कर्करोगाबाबत आपल्याला काय माहीत असायला हवे-भाग एकूण ४ पैकी ४

Submitted by नरेंद्र गोळे on 26 June, 2013 - 22:10

Dictionary
शब्दकोश

Acupuncture (AK-yoo-PUNK-cher): The technique of inserting thin needles through the skin at specific points on the body to control pain and other symptoms. It is a type of complementary and alternative medicine.
ऍक्युपंक्चरः दुःख आणि इतर लक्षणांचे नियंत्रण करण्याकरता, शरीरावरील विशिष्ट बिंदूंवर, त्वचेतून बारीक सुया खुपसण्याचे तंत्र. हे एक प्रकारचे पूरक आणि पर्यायी उपचारतंत्र आहे.

AIDS: Acquired immunodeficiency syndrome (ah-KWY-erd im-YOON-o-de-FISH-en-see SIN-drome). A disease caused by the human immunodeficiency virus (HIV). People with AIDS are at an increased risk for developing certa in cancers and for infections that usually occur only in individuals with a weak immune system.
अधिगृहित-प्रतिरक्षा-कमतरता-लक्षणसमूहः (एडस् - ऍक्वायर्ड-इम्युनोडेफिशिअन्सी-सिन्ड्रोम):
मानवी-प्रतिरक्षा-कमतरता (ह्युमन-इम्युनोडेफिशिअन्सी-व्हायरस– एच.आय.व्ही) विषाणूंमुळे होणारा रोग. हया रोगाने ग्रस्त असलेल्या लोकांना कर्क विकसित होण्याचा आणि बहुधा केवळ अशक्त-प्रतिरक्षा-प्रणाली असलेल्या व्यक्तींत आढळून येतात अशा संसर्गास बळी पडण्याचा धोका वाढलेला असतो.

Bacteria (bak-TEER-ee-uh): A large group of singlecell microorganisms. Some cause infections and disease in animals and humans. The singular of bacteria is bacterium.
जीवाणूः एकपेशीय सूक्ष्मजंतूंचा एक मोठा गट. काही जीवाणू मनुष्यांत व इतर प्राण्यांत संसर्गास व रोगास कारण ठरतात. जीवाणूंचे एकवचनही जीवाणू असेच होत असते.

BCG solution: A form of biological therapy for superficial bladder cancer. A catheter is used to place the BCG solution into the bladder. The solution contains live, weakened bacteria (bacille Calmette- Guérin) that activate the immune system. The BCG solution used for bladder cancer is not the same thing as BCG vaccine, a vaccine for tuberculosis.
बी.सी.जी.द्रावणः पृष्ठभागावरील मूत्राशय-कर्काकरताच्या जैव उपचारपद्धतीचे एक स्वरूप. मूत्राशयात हे द्रावण ठेवण्याकरता एक प्रवेशक (कॅथेटर) वापरतात. द्रावणात जिवंत, अशक्त-केलेले-जीवाणू (बॅसिली-कामिटे-ग्युएरीन) असतात, जे प्रतिरक्षा प्रणालीस कार्यान्वित करत असतात. मूत्राशय-कर्काकरता वापरले जाणारे बी.सी.जी.द्रावण म्हणजे क्षयरोगावरील बी.सी.जी. लसीकरणार्थ वापरले जाणारे द्रावण नव्हे.

Benign (beh-NINE): Not cancerous. Benign tumors do not spread to tissues around them or to other parts of the body.
सौम्यः कर्कमय नसलेले. सौम्य अर्बुदे सभोवतालच्या ऊतींत किंवा शरीराच्या इतर भागांत पसरत नाहीत.

Biological therapy (by-o-LAHJ-i-kul): Treatment to stimulate or restore the ability of the immune system to fight infections and other diseases. Also used to lessen certain side effects that may be caused by cancer treatment. Also known as immunotherapy, biotherapy, or biological response modifier (BRM) therapy.
जैव-उपचारपद्धतीः संसर्ग आणि इतर रोगांचा सामना करण्याचे, प्रतिरक्षा प्रणालीचे सामर्थ्य, उत्तेजित किंवा पूर्ववत्‌ करणारे उपचार. ह्यांचा उपयोग, कर्कोपचारांमुळे उद्‌भवलेले काही उप-प्रभाव घटविण्याकरताही केला जात असतो. ह्या उपचारपद्धतीस प्रतिरक्षा-उपचार-पद्धती, जैव-उपचार-पद्धती किंवा जैव-प्रतिसाद-पालट-उपचार-पद्धती (बायोलॉजिकल-रिस्पॉन्स-मॉडिफायर) असेही म्हटले जात असते.

Biopsy (BY-op-see): The removal of cells or tissues for examination by a pathologist. The pathologist may study the tissue under a microscope or perform other tests. When only a sample of tissue is removed, the procedure is called an incisional biopsy. When an entire lump or suspicious area is removed, the procedure is called an excisional biopsy.
नमुना-निष्कर्षण-शल्यक्रिया (बायोप्सी): रोगनिदानतज्ञाने तपासणीकरता, पेशी किंवा ऊती काढून घेण्याची शल्यक्रिया. रोगनिदानतज्ञ ऊतींचा सूक्ष्मदर्शकाखाली अभ्यास करेल किंवा इतर चाचण्या करेल. जेव्हा केवळ ऊतीचा नमुना काढून घेतला जात असतो, त्या कार्यवाहीला (प्रोसिजर) अंशछेद-नमुना-निष्कर्षण म्हटले जाते. जेव्हा संपूर्ण लपका (लंप) किंवा संशयास्पद भाग काढून टाकला जातो तेव्हा त्या कार्यवाहीला पूर्णछेदक-नमुना-निष्कर्षण म्हटले जाते.

When a sample of tissue or fluid is removed with a needle, the procedure is called a needle biopsy, core biopsy, or fine-needle aspiration.
जेव्हा ऊती अथवा द्रव यांचा नमुना सुईने काढून घेतला जात असतो तेव्हा, त्या कार्यवाहीस सुईचे-नमुना-निष्कर्षण, गाभा-निष्कर्षण किंवा सूक्ष्म-सुई-चूषण म्हटले जाते.

Bone marrow: The soft, sponge-like tissue in the center of most large bones. It produces white blood cells, red blood cells, and platelets.
अस्थीमज्जाः बहुतेक मोठ्या अस्थींच्या मध्यभागातील मऊ, लवचिक ऊती. ह्या ऊती पांढर्‍या रक्तपेशी, लाल रक्तपेशी, आणि बिंबाणूंची निर्मिती करत असतात.

Brachytherapy (BRAKE-ih-THER-a-pee): A procedure in which radioactive material sealed in needles, seeds, wires, or catheters is placed directly into or near a tumor. Also called internal radiation, implant radiation, or interstitial radiation therapy.
स्थापित-प्रारण-उपचार (ब्राकिथेरपी): किरणोत्सारी पदार्थ; सुई, बीज, तारा किंवा प्रवेशकात बंद करून थेट अर्बुदाजवळ ठेवला जातो; ती कार्यवाही. हिलाच अंतर्गत प्रारण, रोपण-प्रारण किंवा शरीरांतर्गत-प्रारण-उपचारपद्धती असेही संबोधले जात असते.

Cancer: A term for diseases in which abnormal cells divide without control. Cancer cells can invade nearby tissues and can spread through the bloodstream and lymphatic system to other parts of the body. There are several main types of cancer. Carcinoma is cancer that begins in the skin or in tissues that line or cover internal organs. Sarcoma is cancer that begins in bone, cartilage, fat, muscle, blood vessels, or other connective or supportive tissue. Leukemia is cancer that starts in blood-forming tissue such as the bone marrow, and causes large numbers of abnormal blood cells to be produced and enter the bloodstream. Lymphoma and multiple myeloma are cancers that begin in the cells of the immune system.
कर्कः ज्या रोगात, अपसामान्य पेशी अनियंत्रितपणे वाढतात, अशा रोगासाठी वापरली जाणारी संज्ञा. कर्कपेशी, आसपासच्या ऊतींत आक्रमण करू शकतात आणि रक्तवाहिन्या व लसिकाप्रणालीवाटे शरीराच्या इतर भागांत पसरू शकतात. कर्काचे प्रमुख प्रकार अनेक आहेत. मांसकर्क (कार्सिनोमा), त्वचेत किंवा अंतर्गत अवयवांना झाकणार्‍या किंवा त्यांचे अस्तर ठरणार्‍या ऊतींत उद्‌भवत असतो. अस्थीबंध-कर्क (सार्कोमा) हा अस्थी, अस्थीबंध, मेद, स्नायू, रक्तवाहिन्या किंवा इतर जोडणार्‍या किंवा आधारात्मक ऊतींत उद्‌भवत असतो. रक्तकर्क (ल्युकेमिया) हा अस्थीमज्जेसारख्या रक्त-निर्मिती-ऊतींत उद्‌भवत असतो आणि अपसामान्यपणे मोठ्या संख्येत रक्तपेशींची निर्मिती करून मग रक्तप्रवाहात प्रवेश करत असतो. लसिकाकर्क (लिम्फोमा) आणि बहुल-अस्थीमज्जाकर्क (मल्टिपल मायलोमा) हे कर्क प्रतिरक्षा प्रणालीतील पेशींत उद्‌भवत असतात.

Cell: The individual unit that makes up the tissues of the body. All living things are made up of one or more cells.
पेशीः शारीरिक ऊती ज्या एककांपासून घडलेल्या असतात असे एक स्वतंत्र (सजीव) एकक. सर्व सजीव वस्तू एक वा अनेक पेशी मिळूनच तयार होत असतात.

Chemotherapy (kee-mo-THER-a-pee): Treatment with drugs that kill cancer.
रसायनोपचारः कर्कविनाशक रसायनांद्वारे केल्या जाणार्‍या उपचारांची पद्धत.

