सुकी कर्दी

Submitted by मया on 3 June, 2011 - 13:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

सुकी कर्दी, टोमाटो,कांदा,बटाटे, कोकम, कोथिंबीर,चाविपुरात मीठ, तेल,आल लसून पेस्ट, हिंग, कढीपत्ता,मालवणी मसाला

क्रमवार पाककृती: 

सुकी कद्री हा प्रकार भरपूर लोक करतात कारण हा प्रकार सामान्य माणसांसाठी, किंवा हा प्रकार चिपळूणी वगैरे लोक जास्त करतात कारण पटकन करता येतो. लोक मला वाटत सुक्की मच्ची सुद्धा खूप आवडीन खातात. पावसाळ्यात सुद्धा हीच मच्ची उपयोगी पडते.

प्रथम हि सुक्की कर्दी साफ करून घ्यावी त्यानंतर ती पाण्यात भिजत ठेवावी १ ते २ तास ती भिजत ठेवावी त्यानंतर त्यात पाणी चांगले मुरते.

दुसरीकडे मध्यम आकाराचे कांदे,बटाटे, आणि टोमाटो कापून घ्यावा.
एका पातेल्यात तेल तापत ठेवून त्यात हिंग, आले लसून पेस्ट, आणि त्यात चिरलेले कांदे , बटाटे आणि टोमाटो टाकावा ते चांगल झाकण लावून शिजू द्याव. या सर्व गोष्टी चांगल्या शिजल्या ना कि मग त्यात ती सुकी कर्दी टाकावी आणि तिला पण थोडी शिजवू द्यावी त्यात थोड योग्यते नुसार पाणी टाकावं म्हणजे शिजण्यास मदत होईल. आणि हे सर्व झाल कि यात चाविपुरात मीठ आणि मालवणी मसाला (नसेल तर आपल्या रोजच्या वापरातला) आणि हे सर्व टाकून झाल्यावर पातेल्याला झाकण लावून पाणी चांगल मुरेपर्यंत शिजू द्याव नंतर सुंदर रंग येईल आणि वासही पसरेल.........................आणि नंतर कोकम आणि कोथिंबीर टाकावी.झाली आपली सुकी कर्दी तयार.................

वाढणी/प्रमाण: 
बटाटे, आणि टोमाटो हे टाकल आहे म्हणजे आजून काही सांगायची गरज नसावी कदाचित.
अधिक टिपा: 

पावसात मच्चीमार मासेमारी करायला जात नाहीत तेव्हा अश्या पक्राराचे पदार्थ केले जातात.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कर्दि म्हणजे करंदी. माझी बहुतेक २९ वी पाककृतीतली सुकवलेली करंदी.

महेश आम्ही अशी भिजत नाही घालत करताना फक्त पाण्यात टाकतो. एकदा ह्यात सिमला मिरचीघालुन बघा ती पण छान लागते.

पावसाळा जवळ आला की वाळवणात सुकी मच्छी चाही वाटा असतो. मी पण भरलेत ह्यावेळी सोडे, बोंबिल, जवळा.

धमाल रेसिपी, पावसाळ्यासाठी !
मालवणला कोणाच्यातरी घरी मी आणखी एक प्रकार चाखला होता; करंदी साफ करून, धुवून पूर्ण निथळू द्यायची, अगदी सुकी झाल्यासारखी होईपर्यंत. कढईत थोड्या तेलावर कांदा थोडा परतून घ्यायचा व त्यावर ही करंदी टाकायची. पाणी अजिबात नाही वापरायचं. खरपूस होईपर्यंत परतून घ्यायची. वर फक्त मीठ,तिखट व किंचित बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची [ हवंच तर एक कोकम सोल ]. बस्स. छान कुरकुरीत तर होतेच पण साथीला करंदी भाजून काढल्यासारखा मस्त भूक चाळवणारा वास पण !

आजोळी हा प्रकार कच्ची कैरी घालून करतात. घाटावर पूर्वापार असा सुका बाजार घेऊन लोक जात असत. (त्या मानाने सुके बोंबील, बांगडे वापरात नाहीत.) भाकरीवर हे घालून शेतात जात असत. तिकडे ताजे मासे दुर्मिळ. त्यांमूळे वर्षभर खाल्ले जातात.

भाउ नमस्कार माझी पद्धत तुम्ही लिहील्या प्रमाणेच आहे. पाणी न घालता केली की जास्त रुचकर लागते. शिवाय बटाटे पण नाही घालत नाहीतर बटाट्याची चव करंदीची मुळ चव खाउन टाकते. आणि दिनेशदा सांगतात त्याप्रमाणे कैरीही घालायची मग अफलातुन करंदी होते.

