अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक

Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00

तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?

उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "

या आधिचे सीन या दुव्यावर वाचा

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला वाटतं आपण भरकटतोय. आपला विषय रामसे नसून अचाट सीन्स -अतर्क्य लॉजिक असा आहे ना? जाउ द्या ना तो प्यासी रात वगैरे. तो नाच एंजॉय करा आणि मनमुराद हसा.

हा पहा घोडा आणि जीप चा अचात सीन :
http://www.youtube.com/watch?v=XRtAa3lL0aQ

अशी झेलावी बंदुकीची गोळी :
http://www.youtube.com/watch?v=SI6SX1o7Muw

अतर्क्यतेचा कळस :
http://www.youtube.com/watch?v=SI6SX1o7Muw

ट्रॅक्टर चा बादशहा :
http://www.youtube.com/watch?v=SI6SX1o7Muw

माझ्या कंपनीने यूट्यूब बॅन केले आहे. त्यामुळे घरी जाऊन निवांत पाहीन!

व्वाह व्वाह! इथे तर स्पर्धाच चालू आहे अतर्क्य सीन ची!

माझ्याकडून स्पर्धेसाठी काही 'वेन्ट्रीज' :

बाइक चालवावी तर अशी:

http://youtube.com/watch?v=eB5JzLy2e3c&search=balayya

हात दाखवा ट्रेन मागे फिरवा:

http://youtube.com/watch?v=m_tpbN4GgWY&search=balayya

आणखी एक:

http://youtube.com/watch?v=wg876RFO4ag&search=vijaykanth

प्रसन्ना, मंदार, टण्या, वरती आर्काइव्ह ची लिंक आहे तेथे हे व असे आणखी सीन्स तुम्हाला मिळतील. धमाल सीन्स आहेत हे.

'फॅमिली', 'खाकी', 'इन्सान', 'धुंद - द फॉग', अक्षय कुमारचे 'द बाँड', 'पांडव', 'खिलाडी' सिरीज ('खिलाडी' वगळता) ही सारी रामसे बंधूंची अपत्ये..
श्र, 'पांडव' आठवतोय का?

ही भानगड रामश्यांत फाटाफूट झाल्यावरची. पण सात बंधू मिळून त्यानी जो हॉरर पैदा केला होता त्याची सर परत नाही.

कधीतरी चुकून चॅनल्स सर्फिन्ग करताना जे दिसते त्यात सर्व सामान्य मध्यमवर्गीय मराठी माणूस भाजी आणायला गेल्यासारखा तुरुंगात जातो आणि घरी येतो.
कधीही टी व्ही लावा.........१ तर तुरुंगाचा सीन किंवा हॉस्पिटलचा सीन किंवा पांढरे कपडे घालून जमलेले लोक ...अर्थातच कुणाचा तरी मृत्यू ... किंवा मग सगळ्या बायका किलो किलो सोनं अंगावर घालून काहीतरी सेलेब्रेट करताहेत.... साखरपुडा.....लग्न ....डोहाळेजवण्.....वाढदिवस्....गेट टुगेदर्स....!
आजपर्यंत खूप भयानक पद्ध्तीने नटलेल्या बायका फक्त एकता क. च्या सिरियल्स मध्ये असायच्या आता मराठीतही.......
आता मराठीतही व्हँप बाईच्या कपाळावर नाग साप(की गांडूळ?)वगैरे प्राणी चितारलेले असतात. सहित्य जीवनाचा आरसा असतो म्हणतात / कलेत जीवनाचे प्रतिबिंब दिसते म्हणतात पण मला तरी अवती भोवती या सीरीयल्स मधल्या बायांचे अनुकरण दिसते. ही उलटी गंगा आहे का? मला नेहमी प्रश्न पडतो या सीरीयल्स नी काय करमणूक होते?

