आनंदी किंवा दुःखी

दुःख

Submitted by कुलदीप आपटे on 3 February, 2021 - 21:30

माझ्या घरात,
मी दुःख पसरून बसलो होतो
दुःखाने कानाकोपरा व्यापला होता

घराचे दार वाजले,
दार उघडले तर समोर सुख होते
घरात जागा नसल्यामुळे बिचारे अडगळीत बसले

अधून मधून,
सुख माझ्याकडे कोपऱ्यातून बघत होते
मी मात्र दुखालाच कुरवाळत बसलो होतो

परत घराचे दार वाजले,
दुसरा कोणीतरी त्याचं दुःख घेऊन आला होता
पण माझ्या घरात जागा नव्हती मी त्याला परत पाठवून दिले

अधून मधून,
सुख माझ्याकडे कोपऱ्यातून बघत होते
मी मात्र दुखालाच कुरवाळत बसलो होतो

प्रांत/गाव: 

आयुष्य

Submitted by Santosh zond on 8 August, 2020 - 08:41

आयुष्य हे नेहमीच कुणालाही सहज जमेल तस जगता आलेलच नाहीये ते नेहमी प्रत्येक वळणावर आपल्याला अस्तित्ववा विषयी विचारत असत कधी समाजाच्या रुपात तर कधी नातेवाईकांच्या ,कधी ते आपल्याला काटयांच्या मार्गामधुन जायला सांगतात तर कधी फुले असलेला मार्ग दाखवतात , पण आपल्याला स्वत:ला ओळखता यायला हव, स्वत:चा मार्ग खुद्द स्वत निवडता यायला हवा, आपण काय करायला पाहिजे म्हणजे आपण आनंदी किंवा दुःखी होत असतो ते ओळखता यायला हवी, अशी कोणतीही गोष्ट जी आपण मनापासून करतो ती करताना आपण कोण आहोत हे विसरतो आणी पुर्ण त्या गोष्टीत हरवतो आणि ती गोष्ट आवडीने करतो ती करायलाच पाहीजे तेव्हा तुम्हाला तुमच्या मधल्या त्या ' मी कोण '

Subscribe to RSS - आनंदी किंवा दुःखी