Clinical trial: A type of research study that tests how well new medical interventions work in people. Such studies test new methods of screening, prevention, diagnosis, or treatment of a disease. Studies may be carried out in a clinic or other medical facility. Also called a clinical study.
वैद्यकीय चाचणीः एक संशोधन अभ्यास, ज्यात नवीन-वैद्यकीय-अतिक्रमक-उपचार, रुग्णांत कशा प्रकारे काम करत आहेत ह्याची चाचणी घेतली जात असते. असे अभ्यास; नवीन गाळणी, प्रतिबंध, निदान किंवा रोगावरील उपचार तपासत असतात. हे अभ्यास आरोग्यकेंद्रांत (क्लिनिक) किंवा वैद्यकीय आस्थापनांत केले जात असतात. ह्यांनाच वैद्यकीय अभ्यास असेही म्हटले जात असते.

Colonoscopy (ko-lun-AHS-ko-pee): An examination of the inside of the colon using a thin, lighted tube (called a colonoscope) inserted into the rectum. If abnormal areas are seen, tissue can be removed and examined under a microscope to determine whether disease is present.
प्रकाशित-नलिका-आंत्रदर्शनः गुदावाटे शिरवलेल्या, बारीक, प्रकाशित-नलिका-दर्शका (कोलोनोस्कोप) चा उपयोग करून आतड्याच्या आतील भागाची केली जाणारी तपासणी. अपसामान्य भाग लक्षात आल्यास, ऊतींचे नमुने काढून घेण्यात येतात आणि रोगाचे अस्तित्व निर्धारित करण्यासाठी, सूक्ष्मदर्शकाखाली तपासले जातात.

Complementary and alternative medicine: CAM.
पूरक आणि पर्यायी उपचार (सी.ए.एम.)

Forms of treatment that are used in addition to (complementary) or instead of (alternative) standard treatments. These practices generally are not considered standard medical approaches. Standard treatments have gone through a long and careful research process to prove they are safe and effective, but less is known about CAM. CAM may include dietary supplements, megadose vitamins, herbal preparations, special teas, acupuncture, massage therapy, magnet therapy, spiritual healing, and meditation.
प्रमाणित उपचारांव्यतिरिक्त (पूरक) किंवा त्यांऐवजी (पर्यायी) दिल्या जाणार्‍या उपचारांचे स्वरूप. ह्या प्रथा सामान्यतः प्रमाणित-वैद्यकीय-पद्धती मानल्या जात नाहीत. प्रमाणित-उपचार-पद्धती, सुरक्षित आणि प्रभावी आहेत हे सिद्ध करण्याकरता दीर्घ आणि काळजीपूर्वक संशोधन प्रक्रियांतून गेलेल्या असतात. मात्र पूरक आणि पर्यायी उपचार पद्धतींबाबत फारशी माहिती नसते. ह्यांत आहार पूरके, प्रचंड-मात्रांतील-जीवनसत्त्वे (मेगाडोस व्हिटॅमिन्स), सिद्ध केलेल्या वनौषधी, विशेष चहा, ऍक्युपंक्चर, शरीरमर्दन, चुंबकचिकित्सा, आध्यात्मिक उपाय आणि ध्यानधारणा इत्यादींचा समावेश होत असतो.

CT scan: Computed tomography scan. A series of detailed pictures of areas inside the body taken from different angles; the pictures are created by a computer linked to an x-ray machine. Also called computerized tomography and computerized axial tomography (CAT) scan.
संगणित-त्रिमिती-चित्रांकन (सी.टी.स्कॅन): संगणकाशी संलग्न असलेल्या क्ष-किरण-यंत्राद्वारे, शरीरांतर्गत भागांच्या, निरनिराळ्या कोनांतून घेतलेल्या, तपशीलवार चित्रांची मालिका तयार केली जाते. ह्या तंत्रास, संगणीकृत-त्रिमिती-आलेखन आणि संगणीकृत-अक्षीय-त्रिमिती-चित्रांकन (सी.ए.टी.स्कॅन) असेही म्हटले जात असते.

Diethylstilbestrol (dye-ETH-ul-stil-BES-trol): DES. A synthetic form of the hormone estrogen that was prescribed to pregnant women between about 1940 and 1971 because it was thought to prevent miscarriages. DES may increase the risk of uterine, ovarian, or breast cancer in women who took it. DES also has been linked to an increased risk of clear cell carcinoma of the vagina or cervix in daughters exposed to DES before birth.
डाय-ईथिल-स्टिलबेस्ट्रॉल (डी.ई.एस.): सुमारे १९४० ते १९७१ दरम्यान गर्भार स्त्रियांना दिला जाणारा कृत्रिम अंतर्स्त्राव, इस्ट्रोजन. कारण त्याकाळी असा विचार केला जाई की, त्यामुळे गर्भपात रोखला जातो. ह्याच्या सेवनामुळे गर्भाशयाच्या, बिजांडकोशाच्या किंवा स्त्रियांत स्तनांच्या कर्कांचा धोका वाढत असतो. जन्मापूर्वीच डी.ई.एस.च्या संपर्कात आलेल्या मुलीच्या बाबतीत, योनी किंवा गर्भाशयग्रीवेच्या स्पष्ट-पेशी-मांसकर्काचा वाढता धोकाही, डी.ई.एस.शी संलग्न केला गेलेला आहे.

Dietitian: A health professional with special training in nutrition who can help with dietary choices. Also called a nutritionist.
आहारतज्ञः पोषणशास्त्रातील विशेष प्रशिक्षण घेतलेला आरोग्य व्यावसायिक, जो आहारात्मक निवडी करण्यास मदत करू शकतो. ह्यास पोषणतज्ञ असेही म्हटले जाते.

Digestive tract (dye-JES-tiv): The organs through which food and liquids pass when they are swallowed, digested, and eliminated. These organs are the mouth, esophagus, stomach, small and large intestines, and rectum.
पचनपथ किंवा पचनसंस्थाः अन्न व द्रव पदार्थ गिळल्यावर, ज्या अवयवांमधून पार होत, पचविले आणि निष्कासिले जात असतात, त्या अवयवांचा पथ. हे अवयव म्हणजे मुख, अन्ननलिका, पोट, लहान व मोठी आतडी आणि गुद हे असतात.

Digital rectal exam: DRE. An examination in which a doctor inserts a lubricated, gloved finger into the rectum to feel for abnormalities.
अंकीय गुदपरीक्षण (डी.आर.ई. डिजिटल-रेक्टल-एक्झामिनेशन): ह्या परीक्षणात डॉक्टर एक वंगणस्निग्धित, हातमोज्याने वेष्ठित बोट गुदात शिरवून अपसामान्यतांचा वेध घेत असतो.

Double-contrast barium enema: A procedure in which x-rays of the colon and rectum are taken after a liquid containing barium is put into the rectum. Barium is a silver-white metallic compound that outlines the colon and rectum on an x-ray and helps show abnormalities. Air is put into the rectum and colon to further enhance the x-ray.
दुहेरी-गुणविधर्म-बेरियम-बस्तीः एक कार्यवाही जिच्यात, बेरियमधारी द्रव गुदात शिरवल्यानंतर, आतडी व गुदाची क्ष-किरण चाचणी घेतली जाते. बेरियम हे चांदीसारखे चकाकते धात्विक संयुग असते जे, आतडी व गुद यांची बाह्यरेषा क्ष-किरणांद्वारे चित्रित करते आणि अपसामान्यता दाखवून देण्यास मदत करते. क्ष-किरण चित्रे आणखी चांगली करण्यासाठी गुदात हवाही शिरवली जात असते.

Epstein-Barr virus: EBV. A common virus that remains dormant in most people. It has been associated with certain cancers, including Burkitt’s lymphoma, immunoblastic lymphoma, and nasopharyngeal carcinoma.
ईप्स्टीन-बार्र-विषाणू (ई.बी.व्ही.): एक सामान्य विषाणू जो बहुतेक व्यक्तींत सुप्तावस्थेत राहत असतो. बर्किट यांचा लसिकाकर्क, प्रतिरक्षा-स्फोटक-लसिकाकर्क आणि नाक-घसा-मांसकर्क इत्यादी काही कर्कांशी त्याचा संबंध जोडण्यात आलेला आहे.

Estrogen (ES-tro-jin): A hormone that promotes the development and maintenance of female sex
characteristics.
ईस्ट्रोजनः स्त्री-लिंग-स्वभावाचा विकास व अनुरक्षण यांस उत्तेजना देणारा अंतस्त्राव.

Excisional biopsy (ek-SI-zhun-al BY-op-see): A surgical procedure in which an entire lump or
suspicious area is removed for diagnosis. The tissue is then examined under a microscope.
पूर्णछेदक-नमुना-निष्कर्षण-शल्यक्रिया (एक्सिजनल बायॉप्सी): शरीरातील (कर्क) संशयित भाग संपूर्णपणे किंवा निदानाकरता अंशतः शल्यक्रियेने काढून घेण्याची कार्यवाही. अशी काढून घेतलेली ऊती मग सूक्ष्मदर्शकाखाली तपासण्यात येत असते.

External radiation (ray-dee-AY-shun): Radiation therapy that uses a machine to aim high-energy rays at the cancer. Also called external-beam radiation.
बाह्य प्रारणः उच्च-ऊर्जा किरणे कर्कावर रोखण्याकरता प्रारणोपचारपद्धतीत यंत्राचा उपयोग केला जात असतो. अशा प्रकारे बाहेरील यंत्राद्वारे दिल्या जाणार्‍या प्रारणांना बाह्य प्रारणे म्हणतात. ह्यासच बाह्य शलाका प्रारण असेही म्हटले जाते.

Fecal occult blood test (FEE-kul o-KULT): FOBT. A test to check for blood in stool. (Fecal refers to stool; occult means hidden.)
शौच्य-अदृष्ट-रक्त-चाचणी (एफ.ओ.बी.टी. फिकल ऑकल्ट ब्लड टेस्ट): शौचात रक्त आढळते का ह्याची तपासणी.

Fertility (fer-TIL-i-tee): The ability to produce children.
फलनक्षमताः अपत्यप्राप्तीचे सामर्थ्य.

Gene: The functional and physical unit of heredity passed from parent to offspring. Genes are pieces of DNA, and most genes contain the information for making a specific protein.
जनुकाः आई-वडिलांकडून मुलांना प्राप्त होणार्‍या वारशाचे कार्यकारी आणि शारीर एकक. जनुका ह्या अपान-शर्करा-गर्भकाम्लाच्या घटक असतात आणि बहुतेक जनुकांत विशिष्ट प्रथिने तयार करण्याची माहिती साठवलेली असते.

