झुकिनी राईस

Submitted by प्रीति on 26 September, 2014 - 14:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ वाट्या बासमती तांदुळ
२ मध्यम साईझच्या झुकिनी
५-६ लसणाच्या पाकळ्या सोलुन, बारीक तुकडे करुन
२-३ हि.मिरच्या
मीठ, हळद
४-५ वाट्या व्हेजी स्टॉक किंवा पाणी

क्रमवार पाककृती: 

तांदुळ धुऊन त्यात खिसलेली झुकिनी १५-२० मि. मिसळुन ठेवावी. एका भांड्यांत तेल तापऊन लसुण टाकावा. लसुण ब्राऊन झाल्यावर त्यावर हळद आणि तांदुळ चांगले परतुन घ्यावे. मीठ घालुन मिक्स करावे. २-३ वाट्या व्हेजी स्टॉक घालुन मंद गॅसवर भांडे झाकुन, तांदुळ शिजत ठेवावे. एका वेळी खुप स्टॉक न घालता थोडा थोडा घालावा. हा भात जरा कमी शिजलेला छान लागतो आणि बुडाला लागलेला मस्त. शिजल्यावर ५-१० मि वाफ मुरल्यावर, गरम गरम तुप घालुन पापडा सोबत खावा.

वाढणी/प्रमाण: 
४ जणं
अधिक टिपा: 

झुकिनी एवजी दुधी पण छान लागतो. मिरची एवजी लाल तिखट पण मस्तच लागतं.

माहितीचा स्रोत: 
आईच्या भोपळ्याच्या भातवरुन सुचलेले
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.. आमच्याकडच्या झुकिनी मागच्यावेळी कडवट निघाल्या होत्या. आता मिळाल्या तर करून बघतो.
असा भात दोडक्या / शिराळ्याचा पण चांगला लागतो. तो भात या भाजीला सुटलेल्या पाण्यातच शिजतो. लागलेच तर वरून ताक घालायचे शिजताना.

असा भात दोडक्या / शिराळ्याचा पण चांगला लागतो>> असा भात कडव्या वालांचा पण मस्त लागतो, पण पाणी वरून थोडे थोडे घालावे लागते.
फारच चवीष्ट प्रकार!!

नवरात्रात टाकल्याबद्दल हार्दिक निषेध! Happy