रानभाजी १९) हदगा

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 13 December, 2011 - 04:11
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

हादग्याची ताटभर फुले (चिरून घ्या)
२ कांदे चिरून
२-३ मिरच्या
राई
जिर
हिंग
हळद
टोमॅटो
मिठ

क्रमवार पाककृती: 

प्रथम भांडे गरम करून त्यात तेल तापवून राई-जिर, मिरची फोडणी देऊन कांदा गुलाबी रंगावर परतवावा. नंतर हिंग, हळद परतवून त्यावर चिरलेली फुले घालून परतवा. ५-१० मिनिटे वाफेवर शिजू द्या मग त्यावर चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर, मिठ, टाकुन एक वाफ आणून गॅस बंद करा.

वाढणी/प्रमाण: 
४ ते ५ जणांसाठी
अधिक टिपा: 

हदगा ही भाजी असते हे मला मायबोलीवरूनच कळल. आमच्या एरीयात हे झाड मी कधीच पाहील नव्हत. पण मायबोलीवर हदग्याचा बरेचदा विषय निघायचा. एक दिवस मला गो-ग्रिन नर्सरीत हदग्याच झाड दिसल. अर्थात त्या झाडावर नावाची पाटी होतीम्हणून मला ते कळाल. ते पाहून मला इतका आनंद झाला आणि मी मागच्या उन्हाळ्यात घेतल. पाऊस अनुभवून हे झाड उंच झाल आणि आता त्याला फुले येऊ लागलि आहेत. मला वाटलच नव्हत एवढ्या लवकर फुले येतील. सुरुवातीला २-३ फुले आली. ती मी रोज काढून फ्रिज मध्ये ठेऊन जमवली आणि वरची भाजी केली. आता ७-८ फुले एकदम येतात. आता ती मी काढत नाही.

बर फुलेआली खरी पण भाजी कशी करायची माहीत नाही. मग सारीका, दिनेशदा यांनी काही टिप्स दिल्या होत्या. भाजी करायची वेळ आली तेंव्हा मी साधनाला फोन केला तिने तिच्या आईला विचारून भाजीची माहीती दिली. शिवाय ह्या फुलांची भजीही करतात ते सांगितले. पुढच्या वेळी भजीचा प्लॅन आहे.

टेस्ट खुपच आवडली ह्या भाजीची. मी वरील प्रमाणे केली आता ह्याच्यात अजुन काही सुधारणा असेल तर जाणकारांनी सांगावे.

इतर रानभाज्या:
१) कुरडूची भाजी - http://www.maayboli.com/node/9313
२) कंटोळी - http://www.maayboli.com/node/9329
३) टाकळा - http://www.maayboli.com/node/9351
४) भारंगी - http://www.maayboli.com/node/9381
५) कुलू - http://www.maayboli.com/node/9406
६) शेवळ - http://www.maayboli.com/node/16771
७) आंबट वेल - http://www.maayboli.com/node/16838
८) कोरल - http://www.maayboli.com/node/16860
९) कवळा - http://www.maayboli.com/node/17069
१०) वाघेटी - http://www.maayboli.com/node/17171
११) कोरांटी/कोलेट - http://www.maayboli.com/node/17448
१२) मायाळू - http://www.maayboli.com/node/17566
१३) सुरणाचे देठ - http://www.maayboli.com/node/17631
१४) दिंडा - http://www.maayboli.com/node/17948
१५) शेवग्याचा पाला - http://www.maayboli.com/node/18177
१६) रानभाजी टेरी (अळू) - http://www.maayboli.com/node/17006
१७) शेवग्याची फुले - http://www.maayboli.com/node/23204
१८) भूईछत्री/आळंबी (मश्रुम्स) - http://www.maayboli.com/node/29346

माहितीचा स्रोत: 
मायबोलीकर
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिल्यांदाच पाहिला/ऐकला हा प्रकार. फुलं खुपच सुंदर आहेत. फुलांची भाजी करण्याचा विचारच आगळा-वेगळा. भाजीची रंगसंगतीही छानच दिसतेय.

मस्त जागू. माझ्या आजीकडे विदर्भात होतं हे झाड. ताटं भरभरून फुलं काढली जायची. काही शेजारीपाजारी पोचती व्हायची. दिवशी भाजी होत असे नि दुसर्‍या दिवशी भजी. चव मात्र मुळीच आठवत नाहीय. खूप लहानपणी खाल्लीय.

श्रद्धादिनेश, बित्तुबंगा, अखी, निलू, मधुरीमा धन्यवाद.

अमी पुर्ण झाडाचा नंतर टाकेन. सध्या हाच घे.

पुरंदरे मलाही नवीनच आहे ही भाजी जाणकार सांगतील गुणधर्म तर चांग्ले आहे.

छान भाजी. हि फुले जरा कडवट असतात म्हणून एकदा उकडून पाणी
फेकून देतात. याचा गुलाबी फुले येणारा पण एक वाण असतो.
धारावीला निसर्ग उद्यानात एक मोठे झाड आहे. पण बहुतेक कुणाला
माहीत नसावे ते, कारण झाडावर भरपूर फुले दिसतात.

मस्तच गं जागू. छान दिसतिये भाजी! बघून खाविशी वाटतिये. इथे पुण्यात जर ही फुलं मिळाली तर नक्की करून पाहीन.

याची मी पीठ पेरुन करते भाजी. ती पण छान लागते. चिरताना याच्या आतला केसर काढुन टाकावा शक्यतो. तो बरेचवेळा कडवट असतो

समई माझ्या सासूबाई पण म्हणत होत्या की अगस्तीची फुल आहेत का ? पण मलाही निट माहीत नाही.

आस पुढच्यावेळी लक्षात ठेवेन. पण मला कडू नाही लागली भाजी.

रानडूक्कर (तुमचा आयडी बदला हो प्रश्न विच्यारण्यासाठी कसतरीच वाटत) प्लिज आईला विचारून लिहाल का हदग्याची कोशींबीर.

लामणदिवा शोध घ्यावा लागेल.

आमच्याकडे हरबरा डाळ भिजत घालून कोबीच्या भाजी सारखी करतात ओला नारळ घालून्.शान्कली शनिपाराजवळ देसाई बन्धू दुकानासमोर जे शेतकरी बसतात तिथे ही भाजी हमखास मिळते.छान लागते.

आयला!
म्हंजे सुसुकु, गेल्या जन्मी हादग्याची भजी खाल्ली नाहियेत तु? अरेरे! फुकट रे! फुकट!! तो ही जन्म फुकट गेला तुझा..