अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक

Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00

तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?

उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "

या आधिचे सीन या दुव्यावर वाचा

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे सगळे वाचून मी धन्य झालो. हापिसात आज काम नव्हते तेव्हा सगळे च्या सगळे वाचून काढले. आणि माझ्या आसपास बसणाऱ्या लोकांना प्रश्न पडला "हा काल पर्यंत बरा होता अचानक ही ही ही ही का करत सुटला"?

थोडक्यात अप्रतीम Rofl

Rofl

मला नीट वर्णन करता येणार नाही, पण हा प्रसंग छोटा असला तरी अ.अ. वाटला.
मधे जानी राजकुमार चा कोणतातरी लागला होता सिनेमा. त्यात नेहमीप्रमाणे एका मुलीला काही गुंड त्रास देत होते. तर राकु. TV च्या पडद्याच्या उजवीकडे उभा असुन, डावीकडे शरीर व डोके करुन आणि त्याचवेळी तिरके कॅमेर्‍याकडे पाहुन 'एक लडकी को इतके सारी त्रास दे रहे हो?' वगैरे काहीतरी म्हणतो आणि त्यांना पिटायला हात उचलतो. पडद्यावर फक्त डावीकडे पहात असलेला closeup मधे राकु. व त्याचा हात. आता तो हात कॅमेर्‍याच्या दिशेने तरी मारणार अथवा डावीकडे त्यच्या समोर तरी मारणार असे वाटले (म्हणजे गुंडे त्याच्या समोर आहेत असे समजुन)........ तर...... एकदम कॅमेरा राकु. पासुन जरा लांब येतो आणि आपल्याला दिसते, गुंड त्याच्या पाठीला पाठ लावुन मुलीला त्रास देत आहेत व राकु. हात उचलतो, उजवीकडे वळतो आणि मग पिटायला सुरु करतो. म्हणजे हा पट्ठेबहाद्दर गुंडांच्या पाठीला पाठ लावुन उभारतो, डायलॉग मारतो व मग वळुन मारामारी सुरु करतो. ऑ!!!!!!!!!!

'एक लडकी को इतके सारी त्रास दे रहे हो?' >>>>>>>>>>>><
मला तर हे वाचुनच Biggrin
बाकी रा.कु च्या संदर्भात काहिही शक्य आहे

वीर पाहिला............ सलमान हिरॉईनला स्वयंवरात जिंकतो... आणि लगेच लढाईला सुरुवात होऊन मरतो.......... आणि लगेच त्या हिरीविनीला मुलगाही होतो ! Proud तोही सलमानच ! दुसरा भाग येणार.... Proud

पिक्चर लक्झरी बसमध्ये पाहिला, फुकट... फुकट मिळाला तरच बघा... Proud

आमच्या एका मित्राचे बाबा कुठल्याशा सरकारी विभागात होते. त्यांनी एकदा घरी प्रोजेक्टर आणि फिल्म आणली होती. आम्ही पण सिनेमा बघायला उड्या मारत गेलो तर पिक्चर होता खंडहर... ( बहुतेक नॅशनल फिल्म अ‍ॅकॅडमी ने एक एक पिंट अशा कार्यालयात दिली असेल )

चित्रपट पाहीला आणि नंतर मि.बा. नी सांगितल कि दोन रीळं उलटी लागली होती आता पुन्हा बघू.

आईशप्पथ सांगतो.. सरळ लावून पण काहीच फरक पडला नाही..

नटरंग पाहिला त्यात पहिलीच लावणी, 'आता वाजले की बारा' मधे पहिल्या अंतर्‍याच्या नंतर हार्मिनिअम व ढोलकीची जुगलबंदी आहे, आता सर्वाना माहित आहे कि लावणी म्हणजे ढोलकीच असायला पाहिजे.....पण त्या जुगल बंदीच्या वेळी चक्क तबला वाजविताना दाखविले आहे (पण ढोलकीच वाजते आहे हे स्पष्ट कळते,...... मग ढोलकीच दाखवायची ना.....तबला का दाखविला?) Uhoh लक्ष दिलयं का कुणी?

काल चाची चारसोबीस बघितला थोडासा. सीन थोडा असभ्य आहे. पण अगदी अ. अ. आहे.
जॉनी वॉकर टुन झालेले आहेत.

चाचीच्या वेषातील कमल हसन मुलीला कडेवर घेउन म्हणतो तुला काय हवे ते घे. ती म्हणते माझ्याबाबांकडे तर पैसे नाहीत ना. तो म्हणतो, ( कंबर चाचपत) शॉर्टसमध्ये खूप पैसे आहेत. ती पळून जाते कुठेतरी दुकानातच. जॉनी कमल ला पक्षी चाचीला बघतो. पैसे मागायला येतो. चाची म्हणते पैसे नाहीत. म्हण्जे आहेत पण ते शॉर्टस मध्ये आहेत. जॉनी लगेच ते काढावेत का असा विचार करतो. चाची विरोध करते. जॉनी तिला म्हण्तो मग वर कुठे चेंज लपविली असशील तर दे की. हा प्रकार बघत असलेला अमरिश पुरी येऊन त्याला रागावतो व ५०० रु. देतो. तो गायब.

