योग

पंच महाभुत व हिंदू धारणा

0

पंच महाभुत,

आपण पंचमहाभुतां बद्द्ल ऐकतो की सर्व सजिव व नि र्जिवांचे अधिष्ठान ही पंचमहाभुत आहेत.
ह्या विषयाला ईतके पदर आहेत की एकच पदर उलगडत न्यायलाच आयुष्य पुरणार नाही.
हस्तमुद्रा ही भारताची खुप प्राचिन व सर्वात महत्वाची देणगी आहे व ह्या हस्तमुद्रा ही पंचमहाभुता वर आधारीत असतात.

आज आपण पंच महाभुताचे हाताच्या बोटातील आधिष्ठान बघू !
हाताच्या पाच बोटा पैकी प्रत्येक बोटाला एका पंच महाभुताचे आधिष्ठान असते.
उदा. हाताचा आंगठा म्हणजे अग्नी महाभुत, प्रथमा म्हणजे वायु.

आयुर्वेदोक्त पंचकर्म

सध्या प्रसारमाध्यमातून आयुर्वेद आणि पंचकर्म याबाबत इतकी जाहीरातबाजी होत आहे की पुष्कळजणाना पंचकर्म करून घेण्याची इच्छा असते.ह्याला पंचकर्मानेच आराम वाटला म्हणून मलाही करायचय अस म्हणणारे ही भेटतात. पाचही कर्म करायची असतील तर किती वेळ लागेल असही काही विचारतात.
यासाठीच आता पंचकर्म म्हणजे काय , ते नेमके का, कधी, कशासाठी,कोणाला करतात ते पाहू.

पंचकर्म म्हणजे काय?
हा आयुर्वेदीय शोधन चिकित्सा प्रकार आहे.

आयुर्वेदात चिकित्सेचे महत्वाचे दोन प्रकार १)शमन आणि २) शोधन

गर्भसन्स्कार

मी सहा महिन्याची प्रेग्ननन्ट आहे .पण बेड रेस्ट वर आहे. ह्या परिस्थितीत किन्वा सामान्य वेळी आपण कोणत्या विशेश गोश्टी करु शकतो येणार्या बाळासाथी?
मी चान्गले music , मन्त्र वगैरे एइकते पण अजुन काय करता येईल का?

वयस्कर लोकांसाठी वजन कमी करण्याचे उपाय

0

वयस्कर लोकांचे वजन कमी करण्यासाठी वा वजन आटोक्यात राहण्यासाठी काही उपाय माहीत असतील तर कृपया इथे लिहा. वेगळा धागा उघडला आहे कारण बर्‍याचदा वयामुळे त्यांच्या आहार- विहारांवर मर्यादा असतात पण वाढत्या वजनाचा त्रासही होत असतो. एखाद्या छोट्या-मोठ्या ऑपरेशनमुळे घेतलेली बेडरेस्ट वजन वाढवायला कारणीभुत ठरते आणि मग नंतर त्यातुन दुसरेच त्रास सुरु होतात. त्या वयात झेपतील असे व्यायामप्रकारांबद्दल लिहीलंत तर दुधात साखर.. नाहीतर नको साखरेऐवजी शुगरफ्री बरे, तेवढ्याच कमी कॅलरीज! फिदीफिदी

रेकी

0

रेकी

१. रेकी कशी शिकावी? किती दिवसात शिकता येते?

२. रेकीमुळे अनेक आजार बरे करता येतात ( स्वतःचे व दुसर्‍यांचे) . याबाबत कुणाचा अनुभव आहे का?

रेकी

रेकी

१. रेकी कशी शिकावी? किती दिवसात शिकता येते?

२. रेकीमुळे अनेक आजार बरे करता येतात ( स्वतःचे व दुसर्‍यांचे) . याबाबत कुणाचा अनुभव आहे का?

शिथिलीकरण

0

शरीर दैनंदिन जीवनात अनंत ताणतणावांचा सामना करते. त्यांच्यातून मुक्ती मिळविते. न जमल्यास त्यांना शरण जाते. तेव्हा ते ताण, मान, खांदा, पाठ, कमर, गुडघे, घोटे इत्यादी आणि इतरही सर्व अवयवांमधून अवघडून राहतात. त्यांना मुक्तीची अपेक्षा असते. विशेषतः जे निदानित हृदयरुग्ण असतात त्यांच्यात तर ताणतणावांना शरण जाण्याची प्रवृत्ती घडत जाते. म्हणून रोगग्रस्त, अस्वस्थ, अवघडलेल्या स्थितीत कुठलेही इतर व्यायाम, प्राणायामादी प्रकार करण्याआधी शरीर पूर्णतः सैलावण्याची गरज असते. हे साधण्याच्या प्रक्रियेस प्रगतीशील शिथिलीकरण उपयोगी ठरते.

मनोव्यवस्थापन

0

मन कुठल्याही एका गोष्टीवर एकाग्र होत नाही. आपण ऑफिसला जायला निघतो तेव्हा घरातल्या समस्या सोबत करत असतात आणि घरी परततो तेव्हा कार्यालयीन डावपेचांनी मन व्याप्त असते. ह्यातून बाहेर पडण्याचा राजमार्ग म्हणजे ओंकार जप, प्रार्थना, कल्पनाचित्रण इत्यादींच्या उपयोगाने मन एकाग्र करण्याची किमया साधणे. ह्यालाच 'ध्यानधारणा' म्हणतात. बहिणाबाई चौधरींनी मनाचे खूपच सुंदर वर्णन करून ठेवलेले आहे. त्या म्हणतातः

मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोर । किती हाकला, हाकला फिरी येत पिकावर ॥

प्राणायाम करा सुखे

0

योगसाधनाः पतंजलि मुनींनी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी अशा अंगांनी युक्त असा अष्टांगयोग (चित्तवृत्तीनिरोध) सांगितलेला आहे. महर्षी पतंजलि प्रणित अष्टांग योग, हा जीवन जगण्याचा असा मार्ग आहे, ज्यावरून जगातील प्रत्येक माणूस निर्भय होऊन, पूर्ण स्वातंत्र्याने चालू शकेल. जीवनात पूर्ण सुख, शांती व आनंद प्राप्त करू शकेल आणि इतर सर्वही लोक जरी तसेच करू लागले तरीही, परस्परांत कुठलेही अंतर्द्वंद्व उद्‍भवणार नाही.