अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक

Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00

तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?

उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "

या आधिचे सीन या दुव्यावर वाचा

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदाच पहाणार असशील तर फक्त 'गुंडा' पहा.तो अशक्य,एकमेवाद्वितीय,अद्वितिय,अदभुत,अल्टीमेट,वन्स इन अ लाईफ टाइम,मॅग्नम ओपस,मास्टरपीस आहे Proud

तो व्हिसिडी/डीव्हीडीवर पूर्ण ब्रेकविरहीतच बघायला मिळेल कारण कुठलाही चॅनल हा सिनेमा लावायचे धाडस करत नाही लावला तरी इतके कट्स आणि म्यूट्स करावे लागतील की त्यातली महत्वाची 'सौदर्यस्थळे' पहायला मिळ्णार नाहीत.

आदरणीय राष्ट्रसंत श्री. श्री. मनोज(भारत)कुमार यांचा कलियुग कि रामायण हा बोलपट कुणी सिनेमागॄहात जाऊन पाहिलाय का ? नसेल तर सध्या झी सिनेमाच्या सौजन्याने अधूनमधून हा चित्रपट सर्व परिवारासाठी दाखविण्यात येतो. झी च्या संस्थळावर जाऊन तो कधी दाखवणार आहेत याची माहीती करून घ्यावी आणि आपले नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यासमवेत या अनुबोधपटाचा लाभ घ्यावा ही विनंती..

अर्थात अर्थात वत्स! फक्त त्याचे नाव चुकलास बालका, ते 'कलियुग और रामायण' असे आहे.असो.
अत्यंत संस्कारक्षम असा हा सिनेमा,त्यातले महान कलाकार मनोजकुमार व महान नृत्यांगना श्रीमती हुमा खान यांचे एक उद्बोधक (या शब्दाची धकधकशी तुलना करु नये) नृत्य प्रशंसनीय आहे

काही दिवसा पूर्वी एक मिथुनपटाची झलक बघितली. 'मिलटरीराज'. यात मिथुन मिलिटरीवाला (आता हुद्दा आठवत नाही :))
खरं तर हा शीण बघण्या लायकच आहे वर्णन अपुरे आहे Happy
तर.. ३-४ गुंडांना पकडलेले आहे. मिथुन त्यांना बोलतं करायला त्यांच्या सेल मध्ये येतो. गुंड विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत नाही मग मिथुन उजव्या हाताची तर्जनी सरळ भिंतीत खुपसतो. भिंतीला भोक :अओ:. मग तो आपल्या टोपीतुन एक खिळा काढतो आणि त्या भोकात घालतो. मग आपली टोपी काढुन खिळ्याला अडकवतो आणि जास्त बडबड करणार्‍या गुंडाची मानगुट दोन बोटात पकडतो आणि तो गुंड तिथेच खलास ...

या देशात भक्तीशक्तीचे महत्त्व वादातीत आहे. आपल्या चित्रपटांनी देखील ते नेहमीच सांगितलेले आहे. उगीचच अचाट आणि अतर्क्य सीनच्या मागे लागून वेळ वाया घालवण्यापेक्षा विधायक असे काही दॄष्टीला पडावे या हेतूने पुढील दुवा इथे चिकटवत आहे.

http://www.youtube.com/watch?v=pujnrxJtohU&feature=PlayList&p=6A8418F1FF...

कॄपया पूर्ण संयम ठेवून संपूर्ण चित्रफीत पहावी... !

उदय चोप्रा, तुषार कपूर यांना घेऊन एक महत्वाकांक्षी चित्रपट काढावा म्हणतोय. सध्या कथा लिहीतोय. पूर्ण झाली कि देतोच..

यांच्या वडिलांच्या भूमिकेत चंकी पांडे आणि सुमीत सहगल यांना घ्यावे असा विचार आहे. विनोदाची बाजू शेखर सुमन सांभाळेल.. सोहा खान आणि इशा देओल या अभिनेत्री अभिनयाची बाजू सांभाळतील...
इतरही बरीच महत्त्वाची कामे आहेत सिनेमात...

येताय पुढे ??

किरण,

मी दिग्दर्शन करतो...
सर्वांना एका जहाजावर ठेऊ... आणि ते जहाज बर्म्युडा ट्रँगल मधे समुद्रात बुडतं असा वास्तववादी सीन शूट करू...

आणि सनी देओल मला पण आवडतो...त्याची टिंगल टवाळी केलेली खपवून घेणार नाही हं..

कभी खुशी कभी गम या सिनेमात नायक ( शाहरूख खान ) आईला भेटायला येतो. कार वगैरे सोडाच तो चक्क हेलिकॉप्टर ने येतो . ते हेलिकॉप्टर तो घराच्या अंगणात "पार्क" करून आईला भेटायला जातो..
त्यावर ती माऊली त्याला म्हणते...मुझे तो पताही नही चला तुम कब आये.

हेलिकॉप्टर घराच्या दारात उतरवूनही त्या माऊलीला जरासुद्धा चाहूल लागत नाही... कसं ना ?

हेलिकॉप्टर घराच्या दारात उतरवूनही त्या माऊलीला जरासुद्धा चाहूल लागत नाही... कसं ना ?
हो, तिला फक्त त्यानं घरात पाउल ठेवलेलं तेवढंच कळतं... Proud कसं ना.. ?

खरंय ग ..
असं तल्लीन होऊन देवपूजा करायला सात पिढ्यांचं पुण्य लागतं... आम्हा पामरांना हेलिकॉप्टरचा आवाज एक किलोमीटरपर्यंतही सहन होत नाही....

