वड्यांसाठी:
१ कप डाळिचे पीठ
१ कप दही
२ कप पाणी
चवीनुसार मीठ
१/४ चमचा हळद
चिमुट्भर हिंग
१/४ चमचा किसलेलं आलं
फोडणीसाठी:
तेल
मोहरी
हिंग
कढीपत्ता
बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
तीळ
सजावटीसाठी
बारीक चिरून कोथींबीर
ताज्या नारळाचा चव.
१. एका मायक्रोवेव्हमध्ये चालणार्या भांड्यात वड्यांसाठी लागणारं सामान एकत्र करणे
२. विस्क किंवा हँड मिक्सरने एकजीव करणे
३. मायक्रोवेव्हमध्ये १.५ मिनिट हाय पॉवरवर ठेवणे
४. बाहेर काढून विस्क किंवा हँड मिक्सरने एकजीव करणे
५. मायक्रोवेव्हमध्ये १.५ मिनिट हाय पॉवरवर ठेवणे
६. बाहेर काढून विस्क किंवा हँड मिक्सरने एकजीव करणे
७. मायक्रोवेव्हमध्ये १.५ मिनिट हाय पॉवरवर ठेवणे
८. बाहेर काढून विस्क किंवा हँड मिक्सरने एकजीव करणे
आता हे मिश्रण अगदी गरम असतानाच तेल न लावलेल्या अल्युमिनम फॉईलवर कालथ्याने पट्पट पसरणे. अगदी पातळ लेअर करण महत्वाचं( मिश्रण फॉईलच्या एका बाजुला चमच्याने घालून कालथ्याने पटपट पातळ लेअर होईल असे ओढून पसरणे) हे खरं तर ट्रिकी आहे थोडं फार. मिश्रण गरमच असं पाहीजे नाहीतर पसरता येत नाही.
पातळ लेअरच्या सुरीने खूणा करून पट्या कापून घ्यायच्या.
पट्या गुंडाळून वड्या करायच्या.
सगळ्या वड्या गुंडाळून झाल्यावर त्यावर तेल गरम करून फोडणी करून पसरवायची.
वरून ताजी कोथींबीर आणि नारळाचा चव पसरायचा.
मिश्रण पटकन पसराव लागतं नाहीतर गोळा होऊ शकतो.
शिजवण्यासाठी बरोबर ४.५ मिनिटं पुरतात. ( अर्थात मायक्रोवेव्हच्या पॉवरवर अवलंबून आहे)
मिश्रण कालथ्याने एका डिरेक्शनमध्येच ओढायचं
जेवढा पातळ लेअर तेवढ्या वड्या नाजूक होतात.
रुनी सेम पिंच. त्या कुकरच्या
रुनी सेम पिंच.

त्या कुकरच्या वड्या चक्कं जमल्या होत्या मला तिनचारदा. त्याने निदान सुरळीच्या वड्यांची भीती गेली.
तरी अजून 'हाँ हाँ म्हणता करुनी टाकु' कॉन्फिडन्स यायचाय या बाबतीत.
आर्च - आता ह्या पद्धतीने नक्की करुन पाहीन. धन्यवाद.
छान दिसताहेत सगळ्यांच्या
छान दिसताहेत सगळ्यांच्या वड्या. आमच्या ज्या मित्राने मला कुकरची रेसिपी दिली तो स्वतः मावेमधेच करतो. पण माझं मावेमध्ये पदार्थ बिघडवण्याचं रेकॉर्ड त्याला माहित असल्याने त्याने मला कुकरचा मार्ग दाखवला
मस्त आहेत सर्व वळकट्या. डीजे,
मस्त आहेत सर्व वळकट्या. डीजे, तुझ्या वड्या निऑन पिवळ्या रंगाच्या कश्या झाल्या..
मायक्रोसॉफ्ट..

झकास झाल्या ! पुढच्या वेळी
झकास झाल्या ! पुढच्या वेळी फोटो काढणार
धन्यवाद आर्च!
आज ट्राय केल्या
आज ट्राय केल्या सुव...चांगल्या झाल्यात. रंग-रुप-चव उत्तम. मात्र वड्या गुंडाळताना थोड्या वड्या मधे मधे तुटत होत्या. काय कारण असेल?
