मायबोली

मायबोली या संकेतस्थळाबद्दल माहिती

काय करणार

Submitted by Santosh zond on 13 August, 2020 - 06:45

काय करणार माझ्या चांगल्या आणि वाईट आठवणीनां साठवून जेव्हा मीच या जगात नसणार! कारण अस म्हणतात की मृत्यु हे जगातलं एकमेव सत्य आहे आणी ते तर एक दिवस सगळयांच्याच गळा भेटेल.
काय करणार पुन्हा तेच क्षण जगायची आस ठेऊन जेव्हा मीच त्या क्षणांमध्ये नसणार!
काय करणार ते गोड भारी स्टेटस ठेऊन ,जेव्हा मीच ते बघायला नसणार !
काय करणार त्या निर्जीव फोटो ला तुमचे अनमोल अश्रु दाखवुन तेव्हा मीच ते अश्रु वाटायला या जगात नसणार ,

शब्दखुणा: 

पाऊस वाऱ्याची

Submitted by रोहितकुलकर्णी on 9 August, 2020 - 06:47

झाडास कळली वंचना पाऊस वाऱ्याची
खिडकीस कळली वेदना अडकून पडण्याची

लपवू नको तू चेहरा दिसणार नाही तो
घाई नको अन आरश्याला दोष देण्याची

मी प्राक्तनाला दोष देणे सोडले आहे
मी याचना नाही करत ते खुश होण्याची

दमदार दुःखे दे मला माझ्यात रग आहे
हे आतडे पचवून बसले साल जगण्याची

बांधू नको तू घर इथे, हे गाव म्हातारे
मातीत इथल्या वासना भंगून धसण्याची

लाटा किती फुटल्या जश्या फिरल्या तश्या मागे
धरणास आहे आस लाटांच्या उसळण्याची

सांगू नदीचे दुःख आताशा समुद्राला
ती भेटते त्याला जिथे तडफड प्रवाहाची

येतोय आपल्या मायबोलीचा बाप्पा

Submitted by संयोजक on 6 August, 2020 - 12:19

IMG-20200805-WA0028.jpg
नमस्कार मायबोलीकर.
श्रावण महिना सुरू झाला की सर्वांना बाप्पाच्या आगमनाचे वेध लागतात आणि सर्वांची बाप्पाचे स्वागत करायची तयारी सुरू होते. मायबोलीच्या गणेशोत्सवाचे यंदाचे 21वे वर्ष आहे. संयोजक मंडळाची तयारी ही जोरात सुरू आहे. यावर्षी कोरोना संकटामुळे गणपती साधेपणाने साजरा करावा लागणार असला तरी मायबोलीवर आपण दणक्यात साजरा करू. लवकरच आम्ही कार्यक्रमाची रूपरेषा आणि स्पर्धा जाहीर करू.

शब्दखुणा: 

