कर्करोगाबाबत आपल्याला काय माहीत असायला हवे-भाग एकूण ४ पैकी १

Submitted by नरेंद्र गोळे on 26 June, 2013 - 21:58

७०% कर्करोग टाळता येण्यायोग्य असतात असे दूरदर्शनवरील सह्याद्रीवाहिनीच्या एका कार्यक्रमात नुकतेच सांगितले गेले. मात्र पुरेशी माहिती नसेल तर तो टाळणे शक्य होत नाही.

कर्काबाबतच्या आधिकारिक आणि अचूक माहितीचा पुरवठा सातत्याने करणारी "जीत असोसिएशन फॉर सपोर्ट टू कॅन्सर पेशंटस " ही अशीच एक अशासकीय संस्था, टाटा मेमोरिअल हॉस्पिटलच्या आवारात एक बुकस्टॉल चालवत आहे. त्यांच्याकरता केलेला एका पुस्तिकेचा मराठी अनुवाद, इथे लोकहितार्थ प्रस्तुत करत आहे.

http://shabdaparyay.blogspot.in/2013/06/blog-post_27.html
ह्या दुव्यावर अवघड शब्दांचे अर्थ अल्फाबेटिकली आणि अकारविल्हे रचून उपलब्ध केलेले आहेत.

*****************************************************

’E-53 What you need to know about Cancer’,
http://jascap.org/sites/default/files/E-53-What-you-need-to-know-about-C...,
ह्या जीत असोसिएशन फॉर सपोर्ट टू कॅन्सर पेशंटस ह्या अशासकीय संस्थेने,
ऑक्टोंबर २०११ मध्ये प्रकाशित केलेल्या मूळ इंग्रजी पुस्तिकेचा मराठी अनुवाद,
पारिभाषिक शब्दसंग्रहासहित, मूळ इंग्रजी मजकुराच्या एकूण ए-४ पृष्ठांची संख्या ३५,

अनुवादकः नरेंद्र गोळे २०१३०५२२

*****************************************************

अनुक्रमणिका

कर्काचे आकलन
कर्काचे प्रकार
कर्काची कारणे
धोके घटक
चित्रांकन
कर्काची लक्षणे
कर्काचे निदान
अवस्थांकन
कर्काचे उपचार
कर्कोपचारपद्धती
शल्यक्रिया
प्रारणोपचार
रसायनोपचार
अंतर्प्रेरकोपचार
जैवोपचार
मूलपेशी प्रत्यारोपण
पूरक आणि पर्यायी उपचार
आहार आणि शारीरिक सक्रियता
पाठपुरावा निगा
आधारांचे स्त्रोत
कर्क-संशोधनातील आशा
शब्दकोश

*****************************************************

कर्काचे आकलन

ऊती ज्या घटकांपासून निर्माण होत असतात त्या पेशींत कर्क सुरू होतो. उतींपासून शरीराचे अवयव घडत असतात.

सामान्यतः शरीरास नव्या पेशींची आवश्यकता असते तेव्हा, पेशी वाढतात आणि विभागतात. जेव्हा पेशी जुन्या होतात, तेव्हा त्या मरतात, आणि नवीन पेशी त्यांची जागा घेत असतात.

काही वेळेला, ही व्यवस्थित प्रक्रिया बिघडते. शरीरास आवश्यक नसतांनाही नवीन पेशी निर्माण होतात आणि मरायला हव्यात तेव्हा जुन्या पेशी मरतही नाहीत. अशा प्रकारे अतिरिक्त ठरलेल्या पेशी ऊतींचे एक वस्तुमान निर्माण करतात, ज्याला वृद्धी अथवा अर्बुद म्हटले जाते.

अर्बुदे, सौम्य किंवा मारक असू शकतात

सौम्य अर्बुदे कर्क नसतात:

१. सौम्य अर्बुदे क्वचितच प्राणघातक असतात.
२. सामान्यतः सौम्य अर्बुदे काढून टाकली जाऊ शकतात आणि ती बहुधा पुन्हा वाढत नाहीत.
३. सौम्य अर्बुदांतील पेशी त्यांच्या आसपासच्या ऊतींत आक्रमण करत नाहीत.
४. सौम्य अर्बुदांतील पेशी शरीरातील इतर भागांत पसरत नाहीत.

मारक अर्बुदे कर्क असतात:

१. मारक अर्बुदे सौम्य अर्बुदांहून सामान्यतः अधिक गंभीर असतात. ती प्राणघातकही ठरू शकतात.
२. मारक अर्बुदे अनेकदा काढून टाकता येतात, पण काही वेळेस ती पुन्हा वाढतात.
३. मारक अर्बुदांतील पेशी आसपासच्या ऊती आणि अवयवांत अतिक्रमण करून त्यांना हानी पोहोचवू शकतात.
४. मारक अर्बुदांतील पेशी शरीराच्या इतर भागांत पसरू शकतात. मूळ (प्राथमिक) अर्बुदातून फुटून कर्कपेशी रक्तप्रवाहात किंवा लसिकाप्रणालीत प्रवेश करतात. ह्या पेशी इतर अवयवांवरही आक्रमण करू शकतात, ज्यामुळे नवीन अर्बुदे निर्माण होऊन ह्या अवयवांना हानी पोहोचवू शकतात. कर्काच्या ह्या प्रसारास कर्कप्रसार असे म्हणतात.

