परस्पर संबंध ओळखा

Submitted by गजानन on 27 May, 2009 - 00:33

सोबतच्या तीन चित्रांतला परस्पर संबंध ओळखा. Happy

Quiz1.jpg

.
.
---------------------------------------------------------
परस्पर संबंध ओळखा चे बरेच आर्काईव्ह झाल्याने भाग २ सुरु करत आहे.
भाग २ चा दुवा - http://www.maayboli.com/node/9236

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Bethells Valley हा एक क्लु होऊ शकतो का?

मृ, योग्य रस्त्यावर आहेस. तिथे जी कोण राहते ती काय आहे ?

    ***
    I get mail, therefore I am.

    वॉरियर प्रिन्सेस.

    झीना, द वॉरियर प्रिन्सेस!

    बरोबर. तिलाच आणखी एखादा generic शब्द ? ती आणि तिच्यासारख्यांना इंग्रजीत काय म्हणतात ?

      ***
      I get mail, therefore I am.

      फेमिनिस्ट???

      ========================
      बस एवढंच!!

      Lol

      Rofl महान !! ओके, आता मी उत्तर देत आहे Happy

        ***
        I get mail, therefore I am.

        उत्तर -
        पहिले चित्र - अ‍ॅमेझॉन.कॉम वर विकली गेलेली सर्वात पहिली गोष्ट. हे एक पुस्तक होते - Fluid Concepts and Creative Analogies: Computer Models of the Fundamental Mechanisms of Thought. लेखक होता Douglas Hofstadter. या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचा भाग म्हणजे हे चित्र.
        दुसरे चित्र - युट्युबवर अपलोड झालेली सर्वात पहिली चित्रफीत. ही अजूनही तिथे आहे - Me at zoo. त्यात दिसणारा माणूस जावेद करीम, युट्युबच्या संस्थापकांपैकी एक.
        तिसरे चित्र - इ-बे वर लिलाव झालेली सर्वात पहिली वस्तू. एक मोडलेला लेझर पॉइंटर.

        हिंटा बहुतेक कोड्यापेक्षा अवघड होत्या. क्षमस्व. मला हे कोडे म्हणजे फक्त सामान्य ज्ञान चाचणी होऊ द्यायची नव्हती, त्यामुळे...
        जो जीता मधले ते दृष्य 'पहला नशा, पहला खुमार' या गाण्यात आहे. म्हणजे 'काहीतरी पहिल्यांदाच घडलेले' असे सुचवायचे होते. पण 'पहिल्यांदाच काहीतरी' कुठल्या क्षेत्राशी संबंधित ?
        O brother, where art thou ? आता हा प्रश्न सर्वांनाच विचारला आहे, तेव्हा अगदी प्रत्येकालाच लागू होईल असे उत्तर बघावे लागेल. Well, when you are reading that question, you are on internet Happy म्हणजे पहिले काहीतरी हे इंटरनेटशी संबंधित. इंटरनेटवरील पहिल्यांदाच घडलेले काहीतरी.
        ती बाई म्हणजे स्त्री-योद्धा... म्हणजेच अ‍ॅमेझॉन.
        त्या नकाशात दोन बे दिसत आहेत. तिथेच असलेली पण त्या नकाशात न दाखवलेली आणखी एक बे म्हणजे इ-बे.
        शेवटची हिंट म्हणजे "U-tube" manometer अर्थात, दाब मोजण्याचे यंत्र. मुख्य म्हणजे ती दिसतेच U-tube Happy त्यात फ्लुइडचाही उल्लेख आहे, जो पहिल्या चित्रातील पुस्तकाच्या नावात आहे.

          ***
          I get mail, therefore I am.

          पावरपफ गर्ल्स! Proud

          hint1.gif

          हे कोडं नाहीये. स्लार्ती, चिनूक्स आणि अन्य कोडी घालणार्‍यांच्या माहितीसाठी आहे. Proud
          -----------------------------------------------
          I was born a Hindu. Soon I converted to Narcissism! Happy

          आणखी एक..

          hint2.gif
          -----------------------------------------------
          I was born a Hindu. Soon I converted to Narcissism! Happy

          स्वाती Lol

          Q21.jpgQ22.jpgq23.jpg

          तिन्ही फोटोवरुन एक प्रसिद्ध कोणीतरी ओळखा..

          स्वाती Rofl आता यापुढे मी हिंट्स आणि उत्तर देणार, तुम्ही कोडे ओळखा Proud

            ***
            I get mail, therefore I am.

            कोणीतरी म्हणजे माणूसप्राणी नाहीये की काय ? बुशचा तो कुत्रा ? Happy

              ***
              I get mail, therefore I am.

              स्वाती :d

              ओबामाच्या डॉगचं नाव बो आहे ना? पण मॅन्टा रे चं काय?

              -----------------------------------------------
              I was born a Hindu. Soon I converted to Narcissism! Happy

              स्लार्ती, योग्य मार्गावर आहेस..

              तो बो-टाय शेप पास्ता आहे ना?

              हो. Happy
              'बो' विश ला हो. डेरेक ला नाही. Happy मी पाहिले तेव्हा तुझे पोस्ट आले नव्हते.

              लालू,
              'हो' कशाला? विशालच्या प्रश्नाला की माझ्या उत्तराला?

              शेवटचे चित्र जेलीफिश आहे ना ? त्या पास्त्याला फार्फाले म्हणतात.

                ***
                I get mail, therefore I am.

                जेलीफिश विषारी असतो ना? मग कोड्याचं उत्तर "बो-विष" आहे का? :p

                दुसरे काय नाव आहे त्याला? फार्फार लांब जाऊ नको.

                स्वाती, सशल,
                Lol

                लालू, 'हवाई' हा क्लु असु शकतो का?

                सशल, Lol हा सही होता ! हे जर उत्तर नसेल तर निदान याला वायव्य किंवा ईशान्य तरी म्हणावे Proud (किती तो गोंधळ दिशांचा !!)

                  ***
                  I get mail, therefore I am.

                  काहीही.. :फिदी:....

                  Pages