परस्पर संबंध ओळखा

Submitted by गजानन on 27 May, 2009 - 00:33

सोबतच्या तीन चित्रांतला परस्पर संबंध ओळखा. Happy

Quiz1.jpg

.
.
---------------------------------------------------------
परस्पर संबंध ओळखा चे बरेच आर्काईव्ह झाल्याने भाग २ सुरु करत आहे.
भाग २ चा दुवा - http://www.maayboli.com/node/9236

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्लू प्लीज
--------------------------------------------
रखरखीत हा रस्ता प्रवास करण्याचा,
शेवट त्याचा मिळेल तोवर बोलू काही...

दीपुर्झा आणि इतर,
क्लु देते पण फार सोप्प होइल कोडं अता Happy

हिंटः

दोन्ही चित्रांना एक कॉमन विशेषण आहे पण त्याच अर्थ प्रत्येक चित्रा साठी अगदी वेगळा होतो ! Happy

मला चित्र बघितल्या बघितल्या 'गुल' आठवलं- गुलाबजाम आणि काश्मिरवर आधारित होती ना मालिका- गुल, गुलशन, गुलफाम! Proud

तसंच, 'केशर' -गुलाबजामच्या पाकात आणि काश्मिरमध्ये त्याची शेती होते- हेही वाटले होते.

दोन्ही साम्य बादरायण आहेत असं वाटतंय पण डीजेच्या हिन्टनुसार Sad दोन्ही चित्रांना चपखल बसेल असं विशेषण काय, ते आठवत/ माहीत नाहीये
-------------------------
God knows! (I hope..)

पूनम,
एकदम योग्य दिशेने जात आहेस Happy

गुलाब - शॉर्टफॉर्म गुलाबजामचा
अन गुलाब(काश्मिरी)
कैतरीच उत्तर दिल का?

एक अंदाज -
पाकातले गुलाबजाम आणि पाकमधले काश्मिर ?

    ***
    Assume there is something witty and creative here.

    येस स्लार्टी, मला वाट्ट ते विशेषण आहे "पाकव्याप्त "?

    स्लार्टि,
    यस्स Happy
    चित्र 1. साध्याचे 'पाक' व्याप्त गुलाबजाम' जे आधी पाकविरहित होते.
    चित्र 2. सध्याचे 'पा़क 'व्याप्त काश्मिर :(, (POK Kagah valley- Dudipatsar lake), जे आधी पाकविरहित होते.

    'हिंट दिली होती त्या प्रमाणे 'पाकव्याप्त' हे विशेषण २ वेगवेगळ्या अर्थानी वापरलय Happy
    पूनम 'साखरेचा पाक', काश्मिर पर्यंत आली होती म्हणून मोठी हिंट मिळाली सगळ्यांना Happy

    एक कोडे माझ्यातर्फे. खालील चित्रे एका विशिष्ठ शब्दाकडे निर्देश करतात. तो शब्द ओळखा.
    तसे सोपे आहे.

    1.jpg2.jpg3.jpg

    Simpson क्लु आहे का?

    मृ, नाही.
    पहिल्या दोन चित्रांवरुन उत्तर कळू शकेल असे मला वाटते. तिसरं चित्र थोडंसं अवघड आहे.

    स्टीफन हॉकिंग ? A Brief History of Time

    घड्याळ, ब्रम्हदेव.
    "काल".
    दुसरा फोटो कुणाचा आहे?

    घड्याळ,
    स्टीफन स्पिलबर्ग- पण इथे स्टिफन हॉकींग अपेक्षीत असावे-ब्रिफ हिस्ट्रि ऑफ टाईम वगैरे
    तिसरे चित्र जर ब्रह्मदेव असेल तर शब्द कालचक्र आहे का?
    ********************************
    द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

    पण हा स्टीव्हन स्पीलबर्ग आहे, तो स्टीफन हॉकिंग आहे. तिसरे चित्र शनीदेवाचे आहे. क्रोनस हा रोमनांचा शनीदेव आणि क्रोनोस या ग्रीक शब्दावरून क्रोनोलॉजी हा शब्द आला आहे.
    शब्द - ज्युरासिक ? पण त्याचा आणि शनीदेवाचा संबंध नाही कळला (असेल तर) Happy

      ***
      Assume there is something witty and creative here.

      स्लार्टी, हॉकिंगच्या A Brief History of Time वर स्पीलबर्गने एक डॉक्यूमेंट्री केली होती रे, त्यात सौरमाला(शनि), आकाशगंगा वगैरे दाखवल्याचं पुसटसं आठवतंय..
      त्याचाच टाईम मशीन असलेला Back to the Future, पण त्याचा शनिशी संबंध कळला नाही.

