अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक

Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00

तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?

उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "

या आधिचे सीन या दुव्यावर वाचा

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'हा कोण बुवा नवीन गूंड' Lol
जे मरण्यासारखे होते ते मरून पडदा पडला एकदाचा Lol

मलाही वाचून फरिश्तेच वाटला होता, पण नक्की माहीत नव्हते कारण बघितला नाही कधी (अजून) तो. यातच डायरेक्ट हवेतून तरंगत खाली उतरत एन्ट्र्या आहेत धरम वगैरेंच्या असे ऐकले होते.

पण मरताना देखील शानसे मरतो बर.>>>
गिरफ्तार मधे सुद्धा मरताना एक शेवटची सिगरेट पेटवतो आणि एक झुरका घेऊन मरतो.

यातच डायरेक्ट हवेतून तरंगत खाली उतरत एन्ट्र्या आहेत धरम वगैरेंच्या असे ऐकले होते.
<<<<<<<
असणारच. 'फरिश्ते' आसमान से आते है.... Proud
~~~~~~~~~~~~~~~~~~~
'माता' रिटर्न्स.

अरे हो ते लक्षातच आले नाही. अशा चित्रपटात नावाप्रमाणे काही असेल असे वाटतच नाही Happy

अरे कोणीतरी जिम्मी बघा आणि लिहा रे.

कालच 'ओम जय जगदीश' ची सुरूवात बघितली. रस्त्याच्या डाव्या बाजूने जाणार्‍या गाड्या असलेले अटलांटा शहर बघून जॉर्जिया (हे शहर ज्या राज्यात आहे ते अमेरिकेतील राज्य व याच नावाचा पूर्वीच्या रशियातील देश) प्रमाणे अटलांटाही दोन आहेत की काय असे वाटले Happy

हिंदी सिनेमांतली बाँबस्फोटाची विनोदी दृश्ये:
खलनायक वगैरे मंडळी हिरो हिरॉईन मरावेत, म्हणून योग्य त्या क्षमतेचे बाँब लावतात. तो चुकून या खलनायक मंडळींजवळच फुटतो. पण त्यांचा जीव न जाता फक्त हातपाय आणि तोंड काळे होऊन, कपडे चिंध्या होऊन ते आपल्या पायाने चालत चालत जातात.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
'माता' रिटर्न्स.

टॉम अँड जेरि ची थिम आहे गं ती, हे लोक एक्दम सेम टु सेम कॉपि करतात.

पण त्यांचा जीव न जाता फक्त हातपाय आणि तोंड काळे होऊन, कपडे चिंध्या होऊन ते आपल्या पायाने चालत चालत जातात>>>>>>>>.
ये अंदाज अपना अपना असेल तर सोडून दे हा. Happy

.............................................................
Marriage is a relationship in which one person is always right and the other is husband! Sad Proud

आणि मी तर कोणत्या तरी पिक्चर मधे पाहिलंय की त्या सनी देओल च्या छाताडावर ३-४ गोळ्या लागूनही तो चालत चालत एकदम जुनून (:फिदी:) मधे वगैरे अमरीश पुरी कडे जात असतो आणि हातात बंदूक असूनही अ.पु. एकदम त्याला घाबरून उलट्या दिशेने जीव खाऊन पळायला लागतो. तरी हा रक्तबंबाळ चालत चालत त्याच्यापर्यंत पोचतो आणि अ.पु.च्याच पिस्तुलाने एका गोळीत त्याला ठार करतो! वा.. वा वाह!! Proud
Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
क्या मौसम आया है क्या मौसम आया है
गीत गाए नदीया बूँदो मे है सरगम..!!

>>अ.पु.च्याच पिस्तुलाने एका गोळीत त्याला ठार करतो!

कॉस्ट कटींग असेल ग Proud

रा. गो. व. चा नवीन सिनेमा येतोय -
फूंक
|