हो, तिला फक्त त्यानं घरात पाउल ठेवलेलं तेवढंच कळतं...>>>>> नाही हो. तिच्या coverage area त आलं की तिला कळत.. नंतरपण त्याने mall मधे पाय ठेवल्यावर लगेच कळतं माऊलीला.. Proud

तिच्या coverage area त आलं की तिला कळत.>>
म्हणजे SRK सेल फोन आणि ती बया tower असा भन्नाट sci-fi सिनेमा भारतात बनतो आणि तुम्ही त्याला नावे ठेवता?

अरे इतके कष्ट घेऊन काही संस्कारक्षम चित्रफिती इथे चिकटवल्या..त्याबद्दल काही टंकायचे काही सौजन्य आहे कि नाही ?

किरनराव एक डाव मापी असावी आमच्या गधड्या नेटवर्क अ‍ॅडमिनने तुनळीवर बंदी घातली आहे, अशा मुळेच तरुण पिढीवर संस्कार होत नाहीत Uhoh

एका सिनेमात अमरीश पुरी देवीची पूजा करताना दाखवले आहेत.. आपल्या पापांचा पाढा देवीपुढे वाचताना ते देवीलाच " हे मां.. ये तुम मुझसे क्या करवा रही हो" असा एक निरागस प्रश्न विचारतात.. पुढे कुणी तरी कुणाला तरी त्याचवेळी पकडून आणतो. त्याच्यावर अमरीश पुरी यांची खप्पा मर्जी झालेली असते..
अमरीशजी देवीला पुन्हा टाहो फोडून प्रश्न विचारतात
"हे मा..और कितने जुल्म करवाओगी इस भक्त से " असे म्हणत ते कुठलेसे एक धारदार शस्त्र उचलतात आणि त्या बिचा-या माणसाचे शीर धडावेगळे होते...

अमरीशजींवर अन्याय होत असलेला हा अचाट सीन बहुधा कोयला या सिनेमातला असावा...

बापरे! भन्नाट आहे हा बाफ! कुठकुठल्या सीन ची, ते काढणार्‍यांची, अ‍ॅक्टिंग करणार्‍यांची- आणि त्यावर इथे लिहिणार्‍यांची नावं घेऊ असं झालं!
खूप हसलेय.
किरण तुझ्या चित्रफितीपण बघितल्या.. त्यातली सुपरमॅन वाली भारीच होती एकदम!

एकदाच पहाणार असशील तर फक्त 'गुंडा' पहा.तो अशक्य,एकमेवाद्वितीय,अद्वितिय,अदभुत,अल्टीमेट,वन्स इन अ लाईफ टाइम,मॅग्नम ओपस,मास्टरपीस आहे >>
गुंडाला निर्विवादपणे competition नाही. पण त्याच श्रेणीतील "लोहा" सिनेमा बघितलाय का कुणी?

अनेक सीन आहेत, उदा., धर्म्नेद्र दोरीन हेलिकोप्टर खाली आणतो, दोन जीप वर उभे राहुन वीलन चा पाठ्लाग करतो. आणी गुंड जेन्व्हा त्याला बंदुकीतुन गोळी मारतो तेन्व्हा ती हाताने पकडतो आणी दाताने चावुन चपटी करतो, मग डायलाग "तुम्हारे बंदुक की ये गोली लोहे जैसे शरीर का कुच नही बिगाड सकती"

परवा हिंदुस्थान की कसम सिनेमा होता कुठे तरी. त्याचा फक्त क्लायमॅक्स च पहायला मिळाला. अशक्य होता! दोन हेलिकॉप्टर्स, एक विमान (सर्व हवेत ) यामधे लोक माकडासारखे उड्या मारून इकडून तिकडे जात होते आणि ट्रेनच्या टपावर मारामारी करतात तसे विमानावर मारामार्‍या पण करत होते!! विमानाच्या खिडक्या , दारे, विंड्शिल्ड सगळे उघडेच तोवर !! Lol

साऊथमधे गाजलेले चित्रपट, आपल्याला भयाण वाटू शकतात. कमला हसनचा, महानदी नावाचा एक सिनेमा, एका दाक्षिणात्य मित्राच्या आग्रहावरुन बघितला. त्यात एका प्रसंगात, गुंड कमला हासन च्या हाताचा आधार घेऊन गच्चीवरुन लोंबकळत असतो. आपला हिरो एक कोयता घेतो, आणि हातच कि कापून टाकतो. आता म्हणाल यात अ अ ते काय, तर तो स्वतःचा हात कापतो, (गुंडाचा नाही ) आणि पुढे सिनेमाभर थोट्या हाताने वावरतो !!!

तो स्वतःचा हात कापतो, (गुंडाचा नाही ) आणि पुढे सिनेमाभर थोट्या हाताने वावरतो !!!>>>
दिनेशदा, अशक्य! आणि हे सिनेमे साऊथ मध्ये गाजतात? Uhoh

अमरीशजींवर अन्याय होत असलेला हा अचाट सीन बहुधा कोयला या सिनेमातला असावा...>>>
नाही त्या सिनेमाचे नाव 'दिव्यशक्ती' असे आहे. त्यात अजय देवगण पण आहे.
लोहाबद्द्ल मत एकदम मान्य इट इज इन द सेम लीग ऑफ गुंडा.फक्त गुंडाचे संवाद जास्त 'पोएटीक' आहेत!

Pages