हा अगदी नो कटकट केक आहे. दुसरे म्हणजे अंडे टाकून वा न टाकता सुद्धा होवु शकतो पण मग दही प्रमाण ज्यास्त घ्यावे.
सामानः
दिड कप गव्हाचे पीठ्(आजकाल मी आशिर्वाद चे आणते चांगलेय),
१ अक्खे naval orange( हि गोड असतात, साली विशेष कडवट नसते),
१ संत्र्याचा ताजा जूस् (रस काढण्याआधी साल मस्त ग्रेट करून घ्या),
१ अक्खे अंडे,
१ मस्त फेटून हलके झालेले egg white शेवटी शेवटी फोल्ड करून घालायचे.
पाव कपाच्या जराशीच वर Organic agave nectar/अर्धा कप ब्रॉउन साखर्/अर्धा कप रोजची साखर.(मला गोड कमी लागते. पण हे प्रमाण अगदीच अगोड नाही करत.
)
पाव कपच्या जरासेच वर कनोला तेल,
मीठ चवीप्रमाणे,
१ लहान चमचा बेकींगपॉवडर + अर्धा चमचा बेकिंगसोडा,
२ मध्यम आकारच्या चमचे घट्ट दही,
पंपकीन स्पाईस १ चमचा.
कृती:
अंडे टाकूनः
अवन आधी ३५० डिग्री वर तापायला ठेवा १५ मिनीटे तरी तापला पाहिजे.
१)सर्वात आधी पीठात स्पाईस, बेपॉ व बेसो घालून मिक्सीत फिरवून घ्या नाहीतर चाळून घ्या.
२)एक अक्खे संत्रे सालीसकट कापून, त्याच्या बिया काढून मिक्सीच्या भांड्यात टाका. प्युरी करून झाली की मग संत्रा रस टाकून प्युरी करून घ्या. रस काढण्याआधी साल किस्सोन घ्या. किसलेली साल बाजूला ठेवा.
३) मग १ आक्खे अंडे + वॅनिला + तेल + साखर्/अगेव मिश्रीत दही टाका. मिक्सी फिरवा.
४)मग हळू हळू पीठ टाकत जा. मग सगळ्यात शेवटी egg white fold करा. मग त्यात बेरीज,किसलेली साल व ऑक्रोड (हवेच असेल्यास)टाका.
६) केक पॅनला तेल व पीठ लावून मग वरचे मिश्रण ओता. वरून फॉइल लावून अवन मध्ये टाका.
नोटः हा केक ५० मिनीटे भाजा. बरोबर ३० मिनीटाने अवनचे टेंपरेचर ३०० वर आणा. मग अलगद स्वःताला न भाजून घेता केक पॅनची फॉइल काढा. केक मात्र अवनच्या आतच ठेवा आणखी २० मिनीटे. 
अंड्याशिवायः
वरच्या स्टेप ३) व ४) मधील अंडी वगळून बाकी सर्व सेम.
इतका मस्त वास येतो संत्र्याचा की कधी खातो असे होते.
( अंडे अजीबात घालत नसाल तर दही चार मोठे चमचे व तेल अर्धा कप असे घ्या.)
संत्र्याचा ज्युस ताजाच घाला.
बाहेरील ज्युस मध्ये प्रीसर्वेटीव असतात ते अवन मध्ये कडवट होतात हाय टेंप वर.
मिश्रण एकदम वर पर्यंत भरू नका. केक फुगतो व फॉइलला चिकटेल. फॉइलला आतील बाजूस जरासे तेल लावून जस्ट वर ठेवून द्या. काढायला बरे पडते.
बेकिंग सोडा टाकायचा नसेल तर बेकींग पॉवडर टोटल दिड चमचा टाका.

