चित्रपट कसा वाटला - २

Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44

या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?

हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वपरिणीती प्रचंड आव्डली होती. अनुष्का शर्मा तेवहा बरी दिसायची. आता बॅटमॅनमधल्या जोकरसारखी भ्याण हसते.

+१००००

मीही नाखुषीने केवळ टिवीवर दिसतोय म्हणुन पाहिला, पण आवडला. शेवटाचे ठिगळ उगीच हिंदि चित्रपटात हिरोची तंगडी नेहमीच उप्पर पाहिजे म्हणुन, नाहीतर मुली जिंकतात तिथेच कथा संपते.

अनुष्काबद्दल सहमत. बॅबॅबा बघितल्यावर ती थोडे हटके आहे असे वाटलेले, पण नंतर भ्रमनिरास झाला. आता ती केवळ मी कित्ती बारीक हेच मिरवताना दिसते. बॅबॅबा मधला हेल्दी लुक (हेल्दी म्हणजे व्यवस्थित, नीटस. आपण स्वतःच्या लुकला 'हेल्दी' म्हणतो तो नव्हे Wink ) कुठल्याकुठे गेला.

मला या लेडीज व रिबे मधला एक सिन जाम आवडतो. त्या बोट पार्टिचं आयोजन करताना साधी वाईन, भाज्या, चपला, बॉक्सेस खरेदी करतात आणि त्यांना हाय प्राईज लेबलं लावतात तो... अगदी तन्मयतेनं पाहते. का कोण जाणे.

हा चित्रपट आवडणार्यांचा ३१ सप्टें रोजी शनिवार वाड्यावर जाहीर सत्कार आयोजित केलेला आहे.. कृपया इच्छुकांनी लाभ घ्यावा..

धन्यवाद
अनुष्का शर्मा लिप्स फॅन क्लब
रनवीर मुच्छड फॅन क्लब
परिणीता हेल्थ फॅन क्लब

मला लुटेरामध्ये जामच आवडला ...<><<< मलाप्ण.

मला गुंडे आणि रामलीलामध्ये पण आवडला. केजोच्या शोमध्ये त्याने आणि अर्जुनने केलेली धमाल बेस्ट होती. केजोसारख्या एलिट शोमध्य यांनी पार कचरा चालू केला होता. Happy

केजोसारख्या एलिट शोमध्य यांनी पार कचरा चालू केला होता>> मी तो एपिसोड नाही पाहिला पण खरतर केजोचा शो हा खरच कचरा कॅटेगरी आहे. हे आपलं माझं वै म.

"स्टैनली का डब्बा"...अप्रतिम सिनेमा
सर्व लहान मुलांचा अभिनय जबरदस्त आहे.अमोल गुप्ते चा मुलगा जो स्टैनली असतो... मस्त काम केलय.
एकदा जरूर बघा...

रणवीर सिंग मला पण लईच आवडतो. रामलीला, लुटेरे मधे मस्त काम केले होते. पण गुंडे मधे रफटफ आवाज पाहिजे असेल तर त्याला निदान आवाजाचे काम तरी जमले नसेल असे वाटते. पाहिला नाही तो सिनेमा. अर्जुन क. आवडत नाही अजुनतरी. अनुष्काबाईचे पण सेम, पहिल्या सिनेमात आवडली मग काहीतरी वेगळीच बाई झाली ती. कसली उंचय ती. १७५इंच.

बॉबी जासुस >>>> कं टा ळ वा ना..... >> +1
मी तर 'कहानी' सारखी असेल म्हणुन बघितला पण शेवटी टिपीकल हिंदी ड्रामा! नो जासुसी!

शूम्पी. तो एपिसोड पाहिलास तर तुझ्या लक्षात येईल.

दोघांनी अंदाज अपना अपनाचे डायलॉग सुरू केल्यावर केजोचं थोबाड बघणेबल झालं होतं. दोघांनी एजी ओजी चं सुरूवातीचं पूर्ण म्युझिक काय म्हणून दाखवलं. कल्ला केला होता.

