युक्ती सुचवा युक्ती सांगा- ४

Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36

स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.

याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनू, सुरणाचे काप छान होतात खूप. >>> हो. आणि न उकडता मीठ्,तिखट्,हळद लावून तांदळाच्या पिठात घोळवून शॅलो फ्राय केले तर मस्त लगतात.

सुरणाची भाजी छान होते, उपासाची तर अगदी सोपी आहे. बरोबर बटाटा, थोडा लाल भोपळापण छान लागतो.

आई किस पण करते सुरणाचा, मी नाही कधी केला.

सुरणाचे छोटेसे तुकडे करून्,हिंग राईच्या फोडणीवर भिजवलेल्या चणाडाळीसोबत शिजवावे.थोडासा कांदा,ओले खोबर्‍याचे वाटण (पाणी न घालता) भाजीत घालावे.तिखट्,चवीपुरता गूळ/साखर घालणे.गॅस बंद केल्यानंतर २-४ सोलं(कोकमं) घालणे.सुरण खाजरा असल्याने कोकम मस्ट.

एकदाच कधीतरी इथे मा.बो. वर वाचुनच सुरणाचे काप कि तुकडी अस काहीतरी केलं होतं. तेव्हा घरी आवडलं होतं खूप. कारण काही नाही पण सुरण फारसं आणल जात नाही.

बर्‍याच आयड्या मिळाल्या.पुढच्या वेळी सुरण घेतल्यावर वापरते. >>> Lol . आत्ताचा संपला का सुरण.

सुरण खाजरं असतं, त्यामुळे शिजवताना आमसुल/ चिंच/ टमॅटो यातलं काहीतरी एक नक्की घालावं. >>> हो मी आमसुल घालते. मी बऱ्याचदा उपासाचीच भाजी करते किंवा मिक्स भाजीत सुरण घालते, कांदा बटाटा टोमाटो वांगी वगैरे एकत्र करते तेव्हा.

अनु;
पुढील वेळी समजा आणले अन काही बनवले तर पाकृ टाका तुमच्या शैलीत.

बास आता ते सुरण पुराण. Angry उधींयो शिवाय सुरण कशातही घालूच नये मुळी. Happy त्यात पण ते का वापरायचे, कारण कळतच नाही ते आहे म्हणुन. फिलर म्हणुन उपयोगी पडते.
जरा सोप्या आवडत्या भाज्यांची चर्चा करा. वांगी भेंडी, झालच तर लाडका बटाटा आणि पनीरसुद्धा. हो भाजीच आहे ती. Wink

ऑफिशिअली ब्याडवर्ड ळॉळ!

रच्याकने, काल छोल्यांबरोबर खरपूस बटाटा करून पाहीला तो असा - सालासकट लहानगे बटाटे स्वच्छ धूवून क्वार्ट्स मध्ये चिरून घेतले. तव्यात जरासं तेल घालून त्यात हे बटाटे + मीठ असं बराचवेळ अगदी मंद आचेवर परतत खरपूस ब्राऊनिश करून घेतले. बोलमध्ये घेऊन वर छोले मसाला, आमचूर आणि कोथिंबीर जराशी असं.
अ फ ला तू न चव जमते. Happy विषेशत: छोले भटुरे, छोले पुडी इं बरोबर तर खासच एकदम.

नागपूरच्या कुठल्यातरी हॉटेलमध्ये छोले-भटुर्‍यांबरोबर एका लहान वाटीत साईडडिश म्हणून हे खाल्ले होते एकदा; काल करून पाहीले. नक्की करून पाहा.

भारतात असताना आई शंभर वेळा सुरण आणून उपासाची, साधी, मग उकडून नारळ कोथिंबिर घालून अशा अनेक प्रकारे तो सुरण पोटात घालायची. सुरणाच्या भाजीवर ओकंबा न येता पोटात घालण्याचा राम्बाण उपाय म्हणजे केचप लावून खाणे हे एक माझं बारकं इन्व्हेंशन होतं.
भारताबाहेर सुरण मिळत नाही याचा कोण आनंद आहे मला. आणि आता भारतात गेल्यावर तीच भाजी नॉस्टेल्जिआच्या फोडणीत घशाखाली जाते याचा माझ्या आईला!

