१) एक जूडी मोठ्या पानांचा पालक किंवा वडीचे अळू
२) १ कप बेसन
३) आवडिप्रमाणे हिंग, तिखट, मीठ, हळद, गरम मसाला, आले लसूण वाटण, गूळ वा साखर
४) आंबटपणासाठी एक टेबलस्पून चिंचेचा कोळ किंवा दोन टेबलस्पून दही (अळू असेल तर कोळच )
५) एक टिस्पून तेल (वरुन फोडणी द्यायची असेल तर जास्त + फोडणीसाठी तीळ, मोहरी, हिरवी मिरची)
६) वरुन पसरण्यासाठी कोथिंबीर आणि ओले खोबरे
हा काही नवीन पदार्थ नाही. पुर्वी फॉईलवर पालकाची पाने पसरून त्यांचा अळुवडीप्रमाणे रोल केला होता. पण त्यापेक्षा हि कृति खुपच सोपी आहे.
१) पालकाची किंवा अळूची जी पाने घेतली असतील त्याचे शिरा वगळून मोठे मोठे तूकडे करून घ्या.
२) बेसनात दही वा कोळ आणि बाकी मसाले घालून भज्यांसाठी भिजवतो त्यापेक्षा थोडे घट्ट भिजवा. (हे थोडे जास्त तिखट / आंबट असू द्या)
३) कूकरच्या डब्याला तळाशी पुसटसा तेलाचा हात लावा.
४) त्यावर पालकांच्या पानाचा एक थर द्या
५) पण बाकिचे तूकडे बेसनात घोळवून वर पसरत जा आणि त्याचे थर करा.
६) वरचा थर जमल्यास नुसत्या पानांचा द्या किंवा शिल्लक राहिलेला घोळ वर ओता (जे काही उरेल त्यावर अवलंबून)
७) कूकरमधे शिटी न ठेवता २० मिनिटे वाफवा.
८) पूर्ण थंड झाले की आवडीप्रमाणे वड्या कापा.
९) पथ्यासाठी या नुसत्यास कोथिंबीर घालून खाता येतील, नाहीतर तेलाची तीळ, जिरे मिरची घालून फोडणी करून वर ओता, व खोबरे कोथिंबीर पसरून घ्या किंवा फोडणीत परता किंवा शॅलो फ्राय करा.
तेल / तळणे वगळले तर हा पथ्याचा प्रकार होईल. उपहार म्हणून भरपेट होतो.
हे मस्त.... करायला एकदम
हे मस्त.... करायला एकदम सुटसुटीत
छानच पालक खुप आवडतो
छानच
पालक खुप आवडतो त्यामुळे नक्की करुन बघणार 
हे सोप्पय एकदम! बेबी स्पिनॅच
हे सोप्पय एकदम! बेबी स्पिनॅच वापरले तर तुकडे पण नको करायला. धन्स दिनेशदा!
खुपच छान.. मी पानकोबी
खुपच छान..
मी पानकोबी किसुन,/पालक,/अळु ची पाने चिरुन अशा वड्या करते..बाकी घटक वरील प्रमाणेच घेते..तेल्,तिळाची खमंग फोडणी करुन वड्या खुटखुटीत होईपर्यत छान परतुन घेते..
फोटो रात्री टाकणार? मग मी
फोटो रात्री टाकणार? मग मी रेसिपी उद्याच वाचणार.
अरे वा! माझ्याकडे स्वीस
अरे वा! माझ्याकडे स्वीस चार्डची पाने आहेत,त्याच्या अळुवड्यासारख्या वडया करायचा कंटाळा आलाय, या पद्धतीने करेन. दिनेशदा तुसी ग्रेट हो जी!
वा फोटोतर तोंपासू आहे.
वा फोटोतर तोंपासू आहे.
लेअर्सची कल्पना आवडली.
लेअर्सची कल्पना आवडली.
मस्तच.
मस्तच.
चांगली पाककृती आहे. लोट न
चांगली पाककृती आहे. लोट न करता हा शॉर्ट्कट आवडला.
मस्त दिसतायत वड्या.
मस्त दिसतायत वड्या.
झक्कास आहे ही आयडिया.
झक्कास आहे ही आयडिया. सुटसुटीतही. धन्स दिनेशदा.
मलापण शॉर्ट्कट आवडला. करुन
मलापण शॉर्ट्कट आवडला. करुन बघते
भजी तर सगळेच जण करतात पण
भजी तर सगळेच जण करतात पण पालकाच्या वड्या असतात हे माहीत नव्हतं. खूपच सोप्याही आहेत करायला.
मस्तं दिसतायेत खमंग भाजलेल्या
मस्तं दिसतायेत खमंग भाजलेल्या वड्या..
मला आळुवड्यांनी घसा खवखवतो,
मला आळुवड्यांनी घसा खवखवतो, पण या छान दिसतायत आणि घसा ही खवखवणार नाही.
मस्तं दिसतायत वड्या...
मस्तं दिसतायत वड्या... फोटोमधुन उचलुन खाता यायला हव्या होत्या..
फोटोमधुन उचलुन खाता यायला
फोटोमधुन उचलुन खाता यायला हव्या होत्या
अनुमोदन
मस्तं दिसतायत वड्या...
मस्तं दिसतायत वड्या... फोटोमधुन उचलुन खाता यायला हव्या होत्या.. अगदी अगदी,
दिनेशदा तुम्हाला मी खूप मस्त या शब्दांची S I च देते ( कारण तुमचे सर्वच पदार्थ करायला सोपे,सुटसुटीत आणि चविष्ट असतात.) फक्त आम्ही केल्यावर (म्हणजे मी केल्यावर हं!) ते फोटोतल्या सारखे दिसत नाहीत......
मस्त दिसताहेत वड्या.
मस्त दिसताहेत वड्या.
सह्ही!!!!!!!!!!!!!!!!!!
सह्ही!!!!!!!!!!!!!!!!!!
फोटोमधुन उचलुन खाता यायला
फोटोमधुन उचलुन खाता यायला हव्या होत्या>> मग बघायलाच उअरल्या नसत्या..
फोटो... एकदम तों.पा.सु.
फोटो... एकदम तों.पा.सु.
मस्तच..करुन बघते.
मस्तच..करुन बघते.
वाह... तोंडाला पाणी सुटेश
वाह... तोंडाला पाणी सुटेश

केल्या आज या वड्या, मस्त
केल्या आज या वड्या, मस्त झाल्या.
आले-लसूण वाटण नाही घातले, तिळ मिश्रणातच घातले. चाळणीत वाफवल्या, खाली पाण्यात थोडा ओवा टाकला. मस्त स्वाद आला ओव्याचा.
धन्यवाद दिनेश ...
पाण्यात ओवा, नवीन आयडीया.
पाण्यात ओवा, नवीन आयडीया.
सोपी कृती आहे. फोटोही छान
सोपी कृती आहे. फोटोही छान
दिनेश दा.. खूप्पच छान
दिनेश दा.. खूप्पच छान प्रकार.. संडे का नाश्ता
तुम्हाला कुणी कधी रेसिपीज चं पुस्तक लिहायची रिक्वेस्ट केलीये??
तुमच्याकडे तर 'साध्या,सोप्या ,पौष्टिक' रेसीपीज् चं भांडार आहे.. पुस्तक लिहिण्याचं मनावर घ्याच्च!!!
मस्त रेसिपी. नक्की करुन
मस्त रेसिपी. नक्की करुन बघणार.
Pages