Genetic testing: Analyzing DNA to look for a genetic alteration that may indicate an increased risk for developing a specific disease or disorder.
जनुकीय चाचणीः विशिष्ट रोग वा विकृती यांच्या विकासाकरता, वाढलेला धोका सूचित करणारे जनुकीय बदल शोधण्याकरता केलेले, अपान-शर्करा-गर्भकाम्लाचे विश्लेषण.

Helicobacter pylori (HEEL-ih-ko-BAK-ter pye-LOR-ee): H. pylori. Bacteria that cause inflammation and ulcers in the stomach and small intestine.
हेलिकोबॅक्टर पायलोरी (एच.पायलोरी): पोटात आणि लहान आतड्यात जळजळ आणि व्रण निर्माण करणारा जीवाणू.

Hematologist (hee-ma-TOL-o-jist): A doctor who specializes in treating blood disorders.
रक्तशास्त्रज्ञः रक्त-विकृतींवर उपचार करणारा तज्ञ डॉक्टर.

Hepatitis B virus: A virus that causes hepatitis (inflammation of the liver). It is carried and passed to others through blood or sexual contact. Also, infants born to infected mothers may become infected with the virus.
हेपटायटिस-बी-विषाणूः यकृताची जळजळ उत्पन्न करणारा (हेपटायटिसचा) विषाणू. मानवी शरीराद्वारे ह्याचे वहन केले जात असते आणि रक्त वा लैंगिक संक्रमणाद्वारे तो इतरांना दिला जात असतो. याशिवाय, संसर्गबाधित स्त्रियांना होणारी बालकेही ह्या विषाणूने संसर्गग्रस्त होऊ शकत असतात.

Hepatitis C virus: A virus that causes hepatitis (inflammation of the liver). It is carried and passed to others through blood or sexual contact. Also, infants born to infected mothers may become infected with the virus.
हेपटायटिस-सी-विषाणूः यकृताची जळजळ उत्पन्न करणारा (हेपटायटिसचा) विषाणू. मानवी शरीराद्वारे ह्याचे वहन केले जात असते आणि रक्त वा लैंगिक संक्रमणाद्वारे तो इतरांना दिला जात असतो. याशिवाय, संसर्गबाधित स्त्रियांना होणारी बालकेही ह्या विषाणूने संसर्गग्रस्त होऊ शकत असतात.

Hormone: A chemical made by glands in the body. Hormones circulate in the bloodstream and control the actions of certain cells or organs. Some hormones can also be made in a laboratory.
अंतर्प्रेरकः शरीरातील ग्रंथीद्वारे निर्माण केलेले एक रसायन. हे रक्तप्रवाहात फिरत असते आणि काही विशिष्ट पेशी वा अवयवांच्या कार्यांचे नियंत्रण करत असते. काही अंतर्प्रेरके प्रयोगशाळेतही तयार केली जाऊ शकतात.

Hormone therapy: Treatment that adds, blocks, or removes hormones. For certain conditions (such as diabetes or menopause), hormones are given to adjust low hormone levels. To slow or stop the growth of certain cancers (such as prostate and breast cancer), hormones may be given to block the body’s natural hormones. Sometimes surgery is needed to remove the gland that makes hormones. Also called hormonal therapy, hormone treatment, or endocrine therapy.
अंतर्प्रेरक-उपचार-पद्धतीः असे उपचार ज्यांत अंतर्प्रेरके शरीरात भरली, रोखली वा शरीरातून काढली जात असतात. काही विशिष्ट अवस्थांत (जसे की मधुमेह अथवा रजोनिवृत्ती) त्यांची पातळी सांभाळण्याकरता अंतर्प्रेरके शरीरात भरली जातात. काही विशिष्ट कर्कांची (जसे की पुरस्थग्रंथीकर्क आणि स्तनांचा कर्क ह्यांची) वाढ रोखण्याकरता शरीरातील नैसर्गिक अंतर्प्रेरके रोखली जातात. काही वेळेस अंतर्प्रेरक-स्त्रवणारी-ग्रंथी काढून टाकण्याकरता शल्यक्रिया करावी लागत असते. ह्या उपचार पद्धतीसच अंतर्प्रेरक-उपचार अथवा एंडोक्रीन-थेरपी असेही म्हटले जात असते.

Human herpesvirus 8: HHV8. A member of the herpes family of viruses. It is a risk factor for Kaposi’s sarcoma, a rare cancer that can cause skin lesions.
मानवी-नागीण-विषाणू (एच.एच.व्ही.-८ ह्युमन-हर्पिस-व्हायरस): नागीण कुटुंबातील हा विषाणू, क्वचितच आढळून येत असलेल्या आणि त्वचेवर व्रण/जखमा निर्माण करू शकणार्‍या, कापोसी यांच्या अस्थीबंध-कर्काकरताचा धोकेगुणक ठरत असतो.

Human immunodeficiency virus: HIV. The cause of acquired immunodeficiency syndrome (AIDS).
मानवी-प्रतिरक्षा-कमतरता-विषाणू (एच.आय.व्ही. ह्युमन-इम्युनोडेफिशिअन्सी-व्हायरस): मानवी-प्रतिरक्षा-कमतरता-लक्षणसमूहाचे कारण हाच विषाणू असतो.

Human papillomavirus (pap-ih-LO-ma-VYE-rus): HPV. A virus that causes abnormal tissue growth (warts) and is associated with some types of cancer.
मानवी-चामखीळ-विषाणू (एच.पी.व्ही. – ह्युमन पापिलोमा व्हायरस): हा विषाणू ऊतींच्या अपसामान्य वाढीस (चामखीळीस) कारणीभूत ठरत असतो आणि काही प्रकारच्या कर्कांशी ह्याचा संबंध जोडला गेलेला आहे.

Human T-cell leukemia virus type 1: A retrovirus that infects T cells (a type of white blood cell) and can cause leukemia and lymphoma. HTLV-1 is spread by sharing syringes or needles used to inject drugs, through sexual contact, and from mother to child at birth or through breast-feeding.
मानवी टी-सेल रक्तकर्क किंवा लसिकाकर्क विषाणू (एच.टी.एल.व्ही.-१ ह्युमन-टी-सेल-ल्युकेमिया/ लिम्फोमा-व्हायरस): टी-पेशींना (एक प्रकारच्या पांढर्‍या रक्तपेशींना) प्रभावित करणारा एक विषाणू. ह्या विषाणूच्या संसर्गामुळे रक्तकर्क आणि लसिकाकर्क उद्‌भवण्याचा धोका वाढत असतो. ह्याचा प्रसार औषधे शरीरात शिरवण्याकरता वापरल्या जाणार्‍या सुईसारख्या उपकरणांच्या सहवापराद्वारे, लैंगिक संपर्काद्वारे आणि जन्मवेळी-मातेकडून-बालकास किंवा स्तनपानाद्वारे बालकास होत असतो.

Imaging procedure: A method of producing pictures of areas inside the body.
चित्रांकन कार्यवाहीः शरीराच्या अंतर्भागातील चित्रे निर्माण करण्याची एक पद्धत.

Implant radiation (ray-dee-AY-shun): A procedure in which radioactive material sealed in needles, seeds, wires, or catheters is placed directly into or near a tumor. Also called brachytherapy, internal radiation, or interstitial radiation.
रोपण-प्रारणः एक कार्यवाही जिच्यात; सुई, बीज, तारा अथवा प्रवेशकांत बंद केलेला प्रारक पदार्थ थेट अर्बुदात वा त्यानजीक बसवला जातो. ह्यासच ब्राचिथेरपी, अंतर्गत प्रारण किंवा शरीरापेशींतील फटीतील प्रारण असेही म्हटले जात असते.

Incisional biopsy (in-SIH-zhun-al BY-op-see): A surgical procedure in which a portion of a lump or suspicious area is removed for diagnosis. The tissue is then examined under a microscope.
अंशछेदक-नमुना-निष्कर्षण-शल्यक्रियाः एक अशी शल्यकर्म प्रक्रिया जिच्यात, शरीरातील संशयित भाग पूर्णतः अथवा निदानाकरता अंशतः काढून घेतला जात असतो. अशा ऊतींची मग सूक्ष्मदर्शकाखाली तपासणी केली जाते.

Infection: Invasion and multiplication of germs in the body. Infections can occur in any part of the body, and can spread throughout the body. The germs may be bacteria, viruses, yeast, or fungi. They can cause a fever and other problems, depending on where the infection occurs. When the body’s natural defense system is strong, it can often fight the germs and prevent infection. Cancer treatment can weaken the natural defense system.
संसर्गः शरीरावर होणारे जंतूंचे आक्रमण आणि त्यांचे घडून येणारे गुणन. संसर्ग शरीराच्या कुठल्याही भागात होऊ शकत असतो आणि मग संपूर्ण शरीरभर तो पसरतही जाऊ शकत असतो. जंतू हे जीवाणू, विषाणू, किण्व (यिस्ट) किंवा अळंबे (फंगी) यांपैकी काहीही असू शकतात. संसर्ग कुठे झालेला आहे त्यावर अवलंबून, त्यामुळे ताप येऊ शकतो किंवा अन्य समस्याही निर्माण होऊ शकतात. जेव्हा शरीराची स्व-संरक्षण प्रणाली सशक्त असते तेव्हा, अनेकदा ती जंतूंचा सामना करून संसर्ग रोखू शकत असते. कर्कोपचार नैसर्गिक-संरक्षण-प्रणाली कमजोर करू शकतात.

Infertility: The inability to produce children.
वंध्यत्वः संतती निर्माण करण्यातील असमर्थता.

Internal radiation (ray-dee-AY-shun): A procedure in which radioactive material sealed in needles, seeds, wires, or catheters is placed directly into or near a tumor. Also called brachytherapy, implant radiation, or interstitial radiation therapy.
अंतर्गत प्रारणः एक कार्यवाही जिच्यात; सुई, बीज, तारा अथवा प्रवेशकांत बंद केलेला प्रारक पदार्थ थेट अर्बुदात वा त्यानजीक बसवला जातो. ह्यासच ब्राचिथेरपी, रोपण-प्रारण किंवा शरीरापेशींतील फटीतील प्रारण असेही म्हटले जात असते.

