१/२ टीस्पून बेकिंग सोडा (सेल्फरायजिंग मैदा वापरल्यास आवश्यकता नाही.)
१/४ टीस्पून बेकिंग पावडर (सेल्फरायजिंग मैदा वापरल्यास आवश्यकता नाही.)
१/२ टीस्पून मीठ (मूठभर खारवलेले बदामतुकडे घातल्यास मीठ नको.)
१/२ कप बटर किंवा मार्गारीन (खोलीच्या तापमानाला आणून, मऊ करून)
१/२ कप पीनट बटर. (क्रंची नको)
१/२ कप साखर
१/२ कप ब्राउन शुगर
१ अंडं
१ टीस्पून व्हॅनिला अर्क
१ कप क्विक कुकिंग ओट्स

क्रमवार पाककृती: 

* एका मोठ्या भांड्यात साखर सोडून सगळे कोरडे घटक एकत्र करावे.
*वेगळ्या भांड्यात बटर, पीनट्बटर, अर्क, अंडं आणि साखर व्यवस्थीत एकत्र करावं. फार फेसत बसावं लागंत नाही.
* कोरडे घटक या मिश्रणात घालून नीट ढवळून एकत्र करावे.
* तेलाच्या हाताने झकास लाडू वळून हलका दाब देऊन कुक्या कराव्या.
*३५० डिग्री फॅ. ला ओव्हनमधे १० मिनिटं बेक कराव्या.

peanutbutter-cookies-maayboli.JPG

वाढणी/प्रमाण: 
साधारण २० कुक्या होतात.
अधिक टिपा: 

*चॉकलेट चिप्स घालता येतात.
* चमचाभर ओटमील कमी करून त्याऐवजी बदामाचा ओबडधोबड चुरा घालून चांगली चव येते.

माहितीचा स्रोत: 
इंटरनेट

ओटमील रेझिन कुकीज

लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ कप सेल्फ रायझिंग पीठ. (मी पिल्स्बरी वापरते. ह्यात बेकिंग सोडा असतो.) नसल्यास
पाउड टीस्पून बेकिंग सोडा
चिमुटभर मीठ
पाऊण कप लोणी. (मी ह्या ऐवजी अर्धं तेल (कॅनोला) आणि अर्ध 'Smart Balance, Light वापरते. स्मार्ट बॅलन्स जरा वेळ फ्रीझच्या बाहेर काढून ठेवावं.
१ कप ब्राऊन शुगर (ग्रॅन्युलेटेड पण चालेल.)
२ मोठी अंडी. (१५-२० मिनिटं फ्रिझबाहेर ठेवलेली.)
१ किंवा दीड टीस्पून व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट
पावणेतीन कप रोल्ड ओट्स
पाऊण कप मनुका
पाव कप पिकान्स किंवा बदाम -ओबडधोबड तुकडे करून
(बरेच लोक ह्यात अर्धा चमचा ऑलस्पाइस पावडर, अर्धा चमचा दालचिनी पावडर आणि चिमुटभर जायपत्रीपावडर घालतात. घरी ह्या चवी गोडात आवडत नसल्यामुळे मी टाळते.)

क्रमवार पाककृती: 

१) मोठ्या भांड्यात मैदा, (बेकिंग सोडा), ओट्स, मीठ, मनुका आणि बदाम किंवा पिकान तुकडे एकत्र करून घ्यावेत.

२) वेगळ्या भांड्यात लोणी आणि साखर एकत्र करून व्यवस्थीत फेटून घ्यावी. (हलकं होईपर्यंत.) (हातात धरायच्या मिक्सरचं सेटींग हाय वर असावं.)

३)ह्या मिश्रणात एका वेळी एक अंडं फोडून टाकावं. नीट मिसळून दुसरं अंडं मिश्रणात घालावं. व्हॅनिला घालून पुन्हा अर्धा एक मिनिट व्यवस्थीत फेटावं.

४) अंड्याच्या मिश्रणात आता कोरडे (आधी एकत्र करून ठेवलेले) जिन्नस घालून नीट ढवळून घ्यावं.

५)बेकिंग ट्रे किंवा कुकी शीटवर पार्चमेंट पेपर लावून आइस्क्रीम स्कूपने मिश्रणाचे लहान गोळे घालावे.

६)३५० डीग्रीवर ओव्हन गरम करून मधल्या रॅकवर १५ मिनिटं कुकीज बेक कराव्या.

७) बेकींग शीटवर २-४ मिनिटं राहू देऊन मग कुकीज जाळीवर थंड कराव्या.

वाढणी/प्रमाण: 
साधारण ३० कुकीज होतात.
अधिक टिपा: 

कुकीज ओव्हनमधे मधल्या रॅकवर भाजणं आवश्यक आहे. तेव्हा जागा नसल्यास २ बॅचेसमधे भाजाव्या.