पुढच्या आठवड्यात ऑफिसमध्ये पॉट लक आहे... तेव्हा सुव न्यायचा बेत आहे. पण तुटल्या नाहीत तर नेण्यात पाईंट आहे. आणि एक शंका - सुरळीची वडी उचलताना अधेमधे तुटू शकते काय... मआझ्या सगळ्या नाही तुटतेत...पण मधेमधे एखादी कोसळते आहे हातानं उचलली तर...
प्लीज हेल्पा...
आर्च - रेसिपी मस्त पण ... आणि किती सोपी..
अन्कॅने , वडी कित्ती पातळ
अन्कॅने , वडी कित्ती पातळ असावी हे तुझ्या दुसर्या फोटोवरून कळतंय
. अफाट सुंदर !
मस्त फोटो अन्कॅनी. थोड्या
मस्त फोटो अन्कॅनी. थोड्या इकडे पाठव. माझ्या पहिल्या बोंबलल्या त्यानंतर अजून मुहूर्त लागायचाय.
अरे वा मी पण करून बघेन ह्याच
अरे वा मी पण करून बघेन ह्याच पद्धतीने. मी नेहमी ढवळत बसते गॅसवर. हात दुखतो त्याच्याने. ही खुप चांगली आयडीया आहे.
लालु , सु. वडी बीबी वरच्या
लालु ,
सु. वडी बीबी वरच्या तुझ्या बेस्ट वड्या आणि बेस्ट फोटो !!
माझ्या वड्यांचा रंग.. LOL
हळद जास्तं टाकलीये थोडी कारण मला दिसायला तोच रंग आवडतो, इतर फोटोतल्या वड्या सुबक -सुंदर वगैरे आहेत प्रश्नच नाही, पण बघताना थोssड्या फिकट वाटल्या मला.
मस्त दिपांजली मस्त... केनी
मस्त दिपांजली मस्त... केनी च्या पण झक्कास्स... अंजलीच्या गाद्या पण आवडल्या सजवल्यावर.
मला जमल्या. मी आज केलेल्या.
मला जमल्या. मी आज केलेल्या. मस्तच झाल्या आहेत. मी प्रमाण कमी घेतले होते. त्यामुळे वीसच वड्या झाल्या. तसंच मी पीठ ताटात वगैरे न पसरवता सरळ ओटाच स्वच्छ धुवून पुसून त्यावर पसरवल्या. त्यामुळे पीठ पटापट पसरतं. पीठ ओढण्यासाठी मला दुकानदाराने एक पिझ्झा चमचा म्हणून दिला होता, त्याचा चांगला उपयोग झाला. (पिझ्झा सर्व करण्यासाठी वापरतात तसाच चमचा आहे)
पण माझ्या वड्या वरच्या सर्वाच्या सारख्या सुबक वगैरे नाही झाल्या. त्यामुळे फोटो अपलोड नाही करत.
सोप्या सुटसुटीत पाकृसाठी आर्चचे आभार.
तुम्ही कोणी गुंडाळी करण्याआधी
तुम्ही कोणी गुंडाळी करण्याआधी फोडणी / खोबरं पसरवत नाही का त्यावर ?
सुरीने पट्ट्या कापल्या की त्याला पर्पेंडिक्युलर फोडणी अन खोबरं कोथिंबीर पेरायचं अन मग गुंडाळी करायची . सगळ्या गुंडाळ्या झाल्या की परत थोडे खोबरे कोथिंबीर अन फोडणी.
मी नेहमी कूकरमधून केल्यात, आता मायक्रोवेव्हच्या करुन पाहीन.
मेधा मी तसेच करते यावेळी पण
मेधा मी तसेच करते यावेळी पण तसचे केले होते.
थोडासा बदल म्हणून दाण्याची
थोडासा बदल म्हणून दाण्याची कोरडी चटणी भुरभुरवली पट्यांवर गुंडाळायच्या आधी. छान लागल्या वड्या.
आता कोणितरी लसणाची चटणी वापरून बघायला हरकत नाही.