Ionizing radiation (EYE-ah-NIZE-ing ray-dee-AYshun): A type of high-frequency radiation produced by x-ray procedures, radioactive substances, rays that enter the Earth’s atmosphere from outer space, and other sources. Ionizing radiation can enter cells and lead to health risks, including cancer, at certain doses.
मूलककारी प्रारणः क्ष-किरण प्रक्रियांद्वारे निर्मित, किरणोत्सारी पदार्थापासून उद्‌भवणारे किंवा बाह्य अवकाशातून आणि इतर स्त्रोतांपासून पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करणार्‍या किरणांतून येणारे, एक प्रकारचे उच्च-वारंवारिता-प्रारण. हे पेशीत प्रवेश करू शकते आणि विशिष्ट मात्रांत असल्यास, कर्कासहित आरोग्य-धोक्यांप्रत नेऊ शकत असते.

Leukemia (loo-KEE-mee-a): Cancer that starts in blood-forming tissue such as the bone marrow, and causes large numbers of blood cells to be produced and enter the bloodstream.
रक्तकर्कः हा कर्क, अस्थीमज्जेसारख्या रक्त-निर्मक-ऊतींत उद्‌भवू शकत असतो आणि ह्यामुळे मोठ्या संख्येतील रक्तपेशी निर्माण होऊन रक्तप्रवाहात प्रवेश करत असतात.

Leukocyte (LOO-ko-site): A white blood cell. Refers to a blood cell that does not contain hemoglobin. White blood cells include lymphocytes, neutrophils, eosinophils, macrophages, and mast cells. These cells are made by bone marrow and help the body fight infection and other diseases.
पांढर्‍या रक्तपेशीः रक्तरंजकद्रव्य नसलेल्या रक्तपेशी. ह्यांत लसिकापेशी (लिम्फोसाईटस), (न्युट्रोफिल्स), (ईओसिनोफिल्स), (मॅक्रोफेगस), आणि (मॅस्ट) पेशींचा समावेश होत असतो. ह्या पेशी अस्थीमज्जेद्वारे तयार केल्या जात असतात आणि शरीरास संसर्ग व इतर रोगांचा सामना करण्यास मदत करत असतात.

Local therapy: Treatment that affects cells in the tumor and the area close to it.
स्थानिक-उपचार-पद्धतः असे उपचार जे अर्बुदातील आणि त्याचे आसपासच्या पेशींना प्रभावित करतील.

Lymph node (limf node): A rounded mass of lymphatic tissue that is surrounded by a capsule of connective tissue. Lymph nodes filter lymph (lymphatic fluid), and they store lymphocytes (white blood cells). They are located along lymphatic vessels. Also called a lymph gland.
लसिकाजोडः लसिका प्रणालीतील ऊतींचे एक गोलाकार वस्तुमान, जे संबंधित ऊतींनी सर्व बाजूंनी वेढलेले असते. लसिकाजोड लसिकाद्रव्य गाळण्याचे काम करतात आणि लसिकापेशी साठवत असतात. लसिकाजोड लसिका वाहिन्यांत वसत असतात. लसिका जोडांनाच लसिकाग्रंथी असेही म्हटले जात असते.

Lymphatic system (lim-FAT-ik SIS-tem): The tissues and organs that produce, store, and carry white blood cells that fight infections and other diseases. This system includes the bone marrow, spleen, thymus, lymph nodes, and lymphatic vessels (a network of thin tubes that carry lymph and white blood cells). Lymphatic vessels branch, like blood vessels, into all the tissues of the body.
लसिका-प्रणालीः संसर्ग आणि इतर रोगांशी सामना करणार्‍या पांढर्‍या रक्तपेशींची निर्मिती, साठवण आणि वाहतूक करणार्‍या ऊती आणि अवयव यांपासून लसिका प्रणाली बनलेली असते. ह्या प्रणालीत अस्थीमज्जा, प्लिहा, हृदोधिष्ठ ग्रंथी, लसिकाजोड आणि लसिका-वाहिन्या (बारीक नलिकांचे एक जाळे, ज्यातून लसिका आणि पांढर्‍या रक्तपेशींची वाहतूक होत असते). लसिका-वाहिन्यांना, शरीरातील सर्व ऊतींपर्यंत, रक्तवाहिन्यांप्रमाणेच फाटे फुटत असतात.

Lymphoma (lim-FO-ma): Cancer that begins in cells of the immune system.
लसिकाकर्कः प्रतिरक्षा प्रणालीतील पेशींत उद्‌भवणारा कर्क.

Malignant (ma-LIG-nant): Cancerous. Malignant tumors can invade and destroy nearby tissue and
spread to other parts of the body.
मारकः कर्कमय. मारक अर्बुदे आसपासच्या ऊतींवर आक्रमण करून त्यांचा विनाश घडवू शकतात आणि शरीराच्या इतर भागांत प्रसृत होऊ शकतात.

Mammogram (MAM-o-gram): An x-ray of the breast.
स्तनालेखनः स्तनांची क्ष-किरण चाचणी.

Medical oncologist (MED-i-kul on-KOL-o-jist): A doctor who specializes in diagnosing and treating cancer using chemotherapy, hormonal therapy, and biological therapy. A medical oncologist often is the main health care provider for someone who has cancer. A medical oncologist also provides supportive care and may coordinate treatment provided by other specialists.
वैद्यकीय-अर्बुदशास्त्रज्ञः एक डॉक्टर जो कर्कनिदान आणि कर्कोपचारार्थ रसायनोपचार, अंतर्प्रेरकोपचार, आणि जैवोपचार यांच्या वापरार्थ विशेष प्रशिक्षित असतो. हा अनेकदा कर्करुग्णांकरता मुख्य-आरोग्य-निगा-दाता असतो. हा आधार-निगा-दाताही असू शकतो आणि हाच इतर तज्ञांनी पुरवलेल्या उपचारांत समन्वयही साधत असू शकतो.

Melanoma (MEL-ah-NO-ma): A form of skin cancer that arises in melanocytes, the cells that produce pigment. Melanoma usually begins in a mole.
त्वचारंजन-कर्कः त्वचाकर्काचा एक प्रकार, जो त्वचारंजकपेशींत उद्‌भवत असतो. त्वचारंजन-कर्क बहुधा तीळाच्या स्वरूपात सुरू होत असतो.

Menopausal hormone therapy: Hormones (estrogen, progesterone, or both) given to women after
menopause to replace the hormones no longer produced by the ovaries. Also called hormone replacement therapy or HRT.
रजोनिवृत्तीकरताचे अंतर्प्रेरकोपचारः रजोनिवृत्तीनंतर बिजांडकोशात आता उत्पन्न होत नसलेल्या अंतर्प्रेरकांची भरपाई करण्यासाठी, स्त्रीस दिली जाणारी अंतर्प्रेरके (ईस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रेरॉन, किंवा दोन्हीही). ह्यांनाच अंतर्प्रेरक-भरपाई-उपचार असेही म्हटले जात असते.

Menopause (MEN-o-pawz): The time of life when a woman’s menstrual periods stop permanently. Also called “change of life.”
रजोनिवृत्तीः स्त्रीच्या आयुष्यातील मासिक पाळी कायमची थांबते तो काळ. ह्यासच आयुष्यपालट असेही म्हटले जात असते.

Metastasis (meh-TAS-ta-sis): The spread of cancer from one part of the body to another. A tumor formed by cells that have spread is called a “metastatic tumor” or a “metastasis.” The metastatic tumor contains cells that are like those in the original (primary) tumor. The plural form of metastasis is metastases (meh-TAS-taseez).
कर्कप्रसारः शरीरातील एका भागापासून दुसर्‍या भागात होणारा कर्काचा प्रसार. पसरलेल्या पेशींनी तयार झालेल्या अर्बुदास ’प्रसृत अर्बुद’ किंवा ’कर्कप्रसार’ म्हणतात. ह्यातील पेशी मूळ (प्राथमिक) अर्बुदातील पेशींप्रमाणेच असतात. ह्याचे अनेकवचनही ’कर्कप्रसार’ असेच होत असते.

Mole: A benign growth on the skin (usually tan, brown, or flesh-colored) that contains a cluster of melanocytes and surrounding supportive tissue.
तीळः त्वचेवरील (बहुधा गडद होणे, तांबूस होणे किंवा मांसरंगी होणे) एक सौम्य वाढ जिच्यात त्वचारंजकपेशींचा समूह आणि सभोवतालच्या आधारभूत ऊती असतात.

MRI: Magnetic resonance imaging (mag-NET-ik REZ-o-nans IM-a-jing). A procedure in which radio waves and a powerful magnet linked to a computer are used to create detailed pictures of areas inside the body. These pictures can show the difference between normal and diseased tissue. MRI makes better images of organs and soft tissue than other scanning techniques, such as CT or x-ray. MRI is especially useful for imaging the brain, spine, the soft tissue of joints, and the inside of bones. Also called nuclear magnetic resonance imaging.
चुंबकीय-अनुनादी-प्रतिमांकनः प्रारक-लहरी आणि शक्तीशाली चुंबक एका संगणकासोबत संलग्न करून शरीरांतर्गत भागांचे तपशीलवार चित्रांकन करणारी कार्यवाही. अशी चित्रे, सामान्य आणि रोगग्रस्त ऊतींतील फरक दाखवू शकतात. चुंबकीय-अनुनादी-प्रतिमांकन; संगणित-त्रिमिती-चित्रांकन, किंवा क्ष-किरण-चित्रांकन ह्यांसारख्या इतर चित्रांकनांपेक्षा, अवयव आणि मऊ ऊतींच्या चांगल्या प्रतिमा तयार करू शकते. चुंबकीय-अनुनादी-प्रतिमांकन; मेंदू, कणा, सांध्यांतील मऊ ऊती आणि अस्थीच्या अंतर्गत भागातील प्रतिमांकनासाठी विशेषत्वाने उपयोगी ठरत असते. ह्यास अणुगर्भीय-चुंबक-अनुनादी-प्रतिमांकन असेही म्हटले जात असते.