कर्काचे प्रकार

बव्हंशी कर्क जिथे उद्‌भवतात त्या जागेवरून त्यांचे नामकरण केले जाते. उदाहरणार्थ, फुफ्फुसाचा कर्क फुफ्फुसात उद्‌भवतो आणि स्तनांचा कर्क स्तनांत. लसिकाकर्क (लिम्फोमा) हा कर्क लसिका-प्रणालीत उद्‌भवत असतो आणि श्वेतपेशीकर्क (ल्युकेमिया) हा पांढर्‍या रक्तपेशींत (ल्युकोसाईटस मध्ये) उद्‌भवत असतो.

जेव्हा कर्क पसरतो आणि नवे अर्बुद शरीराच्या दुसर्‍या भागात निर्माण होते, तेव्हा नव्या अर्बुदात त्याच प्रकारच्या अपसामान्य पेशी असतात आणि त्याचे नावही प्राथमिक अर्बुदाचे जे असते तेच असते. उदाहरणार्थ, जर पुरस्थग्रंथीचा कर्क अस्थींत पसरला, तर अस्थीतील कर्कपेशी प्रत्यक्षात पुरस्थग्रंथीतील कर्कपेशीच असतात. हा रोग पुरस्थग्रंथीचा प्रसारित कर्कच असतो, अस्थीकर्क नव्हे. ह्याकरता, त्याचे उपचार पुरस्थग्रंथीच्या कर्काप्रमाणेच केले जातात, अस्थीकर्काप्रमाणे नव्हे. डॉक्टर्स काही वेळेस, अशा नव्या अर्बुदास ’दूरस्थ’ (डिस्टंट) किंवा ’प्रसारित’ अर्बुद म्हणत असतात.

कर्क शरीरात बहुतेक कुठेही उद्‌भवू शकत असतो.

मांसकर्क (कार्सिनोमा) हे सर्वात सामान्य प्रकारचे कर्क असून, शरीराच्या बाह्य व अंतर्गत पृष्ठभागांना झाकणार्‍या पेशींपासून उद्‌भवत असतात. अमेरिकेत ह्या प्रकारचे कर्क; फुफ्फुस, स्तन आणि आतडी ह्यांत सर्वात वारंवार होत असतात. शरीरातील अस्थी, अस्थीबंध, मेद, जोडऊती आणि स्नायू इत्यादी आधार-ऊतींत आढळून येणार्‍या पेशींत उद्‌भवणारे कर्क अस्थीबंधकर्क (सार्कोमा) असतात.

लसिकाकर्क (लिम्फोमा) हे लसिकाजोडांत अणि शरीराच्या प्रतिरक्षा-प्रणालीतील ऊतींत उद्‌भवणारे कर्क असतात. रक्तकर्क (ल्युकेमिया) हे अस्थीमज्जेत वाढणार्‍या अपरिपक्व रक्तपेशींत उद्‌भवणारे कर्क असून मोठ्या संख्येत रक्तप्रवाहात साचत जाण्याचा त्यांचा कल असतो.

अनेक निरनिराळ्या प्रकारचे मांसकर्क, अस्थीबंधकर्क, लसिकाकर्क आणि रक्तकर्क यांत फरक करण्यासाठी, शास्त्रज्ञ निरनिराळी तांत्रिक नावे वापरत असतात. सामान्यतः ही नावे लॅटीन भाषेतील निरनिराळे पूर्व-उपसर्ग वापरून घडवली जात असतात आणि कर्काची अनिर्बंध वाढ ज्या स्थानापासून सुरू होते त्या स्थानाचा संदर्भ ती नावे देत असतात. उदाहरणार्थ लॅटीन भाषेत ’ऑस्टिओ’ म्हणजे ’अस्थी’. म्हणून अस्थींत उद्‌भवणारा कर्क लॅटीन भाषेत ऑस्टिओ-सार्कोमा म्हणवला जातो. आपण मराठीत त्याला अस्थी-बंध-कर्क म्हणू. तसेच, लॅटीन भाषेत पूर्व-उपसर्ग ’अडेनो’ म्हणजे ’ग्रंथी’. म्हणून ग्रंथीपेशींचा कर्क, लॅटीन भाषेत ’अडेनो-कार्सिनोमा’ म्हणवला जातो. आपण मराठीत त्याला ग्रंथी-मांस-कर्क म्हणू.

कर्क ऊती सूक्ष्मदर्शकाखाली विभेदनक्षम दिसतात. डॉक्टर जी विशेष लक्षणे शोधत असतात त्यात ते मोठ्या संख्येतील अनियमित आकाराच्या विभागत्या पेशी शोधत असतात, पेशीकेंद्रीय आकार आणि आकारमानांतील बदल हुडकत असतात, पेशीच्या आकार आणि आकारमानांतील बदल हुडकत असतात, विशेष पेशी लक्षणांचा र्‍हास शोधत असतात, सामान्य ऊतींच्या संघटनातील र्‍हास शोधत असतात, आणि अर्बुदाची अस्पष्ट सीमा हुडकत असतात.

कर्काची कारणे

कर्कविकासार्थ निर्देशित जनुकांचा एक गट असतो हानीग्रस्त जनुकांचा, ज्या अर्बुद-कारक-जनुका म्हणवल्या जातात. ह्या अशा जनुका असतात, ज्यांची काही विशिष्ट स्वरूपातील उपस्थिती किंवा अतिसक्रियता कर्कविकासास उत्तेजना देऊ शकत असते. जेव्हा सामान्य पेशींत अर्बुद-कारक-जनुका उद्‌भवतात, तेव्हा त्या पेशीस अतिवृद्धी व अतिविभाजन उत्तेजित करणारी प्रथिने तयार करण्याच्या सूचना देत असतात.