भारताबाहेरही सुरण मिळू शकतं.
सुरणाची भाजी चांगली लागते.
सगळ्या भाज्या चांगल्याच लागतात.
आवडी निवडी बाजूला ठेवा आणि सगळ्या भाज्यांनां आपलं म्हणा!

Proud

सुरणाचा टि आर पी इथे अनेक लोकप्रिय भाज्यांपेक्षाही वाढला आहे.भारतात एका एम एल एम स्किम मध्ये मिळणार्‍या १ लाखाच्या चुंबकीय गादीप्रमाणे सुरणाचे फायदे सर्वांना मान्य आहेत, पण त्याला घरी आणून आपलंसं करण्यास मनातून कोणीच तयार नाही Happy

सुरणाला भारीच डिमांड ए Happy
एका मैत्रीणीने सांगितलं की सुरणाचे काप काय लागतात. फ्राय मासा काय नाही त्याच्यापुढे Uhoh
तर मी हिम्मत करुन थोडुसं (अगदी अनुने आणलं तेवढच असेल) सुरण आणलं आणि तिने सांगितल्याप्रमाणे मसाले लावुन काप फ्राय केले.
ठीक होते. पण सुरमई ती सुरमईच. उगा आपलं सुरणाच्या काप समोर मासा काय नाय. सोयावडी समोर चिकन मटण काय नाय बोलतात.

अरे सुरणाचा किस कसला भारी लागतो.
सुरण पाण्यात बुडवून स्वच्छ टुथब्रशने नीट स्वच्छ करावा. मग बाहेरची स्किन सोलाण्याने काढावी. हाताला तेल लावून मग किसून घ्यावा.
आता मीठ, दही लावून 10 मिनिटं मुरत ठेवावा. जिऱ्यावर फोडणी करावी त्यात किस परतावा. खोलगट झाकण टेऊन त्यात पाणी घालून वाफेवर शिजवावे. नंतर हिरवी मिरची, भाजलेले दाणे भरड वाटावेत. शिजलेल्या सुरणात हे टाकावे. परतून घ्यावे. वरून कोथिंबीर, लिंबु पिळून घ्यावे.

सुरणाचे तुकडे करून घ्यायचे बारीक. मग पाणी घालून कुकरम्धे उकडून घ्यायचे. खोबरं आणि मिरची वाटून आणि मीठ साखर घालून सगळं एकत्र शिजवायचं. उपासाची भाजी छान होते. वर दही घालून फार छान लागते.

नाही गराडु म्हणजे सुरण नसाव..नसु दे रे देवा.... गराडु म्हणजे जिनिकंद अस मी एकदा खाता रहे मेरा दिल च्या एपि मधे पाहिल होत.
आता जिनीकंद म्हणजे काय ????

सुरणाच्या फोटोसाठी Elephant-foot-yam सर्च करा.

एका मैत्रीणीने सांगितलं की सुरणाचे काप काय लागतात. फ्राय मासा काय नाही त्याच्यापुढे >>>> काहीही हं! Wink

हिंग मोहरीच्या फोडणीवर सुरणाचे थोडेसे मोठे तुकडे घालायचे. कांदा ओले खोबरे,धणे,मिरी,लवंग, दालचिनी इ.भाजून वाटण करायचे .वाटणात चिंच्,मालवणी मसाला घालायचा.हे वाटण सुरणावर घालायचे.भाजीत उगीच थोडा गूळही घालायचा.प्रे.पॅमध्ये १ शिटी काढायची.

गराडू म्हणजे कोनफळ!
नवीन Submitted by निर्मल on 16 October, 2018 - 13:22
>>>>>
उन्धियो तला निळा कंद

Pages