Mutation: Any change in the DNA of a cell. Mutations may be caused by mistakes during cell division, or they may be caused by exposure to DNA-damaging agents in the environment. Mutations can be harmful, beneficial, or have no effect. If they occur in cells that make eggs or sperm, they can be inherited; if mutations occur in other types of cells, they are not inherited. Certain mutations may lead to cancer or other diseases.
परस्पर-स्वभाव-अंतरणः पेशीच्या अपान-शर्करा-गर्भकाम्लातील कुठलेही बदल. पेशीविभाजनादरम्यान असे बदल चुकीने किंवा अपान-शर्करा-गर्भकाम्लास हानी पोचविणार्‍या पर्यावरणातील प्रतिनिधींच्या संसर्गामुळे घडून येऊ शकत असतात. अशी स्वभावांतरणे धोकादायक असू शकतात, लाभकारक असू शकतात किंवा त्यांचा कुठलाही परिणाम होण्यासारखा नसू शकतो. बिजांड किंवा शुक्राणू निर्माण करणार्‍या पेशींत असे बदल घडून आल्यास, ते अनुवांशिक ठरू शकतात. जर असे बदल इतर प्रकारच्या पेशींत घडून आले तर मात्र ते अनुवांशिक ठरत नाहीत. असे काही बदल कर्क किंवा इतर रोगांप्रत घेऊन जात असतात.

Organ: A part of the body that performs a specific function. For example, the heart is an organ.
अवयवः शरीराचा एक भाग जो विशिष्ट कार्य करत असतो. उदाहरणार्थ, हृदय हा एक अवयव आहे.

Pap test: The collection of cells from the cervix for examination under a microscope. It is used to detect cancer and changes that may lead to cancer. Also called a Pap smear.
पॅप चाचणीः गर्भाशयग्रीवेपासून पेशी गोळा करून सूक्ष्मदर्शकाखाली केलेली त्यांची तपासणी. हिचा उपयोग, कर्काचा आणि कर्काप्रत नेणार्‍या बदलांचा शोध घेण्यासाठी होत असतो.

Pathologist (pa-THOL-o-jist): A doctor who identifies diseases by studying cells and tissues under a microscope.
रोगनिदानतज्ञः पेशीं आणि ऊतींचा सूक्ष्मदर्शकाखाली अभ्यास करून रोगनिदान करणारा डॉक्टर.

PET scan: Positron emission tomography scan. A procedure in which a small amount of radioactive glucose (sugar) is injected into a vein, and a scanner is used to make detailed, computerized pictures of areas inside the body where the glucose is used. Because cancer cells often use more glucose than normal cells, the pictures can be used to find cancer cells in the body.
धनविजक-उत्सर्जन-त्रिमिती-चित्रांकन (पॉझिट्रॉन-एमिशन-टोमोग्राफी-स्कॅन): एक कार्यवाही जिच्यात थोड्या प्रमाणातील किरणोत्सारी शर्करा शिरेत टोचली जाते आणि एक चित्रांकक, शर्करा दिलेल्या शरीरांतर्गत भागांची तपशीलवार, संगणित, चित्रे तयार करण्यासाठी वापरला जातो. कर्कपेशी अनेकदा अधिक शर्करा वापरत असल्याने, ही चित्रे, शरीरातील कर्कपेशी शोधून काढण्याकरता वापरली जाऊ शकतात.

Polyp (POL-ip): A growth that protrudes from a mucous membrane.
पॉलिपः श्लेष्मल त्वचेतून बाहेर येणारी वाढ.

Primary tumor: The original tumor.
प्राथमिक अर्बुदः मूळ अर्बुद.

Progestin (pro-JES-tin): Any natural or laboratorymade substance that has some or all of the biologic effects of progesterone, a female hormone.
प्रोजेस्टीनः कुठलाही नैसर्गिक किंवा प्रयोगशाळेत तयार केलेला पदार्थ, जो स्त्री-अंतर्प्रेरक प्रोजेस्टेरॉनचे काही किंवा सर्व जैव प्रभाव बाळगत असतो.

Quality of life: The overall enjoyment of life. Many clinical trials assess the effects of cancer and its treatment on the quality of life. These studies measure aspects of an individual’s sense of well-being and ability to carry out various activities.
आयुष्याची गुणवत्ताः आयुष्यातील एकूण आनंद. अनेक वैद्यकीय चाचण्या, कर्काचे आणि कर्कोपचारांचे आयुष्याच्या गुणवत्तेवरील प्रभावांचे मूल्यमापन करत असतात. असे अभ्यास, व्यक्तीच्या क्षेम-संवेदनांचे पैलू आणि निरनिराळी क्रियाकर्मे करण्यातील त्यांची सामर्थ्ये ह्यांची मोजमाप करत असतात.

Radiation oncologist (ray-dee-AY-shun on-KOLo- jist): A doctor who specializes in using radiation to treat cancer.
प्रारण-अर्बुदशास्त्रज्ञः एक डॉक्टर जो कर्कोपचारार्थ प्रारणाच्या वापरात विशेष प्रशिक्षित असतो.

Radiation therapy (ray-dee-AY-shun THER-ah-pee): The use of high-energy radiation from x-rays, gamma rays, neutrons, and other sources to kill cancer cells and shrink tumors. Radiation may come from a machine outside the body (external-beam radiation therapy), or it may come from radioactive material placed in the body near cancer cells (internal radiation therapy, implant radiation, or brachytherapy). Systemic radiation therapy uses a radioactive substance, such as a radiolabeled monoclonal antibody, that circulates throughout the body. Also called radiotherapy.
प्रारणोपचारः क्ष-किरणे, गॅमा किरणे, विरक्तक (न्युट्रॉन) आणि इतर स्त्रोतांपासून प्राप्त केलेल्या उच्च-ऊर्जा-प्रारणांचा, अर्बुदसंकोचनार्थ करावयाच्या कर्कपेशींच्या विनाशाकरता, उपयोग करून घेणे म्हणजे प्रारणोपचार होय. प्रारण हे, शरीराबाहेर (बाह्य-शलाका-प्रारणोपचार) असलेल्या यंत्राकडून, शरीरात कर्कपेशींजवळ ठेवलेल्या किरणोत्सारी पदार्थाकडून (अंतर्गत-प्रारणोपचार, रोपण-प्रारणोपचार किंवा ब्राचिथेरपी), प्राप्त होऊ शकत असते. प्रणालीबद्ध प्रारणोपचार, चिन्हांकित-एकलतनू-प्रतिपिंडासारख्या एका किरणोत्सारी पदार्थाचा उपयोग करत असतात, जो शरीरभर फिरत असतो. ह्यासच प्रारक-उपचार (रेडिओथेरपी) असेही म्हटले जात असते.

Radioactive: (RAY-dee-o-AK-tiv): Giving off radiation.
किरणोत्सारीः प्रारणे उत्सर्जित करणारा.

Radioactive fallout (RAY-dee-o-AK-tiv): Airborne radioactive particles that fall to the ground during and after an atomic bombing, nuclear weapons test, or nuclear plant accident.
किरणोत्सारी धुराळाः हवेतील किरणोत्सारी कण; जे अणुस्फोटापश्चात, अण्वस्त्रचाचणीपश्चात किंवा अणुसंयंत्र-अपघातापश्चात जमिनीवर पडत असतात.

Radionuclide scan (RAY-dee-o-NEW-klide): A test that produces pictures (scans) of internal parts of the body. The person is given an injection or swallows a small amount of radioactive material; a machine called a scanner then measures the radioactivity in certain organs.
किरणोत्सारी-अणुगर्भ-चित्रांकनः एक चाचणी जी, शरीरांतर्गत भागांची चित्रांकने निर्माण करत असते. व्यक्तीस सुईने अथवा मुखाद्वारे किरणोत्सारी पदार्थ दिला जातो, मग चित्रांकक म्हटले जाणारे यंत्र काही विशिष्ट अवयवांतील किरणोत्सार मोजत असते.

Radon (RAY-don): A radioactive gas that is released by uranium, a substance found in soil and rock. Breathing in too much radon can damage lung cells and lead to lung cancer.
रेडॉनः युरेनियमद्वारा विमोचित एक किरणोत्सारी वायू. हा पदार्थ जमिनीत आणि खडकांत आढळून येत असतो. श्वसनाद्वारे अति-प्रमाणात घेतला गेल्यास हा वायू, फुफ्फुसाच्या पेशींना हानी पोहोचवून फुफ्फुस-कर्काप्रत नेऊ शकतो.

Recurrence: The return of cancer, at the same place as the original (primary) tumor or in another location, after the tumor had disappeared.
पुनः प्रकटनः अर्बुद नाहीसे झाल्यानंतर, मूळ (प्राथमिक) अर्बुदाच्या जागीच अथवा इतर स्थानांवर कर्काचे परतून येणे.

Risk factor: Something that may increase the chance of developing a disease. Some examples of risk factors for cancer include age, a family history of certain cancers, use of tobacco products, certain eating habits, obesity, exposure to radiation or other cancer-causing agents, and certain genetic changes.
धोके घटकः रोग उद्‌भवाची संभावना वाढवणारे काही घटक. कर्कासाठीच्या धोके घटकांच्या काही उदाहरणांत, वय, काही विशिष्ट कर्कांकरता कौटुंबिक इतिहास, तंबाखूजन्य उत्पादनांचा वापर, काही विशिष्ट आहारविषयक सवयी, स्थूलता, प्रारणसंसर्ग किंवा कर्कजनसंसर्ग आणि काही विशिष्ट जनुकीय बदल ह्यांचा समावेश होत असतो.

Screening: Checking for disease when there are no symptoms.
गाळणीः लक्षणे नसतांनाही रोगाच्या शोधाकरता केलेली तपासणी.

Side effect: A problem that occurs when treatment affects healthy tissues or organs. Some common side effects of cancer treatment are fatigue, pain, nausea, vomiting, decreased blood cell counts, hair loss, and mouth sores.
उपप्रभावः निरोगी ऊती किंवा अवयवांना, उपचार प्रभावित करतात, तेव्हा निर्माण होणारी समस्या. कर्कोपचारांचे काही सामान्य उपप्रभाव, थकवा, दुःख, मळमळ, उलटी, घटलेले रक्तपेशीगणन, केसगळती आणि तोंड येणे हे असू शकतात.