भारतीयांच्या पैसे ठेवण्याच्या सवयी लक्षात घेतल्या तर हा सीन अफलातून आहे. ह्हपुवा. आजिबात वल्गर नाही.

किरण Biggrin

असंच एकदा टिव्ही वर धर्मेंद्रचं गाणं लागलं होतं. चित्रपट कोणता होता माहीत नाही, मी गाणं ही फक्त दिड एक मिनिट पाहिलं. पण जे पाहीलं ते भन्नाट होतं. धरमेंद्र गाणं म्हणत गाडी (दुचाकी) चालवत अस्तो. मध्येच त्या गाडीचं पुढचं चाक निसटुन पुढं जायला लागतं... Uhoh आणि धरमेंद्र त्या कडे पाहत गाणं म्हणत म्हणत त्याच्या मागे (गाडीवरच). नंतर तो कुठुनसा रिंगपाना काढतो नि वाकुन (गाडिवर बसुनच) पुढचं चाक जवळ ओढुन घेउन पटकन गाडीला फिट करतो... Uhoh

एवढं अ.अ. बघायची सवय नाही हो... Sad मी लगेचच टि.व्ही. बंद केला...

सरळ लावून पण काहीच फरक पडला नाही.. >>> Lol

किरण तू बर्‍याच लिन्क्स दिलेल्या दिसत आहेत, बघायला पाहिजेत.

मामी, हा शॉट लक्षात नाही. त्या स्वयपाकासाठी ठेवलेल्या कमल हसनच्या मित्राला तो चाची नसून क.ह. आहे कळते तो मात्र भंगार शॉट वाटला होता. बाकी जवळजवळ सर्व शॉट मधे कमल हसन चे मॅनरिजम जबरी आहेत. साडी नेसून मोटरसायकल वर बसतो तो माझा सर्वात आवडता.

फारेन्ड अनुमोदन. सारा विषयच आपल्याकडे एका वेगळ्या पद्धतीने हाताळला जातो. मिसेस डाऊट फायर सारखे फिनिश नाही. गोविन्दाचा सिनेमा तर आम्ही बघतच नाही या सेम विषयावरील. very declasse.

चित्रपट पाहीला आणि नंतर मि.बा. नी सांगितल कि दोन रीळं उलटी लागली होती आता पुन्हा बघू.>>> मी सलामे इश्कची दुसरी सीडी आधी लावली होती. सुमारे ४५ मिनिटे पाहिल्यावर समजलं.. मग परत अख्खा पिक्चर पाहावा लागला. नंतर माबोवर लिहिताना कुणाची जोडी कोण तेच आठवेना. परत सीडी लावून पिक्चर पाहत पाहत कागद पेनाने लिहून काढलं Happy

परत सीडी लावून पिक्चर पाहत पाहत कागद पेनाने लिहून काढलं>>> धन्य धन्य!!! सलामे इश्क पाहताना गेल्या आठवड्यात कधीतरी पहायाला सुरुवात केली होती असं वाटतं.

चित्रपट पाहीला आणि नंतर मि.बा. नी सांगितल कि दोन रीळं उलटी लागली होती आता पुन्हा बघू.>>> मी सलामे इश्कची दुसरी सीडी आधी लावली होती. सुमारे ४५ मिनिटे पाहिल्यावर समजलं.. मग परत अख्खा पिक्चर पाहावा लागला. नंतर माबोवर लिहिताना कुणाची जोडी कोण तेच आठवेना. परत सीडी लावून पिक्चर पाहत पाहत कागद पेनाने लिहून काढलं>>>>> नंदु, हा वेंधळेपणाचा किस्सा म्हणुन टाक Happy

मी माया मेमसाब असा उलटा पाहिला होता. सिनेमा इटसेल्फ थोडा वेगळा असल्याने सुरवात हिच असावी असं वाटलं होतं.. मग पहिली सिडी नंतर लावली..
पण कसाही पाहिला तरी सिनेमा सेमच..:फिदी:

सलाम ए इष्क...

४ तासांचा फर्स्ट डे फर्स्ट शो @ लक्ष्मीनारायण = २६ जानेवारी ची सुट्टी वाया...

