ऍलोपथी

अनुदिनी परिचय-१: आहार आणि आरोग्य

Submitted by नरेंद्र गोळे on 14 March, 2011 - 07:13

मी मायबोलीवर आलो त्याला आता आठ वर्षे होत आहेत. या आठ वर्षांत मला मायबोलीने भरभरून ज्ञान. मनोरंजन, विरंगुळा आणि मायबोलीचे व्यसन दिले. आता त्याची किमान आंशिक भरपाई करण्याची वेळ आली आहे असे मला वाटते. म्हणून मी ही "अनुदिनी परिचयां"ची मालिका सुरू करत आहे. गेल्या काही वर्षांत महाजालावर अत्यंत महत्त्वपूर्ण विषयांवर अभ्यासपूर्ण लिखाण शुद्ध मराठीतून केले गेले. त्यांची दखल घ्यावी आणि मायबोलीकरांच्या नजरेस ते लिखाण आणून द्यावे हाच उद्देश या मागे आहे. महाजालावरील अनुदिनी लेखनाची सुरूवात मायबोलीवरील "रंगीबेरंगी"नेच झालेली होती. ते लिखाण आपल्या परिचयाचेच आहे.

भावनिक ताण

Submitted by नरेंद्र गोळे on 13 March, 2011 - 03:30

भावनिक ताण हृदयविकाराचे कारण होऊ शकतो या गोष्टीचे महत्त्व हल्लीच सर्वदूर स्वीकारले जात आहे. आजही बव्हंशी, हृदयरूग्ण-पुनर्वसन-कार्यक्रम, तणाव व्यवस्थापन कौशल्य शिकवत नाहीत आणि बव्हंशी डॉक्टर त्यांच्या रुग्णांस ते शिकून घेण्याचा सल्लाही देत नाहीत. भावनिक तणाव मूलत: दोन प्रकारचा असतो. कुशाग्र आणि बद्धमूल. कुशाग्र म्हणजे टोकदार. मात्र शरीराच्या प्रतिसादाने शमू शकणारा. बद्धमूल म्हणजे, अनेक कुशाग्र तणावांच्या साखळीमुळे, शरीराचा प्रतिसाद एका कुशाग्र ताणास शमवू शकण्याच्या आतच दुसरा कुशाग्र तणाव उद्‍भवल्याने अंतिमतः शरीराच्या प्रतिसादक्षमतेबाहेर गेलेला तणाव.

शब्दखुणा: 

मनोव्यवस्थापन

Submitted by नरेंद्र गोळे on 7 March, 2011 - 07:12

मन कुठल्याही एका गोष्टीवर एकाग्र होत नाही. आपण ऑफिसला जायला निघतो तेव्हा घरातल्या समस्या सोबत करत असतात आणि घरी परततो तेव्हा कार्यालयीन डावपेचांनी मन व्याप्त असते. ह्यातून बाहेर पडण्याचा राजमार्ग म्हणजे ओंकार जप, प्रार्थना, कल्पनाचित्रण इत्यादींच्या उपयोगाने मन एकाग्र करण्याची किमया साधणे. ह्यालाच 'ध्यानधारणा' म्हणतात. बहिणाबाई चौधरींनी मनाचे खूपच सुंदर वर्णन करून ठेवलेले आहे. त्या म्हणतातः

मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोर । किती हाकला, हाकला फिरी येत पिकावर ॥

शब्दखुणा: 

अधीर आणि सुधीर व्यक्तीमत्व

Submitted by नरेंद्र गोळे on 1 March, 2011 - 21:15

अधीर (अ-प्रकारचे) व्यक्तीमत्व आणि हृदयविकार ह्यांचा संबंध आजकाल सर्वश्रुत झालेला आहे. किमान, डॉक्टर्स आणि त्यांच्या हृदयरुग्णांमध्ये. मात्र अ-प्रकारच्या व्यक्तीमत्वांची वैशिष्ट्ये, माध्यमांतल्या प्रसिद्धीपश्चातही संदिग्धच राहीली आहेत. अ-प्रकारच्या व्यक्तींची दोन प्रमुख वैशिष्ट्ये आपण धानात ठेवायला हवी. एक म्हणजे वेळाच्या संदर्भातली 'तातडी', 'घाईगर्दी', 'अधीरता' आणि दुसरे म्हणजे सर्वकाळ जाणवणारा, सर्वव्यापी वैरभाव.

अ-प्रकारच्या वागणूकीची दोन मानसिक आणि सहा शारीरिक लक्षणे, डॉक्टर फ्रीडमन ह्यांनी ओळखलेली होती ती खालीलप्रमाणे आहेत.