कर्काकरता निर्देशित असलेला, जनुकांचा दुसरा गट हा ’अर्बुद-दमनक-जनुकांचा’ असतो. ह्या अशा सामान्य जनुका असतात, ज्यांची अनुपस्थिती कर्काप्रत नेऊ शकत असते. दुसर्‍या शब्दांत, जर अर्बुद-दमनक-जनुकांची एक जोडी पेशीतून नाहीशी झाली असेल किंवा परस्परस्वभावांतरणांद्वारे निष्क्रिय करण्यात आलेली असेल तर, त्यांच्या कार्याची अनुपस्थिती, कर्कविकासास वाव देऊ शकते. कर्कविकासाच्या वाढलेल्या धोक्याचा वारसा लाभलेल्या व्यक्ती अनेकदा, अर्बुद-दमनक-जनुकेची एक बिघडलेली प्रत घेऊनच जन्माला येत असतात. जनुका (प्रत्येक पालकाकडून एक यांनुसार) जोडी-जोडीनेच राहत असल्याने, एका प्रतीतील जन्मजात बिघाड कर्काप्रत नेत नाही कारण, इतर सामान्य प्रत अजूनही कार्य करत असते. पण जर दुसर्‍या प्रतीतही स्वभावांतरण घडून आले तर, अशा व्यक्तीत मग कर्कविकास होऊ शकतो, कारण मग कार्यरत अशी एकही जनुकाप्रत शिल्लक राहिलेली नसते.

अर्बुद-दमनक-जनुका, पेशींची वृद्धी व विभाजन यांवर आवर घालणारी प्रथिने तयार करण्याच्या सूचना देणार्‍या सामान्य जनुकांच्या एका कुटुंबाचा भाग असतात. पेशींची वृद्धी व विभाजन मंदावणार्‍या प्रथिनांकरताचे संकेत, अर्बुद-दमनक-जनुका देत असल्यामुळे, अशा प्रथिनांतील घट, पेशींची वृद्धी व विभाजन अनियंत्रितपणे होऊ देत असते. अर्बुद-दमनक-जनुका जणू काय स्वयंचलित वाहनाच्या गतीरोधकाप्रमाणेच असतात. अर्बुद-दमनक-जनुकांच्या कार्यात घट येण्याने, गतीरोधक बरोबर कार्य करत नसल्यासारखीच परिस्थिती निर्माण होऊ शकत असते, ज्यामुळे पेशी निरंतर वाढत आणि विभागत जाऊ शकते.

कर्कासाठी निर्देशित असलेल्या, एक तिसर्‍या प्रकारच्या जनुका असतात, त्यांना ’अपान-शर्करा-गर्भकाम्ल-दुरूस्ती-जनुका’ असे म्हटले जाते. ह्या जनुका अशा प्रथिनांचे संकेत देतात ज्यांचे सामान्य कार्य, पेशीविभाजनापूर्वी जेव्हा पेशी त्यांची अपान-शर्करा-गर्भकाम्ले दुप्पट करत असतात तेव्हा, उद्‌भवणार्‍या चुकांची दुरूस्ती करण्याचे असते. ह्या जनुकांत होणारी अंतरणे दुरूस्ती अपयशी ठरवण्याप्रत पोहोचवू शकतात, ज्यामुळे त्यानंतर होणारी अंतरणे साचत जाऊ शकतात. ’झेरोडर्मा पिग्मेंटोसम’ म्हटली जाणारी अवस्था असलेल्या रुग्णांत, एका अशा जनुकेत आनुवांशिक बिघाड असतो. परिणामी, सूर्यप्रकाशास खुल्या राहिलेल्या त्वचापेशीत सामान्यतः घडून येणारी, अपान-शर्करा-गर्भकाम्लाची हानी, त्या प्रभावीपणे दुरूस्त करू शकत नाहीत आणि त्यामुळे अशा रुग्णांत त्वचाकर्काचा आढळ अपसामान्यपणे उच्च असतो. आतड्याच्या कर्काच्या काही प्रकारांतही, अपान-शर्करा-गर्भकाम्ल-दुरुस्तीतील बिघाड, समाविष्ट असतात.

अर्बुद-कारक-जनुका, अर्बुद-दमनक-जनुका आणि अपान-शर्करा-गर्भकाम्ल-दुरुस्ती-जनुका यांचा समावेश असलेली स्वभावांतरणे साचत जाऊन कर्क उद्‌भवू शकतो. उदाहरणार्थ, आतड्याचा कर्क, अर्बुद-दमनक-जनुकेत असलेल्या बिघाडामुळे सुरू होऊ शकतो, ज्यामुळे अतिरिक्त पेशी प्रसार शक्य होत असतो. पसरणार्‍या पेशींचा कल मग, अपान-शर्करा-गर्भकाम्ल-दुरुस्ती-जनुकांचा, इतर-अर्बुद-दमनक-जनुकांचा आणि अनेक इतर वाढ-संबंधित-जनुकांचा समावेश असलेली आणखीही स्वभावांतरणे ग्रहण करण्याचा असतो. दुसर्‍या शब्दांत, एक कर्कपेशी निर्माण करण्यासाठी, पेशी-वर्धन-त्वरण (अर्बुद-कारक-जनुका) सक्रिय होत असताना, पेशीवर्धनावरील रोध (ब्रेक; अर्बुद-दमनक-जनुकांचे प्रतिरोध) त्याच वेळी मुक्त व्हावे लागत असतात.
.
http://anuvad-ranjan.blogspot.in/ ह्या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे.