धागा

Submitted by रोहितकुलकर्णी on 3 August, 2020 - 05:17

चरख्यामध्ये फिरत राहतो एकच तागा
आयुष्याचा विणत राहतो तुटका धागा

मी शब्दांना ओळींमध्ये बसवत होतो
स्वल्पविरामाने बिघडवली सगळी जागा

विचार घोड्यागत चरतो सगळ्या विषयांना
लीदेने बरबटली आहे मनात पागा

जहरी नव्हता दंश तुझा हा अजिबातही
सुळ्यात कसला साठा आहे बघ रे नागा

पक्षी, भुंगे, मधमाश्यांना कर्फ्यु लागला
सुन्या सुन्या आहेत फुलांच्या सगळ्या बागा

परब्रह्मधामी निजला तो सगुण भक्तीने
सदरेवरती मोकळी आहे त्याची जागा

नाही

Submitted by रोहितकुलकर्णी on 31 July, 2020 - 12:37

जे बोलत आहेस ती ज्ञानाची देवघेव नाही
तू चांगदेव नाही अन मी ही ज्ञानदेव नाही

ह्या जगात सगळ्यांना नशिबाने छळलेले आहे
प्राक्तनास तळतळ देणारा तू एकमेव नाही

चक्रवाढ व्याजाने नेले जे होते तू दुःखा
मज जातमुचलका देण्याला कसलीच ठेव नाही

उदासीनसे रक्त धावते नाडी लागत नाही
कुठलाच जोश नाही मजला कुठलाच चेव नाही

अस्सल नाटक झोपेच्या सोंगाचे वठले आहे
बेशुद्धपणाइतकी जालीम कुठलीच टेव* नाही

(टेव - लत, व्यसनासारखी सवय. मूळ शब्द हिंदी असल्याने ही सूट घेता येते का हे जाणकारांनी सांगण्याची विनंती)

प्रांत/गाव: 

अव्यक्त आई

Submitted by Santosh zond on 29 July, 2020 - 21:03

अव्यक्त आई

असलीस जरी दुःखी तरी हसरी असण्याच दाखवतेस तु
तुझ्या या बाळांना ठेवून आनंदी नेहमीच पाठीशी असतेस तु

मारतेस तु,बोलतेस तु , कधी कधी रागवतेस तु
मग का जखम काही झाल्यावर डॉक्टर होतेस तु

चुकले तूझे बाळ कधी तर आई सावित्री होतेस तु
प्रेम शिकवत या जगाला मग आई जिजाऊ होतेस तु

असल्यास दुःख काही व्यक्त का नाहीस होत तु
प्रश्न हा नेहमीच असतो मला का अशीच अव्यक्त असतेस तु?

शब्दखुणा: 

जाम

Submitted by sumitm on 28 July, 2020 - 02:59

जिंदगी के गलत 'जाम' मे उलझे है हम!
प्याले मे ढुंडने चले थे, पर सुबोह शाम रस्तो पे खोये है हम!!

ज़िन्दा तो है जरुर, पर जीन्दगी कुछ नाराज सी है हम पर!
भीड मे ही तो रहते है, पर तनहाई मंडराती है हर लम्हे पर!!

करू

Submitted by रोहितकुलकर्णी on 25 July, 2020 - 13:27

आभाळाला झुकवू आधी पंखांना बळकट बनवू
हे मृत्यू आयुष्याची चिमणी नंतर दोघे उडवू

रात्रीपुरता विचार करतो आणि निघून जातो ना
कधीतरी चादरीत माझ्या स्वप्ना आपण स्वप्न बघू

अबलख इंद्रधनूचा घोडा उधळण रंगांची करतो
खोगीर त्याचे काढ पावसा, मुक्तपणाने दे उधळू

वळणदार बनवूच नको नात्याचा रस्ता टोकाशी
दोघांमध्ये धूसर सीमा आधीच आहे ती उखडू

बर्फाच्या अस्तरात खाली पाणी शापित पहुडले
चल किरणांचा खंजीर घेऊन प्रवाहास ह्या मुक्त करू

आहे

Submitted by रोहितकुलकर्णी on 25 July, 2020 - 13:25

कुठल्या मातीमध्ये घडला आहे?
माठ मनाचा नुसता गळका आहे

निळ्या ढगांची गर्दी वाढत गेली
पाऊस बहुदा मरून पडला आहे

थांब जरासे विचार करून बोलू
हा संवाद नव्हे हा गलका आहे

कोंदण करून घेऊया किरणांना
महिन्यांनंतर प्रकाश पडला आहे

नकोच आगीशी इतकी आपुलकी
नको निखारा फारच जळका आहे

लाट उसळते आहे विझते आहे
कुठे किनारा जाऊन दडला आहे

पायजमा इर्षेचा सफेद आणि
सात्विकतेचा सदरा मळका आहे

अवघड कविता करते आहे जगणे
काळ विचारामध्ये गढला आहे

Pages

Subscribe to RSS - मायबोली