Sigmoidoscopy (sig-moid-OSS-ko-pee): Inspection of the lower colon using a thin, lighted tube called a sigmoidoscope. Samples of tissue or cells may be collected for examination under a microscope. Also called proctosigmoidoscopy.
प्रकाशित-नलिका-आंत्रदर्शक (सिग्मोईडोस्कोपी): मोठ्या आतड्याच्या खालील भागाची बारीक, प्रकाशित नलिकेद्वारे केलेली तपासणी. ऊती अथवा पेशींचे नमुने सूक्ष्मदर्शकाखाली तपासण्यास गोळा केले जाऊ शकतात. ह्यासच प्रोक्टो-सिग्मोईडोस्कोपी असेही म्हटले जात असते.

Sonogram (SAHN-o-gram): A computer picture of areas inside the body created by bouncing high-energy sound waves (ultrasound) off internal tissues or organs. Also called an ultrasonogram.
ध्वन्यातीत-लहर-आलेख (सोनोग्राम): ह्या आलेखात, उच्च-ऊर्जा ध्वनी लहरी (ध्वन्यातीत) शरीरांतर्गत ऊती किंवा अवयवांपासून परावर्तित करून संगणक चित्रे निर्माण केली जात असतात. ह्यासच अल्ट्रासोनोग्राफी असेही संबोधले जात असते.

Spiral CT scan: A detailed picture of areas inside the body. The pictures are created by a computer linked to an x-ray machine that scans the body in a spiral path. Also called helical computed tomography.
मळसूत्री-संगणित-त्रिमिती-चित्रांकनः शरीरांतर्गत भागांचे तपशीलवार चित्रण. अशी चित्रे संगणक संलग्नित क्ष-किरण यंत्रांद्वारे तयार केली जातात, जे शरीरावर मळसूत्री पथावरून फिरत जात असते. ह्यासच शंकुपथी-संगणित-त्रिमिती-चित्रांकन असेही म्हटले जात असते.

Stage: The extent of a cancer within the body. Staging it based on the size of the tumor, whether lymph nodes contain cancer, and whether the disease has spread from the original site to other parts of the body.
अवस्थाः शरीरातील कर्काची स्थिती, मर्यादा, सीमा. अवस्थांकन; अर्बुदाच्या आकारावर, लसिकाजोडात कर्क आहे की नाही ह्यावर आणि मूळ स्थानापासून रोग शरीराच्या इतर भागांत पसरलेला आहे की नाही ह्यावर अवलंबून केले जात असते.

Stem cell: A cell from which other types of cells develop. Blood cells develop from blood-forming stem cells.
मूलपेशीः एक पेशी जिच्यापासून इतर प्रकारच्या पेशी विकसित होत असतात. रक्तपेशी, रक्त तयार करणार्‍या मूलपेशींपासून विकसित होत असतात.

Stem cell transplantation: A method of replacing immature blood-forming cells that were destroyed by cancer treatment. The stem cells are given to the person after treatment to help the bone marrow recover and continue producing healthy blood cells.
मूलपेशी प्रत्यारोपणः कर्कोपचाराने नाश पावलेल्या अपरिपक्व रक्त-निर्मिती-पेशींऐवजी नव्या पेशी भरण्याची प्रक्रिया. व्यक्तीस कर्कोपचारांनंतर मूलपेशी दिल्या जात असतात, ज्यामुळे अस्थीमज्जा पुन्हा पूर्ववत होण्यास आणि तिच्यायोगे पुन्हा निरोगी रक्तपेशींची निर्मिती सुरू करण्यास मदत होत असते.

Supportive care: Care given to improve the quality of life of patients who have a serious or life-threatening disease. The goal of supportive care is to prevent or treat as early as possible the symptoms of the disease, side effects caused by treatment of the disease, and psychological, social, and spiritual problems related to the disease or its treatment. Also called palliative care, comfort care, and symptom management.
आधारात्मक निगाः गंभीर किंवा प्राणघातक रोग झालेल्या रुग्णाच्या आयुष्याची गुणवत्ता सुधारण्याकरता दिली जाणारी निगा. हिचे उद्दिष्ट, शक्य तितक्या लवकर, रोगाच्या लक्षणांना, रोगोपचार करत असता उद्‌भवणार्‍या उपप्रभावांना आणि रोग वा रोगोपचार यांमुळे उद्‌भवणार्‍या शारीरिक, सामाजिक व आध्यात्मिक समस्यांना रोखणे किंवा त्यांवर उपचार करण्याचे असते. हिलाच उपशमननिगा, आरामनिगा आणि लक्षण-व्यवस्थापन असेही म्हटले जात असते.

Surgeon: A doctor who removes or repairs a part of the body by operating on the patient.
शल्यविशारदः शरीराचा एखादा भाग रुग्णावर शल्यक्रिया करून काढून टाकतो वा दुरूस्त करतो तो डॉक्टर.

Surgery (SER-juh-ree): A procedure to remove or repair a part of the body or to find out whether disease is present. An operation.
शल्यक्रियाः शरीराचा एखादा भाग काढून टाकणे वा दुरूस्त करणे किंवा शरीरात रोगाच्या अस्तित्वाचा शोध घेण्याची कार्यवाही.

Symptom: An indication that a person has a condition or disease. Some examples of symptoms are headache, fever, fatigue, nausea, vomiting, and pain.
लक्षणः व्यक्तीची अवस्था किंवा तिचा आजार यांबाबतची सूचना. लक्षणांची काही उदाहरणे म्हणजे, डोकेदुखी, ताप, थकवा, मळमळ, उलट्या आणि दुःख ही आहेत.

Systemic therapy (sis-TEM-ik THER-a-pee): Treatment using substances that travel through the
bloodstream, reaching and affecting cells all over the body.
प्रणालीबद्ध उपचारपद्धतीः रक्तप्रवाहातून प्रवास करून सर्व शरीरातील पेशींप्रत पोहोचणार्‍या आणि त्या पेशींना प्रभावित करणार्‍या पदार्थांचा वापर करून घेऊन, दिली जाणारी उपचार पद्धती.

Thyroid (THIGH-royd): A gland located beneath the voice box (larynx) that produces thyroid hormone. The thyroid helps regulate growth and metabolism.
अवटूग्रंथीः स्वरयंत्राच्या खालच्या बाजूस असलेली एक ग्रंथी, जी विशिष्ट अंतर्स्त्राव निर्माण करत असते. ही ग्रंथी वाढ आणि चयापचयाचे नियंत्रण करण्यास उपयुक्त ठरत असते.

Tissue (TIH-shoo): A group or layer of cells that are alike and that work together to perform a specific function.
ऊतीः एकसारख्या पेशींचा एक गट वा स्तर, ज्या एखादे विशिष्ट काम करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करत असतात.

Tumor (TOO-mer): A mass of excess tissue that results from abnormal cell division. Tumors perform no useful body function. They may be benign (not cancerous) or malignant (cancerous).
अर्बुदः अपसामान्य पेशीविभाजनामुळे निर्माण होणारे ऊतींचे अतिरिक्त वस्तुमान. अर्बुदे शरीरातील कुठलेही उपयुक्त कार्य पार पाडत नसतात.

Tumor marker: A substance sometimes found in the blood, other body fluids, or tissues. A high level of tumor marker may mean that a certain type of cancer is in the body. Examples of tumor markers include CA 125 (ovarian cancer), CA 15-3 (breast cancer), CEA (ovarian, lung, breast, pancreas, and gastrointestinal tract cancers), and PSA (prostate cancer). Also called biomarker.
अर्बुद चिन्हांककः काही वेळेस रक्तात, इतर शारीर द्रवांत किंवा ऊतींत आढळून येणारा एक पदार्थ. ह्या पदार्थाचा शरीरात असणारा उच्च-स्तर, विशिष्ट प्रकारच्या कर्काचे अस्तित्व सुचवू शकतो. अर्बुद चिन्हांकक पदार्थाच्या उदाहरणांत सी.ए.-१२५ (बिजांडकोशाचा कर्क), सी.ए.-१५-३ (स्तनांचा कर्क) , सी.ई.ए. (बिजांडकोशाचा, फुफ्फुसांचा, छातीचा, स्वादुपिंडांचा आणि आंत्रवाहिनी कर्क) आणि पी.एस.ए. (पुरस्थग्रंथीचा कर्क) ह्यांचा समावेश होत असतो. ह्यास जैव-चिन्हांककही म्हटले जात असते.

Ultrasound: A procedure in which high-energy sound waves (ultrasound) are bounced off internal tissues or organs and make echoes. The echo patterns are shown on the screen of an ultrasound machine, forming a picture of body tissues called a sonogram. Also called ultrasonography.
ध्वन्यातीतः ह्या पद्धतीत, उच्च-ऊर्जा ध्वनी लहरी (ध्वन्यातीत) अंतर्गत ऊती किंवा अवयवांपासून परावर्तित करून प्रतिध्वनी निर्माण केले जातात. प्रतिध्वनी ठसे (पॅटर्न्स) ध्वन्यातीत-यंत्राच्या पडद्यावर दर्शवले जातात. ज्यावर ते शारीर ऊतींची चित्रे निर्माण करत असतात, ज्यांना ध्वन्यातीत-लहर-आलेख (सोनोग्राम) म्हणतात. ह्यास अल्ट्रासोनोग्राफी असेही संबोधले जात असते.