      कालचक्र आहे का शब्द ?
      कारण शनी ला सुद्धा काळाचे प्रतिक मानतात लोक Happy

      नाहीतर साडेसातीचा काही संबंध Proud

      ०-------------------------------------------०
      दुनिया मे है जंग क्यो...बेहेता लाल रंग क्यो..
      सरहदे है क्यो हर कही ... सोचा है..ये तुमने क्या कभी ?

      नाही... अध्यात्माचा काही संबंध नाही. शब्दाचाही आणि चित्राचाही.

      स्लार्टी, विशाल तुम्ही थोडेफार मार्गावर आहात.

      फार विचार करु नका. हा एक तिसर्‍या चित्रासाठी क्लू आहे... आता तुम्हाला बहुतेक येईल उत्तर...

      4.jpg

      टायटन आहे का उत्तर ?

      तिसरा फोटु चंद्राचा आहे..म्हणजेच पृथ्वीचा उपग्रह... तसा शनीचा उपग्रह टायटन आहे
      पहिला फोटो - टायटन चे घड्याळ
      दुसरा फोटु आणि टायटन चा संबंध काय आहे ?

      ०-------------------------------------------०
      दुनिया मे है जंग क्यो...बेहेता लाल रंग क्यो..
      सरहदे है क्यो हर कही ... सोचा है..ये तुमने क्या कभी ?

      स्पिलबर्गला दिग्दर्शनाबद्दल सगळ्यात जास्त सॅटर्न पुरस्कार मिळाले आहेत.. हे एक उत्तर असू शकेल ..
      पण त्याचा त्याने दिग्दर्शित केलेल्या ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईमशी संबंध काय? फक्त दिग्दर्शन सूचित करायचे असेल तर ठीक आहे.

      स्पिलबर्ग आणि टायटॅनिक चा काही संबंध ?

      क्ष च्या प्रमाणे सॅटर्न पण असु शकतो, पण त्याचा आणि घडाळ्याचा काय संबध ?

      ०-------------------------------------------०
      दुनिया मे है जंग क्यो...बेहेता लाल रंग क्यो..
      सरहदे है क्यो हर कही ... सोचा है..ये तुमने क्या कभी ?

      आयापिटस किंवा स्टॅन्ली कुब्रिक

      स्पिलबर्गच्या आर्टिफिशियल इंटिलिजन्स चित्रपटाची मूळ संकल्पना कुब्रिकची होती.. याच कुब्रिकने निर्मिती केलेल्या २००१ स्पेस ओडिसीमध्ये "आयापिटस" या शनीच्या चंद्रावर एक प्रचंड खडक दाखवला होता. आता नासाच्या कॅसिनीने तिथे खरंच एक प्रचंड भिंत असल्याचे फोटो पाठवले आहेत.
      पहिल्या चित्राशी संबंध?
      ग्रीक कथांनुसार आयापिटस, स्वर्ग आणि पृथ्वीचा पुत्र, हा बारा "टायटन" देवतांमधला एक आहे..

      पहिला फोटो: टायटन चे घड्याळ
      दुसरा फोटो: ?
      तिसरा फोटो: शनीदेव. क्रोनस हा रोमनांचा शनीदेव.
      Dictionary definition of Titan : any of the sons of Uranus and Gaea, including Coeus, Crius, Cronus
      उत्तर: टायटन ?

      बरोब्बर ! उत्तर टायटन आहे...
      टायटनचे घड्याळ, शनिचा सर्वात मोठा चंद्र टायटन आणि स्टीवन स्पीलबर्गचा सिनेमा टायटॅनिक...

      टायटॅनिक थोडंसं ओढूनताणून होतं हे मान्य करतो. आधी डेंझेल वॉशिंग्टन टाकणार होतो तिथे... त्याचा एक सिनेमा 'रिमेंबर द टायटन्स' असा आहे. ते जरा जास्त अवघड झालं असतं असं वाटलं... Happy

      >>>स्टीवन स्पीलबर्गचा सिनेमा टायटॅनिक
      सचिन ??? हे कसे काय?
      ----------------------------------------
      मै जिंदगी का साथ निभाता चला गया ...

      सचिन, टायटॅनिक कॅमेरोनचा ना रे Happy

        ***
        ही शून्याकार आग, ही जळती मोकळीक रोजचीच आहे
        ही सर्वस्वी सर्कस तुझीच आहे

        हो का? अरे सॉरी, सॉरी... चूक झाली.... मला स्पीलबर्गचा आहे असं वाटत होतं...

        पुढचं कोडं अचूक देईन... Happy

        अरे काय हे..
        मी इतका छान बादरायण संबंध जुळवून आणला होता त्याचं पार भजं केलंस Proud

        छान.

        Pages