पेशावरी बैंगन

Submitted by लोला on 17 July, 2012 - 21:34
peshavari baingan
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

८-१० छोटी वांगी
२ वाट्या कांदा (किसून किंवा बारीक चिरुन)

२ छोटे चमचे तिखट
१ छोटा चमचा धणेपूड
दालचिनी, लवंग, वेलची यांची पूड प्रत्येकी अर्धा चमचा
४ छोटे चमचे खसखस- वाटून
१ छोटा चमचा हळद

१ छोटा चमचा वाटलेला लसूण
१ छोटा चमचा वाटलेले आले

१ वाटी दूध
अर्धी वाटी दही
अर्धी वाटी खवा (मावा पावडर चालेल)
पाव वाटी काजूचे तुकडे (ऐच्छिक)

२ छोटे चमचे साखर
मीठ

१ वाटी तेल
दीड वाटी पाणी

वरुन घालण्यास कोथिंबीर, पुदीना(ऐच्छिक)

क्रमवार पाककृती: 

- एक मोठे भांडे, कढई वा पॅन गॅसवर ठेवून त्यामध्ये २ चमचे तेल घालून गरम होऊ द्यावे.
- वांगी धुवून, पुसून त्यांना + अशी चीर देऊन ती या तेलात थोडी परतून घ्यावी. बाहेर काढून ठेवावी.
- याच भांड्यात उरलेले तेल घालावे.
- गरम झाल्यावर त्यात २ वाट्या कांदा घालून चांगले परतावे, मग खवा (मावा पावडर) घालून परतावे. खाली लागू देऊ नये.
- यानंतर त्यात हळद, आले-लसूण पेस्ट, मीठ, तिखट, साखर, लवंग-दालचिनी-वेलची पूड घालावी.
- वाटलेली खसखस व काजूचे तुकडे घालून परतावे.
- मग एक वाटी दूध आणि अर्धी वाटी दही(फेटून एकजीव केलेले) घालावे.
- १-२ मिनिटे परतावे.
- नंतर वांगी घालावीत आणि ४-५ मिनिटे परतावे.
- मग यात दीड वाटी गरम पाणी घालून झाकण देऊन वांगी शिजवावी.
- वरुन चिरलेली कोथिंबीर, पुदिना घालून वाढावे.
- चपाती, नान, बासमतीचा भात याबरोबर छान लागते. ग्रेव्ही दाटच असते.

pebe.jpg

वाढणी/प्रमाण: 
३-४ जण
अधिक टिपा: 

-लवंग-दालचिनी इ. मसाल्याचे जिन्नस आख्खे घेऊन खसखशीबरोबर थोड्या दुधात वाटून घेऊ शकता.
- वांग्याऐवजी बटाटा वापरुन पाहू शकता.

ही जरा "वेळखाऊ", "साग्रसंगीत", "कटकटीची" रेसिपी असली तरी "वेगळी" आणि "यम्मी" आहे.
पार्टीसाठी चांगली वाटते.

माहितीचा स्रोत: 
व्हई.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages