पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20

या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फ्रोझन भेंडी आधी पाकिटात राहू देऊन नळाच्या पाण्याखाली थॉ करायची. नंतर पेपरटॉवेलवर पसरायची. तासभर तरी तशीच पसरून ठेवायची. नंतर यावर आमचूर पावडर, मीठ, तिखट, हळद घालायचं. यातलं काहीही भेंड्यांबरोबर न मिसळता, तेलाचा हात लावलेल्या ट्रेवर पसरून, ओव्हनमधे ३५० डीग्री फॅ. वर ६-८ मिनिटं बेक करायचं. चिकटपणा निघून जातो. त्यानंतर पसरट भांड्यात तेल गरम करून त्यात चिंचेचं बुटुक किंवा एखादं कोकम घालून भेंड्या घालायच्या. फार परतायचं नाही. हवा तो मसाला घालून शिजवायचं. झकास अ-बुळबुळीत भाजी होते.

अश्विनीमामी, कशा आहात?? तुमच्या फोनची वाट पाहून तुमची भाची थकून गेली. मी बुधवारी तुम्हाला क्लिकचा गेस देते.
मंगळ्वारी मी हे. वरुन निघेन तो सिंलेडर घेवून. मला आपल्या हे. मा.बो. नीलमताईने सिंगल गेसची शेगडी दिली आहे आणि माझ्या ओनर अंकलने इंन्डेनचे दोन सिंलेडर दिले, त्यामूळे माझा क्लिकचा ५ किलोचा गेस सिंलेडर पडून आहे आणि तुम्हाला उपयोगी येईल.

अमा, तुला माहित असेलच पण गॅस कनेक्शन मिळेतो पाणी उकळायची इलेक्ट्रिक केटल सगळ्याला भारी पडते. Happy

मला "काविळ" झालेल्या पेशंटसाठी काही पदार्थ सुचवाल का?
खुप दिवसांनी माबोवर आलेय, कदाचित जागा चुकली असेल तर माफ करा. Happy

लोणी काढलेले ताक, पालेभाजी, राजगिरा, मुगडाळीची खिचडी, उस (रस नव्हे)
देतात. केळी पण देतात.
खास करुन आमसूलाची / कोकमाची चटणी देतात. त्यासाठी कोकमे, साखर, वेलची
दाणे, मीठ आणि एखादाच मिरीदाणा वाटायचा.
हे सर्व अर्थातच डॉक्टरांच्या सल्ल्याने.

वर्षा११,

तांदूळ + मूगडाळ एकत्र शिजवून भात - दूध - मीठ
लिंबाचे सरबत.
खजूर, बदाम.
आवळा रस.

(डॉ च्या सल्ल्याने घेणे)

धन्यवाद दिनेशदा, ईरा. Happy
लेकीला झाली आहे काविळ आणि तिला नॉनव्हेज शिवाय जेवताच येत नाही.
तिला रोज रोज काय करुन घालू हा मोठा गहन प्रश्न पडतो मला.
डॉ. म्हणतात तेल, तुप आणि नॉनव्हेज बंद कर. ते तर बंद केलेच आहे.
तिला विचारले की तू काय खाणार आहेस जेवताना? (म्हणजे भाकरी की फुलका)
तर मला उत्तर मिलाले की, "मी मागितलेले तर देणार नाहिएस ना मग दे तुला काय हवे ते" Happy

नारळपाणी, लेमन-बार्ली सरबत, व्हेज सुप चालु केले आहे.
आता अशी आमसुलाची चटणी करुन ठेवते.

>> मला "काविळ" झालेल्या पेशंटसाठी काही पदार्थ सुचवाल का>> भोपळ्याची भाजी आणि तेल, तूप न लावलेले फुलके, ताक, भात. आम्हांला (मला व बहिणीला) काविळ झालेली तेव्हा डॉकनी हेच सांगितलं होतं. बरोबर LIV ५२ च्या गोळ्या.
तुमच्या डॉकच्या सल्ल्याने द्यावे.