बाय द वे, काय आहे विषय? Happy

कधीतरी चुकून चॅनल्स सर्फिन्ग करताना जे दिसते त्यात सर्व सामान्य मध्यमवर्गीय मराठी माणूस भाजी आणायला गेल्यासारखा तुरुंगात जातो आणि घरी येतो.
कधीही टी व्ही लावा.........१ तर तुरुंगाचा सीन किंवा हॉस्पिटलचा सीन किंवा पांढरे कपडे घालून जमलेले लोक ...अर्थातच कुणाचा तरी मृत्यू ... किंवा मग सगळ्या बायका किलो किलो सोनं अंगावर घालून काहीतरी सेलेब्रेट करताहेत.... साखरपुडा.....लग्न ....डोहाळेजवण्.....वाढदिवस्....गेट टुगेदर्स....!
आजपर्यंत खूप भयानक पद्ध्तीने नटलेल्या बायका फक्त एकता क. च्या सिरियल्स मध्ये असायच्या आता मराठीतही.......
आता मराठीतही व्हँप बाईच्या कपाळावर नाग साप(की गांडूळ?)वगैरे प्राणी चितारलेले असतात. सहित्य जीवनाचा आरसा असतो म्हणतात / कलेत जीवनाचे प्रतिबिंब दिसते म्हणतात पण मला तरी अवती भोवती या सीरीयल्स मधल्या बायांचे अनुकरण दिसते. ही उलटी गंगा आहे का? मला नेहमी प्रश्न पडतो या सीरीयल्स नी काय करमणूक होते?

>>>> यात अ अ काय आहे? मुळ बा.फ,. अ अ विषयी आहे.

:आआ:

फरदीन खानचा प्रेम अगन नावाचा पिक्चर कुणी पाहिलाय???

बहती हुई गंगामे अपना कीचड धोने चले हो??

इति हीरो, हिरविणीवर अतिप्रसंग करणार्‍या व्हिलनला...

--------------
नंदिनी
--------------

अरे अजून 'जिम्मी' कोणीच पाहिला नाही?

नाही गड्या;
बापाची पुण्याई;
आज काल कुणी ही येत चित्रपटात

बापाची म्हणण्यापेक्षा आजाची पुण्याई. म्हणजे मिथुन, हॅरी बावेजा यांच्याही बापाची पुण्याई... ती अजूनही पुरते आहे.

    ***
    Twinkle twinkle little star
    I don't wonder what you are
    Studying your spectrum, ignorance I've none
    You're not a diamond, you're just hydrogen.

    अरेरे! मी मिस केला जिम्मी. कालच आमच्या कडे केबलवर लागला होता....
    एक दोन संवाद ऐकून चॅनल बदलून टाकले... Sad

    काय हे दक्स्(फिस्स्सsssss)
    अश्याने कसे व्हायचे मायबोली करांचे?

    टण्या, हे बघ. बाय द वे या ब्लॉगवरचे रिव्ह्यूही जबरी असतात.

    फरेन्ड,

    हा ब्लॉग ख त र ना क असतो.... वाट लागते हसून हसून...

    सगळ्या लिन्क्स पहून एकटाच हसतोय मी Happy

    - येड्चाप

    अहाहा... परमेश्वराने मला पण एक छोटीशी संधी दिलीये इथे लिहायची.

    परवा विनोदखन्ना-धरम्-रजनी ह्यांचा एक लागला होता. तर वि-ध ह्यांची बहिण भावांच्शी भांड भांड भांडते की 'माझी शादी करतच नाहीत तुम्ही' वगैरे.

    मग ती कॉलेजला चालत चालत चालत जात असता ४-५ गूंडे तिची चेष्टा करतात. मग ती त्याना खनखन तोंडात, पोटात वगैरे मारते. मग ते चिडतात आणि तिला अजून त्रास देणे सुरु करतात. मग एकजण तिला धक्का मारतो आणि ती समोरच्या एका दाढी-मिश्या वाढलेल्या नवीन गूंडाला जाऊन धडकते. आपण 'हा कोण बुवा नवीन गूंड' असा विचार करतोय तोच तो तिचा हात धरून तिला बाजूल करतो तेव्हा कळते की तो रजनी असतो. मग तो एक जबरी डायलॉग टाकतो.. माफ करा, मी तो लिहून ठेवायला हवा होता पण विसरले. कोणाला आठवेल तर लिहा, इथे लिहिण्याच्या उंचीचा आहे तो.