मला 'पक पक पकाक' हा चित्रपट पण अतिच वाटला, म्हणजे त्यात विषय बरा हाताळला आहे. जो संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा आहे तो पण व्यवस्थित पोहोचला, पण कुठे तरी असं वाटतं की दिग्दर्शक दिग्दर्शन करता......करता...... कुणी तरी येऊन सांगितले असेल..."सर तीन तास संपत आले संपवणार कधी?" हे ऐकल्यावर दिग्दर्शकाने नाना पाटेकरांना जंगलातुन उचलुन गावात आपटले आणि धाडकन चित्रपट संपविला
माझ्या म्हणण्याचा हेतु असा आहे की, भुत्या म्हनजे काय हे गावकर्‍यांना कळलेच नाही व त्याची भिती कायमच मनात राहिली, गावकर्‍याना नाना पाटेकरांच्या कार्याची ओळख झाली असती, वनसंरक्षणाचे महत्व कळले असते, भुत्याबद्दलचे गैरसमझ दुर झाले असते, मग गावकर्‍यांनी त्याना नविन डॉक्टर म्हणुन जंगलातुन गावात आणले असते आणि मग चित्रपटाचा शेवट केला असता तर बरं वाटलं असतं.
पण सस्पेन्स दाखवायच्या नादात सपशेल पडला. (असो ......नाना पाटेकर आणि चिकल्याचं काम फक्कड)

पक पक पकाक बद्दल सहमत

बाकी सर्वांच्या लिखाणाला दाद द्यावीशी वाटतेय..
ह. ह.पु. वा.
( अधूनमधून वाचलंय....)

विश्वजीत चा साबणी चेहरा
भारतभूषण चा धार्मिक रोमान्स
समग्र तुषार कपूर

आई आई गं........... बेक्कार हसतेय मी इथे एकटीच............

असा काही धागा आहे, हे माहीतच नव्हतं मला इतके दिवस.......... Happy

मागे कुठल्यातरी साऊथ इंडीयन सिनेमामधील एक प्रसंग मेल मधून सीनचे pics sequence नुसार देऊन विनोदी पद्धतीने रंगवून सांगितला होता. एक हीरोला खुर्चीला बांधून ठेवलेले असते आणि त्याचा भाऊ की कोण त्याच खोलीत २ खांबांना बांधलेल्या अवस्थेत उभा असतो आणि त्याच्या शरीराला बाँब अटॅच केलेला असतो. बाँब चा टाईमर लावून गुंड निघून जातात. तर हा आपला अ. आणि अ. हीरो खुर्चीसकट स्वतःला खाली झोकून देतो आणि एक पिस्तुलाची गोळी झाडल्यानंतर जे आवरण खाली पडते (का असेच काहीतरी) ते तोंडाने महत्प्रयासाने (????? हा सीन खूप भारी आहे.) उचलून ते फुंकतो आणि बाँब च्या टाईमर चे बटन ऑफ करतो........... भले शाब्बास............. Happy

कुणाकडे हा मेल आहे का? तो सिनेमा आणि त्या हेरो चे नाव काये कुणाला काही idea? एक स्वतन्त्र धागा प्रकाशचित्र मध्ये चालू करा त्यातल्या images देऊन!!! Wink

SRK च्या ओम शांती ओम मधला "येन्न रास्कला ...माईंड इट्...." वाला सीन पण खूप आवडतो........ जाम ह.ह.पु.वा. होते. काही लॉजिक तरी आहे का त्या सीन ला....... ??? Rofl

त्याची आख्खी मेल आहे माझ्याकडे!

मला पाठव ना गं तो मेल........ मी संपर्कातून तुला माझा ऑफिसचा मेल आयडी सेंडते.

अवांतरः तू "ती मेल" म्हणतेस का? मी तरी "तो मेल" म्हणते.... Happy

सर्वात अचाट सिनेमा म्हणजे अनिल कपूरचा 'नायक' ......त्या सिनेमा बद्द्ल जितके बोलावे तितके कमी, .....
१) काय ते डबल डेकर वरुन पडने आणि माकडालाही लाजविल असे सरसर वर चढणे,
२) एका दिवसात एवढा कर जमा करणे, (कधी सरकारी कर्यालयात गेले नाहीत वाटतं?)
३) त्या मारामारी पुर्वी तो एका गुंडाच्या घरी जातो व तिथे त्यांची मारामारी सुरु होते ते पण सर्वांसमोर, कधी या पत्र्यावर आपट कधी टायरवर आपट्.......हा मुख्यमंत्री,.. होय ना, मग तो गुंड याच्यावर हात उचलतो तेव्हा पोलिस, सुरक्षा रक्षक काय गांजा पिउन झोपले होते काय.........
४) एका ड्रायव्हर आणि विदयार्थ्याच्या भांडणात अख्ख्या शहराची ट्राफिक जाम?
५) अनिल कपुर रिक्षातुन जाताना हल्ला होतो तेव्हा अख्ख्या शहरात एकच रिक्षा........ बर पेट्रोल पंपाजवळच घाव इतका जोरात पडतो डोक्यात कि तिथेच अर्धमेला होतो....पण नंतर गुंडांवर अक्षरश: गाडया उचलुन फेकतो.(मला वाटतं पेट्रोल पोटात गेलं असेल तेव्हाच एनर्जी आली)
...... बाकिचं पुढे आठवेल तसे सांगेनच.......

Lol नायक अचाट चित्रपट होता, पण बघताना मजा आली. थिएटरमध्ये अनिल कपूर मुख्यमंत्री झाल्यावर काही सीन्स झाल्यावर नुसत्या शिट्ट्या-टाळ्या होत्या.

Pages