युक्ती सुचवा युक्ती सांगा- ४

Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36

स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.

याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुग्धा, तुमचा नवरा जर्मनीत कुठे येतोय? तिथे काय मिळेल आणि काय नाही याचा अंदाज देऊ शकेन स्मित >>>>
हॅमबर्ग मधे राह्णार आहे, एवढचं माहितिये मला बाकी विचारुन सांगते.

पोळीऐवजी ब्रेड / होल व्हीट / मल्टी ग्रेन ब्रेड नाही का खाऊ शकत महिनाभरासाठी? (सुरुवातीच्या दिवसांत आठवडाभरासाठी फ्रोझन पोळ्या नेऊ शकतात. पण दिवसाला किमान ४ - ५ याप्रमाणे आठ दिवसांच्या ४० पोळ्यांचे वजन वगैरे बघून घ्या.) >>> एक प्रश्न , या पोळ्या प्रवासात चालतात का? म्हणजे नवरा आणायला गेल्या होता , तेव्हा त्या सेल्समॅन ने सान्गितलं . चार पाच तासापेक्षा फ्रीजच्या बाहेर ठेउ नका. त्याला घरातून निघून , ऑनसाईट रूम मध्ये पोचायला आठ तास लागतिल म्हणून त्याने घेतल्या नाहीत.

"स्वतः " कीचन डिसेबल्ड असल्यामुळे MTR , noodles , ready to eat (heat n eat) वैगरे गोस्टीन्चा भरणा होता बॅगेत . पण अर्थातच रूमीज कीचन प्रो असल्यामुळे थोडे फार मसाले वगैरे पण घेउन गेले .

अवांतर : ऑनसाईट वरून फोन करून एक्दा बोलता बोलता उल्लेख केला " आज मी चिकन बनवलं" .
लेकाने लगेच सांगितलं " ईथे परत आल्यावर माझ्यासाठी आणि मम्मासाठी बनवशील ना ? ईथे नेहमी आजी आणि मम्माच जेवण बनवत असतात " . बाबाने कबूल केलयं . आता तो सुदिन कधी उगवतोय त्याची आम्ही वाट बघतोय .
: आकाशाकडे डोळे लावून बसलेली बाहूली :

घरात मालवणी वड्याचं पीठ आहे १ किलो, वडे सोडुन दुसरं काय करता येईल? धिरडी होतील का? किंवा आदल्या दिवशी पीठ भिजवुन दुसर्‍या दिवशी आंबोळ्या. असं काही केल तर चांगल लागेल का? अजुन काय करता येईल?

@स्वस्ति बरं झाल सांगितलतं असं असेल तर...फ़्रोजन पोळ्या जायच्या आधीच खराब होतील. तो ऑप्शन बाद झालाय.
काल थालिपीठ करायला शिकलाय. त्याला जाताना बरोबर भाजणी देणारे. भाजी, कांदा वगैरे चिरता येतोच त्याला. साधी आमटी आणि जरा भाज्या वगैरे घालुन आमटी असं पण करायला शिकला. या विकांताला बाकी ऑम्लेट बुर्जी वगैरे करुन बघणारे.
सगळ्यांच्या टिप्सचा खुप उपयोग होतोय. काल त्याला इथल्या पोस्ट वाचायला दिल्या. सध्या तो खुप उत्साहात आहे, साबा म्हणाल्या चांगला चान्स आहे त्याला स्वयंपाक शिकवुन घे, नंतर तुलाच उपयोग होईल Proud

दाबेलीचा मसाला दाबेली व्यतिरिक्त एरवी कशात वापरला आहे का? कशात चांगला लागतो? उसळीत वगैरे? कोणाला काही अनुभव?

तवाभाजीत तेल, जिरे, मिरचीच्या फोडणीवर उकडलेले स्वीट कॉर्न, कांदापात, चेरी टोमॅटो घालून स्टरफ्राय, वरून तिखट, मीठ, मिरपूड भुरभुरली की काम झाले. पोळी, ब्रेड, भाताबरोबर खाता येईल. (यात ब्रोकोली, फ्लॉवर, गाजर, मटार वगैरे इतर भाज्या, मशरूम्सही घालू शकता.)
पनीर भुर्जीही करायला खूपच सोपी. कांदा व टोमॅटो, हिरवी मिरची कापायचेच काय ते कष्ट.
ब्रेड पुडिंग सोपे. जेली, कस्टर्ड हेही करायला सोपे प्रकार. पाकिटावरच्या सूचना वाचून करायचे.
केळी, रताळी, खरबूज सहज मिळत असतील तर त्यांची शिकरण. रताळी, बटाटे उकडून नुसतेही खाऊ शकतात.
कोरड्या चटण्या (खोबरे, दाणे, कढीपत्ता, पूडचटणी) सोबत नेऊन त्या दही / तेल / तुपात कालवून किंवा नुसत्याही, स्प्रेडप्रमाणे वा तोंडीलावणे म्हणून वापरू शकतात.
पावभाजीही करायला सोपी आहे. जिंजर गार्लिक पेस्ट व पाभा मसाला असेल की झाले. भाज्या कुकरला शिजवून घ्यायच्या. पाकिटावर लिहिल्याबरहुकूम कृती करायची.