    मग लगेच तो मारामारी सुरु करतो तिला वाचवायला. मग त्यातल्या दोघाना धक्का मारतो. मग ते पडतात. मग रजनी २ सायकली हातात घेतो आणि त्या २ गूंडांवर फेकतो. ते उठायचा प्रयत्न करताना पुन्हा सपाट होतात. आणि काय सांगू त्या सायकली त्या दोघांवर न पडता उभ्या रहतात आणि मग वर हवेत जातात, पुन्हा खाली त्यांच्या छाताडावर आपटतात. पुन्हा वर जातात, पुन्हा छाताडावर. मग क्यामेरा रजनी वर.. तर रजनी च्या दोन हातात लोहचूंबकाचे २ गोळे असतात आणि ते तो वर-खाली करत असतो आणि त्याबर त्या सायकली पण वर-खाली होत असतात आणि गूंडाना चोप देतात. आणि मग ते पाहून हिरवीन खूश होते आणि तिला अतीव आनंद होतो आणि मग ती त्याला दाढी-मिशा काढायला सांगून तिच्या भावाना भेटायला बोलवते. . अहो, शादीसाठी.
    मग तो येतो तेव्हा तिचे २ भाऊ जे अ. आणि अ. करायला लागतात ते पाहून मी रिमोट हातात घेते.

    सुनिधि हिहिहिहि
    अग पुढचही पहायचं होतस ना, आम्हाला हसवायला धरमचा एखादा डा.लॉ. टाकायचास.

    अरे सहीच....
    हाच सीन मी पण पाहिला होता....
    रजनी चं नाव पण अ. आणि अ. आहे...
    काहितरी- इंस्पेक्टर रामोजीराव राणोजीराव शिवाजीराव गायकवाड धांडे....

    ह्या चित्रपटाच नाव आहे "फरिश्ते" Happy
    हाच सीन मी बराच आधी लिहिला होता.
    .............................................................
    A successful marriage requires falling in love many times, always with the same person. Happy

    मग एकजण तिला धक्का मारतो आणि ती समोरच्या एका दाढी-मिश्या वाढलेल्या नवीन गूंडाला जाऊन धडकते. आपण 'हा कोण बुवा नवीन गूंड' असा विचार करतोय तोच तो तिचा हात धरून तिला बाजूल करतो तेव्हा कळते की तो रजनी असतो. मग तो एक जबरी डायलॉग टाकतो..>>>>>>>>
    डायलॉग तो 'ये से येक्का, ये से अकबर खान.. अभी आता हूं मेरी जान' का?
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~
    'माता' रिटर्न्स.

    नाही माते.. तू लिहिलेला डायलॉग ज्या चित्रपटामध्ये आहे त्यात रजनीचे नाव बहुतेक अकबर खान आहे..

    फरिश्ते मध्ये त्याचे नाव पोलिस इन्स्पेक्टर अर्जुन रामोजीराव शिवाजीराव गायकवाड जगदिश मुल्क टांगे असे आहे (इती आय एम डी बी)..

    झाकराव , श्र, वयोमानामुळे हल्लि जास्त आठवत नाही. Happy .. हो तो 'फरिश्ते' होता. पण डायलॉग तो नसावा श्रध्हा.

    आशू , नंतर बराच वेळ धीर केला नाही पहायचा. मग २ तासानी जरा आराम करायचा होत तेव्हा सिनेमा संपला असेल असे समजून लावले तर ती बहीण वेडी झाली होती, रजनी (बहुतेक पत्ता कटला असेल) नव्हता, ध-वि ला अमरापूरकर साहेबानी पकडले होते आणि करकचून बांधले होते. तरी ध किंवा वि जोरजोरात ओरडत होते 'तेरे वध के लिये दो-दो राम आये है रावण' का असेच काहीतरी. मग असाच गडबड गोंधळ होउन जे जे मरण्यासारखे होते ते मरून पडदा पडला एकदाचा.

    मग असाच गडबड गोंधळ होउन जे जे मरण्यासारखे होते ते मरून पडदा पडला एकदाचा.

    Lol

    रजनी (बहुतेक पत्ता कटला असेल) >>>>..
    हो हो तो मरतो कि त्यात.
    पण मरताना देखील शानसे मरतो बर.
    बघाच तो पुर्ण चित्रपट.
    मस्ट सी Happy
    .............................................................
    A successful marriage requires falling in love many times, always with the same person. Happy

    Pages