कर्करोगाबाबत आपल्याला काय माहीत असायला हवे-भाग एकूण ४ पैकी १
http://www.maayboli.com/node/43780

कर्करोगाबाबत आपल्याला काय माहीत असायला हवे-भाग एकूण ४ पैकी २
http://www.maayboli.com/node/43781

कर्करोगाबाबत आपल्याला काय माहीत असायला हवे-भाग एकूण ४ पैकी ३
http://www.maayboli.com/node/43782

कर्करोगाबाबत आपल्याला काय माहीत असायला हवे-भाग एकूण ४ पैकी ४
http://www.maayboli.com/node/43783

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे गोळेकाका. मला तरी glossary लागणार हे वाचताना. Sad
फार अवघड जाते आहे वाचायला.

उपक्रम मस्तच.

अनुवाद इथे दिल्याबद्दल धन्यवाद
(आशा आहे की तुम्ही संबंधितांचि परवानगी घेऊनच मजकुर इथे दिला असेल)
उपयुक्त वैद्यकीय माहिती/धाग्यांबद्दल पुनःश्च धन्यवाद

गोळे सर, मी कष्टपूर्वक सगळे भाग वाचले.

माफ करा, पण तुम्हाला असे वाटत नाहिये का, की यू आर सिंप्लि डिफीटींग युअर ओन पर्पज? जर सामान्य लोकांना माहिती मिळावी असा तुमचा उद्देश असेल, तर अर्बुद अन कर्क इत्यादि शब्दबंबाळ अती-मराठी वाचून, वाचणारे लोक (वाचक) ते वाचत नाहीत, असे तुम्हाला वाटत नाही का? मागेही एका लेखात "मोबाईल चार्जिंगला लावणे" या सरळ सीध्या "मराठी" ऐवजी "भ्रमणध्वनीसंचाचे विद्युतघटपुनर्भरण" असा काहिसा एक जहाल मराठी शब्द वाचून भंजाळलो होतो.

मराठीचा आग्रह मीदेखिल धरतो, पण तुमचे माहितीपूर्ण लेख या अशा टेक्निकल जार्गोनला मराठी प्रतिशब्द द्यायलाच हवा या अट्टाहासापायी दुर्लक्षिले जातात, असे माझे मत आहे.

तुम्ही माहिती मस्त देता, फक्त ती पब्लिकला समजेल अशा भाषेत देत जा हो!, ही नम्र विनंती.

>>
अर्बुद-कारक-जनुका, अर्बुद-दमनक-जनुका आणि अपान-शर्करा-गर्भकाम्ल-दुरुस्ती-जनुका यांचा समावेश असलेली स्वभावांतरणे साचत जाऊन कर्क उद्‌भवू शकतो. उदाहरणार्थ, आतड्याचा कर्क, अर्बुद-दमनक-जनुकेत असलेल्या बिघाडामुळे सुरू होऊ शकतो, ज्यामुळे अतिरिक्त पेशी प्रसार शक्य होत असतो. पसरणार्‍या पेशींचा कल मग, अपान-शर्करा-गर्भकाम्ल-दुरुस्ती-जनुकांचा, इतर-अर्बुद-दमनक-जनुकांचा आणि अनेक इतर वाढ-संबंधित-जनुकांचा समावेश असलेली आणखीही स्वभावांतरणे ग्रहण करण्याचा असतो. दुसर्‍या शब्दांत, एक कर्कपेशी निर्माण करण्यासाठी, पेशी-वर्धन-त्वरण (अर्बुद-कारक-जनुका) सक्रिय होत असताना, पेशीवर्धनावरील रोध (ब्रेक; अर्बुद-दमनक-जनुकांचे प्रतिरोध) त्याच वेळी मुक्त व्हावे लागत असतात.<<
देवा रे!
पेशंटला जर तुझा अर्बुद कापतो म्हटलं तर मारेल मला तो Wink

इब्लिस यांच्याशी सहमत. मी वाचायला सुरुवात केली आणि कंटाळून नाद सोडला.>> +१. लेखमालिका फार माहीतीपुर्ण आहे पण मला तर अबुर्द काय तेही समजलं नाही.

इब्लिस +१
मला वाचताना ग्लॉसरीची फारशी गरज पडली नाही, पण इतक्या क्लिष्ट भाषेत वाचायला त्रासच झाला. बर्‍याच गोष्टींचं मनातल्या मनात इंग्लिश/सोप्या मराठीत भाषांतर करत वाचला. तुम्हीही अनेक शब्दांपुढे कंसात इंग्लिश प्रतिशब्द दिलेत त्यातच काय ते आलं Uhoh
सध्याच्या लोकांना सर्वसाधारणपणे संस्कृतपेक्षा इंग्लिश शब्दच जास्त पटकन समजतात. मुळातच हे सगळं संशोधन हे इंग्लिशमधूनच झालं आहे, संस्कृतमधून नव्हे. ज्ञानभाषा म्हणून वापराच्या दृष्टीने संस्कृत आता मृत भाषा आहे - गेले बरीच शतकं.. तेव्हा संस्कृतप्रचुर मराठीत लिहून कितपत लोकांपर्यंत हे लेख पोचतील याची मला साधार शंका आहे....

