अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक

Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00

तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?

उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "

या आधिचे सीन या दुव्यावर वाचा

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रभास माझं सौभाग्य नावाचा चित्रपट युट्यूब वर बघा आणि ५५ ते ५६ व्या मिनीटाला हे गाणे सुरु होईल.
याच्या आधी हिरो चं प्रेम पात्र दु:खी गाऊन मध्ये असल्याचा सीन आहे.

गुलाबी आंखे गाणं पाहीलं आत्ता मी...बाप रे!
किती हिंदकळवलंय त्या नंदा ला राजेश खन्नाने! चापट्या मारणं काय, डोकं धरुन स्वतःच्या खांद्यावर आपटणं काय, उचलून दाणकन खाली ठेवणं काय, दणादणा हात ओढत पळवणं काय.....!! हरे राम !!

धन्यवाद mi_anu...

आत्ताच पाहिलं ते गाणं आणि एका निर्विचार अवस्थेत पोहोचलो... Lol

हा अमूल्य आनंदाचा ठेवा मिळवून दिल्याबद्दल आपले मनापासुन आभार...

मिसल पाव व रील लेख वाचून व इथले पण प्रतिसाद वाचून शेवटी गुंडा बघितला ३/४. फारच भारी आहे व एक ही संवाद इथे लिहू शकत नाही. अतर्क्य. पण सुरुवातीला एअर्पोर्टवर एकच विमान सात आठ वेळा मागून जाते टेक ऑफ करायला. ते फारच विनोदी आहे.

गुलाबी आँखे मध्ये नंदा अनवाणी पायांनी हि सगळी धावपळ करतेय. बहुतेक सगळे चित्रीकरण हिरवळीवर आहे पण मध्ये एका स्ट्रेचवर माती आणि दगड दिसतात. त्यावरून राजेश तिला हाताला धरून ओढत धावतोय. बिचारी. तिला ते जमिनीवरन बाहुलीसारखी हवेत उडवून, त्यात परत गोल फिरत खाली ठेवण्याचे काम कसे जमवले तोच जाणे.

मी मागे इथे टंकलं होते का आठवत नाही...
वरचा भाभु चा फोटो पाहून आत्त्ता आठवले, ते त्याचे गेट वे ऑफ इंडिया का काहीतरी नावाच्या चित्रपटातले दो घडी वो जो पास आ बैठे गाणं !!
मदन मोहन ह्यांचे संगीत, लता-रफी असे मधाळ कॉम्बो आणि पडद्यावर चक्क भूलोकी ची शापित अप्सरा मधुबाला आणि कायम २ लिटर एरंडेल प्यायलेला चेहरा करुन भाभू...एका कडव्यात ती अत्यंत रोमँटीकली त्याला म्हणते दिल को एक दिन जरुर जाना था..वहीं पहुँचा जहाँ ठिकाना था, दिल वही दिल जो दिलमें जा बैठे !! आणि हे येडं त्या वेळी नजरे चुराके, दामन बचाके असे काही एक्स्प्रेशन्स आणतो, की समोर मधूबाला नसून शक्ती कपूर आहे, आणि आउ आउ करत ह्याच्या चारित्र्यावर डाग पाडायला समोर सरसावतो आहे...अतर्क्य !!!

भाभु Happy
मला सारखं भुभू वाचावं वाटतंय.
मनोज कुमार हँडसम होता, चेहर्‍यावरचा हात सोडला तर.
संजय खान सर्वात जास्त देखणा होता.

उस्फुर्त्पणे महिनाभर प्रॅक्टिस केल्यासारखा रस्त्यावरचा प्रत्येक माणुस नाचणं जितक अतर्क वाटत तितकच हे गुलाबी आंखे वाटतय :प

