- स्वगृह
- या गृपमधे भाग घेण्यासाठी मायबोलीत प्रवेश करा/मायबोलीकर व्हा !
आहारशास्त्र आणि पाककृती
सदस्य प्रवेश |
डाळ इडलीलागणारा वेळ: २० मिनिटे लागणारे जिन्नस: 1 कप मुग डाळ क्रमवार पाककृती: रात्री दोन्ही डाळी धुवुन भिजत घालाव्यात. मिरच्या आणि लसुणही त्यातच भिजत घालावे. वाढणी/प्रमाण: दिलेल्या प्रमाणात मध्यम आकाराच्या 15 इडल्या होतात. अधिक टिपा: डाळी भिजण्यास लागणारा वेळ सोडला तर इडली 20 मिनिटांत तयार होते. माहितीचा स्रोत: माझी तमिळ मैत्रीण. |
|
छान सोपी वाटतेय हि ईडली. ह्या २-३ दिवसात नक्की करुन बघेन
प्राची,
या इडल्या फुगतात का नेहमीच्या डाळ-तांदळाच्या इडल्या सारख्या, त्यासाठी यात काही सोडा वगैरे घालावा लागतो का? या दोनच डाळी घालायच्या का हरबरा, तूर पण घातल्या तर?
त.टी: ही पाककॄती गणेशोत्सवात टाक तिकडे झटपट, पौष्टीक नाष्टा अशीच स्पर्धा आहे नाही तरी.
मुग डाळ आणि उडिद डाल ह्या दोन्ही डाळी लवकर भिजतात तरी रात्र भर भिजत ठेवण्याची गरज असते का?
रुनी, चांगल्या प्रतीची उडद डाळ असेल तर इडली चांगली फुगते. सोडा नाही लागत.
अखी, डाळी साधारण 3-4 तास तरी भिजवाव्यात.
रुनी, चांगल्या प्रतीची उडद डाळ असेल तर इडली चांगली फुगते. सोडा नाही लागत.
अखी, डाळी साधारण 3-4 तास तरी भिजवाव्यात.
कृपया सांगाल का की,हे पीठ फ्रिजमध्ये किती दिवस राहतं?
सुप्रिया, माझ्या मते २-३ दिवस तरी राहिल. पीठ थोडे आंबले तरी फरक पडत नाही.
मी करुन बघीतली हि इडली, मस्तच झाली
धन्यवाद!
खुप छान वाटतीये

करुन पहीली पाहीजे .........
*************************************************************
मनापासुन.............मनापर्यंत
*************************************************************
प्रिया
झक्कास रेसिपी! कसली मस्त होते ग. एका मैत्रिणीने केली आणि मला सांगितले मी लग्गेच केली आज. आत्ताच खाउन ताट खाली ठेवले. मस्तच एकदम
----------------------------------------------------------------
~मिनोती.
हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.
मिनोती, फोटो मस्तच.
लसूण आणी लाल मिरच्या तू पण डाळीबरोबर भिजत घातलेल्यास का जस वरती प्राची ने लिहिलय?
हो तसेच केले. मी गाजर पण घातले होते. त्यामुळे रंग केशरी आला.
----------------------------------------------------------------
~मिनोती.
हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.