Ultraviolet radiation (ul-tra-VYE-o-let ray-dee- AY-shun): UV radiation. Invisible rays that are part of the energy that comes from the sun. UV radiation also comes from sun lamps and tanning beds. UV radiation can damage the skin and cause melanoma and other types of skin cancer. UV radiation that reaches the Earth’s surface is made up of two types of rays, called UVA and UVB rays. UVB rays are more likely than UVA rays to cause sunburn, but UVA rays pass deeper into the skin. Scientists have long thought that UVB radiation can cause melanoma and other types of skin
cancer. They now think that UVA radiation also may add to skin damage that can lead to skin cancer and cause premature aging. For this reason, skin specialists recommend that people use sunscreens that reflect, absorb, or scatter both kinds of UV radiation.
जम्बुपार प्रारणः सौर ऊर्जेचा भाग असणारी अदृश्य किरणे. सौर दिव्यांपासून आणि वाळवण-मंचां (टॅनिंग बेड) पासूनही ही प्रारणे येत असतात. ती त्वचेस हानी पोहोचवू शकतात आणि त्वचारंजनकर्क आणि इतर प्रकारच्या त्वचाकर्कांनाही कारण ठरू शकत असतात. पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचणारे जम्बुपार प्रारण दोन प्रकारच्या किरणांनी घडलेले असते. एक प्रकारचे किरण त्वचेत खोलवर शिरू शकत असतात तर दुसर्‍या प्रकारचे किरण त्वचा करपवतात. शास्त्रज्ञ दीर्घकाळ असा विचार करत असत की दुसर्‍या प्रकारची किरणेच त्वचारंजनकर्कास आणि इतर प्रकारच्या त्वचाकर्कांना कारण ठरत असावित. आता त्यांचा विचार असा आहे की, पहिल्या प्रकारची किरणेही त्वचाहानीत भरच घालत असतात आणि अकाली वृद्धत्वाप्रत घेऊन जात असावित. म्हणूनच त्वचातज्ञ लोकांना, दोन्ही प्रकारच्या जम्बुपार किरणांचे परावर्तन, अवशोषण आणि विखुरणे घडवून आणणारे सौर-पडदे वापरण्याचा सल्ला देत असतात.

Virtual colonoscopy (ko-lun-AHS-ko-pee): A method under study to examine the colon by taking a series of x-rays (called a CT scan) and using a high-powered computer to reconstruct 2-D and 3-D pictures of the interior surfaces of the colon from these x-rays. The pictures can be saved, manipulated to better viewing angles, and reviewed after the procedure, even years later. Also called computed tomography colography.
आभासी आंत्रदर्शनः क्ष-किरण-चित्र-मालिका काढून (जिला संगणकीय त्रिमिती चित्रांकन म्हटले जात असते) आणि ह्या क्ष-किरणांपासून उच्च-शक्ती संगणकाच्या आधारे आंत्राच्या अंतर्भागाच्या २-मिती किंवा ३-मिती पृष्ठभागाची चित्रे तयार करणार्‍या, आंत्र तपासणीकरता, अभ्यासाधीन असलेली एक पद्धत. अशी चित्रे साठवता येतात. चांगल्या दर्शन कोनांकरता बदलवली जाऊ शकतात आणि कार्यवाहीपश्चात किंवा अनेक वर्षांनंतरही त्यांचे पुनर्विलोकन केले जाऊ शकते. ह्यास संगणित-त्रिमिती-चित्रांकन किंवा आंत्र-आलेखन असेही म्हटले जाते.

Virus (VYE-rus): A microorganism that can infect cells and cause disease.
विषाणूः एक सूक्ष्मजीव जो पेशींना संसर्ग पोहोचवून रोगास कारण ठरू शकतो.

X-ray: A type of high-energy radiation. In low doses, x-rays are used to diagnose diseases by making pictures of the inside of the body. In high doses, x-rays are used to treat cancer.
क्ष-किरणः एक प्रकारचे उच्च-ऊर्जा-प्रारण. निम्न मात्रांत, क्ष-किरणांचा उपयोग, शरीरांतर्गत चित्रे तयार करून, रोगनिदानार्थ केला जात असतो. उच्च मात्रांतील क्ष-किरणांचा उपयोग कर्कोपचारार्थ केला जात असतो.

Note for Reader
This JASCAP booklet is not designed to provide medical advice or professional services and is intended to be for educational use only. The information provided through JASCAP is not a substitute for professional care and should not be used for diagnosing or treating a health problem
or a disease. If you have, or suspect you may have, a health problem you should consult your doctor.

वाचकांकरता नोंद
ही जॅसकॅप पुस्तिका, वैद्यकीय सल्ला किंवा व्यावसायिक सेवा देण्याकरता अभिकल्पित नाही. तिचा उद्देश केवळ माहितीकरताच आहे. जॅसकॅपचे वतीने पुरवली जाणारी माहिती, ही व्यावसायिक निगेस पर्यायी नाही आणि तिचा उपयोग रोगनिदान वा एखाद्या आरोग्य-समस्येच्या वा रोगाच्या उपचारार्थ केला जाऊ नये.
.
http://anuvad-ranjan.blogspot.in/ ह्या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे.

कर्करोगाबाबत आपल्याला काय माहीत असायला हवे-भाग एकूण ४ पैकी १
http://www.maayboli.com/node/43780

कर्करोगाबाबत आपल्याला काय माहीत असायला हवे-भाग एकूण ४ पैकी २
http://www.maayboli.com/node/43781

कर्करोगाबाबत आपल्याला काय माहीत असायला हवे-भाग एकूण ४ पैकी ३
http://www.maayboli.com/node/43782

कर्करोगाबाबत आपल्याला काय माहीत असायला हवे-भाग एकूण ४ पैकी ४
http://www.maayboli.com/node/43783

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख मराठीत लिहिलाय आणि ग्लॉसरी इंग्रजीत दिलीत. त्यामुळे शब्दांच्या अर्थाचा काही थांगपत्ता लागत नाहीये.
एक सुचवणी-
माझ्यासारख्या मठ्ठ मुलीला घेऊन एकेक ओळ वाचून दाखवा . मग जे अडेल तो शब्द घेऊन त्याचा इंग्रजीत अर्थ लिहा.
जरा तरी समजेल माझ्यासारख्या मुलीला.

गोळेकाका,
तुमचा भाग १ वरचा प्रतिसाद वाचला. तुमच्या हेतूबद्दल इथे कुणाला शंका नाहीये, पण रोज मराठी लिहिणारे, बोलणारे, वाचणारे बहुतेक सगळे खंदे वीर तुमच्या लेखांची भाषा अवघड आहे म्हणत आहेत. त्याच्यामागे कुठलाही आकस आहे असं वाटत नाहीये
तुम्हाला मराठी प्रगल्भ करायची आहे तर मग शब्द संस्कृतमधूनच आणायचा अट्टाहास का? संस्कृतपेक्षाही प्राकृत भाषा या खर्‍या आधुनिक भारतीय भाषांच्या जननी आहेत, तेव्हा मग त्यात काय शब्द आहेत ते आणले तर जास्त सयुक्तिक ठरेल. आणि भाषा प्रगल्भ होते ती अनेक भाषांमधले शब्द आपसूक वापरात आल्याने, अवघड शब्द बनवल्याने नव्हे.. निदान असा माझा समज आहे.
आणखी एक - काही शब्द (अर्बुद वगैरे सोडले) तर प्राचीन संस्कृतात कधीच नव्हते. संस्कृतात कर्क हा कॅन्सर या रोगाला उद्देशून कधीच वापरला नाहीये, तर इंग्लिश शब्दाला समानार्थ/अनुवाद म्हणून वापरायला सुरुवात झाली. बहुदा विसाव्या शतकात. तेव्हा असे 'बनवलेले' आधुनिक संस्कृत शब्द वापरून भाषा कशी प्रगल्भ होणार?
शिवाय जिथे सोपे मराठी प्रचलित शब्द आहेत तिथेही तुम्ही किचकट, संस्कृत शब्द वापरलेत, नेहेमीचे बोलीभाषेतले शब्दप्रयोग सोडून कृत्रिम शब्दप्रयोग वापरलेत. कशासाठी?
उदा:
आंत्र (आतडे)
जम्बुपार प्रारण (अतिनील किरणोत्सर्ग) -
निर्धारित करणे (ठरवणे) - ही यादी बरीच मोठी आहे...

अर्बुदाला शुद्ध मराठीत गाठ म्हणतात. आणि जेव्हा कॅन्सरच्या संबंधात तो शब्द येतो तेव्हा ट्यूमर हाच अर्थ सर्व लोकांपर्यंत न सांगता व्यवस्थित पोचतो. मग अर्बुद कशाला?

असे अनेक मुद्दे उपस्थित करता येतील.
तुम्ही हे आक्षेप कुठलाही गैरसमज न करून घेता वाचाल अशी आशा आहे. असो.

मला एक बेसिक प्रश्न पडलाय...
नव्हे काही बेसिक प्रश्न आहेत....

१. लेखमालेचे शीर्षक आहे ’कर्करोगाबाबत आपल्याला काय माहीत असायला हवे?’ - यातले आपण म्हणजे कोण आहे? शरीर हे शरीर आहे आणि त्याची काळजी घेण्याबद्दल समजून घेताना पटकन समजेल, पचेल, रूचेल ही भाषाच महत्वाची ना?

२. वरती डॉक्टरीणबाईंनाच काही समजले नाही म्हणतायत तर हा लेख नक्की कुणासाठी लिहिलाय?

साती, वरदा, नीधप, अभिप्रायांखातर सगळ्यांना मनापासून धन्यवाद.

साती,
http://shabdaparyay.blogspot.in/2013/06/blog-post_27.html
ह्या दुव्यावर अवघड शब्दांचे अर्थ अल्फाबेटिकली आणि अकारविल्हे रचून उपलब्ध केलेले आहेत.

वरील दुव्यावर अकारविल्हेही शब्द रचलेले आहेत. गरजवंतास उपयुक्त ठरतील असा विश्वास वाटतो.

नीधप,

१. लेखमालेचे शीर्षक आहे ’कर्करोगाबाबत आपल्याला काय माहीत असायला हवे?’ - यातले आपण म्हणजे कोण आहे? शरीर हे शरीर आहे आणि त्याची काळजी घेण्याबद्दल समजून घेताना पटकन समजेल, पचेल, रूचेल ही भाषाच महत्वाची ना? >>>>> हो. खरे आहे.

२. वरती डॉक्टरीणबाईंनाच काही समजले नाही म्हणतायत तर हा लेख नक्की कुणासाठी लिहिलाय? >>>>डॉक्टरीणबाईं म्हणून त्यांच्या माहितीकरता मी काही लिहावे अशी मुळीच आवश्यकता नाही.

मात्र मराठीच्या सातीच्या ज्ञानात माझ्यामुळे कदाचित भरही पडू शकेल. असे मला वाटते.
साती, तुला काय वाटते, ह्याबद्दल?

