अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक

Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00

तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?

उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "

या आधिचे सीन या दुव्यावर वाचा

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy बापरे ! तुम्ही लोक पूनम झंवर अशा नावाच्या नायिकांबद्दलही एव्हढी माहिती ठेवता? ग्रेट आहात!
अनू, मस्त गाणंय. कसला भारी आहे तो हिरो. आणि मागचा चंद्र बघितला का...? अगदी लहान मुलांच्या 'प्रोजेक्ट' मधे करतो ना आपण तस्सा आहे बघा...वाटोळा, शुभ्र!!!
पण इवा उवा तुळतुळ ची सर कशालाच नाही !!! कोण गीतकार आहे त्याचा..? कळेल का?

कल चौधरी कि रात थी..आपल हे चौधवी..
कम खत्तम आहे तो हिरो...सतत हसत राहायचं हा गुरुमंत्र दिला होता वाटतं त्याला कोणतरी..अन ती बया हसताना लिपिश्टीक मोडल माझं अस तोंड करुन हसतीए...

मुळात इतके सुंदर रोमान्स सीन्स करताना हिरो टूथपेस्ट जाहिरातीसारखे सतत दात काढतोय आणि त्याच्या अंगावर सेल्स मीटिंग चे प्रेझेंटेशन सादर करत असल्यासारखे डबल ब्रेस्टेड फॉर्मल सूट आहेत ही कल्पनाच पुरेशी रीफ्रेशिंग आहे Happy
याचा कट जियाला कट म्हणून गाजला होता बराच.हा संजय दत्त कट पेक्षा थोडा वेगळा आहे.

कट म्हणजे केसांचा का? की कोटाचा? Happy
कारण त्याचे केसही वैशिष्ट्यपूर्ण आहेत !

आणि इतक्या सुंदर गझलेचं पार वाटोळं करुन विडंबन ऐकतोय असं वाटायला लावलंय ते वेगळंच! Uhoh

कम खत्तम आहे तो हिरो... >>>

'धूमधडाका'मधे एक डायलॉग आहे -

"कुठून फर्निचर पकडून आणलंय?"
"लो बजेट आहे..."

Biggrin ते आठवलं.

याचा कट जियाला कट म्हणून गाजला होता बराच.>>> रिअली?

लिपिश्टीक मोडल माझं अस तोंड करुन हसतीए...>>>> आई ग!

इतक्या सुंदर गझलेचं पार वाटोळं >> हो म्हणजे सानु आवडता आहे पण गुलाम अली ने इतकी सुंदर म्हटली आहे ती गझल की सानुच्या आवाजात अगदी नकोसे होते Lol

साधारण १५-१६ वर्षांपूर्वी एका घरगुती स्नेहसंमेलनात एक दूरच्या आत्याचे मिष्टर जगजीतने गायलेली गझल आणि गुलाम अलीने गायलेली गझल यातला फरक गाऊन सांगत होते. मी ही जियाला मधली चाल सांगितल्यावर त्यांना तोंडाचा आ वसलेला बंद करायचं पण सुचेना. Proud Biggrin

MSG : the warrior lionheart ट्रेलर : https://www.youtube.com/watch?v=2z_T5ZLD7AI
रविवारी गुंडाला १८ वर्षे पूर्ण झाली तेव्हा माझ्यासारख्या अनेक जणांचे डोळे अश्रूंनी भिजले होतेच पण हा ट्रेलर पाहून आता पारणे फिटणे का काय म्हणतात तसं झालंय. एक तर गुरमीत रामरहीम सिंगजी आता ऑफिशियली डॉक्टरही झालेत वर सीक्रेट एजंट, त्यात ३० वेगवेगळ्या जबाबदार्‍या सांभाळल्यात, वर ताहेरच्या पावलावर पाऊल टाकत स्वतःची पोरगी (हनीप्रीत इन्सान) पण आणली आहे आणि मुख्य आकर्षण टाईम ट्रॅव्हल पण आहे.
स्पीचलेस!!

मी MSG 1 & MSG 2 - दोन्ही मुवीज थिएटरमधे पाहिले आहेत, अचाट & अतर्क्यच्या पलिकडे होते. The most entertaining movie, i ever have seen. 'पिताजी'च्या मल्टी टॅलन्टला तोडच नाही. Proud

नशीब थिएटरमधे आम्ही सोडता ३-४ लोकच होते. आम्ही जे काही तुफान हसलो आणि बरोबरच्या सगळ्यांनी ज्या काही कमेंट्स केल्या त्या ऐकायला एकही 'इन्सान' आजुबाजुला नव्हता हे आमचं नशीब.

पायस, तिसरा कधी रिलिज होतो, आम्ही वाटच पहात होतो. आता हा ट्रेलर लगेच ग्रुपमधे फॉरवर्ड करते. Lol

MSG 1 आमच्या छोट्या शहरात लागलाच नाही (दुर्दैव माझं) MSG 2 लागला त्या दिवशी एक पण तिकीट विक्री झाली नाही म्हणून संघ्याकाळी त्याने लगेच बाहुबली परत लावला

अरे काय भयाण प्रकार आहे हा??????

टीव्ही वरच्या बाल्वीर ची आठवण आली .

डाय्लॉग बोलताना किती चुकीच्या जागी वाक्यं तोडली आहेत .
"यॉद तो आती थी ..." काय टोन आहे , काय एक्स्प्रेशन्स Uhoh
"तो मैं सेकडो साल आगे कैसे जाउन्गा ?"
"नही जा सकते" म्हटल्यावर हिरोचे एक्स्प्रेशन केवळ महान आहेत .

पायस , --^-- प्रणाम स्वीकारावा .

मी आता MSG च्या गप्पा वाचायला इथेच रेंगाळणार आहे. माझ्याशिवाय अजुन कोणीही पाहिला नाहीए का? If you have missed it, I highly recommend to watch it. Proud

'पिताजींचे' ड्रेसेस आणि dialogue delivery पहाण्यासाठी तरी पहायलाच हवा. मी ऐकलं कि प्रॉडक्शनच्या अनेक जबाबदार्‍यांबरोबर Costume designing पण गॉडमॅन उर्फ पिताजींनी स्वतःच केलं आहे. ही एक झलक पहा आणि मग मोह आवरणार नाही गुगल करुन त्यांचे बाकीचे कॉस्च्युम्स पहायची Lol

Pitaji.jpg

स्वतःची पोरगी (हनीप्रीत इन्सान) पण आणली आहे आणि मुख्य आकर्षण टाईम ट्रॅव्हल पण आहे. >>> पायस, त्याच्या मुलीबद्दल हा पुणेरी शेरा का? Happy

खत्रा दिसतोय. बर्‍याच दिवसांपासून पाहायचा आहे.

पायस, त्याच्या मुलीबद्दल हा पुणेरी शेरा का? >> फा तूच रे Happy
बाकी जी बाई स्वतःचे अर्ध नाव हनी सिंग बरोबर शेअर करते (च्यायला यांचं लग्न झालं तर कसलं भारी अर्धांगी पण अर्धनामी पण) तिचा अनुल्लेख करणं जीवावर आलं माझ्या Lol

MSG वा वा वा डोळ्यांचे पारणे फिटले अगदी. १ दिवसात २ मिलीयन पेक्षा जास्ती व्ह्युज. म्हणजे भाई पेक्षा जास्ती हीट आहे Lol

MSG Biggrin

Pages