मानसिक लक्षणे:

धमनी स्वच्छता उपचार

Submitted by नरेंद्र गोळे on 26 February, 2011 - 22:49

श्रेयअव्हेरः हे लिखाण वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. माझी तशी वैद्यकीय पात्रता नाही. ह्या लेखात कुठल्याही उपायाची जाहिरात करण्याचा उद्देश नाही. केवळ उपलब्ध पर्यायांची माहिती म्हणूनच ह्याकडे पाहावे. तरीही इथे हे नमूद करायला हवे की हे लिखाण निराधार नाही. बखरनुमा आहे. हे केवळ अनुभवातून/ वाचनातून आलेले शहाणपण आहे. या लेखात वर्णन केलेले धमनीस्वच्छता उपचार मी स्वतः घेतलेले नाहीत. त्यांची माहिती केवळ उपलब्ध पर्यायांपैकी एक म्हणून मिळवली होती. पुढे अनेक रुग्णांना हे उपचार घेतांना आणि बरे होतांनाही मी स्वतः बघितलेले आहे.

आहाराने रोग हरा !

Submitted by नरेंद्र गोळे on 29 January, 2011 - 22:55

प्रस्तावना: वयपरत्वे येणार्‍या अवनतीकारक रोगांची आणि त्याच्या उपायांचीही अवस्था 'काखेत कळसा आणि गावाला वळसा' अशी आहे. आज ना त्या रोगांविषयी पुरेशी जाग आहे, ना त्यांवरील उपायांविषयी. मात्र त्यांचा मुकाबला करण्याकरता 'सम्यक जीवनशैली परिवर्तना’ची आवश्यकता भासते. याचा अर्थ काय आहे ते समजून, ह्या लेखाच्या आधारे 'सम्यक जीवनशैली परिवर्तनास' सामान्यजनांनी सिद्ध व्हावे, कर्मठपणे ते आचरावे आणि हृदयरोगच नव्हे तर इतरही अवनतीकारक रोगांना आपल्यापासून दूरच ठेवण्यात यश मिळवावे अशी माझी अपेक्षा आहे. सम्यक जीवन शैली अंतर्गत ’आहार’ या घटकाचा विचार या लेखात करायचा आहे.

माझे हृदयधमनीरुंदीकरण

Submitted by नरेंद्र गोळे on 29 January, 2011 - 01:13

श्रेयअव्हेरः हे लिखाण वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. ह्या माहितीचा उपयोग सामान्यज्ञानापलीकडे करू नये. व्यक्तीपरत्वे वैद्यकीय चिकित्सा करवून घेऊनच उपचार घ्यावेत. हा लेख औषधोपचार अथवा आहारविषयक मार्गदर्शक सल्ला देणारा लेख नाही. माझी तशी वैद्यकीय पात्रता नाही. हे लेख ही माझीच अभिव्यक्ती आहे. इथे व्यक्त झालेली माहीती ही कुठल्याही पुस्तकाचे आधारे लिहावी असे प्रयोजन नाही. हे संदर्भलेखन नाही.

हृदयविकार का होतो?

Submitted by नरेंद्र गोळे on 26 January, 2011 - 21:10

श्रेयअव्हेरः हे लिखाण वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. ह्या माहितीचा उपयोग सामान्यज्ञानापलीकडे करू नये. व्यक्तीपरत्वे वैद्यकीय चिकित्सा करवून घेऊनच उपचार घ्यावेत. हा लेख औषधोपचार अथवा आहार विषयक मार्गदर्शक सल्ला देणारा लेख नाही. माझी तशी वैद्यकीय पात्रता नाही. हे लेख ही माझीच अभिव्यक्ती आहे. इथे व्यक्त झालेली माहीती ही कुठल्याही पुस्तकाचे आधारे लिहावी असे प्रयोजन नाही. हे संदर्भलेखन नाही.

हृदयोपचार घेत असताना मी वाचलेली पुस्तके

Submitted by नरेंद्र गोळे on 25 November, 2009 - 00:33

हृदयोपचार घेत असताना मी वाचलेली पुस्तके

१. हृदयविकार निवारण, शुभदा गोगटे, मेहता प्रकाशन गृह, रू.१८०/-, प्रथमावृत्ती फेब्रुवारी १९९९, सदर पुनर्मुद्रण डिसेंबर २००४.
२. हृदयविकार आणि आपण, एस. पदमावती, मराठी अनुवाद: जयंत करंडे, नॅशनल बुक ट्रस्ट, किंमत:रू.२६/- फक्त, मूळ १९९०, मराठी अनुवाद २०००.
३. माझा साक्षात्कारी हृदयरोग, अभय बंग, राजहंस प्रकाशन, किंमत:रू.१२५/- फक्त, पहिली आवृत्ती: जानेवारी २०००, सदर अकरावी आवृत्ती: डिसेंबर २००४.
४. गीता प्रवचने, विनोबा, परंधाम प्रकाशन,रू.२५/- फक्त, सदर एकेचाळीसवी आवृत्ती: सप्टेंबर २००४.

Pages

Subscribe to RSS - ऍलोपथी