लिंबुटिंबू, इब्लिस, सायो, मनी, नताशा, वरदा, थमी,
सगळ्यांना प्रतिसादांखातर मन:पूर्वक धन्यवाद.

वाचायला अवघड मजकूर विना-स्वारस्याने वाचणे हे काही येरागबाळ्याचे काम नाही.

मुळात इंग्रजी भाषेत असलेला स्वारस्याचा मजकूर वाचायला अवघड असूनही लोक गरजेपोटी वाचतात.
त्यांना त्यामुळेच तो कळू लागतो.

जी जी भाषा, नवनवीन माहिती, अनुभव, संशोधने, रीती-पद्धती, मानवी व्यवहार ह्या सार्‍यांचे सुहृदांस समजेल असे वर्णन करू शकेल तीच प्रगल्भ होत जाते. मराठीला प्रगल्भ करण्याचाच हा प्रयास आहे.

ताबडतोब, कुणाला हे स्वारस्याविनाच समजेल अशी माझीही अपेक्षा नाही.

मात्र महत्त्वाची, स्वारस्याची, माहिती सहजी मिळून, कुणा एकासही काही लाभ झाला,
तर माझ्या कष्टांना काही अर्थ आहे असे मला वाटू शकेल. मी त्याच्याच प्रतीक्षेत आहे!

एरव्ही, पहिल्या नजरेत आवडावे असे ह्यात खरोखरीच काहीही नाही.

मायबोलीस हा मजकूर निरुपयोगी, निरर्थक वाटत असल्यास, अवश्य काढून टाकावा.

मायबोलीस हा मजकूर निरुपयोगी, निरर्थक वाटत असल्यास, अवश्य काढून टाकावा.

>> अहो माहीती निरुपयोगी आहे असे कोणी म्हटले.. फक्त वाचणार्‍यांना पटकन समजेल अश्या भाषेत टाका.

मराठीला प्रगल्भ करण्याचाच हा प्रयास आहे.

>> ह्या लेखामागचे नक्की उद्दिष्ट्य काय आहे? कर्करोगाविषयी सर्वांना (सर्वसामान्यांना) जागरुक करणे की मराठीला प्रगल्भ करणे?

माझ्या मते कर्करोगाविषयी सर्वसामान्यांना जागरुक करणे हा तुमचा हेतु असावा. नुसतेच मराठीला प्रगल्भ करायचे असते तर तुम्ही एवढा तांत्रिक विषय निवडलाच नसता. नाही का?

तर.. कर्करोगाविषयी सर्वसामान्यांना जागरुक करणे हा हेतु असेल तर मग कोणता शब्द वापरल्याने मराठी प्रगल्भ होईल यापे़क्षा कोणता शब्द वापरल्याने वाचकांना पटकन समजेल हे जास्त महत्वाचे नाही का? मग त्यासाठी आजकाल सर्रास वापरले जातात असे इंग्रजी शब्द, थोडी चित्रे, फोटो या सार्‍यांचा वापर करायला काहीच हरकत नाही.

तुमचा हेतु अत्यंत चांगला आहे हे इथे सर्वांपर्यंत पोहोचले आहे म्हणुनच कोणीही तुम्हाला वेडेवाकडे काही बोलले नाहीये. उलट एवढ्या लोकांना ह्या विषयाबद्दल जाणुन घेण्यात रुची आहे म्हणुनच ते तुम्हाला हा विषय सोप्प्या भाषेत मांडा अशी विनंती करताहेत.

१)< पुस्तिकेचा मराठी अनुवाद, इथे लोकहितार्थ प्रस्तुत करत आहे>

२) <वाचायला अवघड मजकूर विना-स्वारस्याने वाचणे हे काही येरागबाळ्याचे काम नाही.>

सोपे लिहिणे खरेच अवघड असावे.

सध्याच्या लोकांना सर्वसाधारणपणे संस्कृतपेक्षा इंग्लिश शब्दच जास्त पटकन समजतात. मुळातच हे सगळं संशोधन हे इंग्लिशमधूनच झालं आहे, संस्कृतमधून नव्हे. ज्ञानभाषा म्हणून वापराच्या दृष्टीने संस्कृत आता मृत भाषा आहे <<<
हे परंप्रेचा दुराभिमान बाजूला ठेवून लक्षात घेता आले तर ठिक.. नाहीतर आहेतच अर्बुदं कर्बुदं! Happy

पियु, भरत, वरदा, नीधप, साती, सगळ्यांना अभिप्रायांकरता मनापासून धन्यवाद!

साती,
अर्बुदं-कर्बुदं. भारीच. >>>>
मराठीचे आपले अज्ञान लपवू म्हटले तरीही लपत नाही ही वस्तुस्थिती खरीच आहे.

अहमदाबाद पासून तर पार दिल्लीपर्यंत पसरलेल्या डोंगरराशींना एक समर्पक नाव दिलेले आहे.
'अरवली' पर्वत. अबूच्या पहाडावर तर माँ अर्बुदा देवीचे विख्यात मंदिरही आहे.