१७५इंच. >>> Lol

बरंऽऽऽ पौर्णिमा, "रणवीरसिंग अजिबात आवडत नाही, काम (कधीकधी) बरं करतो" - हे चालेल का? Proud

मला रणवीर सिंगपण आवडला. >>>>>>>>>.. नंदिनी....तुला फक्त काय हवं ते बोल माझ्याकडुन.... ( आवडती स्मायली वॉट्सअ‍ॅप वरची )
"रणवीरसिंग अजिबात आवडत नाही, काम (कधीकधी) बरं करतो" - हे चालेल का??>>>>>>>>>>>>> नाही ना गं .... काम (नेहमीच) बरं करतो" - हे चालेल

अनुष्काबाईचे पण सेम, पहिल्या सिनेमात आवडली मग काहीतरी वेगळीच बाई झाली ती. कसली उंचय ती. १७५इंच.>>>>>>>>>>> १७५ इन्च???? म्हणजे १४'-७"??????/ की १७५ सेमी म्हणायचय????
ती मलातरी फार उंच वाटत नाही..आणि पहिल्या २ मुव्ही मधे आवडलेली...पण तिने लिप्स ची काय वाट लावली तेव्हापासुन ती हेट लिस्ट मधे गेलीय पार...आणि आता तीची अ‍ॅक्टींगही आवडेनाशी झालीय

अरेच्चा - १७५ सेंटीमीटर.>>>>>>>>... सुनिधी तुझा रिप्लाय मी रिप्लाय दिल्याच्या नंतर वाचला....:)

केजोसारख्या एलिट शोमध्य यांनी पार कचरा चालू केला होता>>> +++१ नंदिनी.
मी तर अजुनही तो एपिसोड ऑनलाईन बघत असते कधी कधी स्ट्रेसबस्टर म्हणुन :).

बाबा...यु आर लुकिंग सो हॉट बाबा.
धिना धिन धा.....

धमाल होता ह एपिसोड.

हम्टी पाहिला काल...... नये दौर का डी डी एल जे.... बस्स. सगळच नविन दौरच.

शारुखला देखिल वाटेल जरा उशीरा जन्मलो असतो तर कित्ती बर झाल अस्तं.... Wink

हम्टी चा फर्स्ट हाफ छान वाटला मला, टाइमपास एकदम.डायलॉग भारी होते एकदम. आणि तिचे वडिल तो आल्यावर जे खोटे सांगतो त्याने फसत नाहीत हे पटले. नाहीतर हिरोने काहीतरी थापा मारायच्या आणि बाकिच्यांनी त्या खर्‍या मानायच्या हेच सगळ्या सिनेमात दाखवतात.

रणवीरसिंग अतिशय चीप वाटतो....फुलटू सडकछाप!

केजोचे पिक्चर कसे का असेनात पण कॉफी मस्त होस्ट करतो तो!

शुक्रवारी झी-क्लासिकवर जुना 'अंदाज' पाहिला. दिलीपकुमार, नर्गिस, राजकपूर.
गाणी आणि ब्लॅक अँड व्हाईट क्लासिक म्हणून मला हा सिनेमा पहायचाच होता.

गाणी मस्तच! सिनेमाचा पूर्वार्ध आवडला. नायिकेचं मोकळंढाकळं वागणं, त्यामुळे नायकाचा गैरसमज, मैंने तुम्हे सिर्फ दोस्त की नजरसे देखा - वगैरे जोहर-चोप्रा टाईप होतं बरंच. पटकथा फारशी नाही आवडली. (तेव्हा गाणी आणि स्टारकास्टच्या नादात पटकथेकडे फारसं लक्ष देत नव्हते की काय अशी शंका यावी इतकी ढिली वाटली.)

प्रेमात पडलेला दिलीपकुमार चक्क हॅण्डसम दिसत होता. उत्तरार्धातला प्रेमभंग झालेला त्याचा चेहरा अनेकदा पाहिलेला आहे. Wink
नर्गीसच्या अभिनयात ओव्हरअ‍ॅक्टिंग अधिक वाटलं. (मला नर्गीस आवडत नाहीच!) पण तिचे काही क्लोज-अप्स फार छान होते.
उत्तरार्धात कथानक अनपेक्षित वळण घेतं. शेवटी कै-च्या-कै नोटवर सिनेमा संपला असं मला वाटलं.

मला वाटतं अंदाज बॉलीवूडमधला पहिला अत्यंत क्लिशेड प्रेमत्रिकोण स्टोरी होता.

दिलीपकुमारपेक्षा मला राज कपूर आवडतो. दिलीप कुमारला ट्रॅजेडी किंग करून त्याच्याच इमेजमध्ये त्याची वाट लावली अन्यथा त्याला हलकेफ्हुलके रोल्स उत्तम जमायचे.

नर्गिस कधीच आवडली नाही. (अपवादः दम भर जो उधर मूह फेरे आणि नंतरचा "डूब जाने दो ये कश्तीवाला सीन) तिचा चेहरा फार उभा आहे, आणि डोळे काहीसे विचित्रच.

Pages