ज्याच्या साठी त्यानी एक चॅलेंज ठेवलय....
जो कोणी (माई का लाल; फिल्लमबाज) हा सिनेमा थेटर मधे एकटा बसून सुरुवातीपासून - शेवटपर्यंत पाहील (सहनशक्ती ची कमाल मर्यादा दाखवेल) त्याला पाच लाख रुपये ईनाम देण्यात येईल......
रामू च्या मते हा सिनेमा अत्यंत भितीदायक असल्या कारणामुळे हे धाडस करण्यास कोणी धजावणार नाही...
(त्याला अजून हे पटत कसं नाही की त्याचे सिनेमे अत्यंत वाईट असल्यामुळे कोणी बघत नाही... भितीदायक असतात म्हणून नव्हे...)
(किंवा कदाचित हा त्याच अखेरचा प्रयत्न असेल... पाच लाख देतो... पण सिनेमा बघा....)

कापसाचे बोळे घालायचे आणी मस्त डुलकी काढायची

अरे काय हे....
पाच लाख कमवण्याचं गुपित असं फोडायचं नसतं.....

थेटरात तो बहुधा स्वतःची ( मंतरलेली ) पात्रं पेरून ठेविल. अंतरा माळि, निशब्द मधलि ती झपाटलेली टाइप नायिका, डि मधला हिरो, जेम्स मधले नायक नायिका. मग कोण माइका लाल धाडस करेल बरं?

ही गँग असेल तर चित्रपटात भीतीदायक कथा वेगळी टाकायलाच नको Proud फक्त रणदीप हूडा जरा बरा आहे. मॉन्सून वेडिंग मधे बरा वाटला होता.

जेम्स मधले नायक नायिका.>>>>>>>.
अरारा. स्वप्नात देखील नकोत रे देवा ५ लाख. Happy
.............................................................
Marriage is a relationship in which one person is always right and the other is husband! Sad Proud

माते इकडे क्यों नही आते ??
****************************
जसे वाजती नुपुर सुखाचे ...

त्या दर्जेदार नृत्यानंतर हे नृत्य आणि गायनही पहा/ ऐका लोक्स.

बापरे बाप. कुठे मिळ्तात तुम्हाला ह्याच्या लिन्क्स

काल झी म्युझिक वर 'लव्ह' नावाचा सिनेमा अर्धवट पाहीला.. ज्या काळी तो चित्रपट प्रदर्शित झाला होता तो म्हणजे 'भारावून' जाण्याचा काळ होता. गाणी म्हणजे जीव की प्राण, पण काल पहाताना अ.आ. वाटला.
१. रिटा भादुरी स्वतःच्या तरण्याताठ्या मुलीला एका गुंडाच्या हाती सोपवून देते, वर तिला बजाज बंगल्यावरून लोणावळ्याला घेऊन जा म्हणून सांगते. एका गुंडावर इतका विश्वास?
२. रेवतीला पोटाला काच लागून मोठी जखम होते. दवाखान्यात सलमान गाण्याच्या स्पर्धेहून परत येतो, रेवती इन्ट्राकॅथ मध्ये लावलेल्या सुया उपसून काढते. उपसून? :अओ:?
३. रेवती मरते, ७-८ वेळा तिला शॉक देऊन तिचे हृदय सुरू करण्याचा प्रयत्न केला जातो, पण काही उपयोग होत नाही, रडारडी सुरू असते, तरिही ऑपरेशन थिएटरमधला एक असिस्टंट रेवतीला प्रामाणिकपणे अंबूस बॅगने कृत्रिम श्वासोच्छवास देतच राहतो. सलमान तिच्या पोटावर जोरजोरात दाब देऊन तिला ऊठ ऊठ म्हणतो, पोटाला काच लागून तिला मोठ्ठी जखम झालेली असते हे तो विसरतो कि काय? Uhoh आणि काय आश्चर्य रेवती चक्क जिवंत. डॉक्टरांच्या शॉक पुढे सलमानचे गुद्देच तिला उपयोगी पडतात. Proud

सलमानने जखमेतून हात आत घालून हॄदय चालु केले असणार !! शिम्पल लॉजिक ... Happy

चित्र्पट-इन्स्पेक्ट्र इग्ल
संजिव्कुमार रक्त लाग्लेला रुमाल तपासणीला पाठवतो
दुसर्या दिवशि त्याचि महान सेक्रेट्रि सांग्ते- त्याचा ब्ल्डग्रुप 'सी' आहे
Lol Lol

त्याचा ब्ल्डग्रुप 'सी' आहे
>>>