सह्याद्री पर्वत जसा भिंतीसारखा आडवा पसरलेला आहे तसा हा पर्वत नाही.
भुईवर दगड-मातीचे लपके पडावेत तसे त्याचे स्वरूप आहे.
म्हणून मुळात अर्बुद-आवली वरून अरवली हा शब्द तयार झालेला आहे.

मराठी विश्वकोशातील कर्करोगावरील लेखांत, ट्युमर करता हाच शब्द वापरलेला असल्याने मी हाच शब्द स्वीकारला आहे. इतकेच.

नीधप,
लोकांचे अज्ञान काढण्यासाठी हे लेख आहेत होय.. तरीच!>>> त्यात काय चूक आहे?

गोळे काका, मराठीतून माहिती असणे हे उत्तम आहे. पण जिथे इंग्रजी शब्द अगदीच रोजच्या वापरात आहेत, तिथे मराठीच्या बरोबरीने जर इंग्रजी शब्द कंसात लिहीले तर त्यामुळे मराठी शब्द रुळण्यास जास्त मदत होईल. नक्की काय वाचतो आहे त्याचे आकलन ह्यामुळे नक्कीच वाढेल.

कदाचित १० वी पर्यंत मराठीतून शास्त्र शिकलेल्या विद्यार्थ्यास ह्यातील शब्द जड जाणार नाहीत.. पण जे ७वी पर्यंत मराठी आणि नंतर इंग्रजीतून शास्त्र शिकले आहे त्यांना प्रत्येक वेळेस शब्दार्थ कोश बघत बसावा लागेल.. जे कारण नसताना वेळखाऊ प्रकारात मोडेल आणि मग त्यामुळे लेख न वाचण्याकडे कल वाढेल. जे तुमच्या मूळ संकल्पनेच्या आड येऊ शकेल.

>>जी जी भाषा, नवनवीन माहिती, अनुभव, संशोधने, रीती-पद्धती, मानवी व्यवहार ह्या सार्‍यांचे सुहृदांस समजेल असे वर्णन करू शकेल तीच प्रगल्भ होत जाते. मराठीला प्रगल्भ करण्याचाच हा प्रयास आहे.>> अहो गोळे काका, इथले तुमचे सुहृद त्यांना समजत नाहीये असं सांगतायत तेव्हा अट्टाहास करुन काय उपयोग?

<कदाचित १० वी पर्यंत मराठीतून शास्त्र शिकलेल्या विद्यार्थ्यास ह्यातील शब्द जड जाणार नाहीत..>
हिम्सकूल माझे शालान्त परीक्षेपर्यंतचे शिक्षण संपूर्ण मराठी माध्यमातून झाले आहे. मला वरच्या लेखातले बहुसंख्य पारभाषिक शब्द (जनुक, उती, असे काही अपवाद सोडले तर) माहीत नाहीत/ ऐकल्या-वाचल्याचे आठवत नाही. पारभाषिक शब्द वगळून उरलेली वाक्येही एका वाचनात कळली नाहीत.

लोकांचे अज्ञान काढण्यासाठी हे लेख आहेत होय.. तरीच!>>> त्यात काय चूक आहे?
<<
काढणे याचे अर्थछटांनुसार मला उमजलेले वेगवेगळे अर्थ लिहितो, त्यात काय चूक आहे, ते तुम्हीच वाक्यात वापरलेल्या अर्थछटेवरून सांगा:
१. लाज 'काढणे'
२. चित्र 'काढणे'
३. भूत 'काढणे'
४. धिंड 'काढणे'
५. काटा 'काढणे' (दोन्ही अर्थांनी Wink )

असो. जै मर्‍हाटी.