महेश तुम्ही दिलेली रेसिपी पण छानच आहे. पण वरची करुन बघा. आणि तुमच्या पद्धतीने रस्सा करा व त्यात चिंचेचा कोळ आणि थोड तांदळाच पिठ घाला एकदम झक्कास रस्सा होतो.

जागू हे सर्व सोड आम्ही लहानपणी गावी गेलो ना कि ११ वाजले सकाळचे कि आम्हाला पेज मिळत असे आणि तोंडाक कधी आम्बो नायतर कधी बारीक जवलो ना नुसत्तो भाजून तव्यावर काय सुंदर लागता...................

कर्दि १ तास भिजत नाहि घातलि तरि चालते. फक्त गरम पाणि घालून १५ मिनिट ठेवा.बाकि सुक्या मच्चिचि चव खुपच छान लगते.

<< भाउ नमस्कार माझी पद्धत तुम्ही लिहील्या प्रमाणेच आहे. >> जागूजी,
तुमच्या रेसिपी मी वाचतो मधून मधून . छान असतात. खूप वाव आहे क्रिएटिव्हीटीला यात, हे उमगलंय तुम्हाला !

हा प्रकार खुप आवडतो....पावसाळ्यात तर हादड-हादड असते नुसती दिवसातुन ४-५ वेळा.....पण महेशराव तोंपासुची 'तर्री' कुठे गेली..?

महेश भाजलेल्या बांगडा आठवत असेलच मग तुम्हाला. काय वास सुटतो त्याचा. कुणी चुलीत भाजला असेल तर आख्या गावाला भुक लागते.

भाउ धन्यवाद. पण तुम्ही रेसिपी मधुन मधुन का वाचता? नेहमीच वाचा.

मी हे गेल्या कित्येक दिवसांपासून सुकी सर्दी असं वाचतेय. आज पाकृ विभागात चक्कर टाकली तर तिथे पण "सुकी सर्दी". मग पत्ता लागला सर्दी नाही कर्दी आहे ते.

असो. हा माझ्या खाण्याचा प्रांत नाही.

निंबुडा @ माझ्या माहिती प्रमाणे "सुकी सर्दी" अश्या नावाची कोणती पाककृती पण मी एकली नाही अजून..............

भाऊकाकांनु तुम्ही सांगितलेली रेसीपी आम्ही करदीच्या ऐवजी जवला वापरुन करतो छान लागते.(कोथिबीर आणी कोकम न घालता)

मी हे गेल्या कित्येक दिवसांपासून सुकी सर्दी असं वाचतेय. आज पाकृ विभागात चक्कर टाकली तर तिथे पण "सुकी सर्दी". मग पत्ता लागला सर्दी नाही कर्दी आहे ते.

>>>> अग निंबुडा, मी पण अगदी हेच लिहायला आले इथे. सुकी सर्दी! Happy

निंबुडा, मामी, मीपण तसेच वाचतिये इतके दिवस. आज म्हटले बघुया तरी काय लिहिले आहे सर्दीबद्दल Happy

<< निंबुडा, मामी, मीपण तसेच वाचतिये इतके दिवस >> डोळे,कान व जीभ यांची आंतून खूप जवळीक असते; त्यामुळे जीभेला जे आवडत नाही तें डोळे व कान पण दुर्लक्षित करत असावेत ! उदा. ""सुकी सर्दी"वर उपाय म्हणून मी म्हटलं "कुर्ल्यांचा रस्सा लई ब्येस ", तर कांही कान ऐकतील " कारल्याचा रस कां नाही घेत " !! Wink

मी नक्की सांगतो भाऊ ज्यांनी ज्यांनी हे शीर्षक "सुकी सर्दी " म्हणून वाचल ती सगळी शाकाहारी असणार. उदा.मामी, निबुडा, आदिती आणि भाऊ आता चक तुम्ही सुधा...............

का तुम्ही गरीबाची टिंगल करताय................

ज्यांनी ज्यांनी हे शीर्षक "सुकी सर्दी " म्हणून वाचल ती सगळी शाकाहारी असणार. >> ह्म्म नाहीतर करंदी हा प्रकार माहीत असलेले मांसाहारी (खास करून कोंकणातले...) विरळाच. सावंतवाडी साईडला याला करदी म्हणतात. जागू ने सांगितलेली रेसिपी पाणी न घालता कैरी टाकून अगदी तोंपासू होतं. मी छोटा बटाटाही घालते, फारशी चव नाही बदलत कारण बटाट्याला स्वतःची चव नसते, मर्ज होतो रश्श्यात. आणि पुरणागत शिजवला की रस्साही थिक होतो.

रच्याकने, कोणी हे सुक्या करंदीचे सारण असलेले समोसे किंवा भजी केलेय का?