चित्रपट

स्वप्निल - टॉप टेन

Submitted by ठिपका on 6 October, 2022 - 20:11

स्वप्निल पंचेचाळीस वर्षांचा होणार यंदा?!
सोशल मीडियावर शोधायची गरजच नाही पडली!

इथे बरेच स्वप्निल फॅन्स आहेत. तुम्हाला पहिली लागण कशी झाली स्वप्निलची ते आठवतं का? म्हणजे प्रथम कुठला चित्रपट पाहिला असं नव्हे, प्रथम 'अरे, हे भारी प्रकरण आहे' असं कधी वाटलं?

मला प्रयत्न करूनही आठवत नाही, जणू ते कायमच माहीत होतं.

तुम्हाला आठवत असेल तर सांगा - वाचायला आवडेल.

त्याबरोबरच तुमच्या टॉप टेन फेव्हरिट स्वप्निल मोमेन्ट्सही लिहा. डायलॉग, एक्स्प्रेशन, अ‍ॅक्शन, काहीही.

या माझ्या (नॉट इन एनी पर्टिक्युलर ऑर्डर) :

विषय: 
शब्दखुणा: 

अमरीश पुरी - एक अयशस्वी व्हिलन

Submitted by फारएण्ड on 6 October, 2022 - 18:55

अमरीश पुरीला आपण "बावजी" च्या रूपात अनेकदा पाहिले आहे. तो लंडन मधे ब्रिटिशांसारखा व अमेरिकेत अमेरिकनांसारखा असतो पण त्याचा भूगोल व दिशाज्ञान तसे कच्चेच. साधे लंडन मधे आपल्या घरून आपल्याच दुकानात जायला तो पुण्यातील रिक्षावाल्याने नवख्या व्यक्तीस फिरवून न्यावे तसा कोठून कोठून फिरून जातो. अमेरिकेत त्याच्या हॉलीवूड मधल्या म्हणजे समुद्रकिनार्‍यावरून बरेच मैल आत असलेल्या शहरातील घराखालीच समुद्रकिनारा व मरीना असतो, व त्या शहरातील "सबसे बडा पेपर" हा न्यू यॉर्क टाइम्स असतो. त्याला १८ मुले व १७ मुली असल्यातरी एक मानलेला मुलगाही असतो. व तो फावल्या वेळात भारतात आल्यावर ताजमहाल चा गाइड बनतो.

विषय: 

अमिताभ - टॉप टेन

Submitted by स्वाती_आंबोळे on 6 October, 2022 - 13:56

बच्चन ऐंशी वर्षांचा होणार यंदा?!
सोशल मीडियावर बच्चन मेनिया कशाबद्दल सुरू आहे ते शोधल्यावर कळलं!

इथे बरेच (सगळेच?) बच्चन फॅन्स आहेत. तुम्हाला पहिली लागण कशी झाली बच्चनची ते आठवतं का? म्हणजे प्रथम कुठला चित्रपट पाहिला असं नव्हे, प्रथम 'अरे, हे भारी प्रकरण आहे' असं कधी वाटलं?

मला प्रयत्न करूनही आठवत नाही, जणू ते कायमच माहीत होतं.

विषय: 
शब्दखुणा: 

अ‍ॅड अस्त्रा: स्पेस कडबोळे खमंग व चविष्ट.

Submitted by अश्विनीमामी on 16 September, 2022 - 09:48

तर बंधु आणि भगिनिंनो, उकडीचे मोदक करुन आणि खाउन झाले असतील व देशी फराळाचे जुगाड करायला अभी थोडा टैम है लेव्हल वर असाल तर उघडा ते नेटफ्लिक्स दण्न. दण्न. आणि लावा हा चित्रपट. अ‍ॅड अस्त्रा हे ब्रम्हास्त्रातलेच एखादे उडुन अमेरिकेत पडले कि कॉय असा विचार करायला वाव आहे. पण पदार्थ एकदम लै भारी करमणूक प्रधान आहे.