त्याचा ब्लड ग्रुप 'शी:' असेल बघ! Happy

---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

तो तर या सिनेमाचा ग्रुप आहे!!

चित्रपट- यमराज
कलाकार- मिथुन (हे जाण्त्यांना ़कळलेच असेल!)
पुर्ण सिनेमात तो गमछा घालुन फिरतो. आणि एका सीनमधे डझनभर गुंडांना त्यानेच मारतो.मारामारि नंतर सर्वांच्या अंगावर मोठ्या जखमा दिसतात- आता गुंड्देखिल प्रेक्ष्कांसार्खेच गोंधळ्लेले Happy
स्र्वांच्या स्माधानासाठि मिथुन गमछ्याची आतलि बाजु दाखवतो-
आणी काय सांगावं ं महाराजा, तिथे अनेक ब्लेड्स टांग्लेलि असतात.
आता बोला Happy

>>त्याचा ब्ल्डग्रुप 'सी' आहे

Proud Lol

चित्रपट- मिलीट्री राज
कलाकार-मिथुन (आणखी कोण?)
लॉकअप मधे ठेवलेल्या गुंडांना मारायला मिथुन मोठी हॅट घालून येतो.आता त्यांना बडवण्याआधी ती हॅट कुठेतरी ठेवायला पाहिजे,यावर तो टिपीकल मिथुन मेथड वापरतो-
प्रथम तो बोटाने भिंतीमधे भोक पाडतो,
मग खिशातून खिळा काढुन त्या भोकात लावतो,आणि
त्या खिळ्याला टोपी लावतो.(यावर त्या गुंडांची रिअक्शन पाहाण्यासारखी आहे)
कशी काय पद्धत?:-P
*************************************************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

काल चुकून तूफान मधला एक सीन बघायला मिळाला.. आणि तो बघताना दुसरे काही नाही तर ह्या बाफचीच आठवण झाली....

अमिताभ बच्चन खाली घोड्यावर बसला आहे हातात एकदम भारी प्रकारचा धनुष्य-बाण घेऊन..
व्हिलन (नाव माहित नाही) एका विमानात बसून वरुन चालला आहे..
बच्चन खालून विमानाला बाण मारतो आणि विमानाबरोबर उडायला लागतो.. बाणाला एक दोरी असते तिला धरुनच तो हळू हळू वर सरकायला लागतो.. ते व्हिलनच्या बरोबर लक्षात येते. म्हणून तो एका लाथेत विमानाचे दार तोडतो आणि बच्चन खाली कुठे दिसतो आहे का ते बघायला लागतो.. त्याला काही नीट काही दिसत नाही.. तेवढ्यात त्याला एक दोरी दिसते म्हणून तो ती दोरी कापून टाकतो. बच्चन डारेक्ट खालती पडायला लागतो पण पडताना डोके वरच असते आणि सगळी शक्ती शाबूत असते. त्यामुळे तो हातातल्या धनुष्यातून अजुन एक बाण मारतो विमानाला. तो बाण बरोबर जिथे व्हिलन उभा असतो त्याचा पायतून आरपार जाऊन आदकतो. व्हिलन पाय सोडवायचा प्रयत्न बच्चन वर पर्यंत पोहोचलेला असतो आणि व्हिलनला मारायला वर विमानत चढतो.. तिथे तो व्हिलनला प्रश्न विचरतो, 'कहाँ हैं मेरा भाई?' आसे म्हणून डायरेक्ट व्हिलनला बडवायला सुरुवात करतो...

एवढाच सीन बघितल्यानंतर पुढचे काही बघावे अशी मन:स्थिती नसल्याने चॅनलच बदलला..
==================
अहिंसा....
जय जवान जय किसान....

Biggrin
>> 'कहाँ हैं मेरा भाई?' आसे म्हणून डायरेक्ट व्हिलनला बडवायला सुरुवात करतो...
एवढी उठाठेव करून विमानात जाऊन प्रश्न विचारल्यावर उत्तर ऐकण्यासाठी थोडी वाट तर बघायची. डायरेक्ट मारामारी ?

>> एकदम भारी प्रकारचा धनुष्य-बाण घेऊन
त्याला crossbow असे नाव आहे. crossbow म्हणजे काय असे मित्राला विचारल्यावर त्याने हे सांगितले होते
"तो एक छोटा धनुष्य-बाण असतो. तूफान पिक्चर मधे बच्चन कडे असतो तसा."

चित्रपटाद्वारे जनजागरण !!

Pages