गवारीची भाजी रेडीमेड मेथीमुठीया घालून दाबेली मसाला अगदी अर्धा चमचाच घालून (खूप जास्त नाही, हलकेच स्वाद येण्यासाठी) खूप मस्त लागते.

मुग्धा, वड्याचं पीठ धिरडी/ आंबोळ्या/ थालिपीठं करून संपवता येईल, पीठ पेरून करायच्या भाज्यातही वापरता येईल. पराठे करताना अर्धी कणीक आणि अर्धं वड्याचं पीठ घालता येईल.

Thalipith

फ्रीजची आवाराआवर करताना लहानसा डबा भरुन (जवळ जवळ दोनशे ग्राम) चारोळ्या हाताशी लागल्यात. चांगल्या आहेत. खवट झालेल्या नाहीत. मी घरी श्रीखंड-बासुंदी करत नाही. नुसत्या खायला आवडत नाहीत. त्यांचे काय करावे?

कुळथाच्या पिठाचे पिठल्या व्यतिरिक्त काय करता येते?

भरलेल्या सांडगी मिरच्या तळण्याव्यतिरिक्त अजून कशा प्रकारे खाता येतील?

आप्पे पात्रात केक केला आहे का कोणी? केला असल्यास प्लीज इथे रेसिपी देणार क? किंवा लिंक द्या प्लीज
ऑल्ररेडी कुठे असेल तर....

पूनम दाबेलीच्या मसाला वापरून दाबेलीचीच भाजी करुन तीच वापरायची... फ्रँकी, पराठे करायला एकदम बेस्ट.. गेला बाजार पिझ्झ्यावर टॉपिंग म्हणून पण मस्त लागते...

गुगलबाबा सांगतोय Happy

Chehre ko Sundar Banaye:

Chironji ko gulab jal ke saath piskar chehre par lep lagaye. Phir jab yeh sukh jaye tab ise masal kar dho le. Isse chehra chikna, sundar aur chamakdar ban jayga.

गुळाच्या पोळ्या आवडत असतील तर त्या द्या. भरपूर तूप घाला मधे. आणि एक दोन कोरड्या चटण्या बरोबर.
एक किंवा दोन पोळ्या चटणीबरोबर खाल्ल्या की मस्त एक जेवण होऊन जाते. फ्रिजात टिकतात महिनाभर सुद्धा.

परदेशात एकटे राहणारे गृहकॄत्य-अदक्ष अशी जी जमात आहे त्यांच्यासाठी बी एम एम ने मॉम्ज किचन नावाचे एक मस्त पुस्तक काढलेले आहे ज्यात फोडण्या, वरणभात, कुकर लावणे पासून सगळ्या गोष्टींच्या कृती आणि टिप्स आहेत. तसेच देसी वस्तूंना अमेरिकेत काय म्हणतात, देसी मापांचे अंदाज अमेरिकेत कसे बघायचे, गॅस वरून इलेक्ट्रिकवर स्वैपाक करताना काय लक्षात ठेवायचे वगैरेही आहे बहुतेक. बीएमएम च्या सायटीवर होते ते पुस्तक. अजून मिळते का नाही माहित नाही पण मिळत असेल तर स्वैपाकातल्या शिशुवर्गापासून चौथीपर्यंत असलेल्या कुणालाही परदेशात वरदान ठरू शकते ते पुस्तक.
मी कुकर, खिचडी, बेसिक भाज्या, तुरीच्या डाळीची आमटी आणि चहा इतपतच येणारी होते. त्या पुस्तकाने मला तीन वर्ष तारले उसगावात. शेवटी कुणीतरी ढापले ते पुस्तक.

मेतकूटाचे 'मेतकूट-भात' सोडून इतर काय वापर करता येतील? मेतकूटभात नेहमी खाल्ला जात नाही त्यामुळे मेतकूट पडून राहिले आहे. ते हेल्दी कॅटेगरीत येत असल्यामुळे वाया घालवायचे नाहीये. तुम्ही कशाकशात वापरता मेतकूट?

मेतकुटाचे डांगर - मेतकूट, कच्चा कांदा बारीक चिरून, दही, तिखट, चवीनुसार मीठ. मिसळायचे. वरून फोडणी. तोंडीलावणे म्हणून छान.
पातळ पोह्यांत मेतकूट, तिखट, मीठ, साखर घालून वरून मोहरी जिरे हिंग हळदीची फोडणी.

सोहम ब्रँडचे गहु सत्व आणले आहे - पावडर आहे, आज चिकासारखे करुन बघितले तर चव अजिबात आवडली नाही. अजुन काही वेगळे पदार्थ करता येतील का ? कशात वापरता येइल ?

Pages