चलो राजमाची (मुलांसाठी आणि मुलांबरोबर ट्रेक)

Submitted by कविन on 8 October, 2010 - 13:08

गेल्यावेळचा कँपचा अनुभव बघता अजून एका कँपची मागणी झालेली. पण तेव्हा लगेच नेणं शक्य झालं नव्हतं. आता ह्या दिवाळी सुट्टीत लहान मुलांना बरोबर घेऊन एक विकांत "राजमाची" ला जायचा प्लॅन केलाय. (नाणेघाट पुण्याहून येणार्‍यांसाठी गैरसोयीचा होईल म्हणून हा बदल केलाय. शिवाय गेल्या आठवड्यात आमच्या गृपच्या कॅप्टनने बरोबर ४-५ जणांना घेऊन फिनिक्स ह्या शारिरीक अपंगांच्या संस्थेच्या लोकांना घेऊन राजमाचीला ट्रेक केला आहे)

तारिख आहे १३-१४ नोव्हेंबर २०१०

मुंबईकरांसाठी बसची सोय असेल. पुणेकरांना लोणावळ्याजवळ बस पिक अप करेल.

पहिल्या दिवशी मनोरंजन फोर्ट आणि दुसर्‍या दिवशी श्रिवर्धन फोर्ट असा कार्यक्रम आहे.
( दोन दोन फोर्ट करायचे म्हणून दड्पून जायची अजिबात गरज नाही. तस दड्पण आलं तर फिनिक्स च्या जवानांना आठवायचं.) Happy

ज्यांना यायची इच्छा आहे त्यांनी कृपया मला संपर्कातून इमेल करा. किंवा इंद्राला draj598@gmail.com ह्या आयडीवर संपर्क केल्यास तो देखील माहिती अपडेट करु शकेल.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अम्या, दुसरा भाग हि जबरदस्त आणि तळटीपतर खासच!!!

श्रेयसला पडलेल्या "घरी जाई पर्यंत माशांना खायला काय द्यायच" ह्या प्रश्नाच उत्तर बूमर आणि श्रीखंड असं द्यायचे हे अनुक्रमे प्रशांत आणि मी ठरवताच, घाबरुन मालक आम्हाला शरण आले.>>>> Biggrin

Pages