कर्करोग म्हणजे काय?
कर्करोग, ज्याला मॅलिग्नंसी किंवा निओप्लाज्म असेही म्हटले जाते, हा एक सामान्य शब्द आहे ज्याचा उपयोग मोठ्या प्रमाणावरील रोगांमुळे होतो जो कोणत्याही भागावर परिणाम करू शकतो. शरीरात असे अति घातक ट्यूमर किंवा गुल्म आणि नियोप्लाज्म निर्माण होतात.. कर्करोगात एक परिभाषित वैशिष्ट्यपूर्ण जलद निर्मिती होते.असामान्य पेशी जी त्यांच्या नेहमीच्या अमर्यादरित्या सीमांपेक्षा अधिक वाढतात आणि नंतर शरीराच्या शेजारच्या भागांवर आक्रमण करू शकतात आणि त्यामध्ये पसरू शकतात. सामान्य पेशीही असामान्य होतात व त्यांच्यात क्रांती होते. इतर अवयवांमधील ही प्रक्रिया मूळ कर्करोग फैलावून मेटास्टेसिस म्हणून उल्लेखित आहे. मेटास्टासिस कॅन्सरपासून मृत्यूचे मुख्य कारण आहेत.
शरीराच्या कोणत्याही अवयवावर प्रभाव टाकणारे 100 पेक्षा जास्त प्रकारचे कर्करोग आहेत.
कर्करोग कसा होतो?
एका पेशीपासून कर्करोग होतो. सामान्य/सामान्य पेशींपासून ट्यूमर सेलमध्ये रूपांतर हे बहुस्तरीय प्रक्रिया आहे, विशेषत:पूर्व-कर्करोगजन्य जखमेपासून ट्यूमर पर्यंत प्रगती. हे बदल एक दुस-या पेशी-दरम्यानच्या परस्परसंवादाचे परिणाम आहेत व्यक्तीचे आनुवंशिक घटक आणि बाह्य-मूळ तीन श्रेणी ज्यामध्ये खालील प्रकार समाविष्ट आहेत:
•• शारीरीक कर्करोगास, उदा. अतिनील आणि आयनियोजन विकिरण;
•• रासायनिक कर्करोगासारख्या एस्बेस्टॉस, तंबाखूच्या धुराचे घटक, ऍफ्लोटॉक्सिन (अन्न दूषित करणारे बुरशी आणि आर्सेनिक विष.
• • विशिष्ट व्हायरस, जीवाणू, किंवा परजीवी पासून संक्रमण म्हणून जैविक कार्सिनजन्स.
वय वाढल्यामुळे विशिष्ट कर्करोगासाठी जोखीम निर्माण करण्याच्या शक्यतेमुळे
कर्करोगासाठी जोखीम घटक(risk factors)
जगभरातील तंबाखूचा वापर, अल्कोहोल वापरणे, अस्वास्थ्यकरित आहार आणि शारीरिक निष्क्रियता हे मुख्य कर्करोग धोका कारक आहेत. तीव्र संक्रमण
हिपॅटायटीस ब व्हायरसपासून (एचबीव्ही), हिपॅटायटीस सी व्हायरस (एचसीव्ही) आणि काही प्रकारच्या मानवी पापीलोमा व्हायरस (एचपीव्ही) पासून धोका निर्माण होतो.
कमी व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांतील कर्करोगासाठी कारक एचपीव्हीमुळे उद्भवणा-या ग्रीवा कर्करोगाने कर्करोगाचे एक प्रमुख कारण आहे, कमी उत्पन्न असलेल्या देशांतील स्त्रियांमध्ये याकारणास्तव मृत्यु होतात.
त्यासाठी जोखीम घटक टाळणे हे खूप महत्त्वाचे आहे.
30% कर्करोगाच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारा घटक बदलून किंवा टाळल्यामुळे प्रतिबंध केला जाऊ शकतो.
• तंबाखूचा वापर
• • जादा वजन किंवा लठ्ठपणा असणे
• • कमी फळे आणि भाज्या आहारात असणे
• • शारीरिक हालचालींची कमतरता
•• अल्कोहोल वापर
• • लैंगिक संक्रमित एचपीव्ही-संक्रमण
• शहरी वायू प्रदूषण
कर्करोगाची चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
बहुतेक कर्करोग प्रगत टप्प्यापर्यंत विशिष्ट लक्षण किंवा लक्षणे दर्शवत नाहीत. काही संभाव्य चिन्हे किंवा लक्षणे:
• • जलद आणि महत्वपूर्ण वजन कमी होणे
• • आवाजाची सततची खोकला किंवा घसा आवाज
•• मलवित्सर्जनातील सवयी किंवा रक्तातील बदल
• • शरीरात कुठेही सूज किंवा वाढ
• • स्तन मध्ये सूज किंवा टयुमर, त्वचेच्या पोतामध्ये बदल, स्तनातून रक्तस्त्राव होणे किंवा स्तनाग्र
एका दिशेने बदलणे इ.
• • गिळताना त्रास होणे
योनीसह कुठल्याही संयोगातून अनैसर्गिक रक्तस्राव
• • शरीराच्या कोणत्याही बाहेरील भाग किंवा दृश्यमान अंतर्गत भागांमध्ये पॅचेस किंवा अल्सर उदा. तोंडात होणे.
आपण वर दिलेल्या कोणत्याही चिन्हांवर किंवा लक्षणांवर लक्ष दिले तर पुढील मूल्यांकनासाठी आरोग्य-काळजी व व्यावसायिक त्वरित सल्ला घ्या.
कर्करोगासाठी स्क्रीनिंग चा उपयोग किती उपयुक्त आहे?
ब-याच वेळेस कॅन्सरना लवकर लवकर शोधून काढल्यास आणि पर्याप्त उपचार केले गेल्यास बरा होण्याची शक्यता आहे. कर्करोगाबद्दल तपासणी (किंवा अशा परिस्थितीसाठी कर्करोग होण्यास कारणीभूत होऊ शकतो) ज्या लक्षणांमधे सध्या कर्करोग नाही त्यांना स्क्रीनिंग म्हणतात. स्क्रीनिंग हेल्थ-केअर प्रॅक्टीशनर्सला(डॉक्टरस्नाक) शोधण्यात मदत करतात.