मृदुला एक मस्त पदार्थ सुचवते. कॉर्न भेळ.. करायला ही सोपी आणि फारसे कष्ट नाहीत.. परत एकदम वेगळ.
ट्राय धिस..

३ वाट्या कॉर्नचे दाणे वाफवुन
३ वाट्या मोड आलेले मुग वाफवुन
३ कांदे बारिक चिरुन
लाल,पिवळी आणि हिरवी भोपळी मिरची प्रत्येकी १ बारिक चिरुन
३ गाजर किसुन
३ टोमॅटो बारिक चिरुन
१-१+/२ कोथिंबीर बारिक चिरुन
बारीक चिरलेली मिरची.. चवीनुसार
१+१/२ चमचा जिरे खमंग भाजुन+१ चमचा काळ मीठ एकत्र करुन घ्यावे
१+१/२ चमचा पाणीपुरी मसाला.

डेकोरेशन साठी: चिंगु चटणी (असल्यास) , जिरेपुड, पाणीपुरी मसाला, डाळींबाचे दाणे ,आणि बटाटाची लाल सळी( "डाएट फुड" लोकाना नको.)

वरिल सर्व साहित्य आयत्यावेळेस एकत्र करुन त्यावर चिंगु चटणी , जिरेपुड, पाणीपुरी मसाला,डाळींबाचे दाणे , आणि बटाटाची लाल सळी घालुन खायला द्यावे.

नवलकोल नावाची एक भाजी पहिल्यांदाच आणली आहे. तिची सालं काढुन, किसुन, मुग डाळ घालुन भाजी करायची असं भाजीवालीनी सांगितलं होतं. पण आता किसल्यावर तिचा जरा विचित्र उग्र वास वाटतो आहे. भाजी सोडुन याचा दुसरा काही पदार्थ करता येइल का? काही तरी साइड डिश, यम्मी आणि फॅन्सी. घरातल्यांना खायला घालायचंच असेल तर असंच काही बनवावं लागेल.

मला प्लीज लवकर सांगा. कारण भाजी किसुन पडली आहे ती वाया जाइल.

माऊ, किसलेल्या नवलकोलचे पाणी काढून बघ जरा म्हणजे त्याचा उग्रपणा कमी होईल. मग भाजी कर.
याच्याच आपण कोबीच्या वड्या करतो तश्या वड्या पण करु शकतेस.

अंजली, थँक्स. असंच वड्या वगैरे काही हवं होतं. कोबीच्या वड्या सांग ना कशा करायच्या. वेळ नसेल तर थोडक्यात सांगितल्यास तरी चालेल. मुख्य रेसिपी कळली तर चव वाढवण्यासाठी बाकी छोट्या छोट्या गोष्टी वाढवेन मी त्यात.

एव्हाना तुझ्या नवलकोलचं पाणी पाणी झालं असेल Proud

आपण नेहेमी कोथिंबिरीच्या वड्या करतो ना तशीच कृती आहे. त्या किसलेल्या नवलकोलातच (पाणी काढलेल्या) डाळीच पिठ, थोडसं आलं मिरची मीठ, थोडं लाल तिखट घालून जरुरीपुरतं पाणी घालून भिजवायचं ,कडकडीत मोहन घालून शिट्टी काढून उकडून घे. थंड झाल्यावर वड्या पाडून परतून घे.

म्ने तशिच कापुन खा. णावाऴ्ऑळ्बSorry mob warun type karaych mhanje traas
You can eat that as a Salad...kahich lawu nakos saal kadh char tukde kar...pan tyachi ek bhaji majhi aai Karaychi Kamlabai ogle ya chya pustakawarun....I think chaukoni Kapun aani tyaala ola khobara etc lawun....ruchira aahe ka kunakade tyaat aahe navalkolachi bhaji...my opinion just eat it .....tasach changle lagte ...:)

मनिमाऊ, जुन्या हितगुजवर आहेत काही पाकृ. मागच्या पानावर बहुतेक मीच विचारलं होतं तेव्हा लिंका दिलेल्या होत्या कुणीकुणी.