वरदा,

तपशीलवार आक्षेप नोंदवल्याखातर धन्यवाद.

गाठ शब्द खराच प्रचलित आणि अर्थवाही आहे.
मात्र पहिल्या लेखावरील प्रतिसादात मी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या विश्वकोशात
ट्युमर करता अर्बुद शब्द स्वीकारलेला असल्याने मी तोच पारिभाषिक शब्द म्हणून स्वीकारला आहे.

तुम्ही अर्बुदविषयीच्या प्रश्नाचे उत्तर दिलेत, तसंच माझ्या इतर शंकांचं समाधान केलंत तर आणखी आवडेल...

वरदा,
हो. प्रयत्न करतोच.

डॉ.रवी बापट (नाव चुकले असल्यास क्षमा करावी!) ह्या विख्यात आंत्रतज्ञ डॉक्टरांनी आपल्या आत्मचरीत्रात सहजपणे आंत्र हा शब्द वापरला आहे. त्यावरूनच मला तो वापरावासा वाटला.

जम्बुपार प्रारण (अतिनील किरणोत्सर्ग) ->>>>> अतिनील हा पर्यायी शब्दही तेवढाच स्वीकारार्ह आहे.
निर्धारित करणे (ठरवणे) - ही यादी बरीच मोठी आहे...>>>>> हो. खरे आहे.

साती+१
आधीच्या तीन लेखांतील पारभाषिक शब्दांचे अर्थ(मीही जड लिहायचा प्रयत्न करतोय) देण्याचा या शब्दकोशाचा उद्देश असेल तर तो मराठी वर्णमालेनुसार हवा ना?
छापील पुस्तकात वेगळी शब्दसूची देण्याला पर्याय नसेल कदाचित. पण इ-पुस्तिकेत त्या त्या शब्दांच्या अर्थाचा दुवा( link) दिला जायला हवा.

मराठीतून अर्थासाठी पुन्हा पारिभाषिक शब्द वापरलेत.(ते स्वतः ठरवलेत की सामान्यतः स्वीकृत शब्द वापरलेत?) त्यामुळे खरे तर पारिभाषिक शब्दाचा व्यावहारिक मराठीत अर्थ सांगणारा शब्दकोश हवा.
मराठीला प्रगल्भ करायचं आणि वापरलेल्या शब्दांचा अर्थ सांगायला इंग्रजीच्या आसर्‍यालाच जायचं हे कसं?

Pain =वेदना की दु:ख? cancer साठी कर्करोग हा शब्द अनेक वर्ष ऐकत आलोय. इथे फक्त कर्क हा शब्द वापरलाय.Aidsचे मराठी नाव वाचूनच धडकी भरली.
Procedure = कार्यवाही? की कार्यपद्धती/कार्यप्रणाली?

गोळेकाका, तुमचे लेख माहितीपूर्ण असतील नक्कीच, पण सोप्या भाषेत लिहिलेत तर अधिक वाचकांपर्यंत पोहोचतील, अधिकांना समजतील. मी सुरुवातीलाच वाचताना इतकी अडखळले आहे, की पुढे वाचायला झाले नाही Sad
वाचायची इच्छा तर आहे, पण जवळपास प्रत्येक शब्दाचा अर्थ लावत वाचण्याइतका वेळही खरंच देऊ शकणार नाही.

आंत्र, अर्बुद असे शब्द तर सोडूनच द्या (त्यांना ढळढळीत मराठी सोपे प्रचलित शब्द असल्याने मी हे शब्द मराठी मानायला तयार नाही. ते संस्कृत, भाषेबाहेरचेच आहेत)..
पण मुळात माझ्या आक्षेपाचं उत्तर द्या ना - की 'बनवलेले' 'संस्कृत' शब्द वापरून मराठी कशी प्रगल्भ होणार????

कर्क, जम्बुपार, प्रणाली, अपसामान्य, अवशोषण हे आणि असे अनेक शब्द हे मूळ, जेव्हा संस्कृत 'जिवंत' होतं तेव्हाचे, शब्द नव्हेत. त्यातले काही शब्द पूर्णपणे वेगळ्या अर्थाने वापरले जात होते. आधुनिक विज्ञान, वैद्यकज्ञानात येणार्‍या संकल्पनांना, शब्दांना प्रत्येकवेळा संस्कृतात शब्द नसल्याने असे काहीतरी धेडगुजरी, कुणालाही पटकन न समजणारे क्लिष्ट पारिभाषिक शब्द बनवले गेले. तेव्हा हे असले शब्द वापरून नक्की काय साध्य होणार???

वाळवण-मंच (टॅनिंग बेड) - मी थक्क. नो कमेन्ट..

शेवटी - लोकांपर्यंत, सर्वसामान्यांपर्यंत पोचवायचं असेल तर पारिभाषिक शब्द न वापरणे हा लेखनाच पहिला नियम असतो. प्रत्येक विषयात, विद्याशाखेत जडच्याजड पारिभाषिक शब्द असतात. ते बाहेरच्या प्रत्येकाला कसे कळतील? कळण्याची भाषिक गरजही नाही..

<आधारात्मक निगाः गंभीर किंवा प्राणघातक रोग झालेल्या रुग्णाच्या आयुष्याची गुणवत्ता सुधारण्याकरता दिली जाणारी निग<>
दिली जाणारी निगा की घेतली जाणारी काळजी?

माझी मराठी तुम्ही इथेच अकारविल्हे शब्दसूची किंवा लेखात आलेल्या क्रमाने कठिण शब्दांचा अर्थ अशा प्रकारे दिलात तरच सुधारेल.;)
म्हणूनच कठिण म्हणजे काय याचा अर्थ मी माझ्यासारख्या ढ मुलीला या लेखात न कळलेला शब्द असा दिला आहे.

शेवटी - लोकांपर्यंत, सर्वसामान्यांपर्यंत पोचवायचं असेल तर पारिभाषिक शब्द न वापरणे हा लेखनाच पहिला नियम असतो. प्रत्येक विषयात, विद्याशाखेत जडच्याजड पारिभाषिक शब्द असतात. ते बाहेरच्या प्रत्येकाला कसे कळतील? कळण्याची भाषिक गरजही नाही..
>>+१.

व्यावसायिक लेखनामधे टेक्निकल लेखन करणारे काही लोक असतात, त्यांचा मुख्य हेतूच मुळात सोप्यात सोप्या शब्दांमधे लोकांना माहिती मिळावी हा असतो. कठीण जडातिजड शब्द वापरून लिहिलेले नीरस लेखन हे शक्यतो वाचले जात नाही. परिणामी, "जास्तीत जास्त लोकांना माहिती देणे" हा उद्देशच रद्दबातल होतो, म्हणून असे लेखन सोप्या भाषेत लिहिले जाणे अपेक्षित असते. भाषांतर करणे हे एक कौशल्याचे काम आहे. आपल्या मायबोलीवर व्यावसायिक भाषांतरकार आहेत, वाटल्यास त्यांना विचारून बघा. प्रत्येक शब्दाचा संस्कृत अर्थ देऊन त्याचे एकत्र समूह (- असे चिन्ह घालत) करणे म्हणजे भाषांतर नव्हे!

वरच्या लेखातील एक नजरेस आलेले उदाहरण म्हणूनः

Imaging procedure:A method of producing pictures of areas inside the body.
चित्रांकन कार्यवाहीः शरीराच्या अंतर्भागातील चित्रे निर्माण करण्याची एक पद्धत.

हे भाषांतर चूक आहे. कार्यवाही हा शब्द प्रोसीजरला समानार्थी असला तरी इथे तो अर्थ होत नाही. इथे त्याचा अर्थ चित्रांकन तपासणी असा घ्यायला हवा. शरीराच्या अंतर्भागाची चित्रे दाखवणारी तपासणी हा अर्थ इथे जास्त योग्य आणि मुद्देसूद आहे.

इंग्रजी शब्दाचा समानार्थी संस्कृतोद्भव मराठी शब्द लिहून शुद्ध मराठी लिहिण्याच्या अट्टहासामधे आपण माहितीमधील काही तथ्यांची उलटसुलट मांडणी करत नाही हे पहाणे जास्त गरजेचे.. तेदेखील वैद्यकीय, कायदा अथवा आर्थिक अशा संवेदनशील क्षेत्रामधे.

शब्दाला संस्कृतोद्भव प्रतिशब्द आणि वाक्यांचे ताल, तोल सगळे कृत्रिम परकीय भाषेसारखे.... हा अट्टाहास असेल तर तुम्हाला खरच माहिती पोचवायचीये की बघा तुमचे मराठी किती वाईट हे दाखवायचेय लोकांना याबद्दल शंका येते.

गोळेकाका, भाषांतरावर इतकी मेहेनत घेतलीत, पण माफ करा, लेख परिणामकारक, सर्वसामांन्यांना समजेल अशा भाषेत माहिती देणारा वाटला नाही.

इंग्रजीचं ज्ञान नसणार्‍या, फक्त मराठी वाचू-समजू शकणार्‍या, आणि कॅन्सरबद्दल माहिती हवी असणार्‍या व्यक्तीला हा दुवा पाठवला. त्यांनी, 'इतके क्लिष्ट शब्द नसते तर वाचवला असता' असा अभिप्राय दिलाय, तुमच्यापर्यंत पोचवायला सांगितला, म्हणून हा पोस्ट प्रपंच!

वर बर्‍याच प्रतिसादांमधे मांडलंय, तसंच वाटलं. मराठीकरणाचा अतिरेक झाल्यामुळे रटाळ आणि काही ठिकाणी, वाटू नये पण निव्वळ हास्यास्पद वाटतो. उदा: सौर दिव्यांपासून आणि वाळवण-मंचां (टॅनिंग बेड) पासूनही ही प्रारणे येत असतात. वाळवणमंच कसं? टॅनिंगचा वाळवणाशी काय संबंध? मेलॅनिन (Melanin) पिगमेंट, मेलॉनोसाइट्स (Melanocytes), किरॅटिनोसाइट्सला (Keratinocytes) मराठी प्रतिशब्द मिळाले तर 'टॅनिंग' प्रक्रिया आणि टॅनिंग बेडचं भाषांतर जमू शकेल.