स्तन कर्करोगासाठी मॅमोग्राफी व ग्रीवेच्या कर्करोगासाठी अॅसिटिक ऍसिड (व्हीआयए) तपासणी.
उपचार
कर्करोगाच्या उपचारासाठी एक किंवा अधिक हस्तक्षेप, जसे शस्त्रक्रिया, रेडियोथेरपी आणि केमोथेरेपीची काळजीपूर्वक निवड करणे आवश्यक आहे.रुग्णाच्या जीवनातील गुणवत्तेत सुधारणा करताना या रोगाचा बराच परिणाम कमी करणे हे लक्ष्य आहे.
कर्करोग हा आजार आणि मृत्युच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. जगभरात, 2012 मध्ये अंदाजे 1.4 कोटी नवे कॅन्सर्स झाले. नवीन्‍ रुग्णांची संख्या सुमारे 70% ने वाढण्याची अपेक्षा आहे, पुढील 2 दशकांमधे. जागतिक स्तरावर मृत्युचे कर्करोग हे दुसरे प्रमुख कारण आहे, आणि ते होते. 2015 मध्ये 8.8 दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो. जगभरात, जवळजवळ 1 ते 6 मृत्यू कर्करोग झाल्यामुळे आहे. कर्करोगापेक्षा सुमारे 70% मृत्यु, कमी आणि मध्यम उत्प्न्न देशांच्या गटात होतात. कर्करोगाच्या सुमारे एक तृतीयांश मृत्युमुळे 5 अग्रगण्य आहेत.वर्तणुकीशी आणि आहारासंबंधी जोखीम: उच्च बॉडी मास इंडेक्स(BMI), आहारातील कमी फळं आणि भाजीपाला, कमी शारीरिक हालचाल, तंबाखूचा व आणि दारुची व्यसने.तंबाखूचा वापर कर्करोगाचा सर्वात महत्वाचा जोखीम घटक आहे व तो अंदाजे 22% कर्करोगाच्या मृत्यूस कारणीभूत ठरतो. जंतु-संक्रमण, जसे की यकृताचे आणि मानवी पेपिलोमाक विषाणु-ग्रीवेचा कर्करोग. विषाणु-एचपीव्ही, कमी कॅन्सरच्या 25% कॅन्सरच्या बाबतीत जबाबदार आहेत- मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमधे. उशीरा स्टेज सादरीकरण आणि अपरिपक्व निदान आणि उपचार हीसुद्धा कारणीभूत आहेत.सामान्यतः 2017 मध्ये, फक्त 26% कमी उत्पन्न असलेल्या देशांच्या सदस्यांनी कर्करुग्ण नोंदवले होते.सार्वजनिक क्षेत्रातील सामान्यत: उपलब्ध पॅथॉलॉजी सेवा महत्त्वाची आहे.उच्च-उत्पन्न असलेल्या देशांनी 9 0% उपचार सेवांची माहिती दिली आहे, ही कमी उत्पन्न असलेल्या देशांमधे 30% पेक्षा कमी तुलनेत उपलब्ध आहे. कर्करोगाचा आर्थिक प्रभाव महत्त्वाचा आहे आणि दरवर्षी वाढत आहे..सन 2010 मध्ये कॅन्सरचा वार्षिक आर्थिक खर्च अपेक्षित होता-अंदाजे 1.16 लाख कोटी अमेरिकन्‍ डॉलर्स.
समस्याः
जागतिक स्तरावर मृत्यूचे प्रमुख कारण म्हणजे कर्करोगाचे प्रमाण 88 लक्ष आहे.(2015 मध्ये)
यापैकी:
फुप्फुस (1.6 9 दशलक्ष लोक मृत्यु)
यकृत (788 000 मृत्यु)
आतडयांचे (774 000 मृत्यु)
पोट (75000 मृत्यु)
स्तन (571 00 मृत्यु
जागतिक आरोग्य संघटनेचा त्याच्या कर्करोग संशोधन एजन्सीद्वारे, आंतरराष्ट्रीय एजन्सीसाठी कर्करोगाचे संशोधन (आयएआरसी) संघटना, कर्करोगाच्या परिणामी कर्करोगाचे वर्गीकरण कायम ठेवते.
कारणे
कर्करोगाच्या विकासासाठी वय हा आणखी एक मूलभूत घटक आहे.
कर्करोगाच्या घटना वयासह नाटकीपणे वाढवते विशिष्ट कर्करोगासाठी जोखीम तयार करते. एकूण
जोखीम संचय सेल्युलर दुरुस्तीची प्रवृत्तींशी जोडला जातो
एखाद्या व्यक्तीची वयोमर्यादा वाढते म्हणून यंत्रणा कमी प्रभावी ठरते.
कर्करोगासाठी जोखीम घटक
तंबाखूचा वापर, मद्यार्क वापर, अस्वास्थ्यकरित आहार आणि शारीरिक निष्क्रियता, लट्ठपणा.
तीव्र संक्रमण कर्करोगासाठी जोखीम कारक आहेत आणि मुख्य आहेत
कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये प्रासंगिकता. च्या सुमारे 15%
2012 मध्ये निदान झालेली कर्करोग केसीनजनिक संक्रमणांमुळे होते,
हेलिकोबैक्टर पाइलोरी, ह्यूमन पेपिलोमाव्हायरस (एचपीव्ही), हैपेटाइटिस बी
विषाणु आणि सी विषाणु आणि काही प्रकारच्या एचपीव्ही विषाणुंमुळे यकृताचा धोका वाढतो
आणि गर्भाशयाच्या मुखाचा(ग्रीवेचा) कर्करोग हे एचआयव्ही सह संक्रमण मोठ्या प्रमाणात कर्करोगाचा धोका.
प्रतिबंधक उपायांमुळे 30-50% धोका टाळता येऊ शकतो
प्रतिबंधनः
तपासणी व स्क्रिनिंग
जोखीम घटक सुधारित करणे आणि टाळणे
उपचार
महत्त्वाच्या जोखमीच्या कारकांमधून बदल करणे किंवा टाळणे हे प्रमाण कमी करू शकते.
अशा प्रकारे हा कर्करोगाचा भस्मासुर व जीवघेणा विकार नियंत्रणात आणता येतो.