मनिमाऊ...नवलकोलचा कीस कर रताळ्याचा करतो तसाच. दाण्याचे कुट , हीरवी मीरची वगरे घालुन. एकदम मस्त लागतो नवलकोलचा कीस .

थॅंक्स सगळ्या जणींना. मी आ आणि पा मधे जावुन सर्च केलं तर जुन्या माबोवर नवलकोलची फक्त भाजी मिळाली. पण मला भाजी नकोच होती, म्हणुन अंदाजाने वड्या केल्या. फार ग्रेट झाल्या नाहीत, पण नवलकोल खावुन संपला. वाया तरी गेला नाही. पाकृ साधारन अंजलीने लिहिली तशीच. फक्त उकडुन परतल्या तेव्हा तुकडे तुटले. पण एकुणात बरं लागलं.

मिक्स डाळींचे दहीवडे आणि तेही न तळता अशी पाककृती मिळू शकेल का?

नव्या मायबोलीत मेदूवडे मिळाले पण सविस्तर दहीवडे कुठे मिळाले नाहीत.

शर्मिला, non fried dahi vada गूगल कर. तरला दलालची पाकृ आहे. तशीच कुठेतरी मिश्र डाळींची पण कृती मिळेल.

शर्मिला फडके, इडलीचा दहीवडा बनवू शकता. इडलीमध्ये साखर घातलेल दही, चिंचेची गोड च्टणी, चाट मसाला घाला.

ओके मंजू. तरला दलालची साईट बघते. आर- मिक्स डाळीच्या इडल्या (लहान, आप्प्याच्या आकाराच्या) असंच काहीतरी करायचं आहे. बघते. थॅन्क्स.

आहार आणि पाककृती विभागाकरता एक वेगळा सर्च ठेवायला हवाय. विषयवार यादीतल्या प्रत्येक उपविषयांतर्गतही किती पान उलटावी लागतात Uhoh मुख्य सर्चवर बरेचदा तो शब्द असलेल्या मायबोलीवरच्या चर्चांच्याच लिन्क्स येतात आणि आवश्यक ती रेसिपी नसतेच त्यात. उदा. 'दहीवडा' सर्चला एनजेच्या जिटीजीच्या, किंवा मी दहीवडा आणते वगैरेच्याच सगळ्या लिन्क्स. प्रचंड वेळ जातो शोधाशोध करण्यात. खरं तर इथे विचारुन दुसर्‍या कुणाला आपल्या कामाला लावणं जीवावर येतं पण पटकन काही हवं असलं तर नाईलाजच होतो. मिनोतीचा ब्लॉगही हल्ली खूप स्लो झालाय आणि तिथेही खूपच गर्दी झालीय. नाहीतर तो हमखास मदतीला यायचा.

sharmilaa, chakalichaa blog pan Changlaa aahe recipe sathi..

Chakali.blogspot.com

शर्मिला << आहार आणि पाककृती विभागाकरता एक वेगळा सर्च ठेवायला हवाय. विषयवार यादीतल्या प्रत्येक उपविषयांतर्गतही किती पान उलटावी लागतात>> +१
मीही २-३ दा सर्चे करायचा प्रयत्न केलाय पण हवं ते मिळ्तच नाही लवकर. Sad

आहार आणि पाककृती विभागाकरता एक वेगळा सर्च ठेवायला हवाय. विषयवार यादीतल्या प्रत्येक उपविषयांतर्गतही किती पान उलटावी लागतात>> +१
मीही २-३ दा सर्चे करायचा प्रयत्न केलाय पण हवं ते मिळ्तच नाही लवकरं<<+१'

होना एखादी गोष्ट शोधायला जावी तर बाकीच्या खुप खुप लिंका येतात ज्यात त्या पदार्थ्याचा नुसताच उल्लेख असतो. Sad कृतींसाठी वेगळा सर्च हवाच. Happy

Pages