आपल्या मिथुन दांचा एक सिनेमा... मेरा रक्षक... झी सिनेमावर पाहिला होता (सिनेमा नाही हा प्रसंग...) हा धागा अनेक दिवस चालू आहे त्यामुळे कदाचित आधी कुणी दिलाही असेल... पूर्वीच्या काळी सिनेमात शेवटची मारामारी नावाचा जो काही प्रकार असायचा तशीच ही मारामारी... मिथुन चक्रवर्तीचा एक आवडता मेंढा असतो... मारामारी करताना तो मेंढा चुकून एका खड्ड्यात पडतो... खड्डा साधारण दोन पुरूष उंचीचा असेल... तो खड्डा लाल मातीचा कोरडा ठणठणीत असतो... मिथुन दा फाईटिंग करता करता आवडत्या मेंढ्याला बाहेर कसं काढायचं याचा विचार करत असतात... पाठीमागे खड्ड्यातून मेंढ्याच्या आर्त हाकाही ऐकू येत असतात... मग हिरो आईडीयाची कल्पना लढवतो... आणि कुठल्याश्या ओढ्यातून फाईटिंग करता करता खड्ड्यात पाणी सोडतो... एवढ्या भल्या थोरल्या खड्ड्यात जसं जसं पाणी भरत जातं आणि तसं तसं मेंढा पोहत वर येतो ... पण तो इथेच थांबत नाही तर कुठल्याश्या कड्यावर व्हिलन आणि हिरो मारामारी करत असतात तिथे जाउन तो सरळ व्हिलन ला मागून ढुशी मारतो... व्हिलन थेट दरीत... डोंगराच्या पायथ्याशी पोलीस सज्ज असतात... मिथुन मेंढ्याबरोबर कड्यावर दिमाखात उभा... आणि मी घरात हतबुद्ध होउन हे सगळं पहात असते... मग डोक्याला मुंग्या येतात... आणि पिक्चर संपतो एकदाचा...

बघावासा वाटतोय का? इथे बघा.... https://www.youtube.com/watch?v=yS7WXMyKHs0 साधारण २ तास ३० व्या मिनिटाला सुरू करा... म्हणजे मेंढ्याचा सीन नीट पाहता येईल... संपूर्ण पिक्चर आपल्या जबाबदारीवर बघावा...

धूम थ्री..
तसा सगळा सिनेमाच अचाट आणि अतर्क्य.. पण आज लक्षात राहिलेल प्रसंग.. अभिषेक आणि आमीर खानची भेट. आमीर त्याला आपल्याला चोराविषयी माहिती असल्याचं सांगतो. मग अभिषेक त्याला आणखी काही काही विचारतो त्याबद्दल. त्यावेळी आमीर सांगतो, तो कायमच मुखवटा घालून असायचा त्यामुळे त्याचं मूळ स्वरुप कधीच पाहिलं नाही.. तो बोलत नसायचा त्यामुळे त्याला चुपचाप चार्ली म्हणायचो म्हणे. तो कधीच बोलत नसायचा. पण एकदाच बोलला ते शब्द असे होते की, ते आजही मनात गुंजत आहेत, आणि ते (खतरनाक, भावनात्मक, जबरदस्त) शब्द होते.. ‘बँकवालो, तुम्हारी ऐसी की तैसी… ’
अमेरिकेच्या शिकागोतील सर्वात मोठी बँक आणि तेथे एवढी धाडसी चोरी करून महाशय काय लिहिणार, तर बँकवालो, तुम्हारी ऐसी की तैसी.. वा रे पठ्ठ्या.. कसे काय सहाशे कोटी कमावले बॉ…?

तसच ते हिमालय की गोद में मधलं, 'चाँद सी महबूबा हो मेरी, कब ऐसा मैने सोचा था, हा तुम बिल्कूल वैसी हो, जैसा मैने सोचा था' हे एक गाणं. म्हणजे, माझ्या काही फार मोठ्या महत्वाकांक्षा नव्हत्या, त्यामुळे माझ्या लो / मिड बजेट अपेक्षांमधे तू जशी आहेस, तशी बसलीस, अशा काहीतरी अर्थाचं वाटतं.>>>>

नाही, ते तसे नाही आहे. इथे 'कब' चा अर्थ 'कधीतरी' असा आहे...
कधीतरी मला वाटले होते कि खूप सुंदर अशी माझी प्रेयसी असावी...
हो तू बिलकुल तशीच आहेस..

फूल Lol

काय पॉवरफुल मेण्ढा आहे! व्हिलन ची गाडी अडावी म्हणून रेल्वेचे फाटकही बंद करतो. तो व्हिलनही ब्रिलियंट आहे. मिथुन याला खड्ड्यातून बाहेर काढायचा प्रयत्न करत असताना त्यालाही आत ढकलायचे सोडून त्याला बाहेर ओढतो.