विषय: 

कथाशंभरी २ - हे बंध केरसुणीचे - आशूडी

Submitted by आशूडी on 6 September, 2022 - 07:38

अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि तो चमकला. दारावरची पाटी वाचून त्याला धडकी भरली. परवाच मालक म्हणाले होते हा बंगला ज्यांना विकला आहे ते येतीलच लवकर राहायला मग तू त्यांचा भाडेकरू. पण हा योगायोग असा जुळून येईल असे त्याला स्वप्नातही वाटले नव्हते. आता ताबडतोब नवं घर शोधायला सुरुवात केली पाहिजे.
त्याने लगेचच ग्रुपवर मेसेज टाकला, आजची पार्टी कॅन्सल. खिशातले पाकीट उघडून पाहिले त्यात सत्तर रुपये होते. एक केरसुणी पण कोपऱ्यात उभी होती. आता नवा खेळ रंगणार होता. तो आळीपाळीने दोन्ही बंद दरवाज्यांकडे बघत होता ज्यावर पाट्या होत्या -

उत्क्रुष्ट चित्रिकरण असणारी गाणी ( नुसती एकायलाच नाहि तर पहायलाहि गोड)

Submitted by बिचुकले on 21 July, 2022 - 23:26

मनाला न भावलेली गाणी या धाग्यावरुन प्रेरणा घेउन हा धागा काढला आहे. काहि गाणी एकायला तर गोडच असतात पण एकतानाच पाहिल्याशिवाय समाधान न होणारी असतात.
उदा.
रिम्झिम गिरे सावन - लताच्या आवाजातले - जुन्या मुबैचे चित्रीकरण आहे पावसातले, अमिताभ आणी मौसमी चे सहज अभिनय ह्यामुळे हे गाणे नुसते एकण्यातच नाहि तर पहाण्यातहि मजा येते
अजुन अशिच आठवणारी गाणी म्हणजे -
आवाज दे के हमे तुम बुलाओ
रात के हमसफर

तुम्हालाहि अशी काहि गाणी वाटत अस्तील तर पोस्ट करा !

विषय: 

बॉलीवूडसाठी धंदेवाईक ऐतिहासिक चित्रपटाची कथा - मायबोलीकरांनो पूर्ण करा

Submitted by शांत प्राणी on 10 July, 2022 - 11:32

बॉलीवूडचे चित्रपट राजमौली यांच्या सारख्या निर्मात्यांच्या चित्रपटांसमोर आचके देताना २०२२ सालात पाहतोय. पण उगीच हळहळ व्यक्त करून किंवा नैराश्यातून कठोर टीका करून सुद्धा चालणार नाही. हो, कठोर टीका ही आपुलकीतूनच होत असते. जसे सध्या शिवसेना संपली कि काय म्हणून पक्षाच्या चुका उगाळणार्‍यात त्या पक्षाचे समर्थकच आघाडीवर आहेत, तसेच यशराज फिल्म्स, जोहरी चित्रपट, अक्षयकुमार, लेडी अक्षयकुमार कंगना राणावत यांचे चित्रपट धडाधड कोसळताना पाहून बॉलीवूड प्रेमींचा संताप होत आहे. या अवस्थेतून बाहेर पडायचे तर आपल्याला काही तरी केले पाहीजे.

विषय: 
शब्दखुणा: 

अर्थाअर्थी एंपरर अर्थात सम्राट पृविट पृथ्विराज: एक वैश्विक दळण

Submitted by अश्विनीमामी on 6 July, 2022 - 08:59

तर मंडळी, ज्याला गिर्‍हाइक नाही ते ओटीटीवर ह्या नवीन न्यायाने सम्राट पृथ्विराज प्राइम वर येउन आदळला आहे. आज पाउस म्हणून कामाला दांडी मारुन घरीबसलेली पण लोणावळ्यास न गेलेली निरुद्योगी म्हातारी पिसे काढायला सज्ज आहे. ( अश्या परिस्थितीत सुद्धा न बघावा असा हा चित्रपट आहे पण आह विल टेक वन फॉ द टीम!! टीम माबो झिंदाबाद म्हणारे.)

विषय: 

झुंड पाहताना

Submitted by -शर्वरी- on 17 June, 2022 - 14:41

1. मिरवणुक : आंबेडकर जयंती ची मिरवणुक.नागराज चा फोकस हलत नाही. मुद्दा सुटत नाही. पोरे वर्गणी काढतात. DJ लाऊन नाचतात. त्यापेक्षा वेगळं, सकारात्मक, अर्थपुर्ण काय करायचं हे त्यांना ठाऊक नाही. त्यांच्यासाठी महापुरुषांची जयंती हा एक सण आहे. हिटलर दादा सारख्यांना हेच पाहीजे आहे. पैसा आहे. या पोरांनी एवढच करावे, यात त्याच्यासारख्यांचे हित आहे. पोरं ambulance ला वाट करुन देतात. नाचण्याच्या धुंदीतही सामाजिक भान विसरत नाहीत.सरां च्या चेहऱ्यावरचं समाधान अव्यक्ताला भाव देते.सर पुढे होतात. बाबासाहेबांच्या तसबिरीपुढे हात जोडतात.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - चित्रपट