मी लावते आतून हिरवं वाटण. आणि
मी लावते आतून हिरवं वाटण. आणि मग गुंडाळून वर फोडणी, खोबरं आणि पुन्हा कोथिंबीर
आता माबेत केल्या पाहिजेत एकदा....
आहाहा तोपासु मस्तच!!!!
आहाहा तोपासु
मस्तच!!!!
१०० पैकी १०० मार्क्स ग बये
१०० पैकी १०० मार्क्स ग बये तुला.. परवा केल्या होत्या. कसल्या पटकन झाल्या वड्या. गॅसवर करताना पेक्षा अगदी २५% श्रमात
खतरनाक रेसिपी आहे. एकदा ट्राय
खतरनाक रेसिपी आहे. एकदा ट्राय केली आणि एक दोन सुरळ्या सोड्ल्या तर जमलीच की.
आता कधीतरी योग येईल तेव्हा माहेरी किंवा सासरी केली तर सत्कारच होईल माझा...:P
त्या सत्कारातला अर्धा नारळ
त्या सत्कारातला अर्धा नारळ आणि अर्धी शाल आर्चला पाठवायला विसरु नये
हा हा हा... शालीचे दोन
हा हा हा... शालीचे दोन स्कार्फ्स करून शेअर करावेत अशी कल्पना आली अचान्क
Arch thanks for the recipe and sorry for the discussion
खरंच अगदी भन्नाट रेस्पी आहे.
खरंच अगदी भन्नाट रेस्पी आहे. कधीही चुकली नाही आजवर. एरवी सुरळीच्या वड्यांचं, वळकट्या न होता ताटलीवरून खरवडलेलं विचित्र पिठलं व्हायचं.
जबरा दिसताहेत.. करून बघितल्या
जबरा दिसताहेत.. करून बघितल्या पाहिजेत..
नानबा, घरी आहेस का? आत्ता
नानबा, घरी आहेस का? आत्ता पीठ-पाणी-दही एकत्र करून मायक्रोवेव्हमधे घातलंस तर पुढल्या १५व्या मिनिटाला गुंडाळी खात असशील.
अग, नाही ना.. म्हणून ऑफिसमधे
अग, नाही ना.. म्हणून ऑफिसमधे सुस्कारे सोडत "करून बघितल्या पाहिजेत.." लिहिलं.. :,(
ंमस्त पाकॄ, मी बनवून
ंमस्त पाकॄ, मी बनवून पाहील्या, खुप्च छान झाल्या. नवर्याच्या चायनिज कलिगलाही आवडल्या.
(No subject)
खरच पाच मिनीटात झाल्या. आज
खरच पाच मिनीटात झाल्या. आज लेकीसाठी तयारी न लागणारा आणि दहा मिनीटात होणारा पदार्थ शोधताना या मिळाल्या.
सुगरण नसल्याने किचन मधले कलाकुसरीचे काम जमत नै.
फक्त माझ्याही अंजली_१२ सारख्या गादी गुंडाळल्यासारख्या झाल्यात
एक प्रश्न आहे. या वड्या किंवा ढोकळा यावर फोडणी टाकली कि फार तेलकट दिसतात. पण दुकानातल्या तितकया तेल्कट दिसत नाहीत. ते कसे काय?
हा धागा वर आला त्यामुळे परत
हा धागा वर आला त्यामुळे परत या वड्या केल्या पण या वेळी गाद्या नाही झाल्या बरं

एकदम छान प्रोफेशनल झाल्या
सु. वड्या.. कुकर मध्ये करताना
सु. वड्या.. कुकर मध्ये करताना किती शिट्या घ्यायच्या?
प्लिज मदत
कधी केल्या नाहीत. पण करताना
कधी केल्या नाहीत. पण करताना पाहिले आहे. पालक मिक्सरमधून वाटून १ वाटी+ १ वाटी आंबट ताक+ १ वाटी बेसन एकत्र गॅसवर शिजवून मिश्रंण ताटावर पसरून खोबरे + कोथींबीर एकत्र पसरवून वड्या कापून वर फोडणी द्यायची.
Pages