या मेण्ढ्याच्या चित्रपटावर इफेक्ट इतका जोरदार आहे की शेवटी हे दोघे फायटिंग करताना ब्रिज वर चढून एकमेकांना डोक्याने ढुशा देत फायटिंग करतात.

>>चाँद सी महबूबा हो मेरी<<

सोनाली, पटनेबल आहे तुमचं स्पष्टिकरण; बक्शीसाहेबांकडुन अशी सामान्य चुक होणे कठिण. काल "दि गोल्डन इयर्स" मध्ये जावेद साहेबांना हि इथल्या काहि जणांसारखा प्रश्न पडला होता...

बायदवे, मी हे गाणं असं ऐकायचो - चांद सी मेहबु, बाहों मेरी कब, ऐसा मैने सोचा था? अर्थात - चांदण्यासारखी सुंदर प्रेयसी माझ्या बाहुपाशात कधी येईल... Happy

@ फारएण्ड, काय पॉवरफुल मेण्ढा आहे! >>> हे वाक्य वाचून, हसून हसून डोळ्यात पाणी आलं की!!! Rofl

या मेण्ढ्याच्या चित्रपटावर इफेक्ट इतका जोरदार आहे की शेवटी हे दोघे फायटिंग करताना ब्रिज वर चढून एकमेकांना डोक्याने ढुशा देत फायटिंग करतात.>>> पुन्हा Rofl

अगाध लोक आहेत रे देवा...

च्यामारी मेंढा मागे लागलाय तर सरळ गाडीत बसावे आणि काच खाली करून त्याला वाकुल्या दाखवाव्यात तर येड उड्या मारत पळत सुटलंय.

कसला क्यूट आहे तो मेंढा.. खरा असावा, animated वाटत नाहीये..

त्याकाळात इतके कुठले अॅनिमेशन प्रगत...खराच मेंढा आहे तो. ट्रीक सीन्स वापरले असावेत

पुढे त्या गाण्यात तो म्हणतो - देखे ना ख्वाब वो मेहलोंके आहे, म्हणजे लो बजेट प्रियेसीच हवी आहे बाबाला.

ह्या वरुन एकदा पुर्वी झालेला वाद आठवला.
क्या हुआ तेरा हर एक रोज मुझे खत लिखना - ह्या गाण्यात तो तिला तु रोज पत्र लिहायचीस त्याच काय झाल, आणि आता का सोडलस अस विचारतो की पत्र लिहीत जा अस सांगतो...

त्याचा अर्थ लो बजेटच आहे. " ना कस्मे है न रस्मे है, ना शिकवे है ना वादे है..."....
म्हणजे काही मागण्या नाहीत, रुसवे फुगवे नाहीत, ताठा-तोरा नाही...... अगदीच 'आयडियल' प्रेयसी हवीए त्याला...

इतक्या डिग्रेडिंग स्तुती ला झेपवून घेणारी मिडिऑकर मेहबूबा होती तरी कोण या गाण्यात?
तू चांद सारखी नाहीस, पण चालेल..आता काय करणार..पदरी पडलं पवित्र झालं.तसंही मी कोण मोठा हृतिक लागून गेलोय..माझ्यासारख्याला असलीच मिळणार वगैरे वगैरे.

वाचा लिरिक्स आणी लावा अर्थ.

चाँद सी महबूबा हो मेरी कब ऐसा मैंने सोचा था
हाँ तुम बिलकुल वैसी हो जैसा मैंने सोचा था
चाँद सी महबूबा हो मेरी कब ऐसा मैंने सोचा था
हाँ तुम बिलकुल वैसी हो जैसा मैंने सोचा था

ना कसमे हैं ना रस्मे हैं ना शिकवे हैं ना वादे हैं
एक सूरत भोली भाली है दो नैना सीधे साधे हैं
ऐसा ही रूप ख्यालों में था जैसा मैंने सोचा था
हाँ तुम बिलकुल वैसी हो जैसा मैंने सोचा था

मेरी खुशियाँ ही ना बंटे मेरे गम भी सहना चाहे
देखे ना ख़्वाब महलों के मेरे दिल में रहना चाहे
इस दुनिया में कौन था ऐसा जैसा मैंने सोचा था
हाँ तुम बिलकुल वैसी हो जैसा मैंने सोचा था

चाँद सी महबूबा हो मेरी कब ऐसा मैंने सोचा था
हाँ तुम बिलकुल वैसी हो जैसा मैंने सोचा था

Pages