चलो राजमाची (मुलांसाठी आणि मुलांबरोबर ट्रेक)

Submitted by कविन on 8 October, 2010 - 13:08

गेल्यावेळचा कँपचा अनुभव बघता अजून एका कँपची मागणी झालेली. पण तेव्हा लगेच नेणं शक्य झालं नव्हतं. आता ह्या दिवाळी सुट्टीत लहान मुलांना बरोबर घेऊन एक विकांत "राजमाची" ला जायचा प्लॅन केलाय. (नाणेघाट पुण्याहून येणार्‍यांसाठी गैरसोयीचा होईल म्हणून हा बदल केलाय. शिवाय गेल्या आठवड्यात आमच्या गृपच्या कॅप्टनने बरोबर ४-५ जणांना घेऊन फिनिक्स ह्या शारिरीक अपंगांच्या संस्थेच्या लोकांना घेऊन राजमाचीला ट्रेक केला आहे)

तारिख आहे १३-१४ नोव्हेंबर २०१०

मुंबईकरांसाठी बसची सोय असेल. पुणेकरांना लोणावळ्याजवळ बस पिक अप करेल.

पहिल्या दिवशी मनोरंजन फोर्ट आणि दुसर्‍या दिवशी श्रिवर्धन फोर्ट असा कार्यक्रम आहे.
( दोन दोन फोर्ट करायचे म्हणून दड्पून जायची अजिबात गरज नाही. तस दड्पण आलं तर फिनिक्स च्या जवानांना आठवायचं.) Happy

ज्यांना यायची इच्छा आहे त्यांनी कृपया मला संपर्कातून इमेल करा. किंवा इंद्राला draj598@gmail.com ह्या आयडीवर संपर्क केल्यास तो देखील माहिती अपडेट करु शकेल.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

कविता तारीख अगदी योग्य निवडली आहे ...१४ नोव्हेंबर मुलांबरोबर मजा करायला मिळेल.

माझाही विचार आहे येण्याचा ... पण मी पहिल्यांदाच मुलाला घेऊन येणार आहे ट्रेकला .. मुलाचे वय ३ वर्ष
थोडी पुर्वतयारी , किंवा काय काय घेऊन जाणे गरजेच आहे तेहि ईथे लिहाल तर बर होईल..

खरेच मज्जा मज्जा येणार. मी आलो असतो तर चार पाच छोट्या दोस्तांनी माझी जबाबदारी नक्कीच घेतली असती. (हो बरोबरच लिहिलेय मी.)
मी ही बहुतेक, १४ नोव्हेंबरला दोन तीन छोट्या दोस्तांबरोबर कुठल्यातरी जंगलात जाणार आहे !!

जायचा प्लान कसा आहे, आपण लोणावळ्यावरुन जाणार आहोत की, खंडाळामार्गे कुणे गावातुन...

कुणे गावातुन गेल्यास लोणावळा ते अप्पर डेक रिसोर्ट पर्यंतची दिड ते दोन तासाची तंगड्तोड वाचते....

कवडे ह्या वेळेस नाही, म्होरल्या टायमाला नक्की
लले Biggrin मानसिक वयाप्रमाणे चालेल बघ, कवीला विचारून

आपण "वरसोली" गावातून जाणार आहोत. मोटर रुटने गावात जाणार आहोत. साधारण १ तासाची पायदौड आहे. पण मुलं नक्की एन्जॉय करतील.

कोंढाण्याचा उतार् स्टिप आहे. आपण ज्या मार्गाने जाणार त्याच मार्गाने परत येणार.

जुई, थंडी असणार त्यामुळे गरम कपडे जोड, चादर, मुलांसाठी मोजे, हातमोजे, नेहमीची मेडीसिन्स मस्ट.

कवे, माझ्या खोंडाला पुढच्या येळेला नक्की पाठवीन.
लले, तुझ्या बौद्धिक वयोमानानुसार तु जाऊ शकतेस की ट्रेकला Proud

हमभी अगर बच्चे होते... Proud

छान उपक्रम आहे.. बच्चा पार्टी खूष होणार तर... मजा करो ! Happy

जुई.. टेन्शन घेउ नकोस.. इंद्रा असणारच ना.. श्रीशैल खूपच लहान आहे तसा.. तेव्हा तुमच्या तीघांसाठी एकच बॅग घ्या.. म्हणजे त्याला उचलुन घेउन जाताना त्रास नाही होणार..

वविला बघितलेला श्रीशैलचा उत्साह, म्हणून यावेसे वाटते तेवढाच त्याला चेंज... Happy

जास्त ओढाताण नाही होत ना लहान मुलांच्या ट्रेकमध्ये... मला काही अनुभव नाहि आहे.

<<यो, तु पण येउ शकतोस, हाफ चड्डी घालुन...>> Lol आणि हो श्रीशैलापण कंपनी मिळेल Lol

तसा लहान आहे श्रीशैल, पण मग त्याच्या उत्साहाचा अंदाज घेउन एक कर्ता येईल शनिवारचा मनोरंजन गड त्याला घेऊन करायचा. दुसर्‍या दिवशी नसेल जमणार त्याला असं वाटलं तर तो आणि इंद्रा रहातील गावात नी गाव फिरुन येतील तू चल आमच्या बरोबर Proud

यो दगड्या, तू ये रे. तुला व्हॉलेंटिअर करु म्हणजे श्रीशैलचं टेंशनच नाही. थोडावेळ इंद्रा त्याला उचलेल थोडावेळ तू उचल Wink

आणि आपण बॅगा गावातल्या घरी ठेवून मग चढणार आहोत फक्त पाणी आणि आवश्यक सामान घेऊन.

योगेश तुझी व्हॉलेंटिर म्हणून नेमणूक निश्चित करण्यात येत आहे :p

ट्रेकची वर्गणी जमा करण्यासाठी दोन पर्यांयांचा अवलंब करावा..
१. रोख रक्कम भरणार असतील तर त्यांनी ३० ऑक्टोबर रोजी ठाण्यात भेटावे.
२. ज्यांना Online Transfer करणे शक्य असेल त्यांनी email द्वारे कळवावे... Account details email द्वारे कळविण्यात येतील.

अरे मुले स्वतःचीच पाहीजेत का भाड्याने आणली तर चालेल का...>>> हो आणि एव्हढ्या शॉर्ट नोटीसवर्...:फिदी: पण सुन्या तु आणि योग्या याच.. कारण थोड मुलांना ट्रेनिंग द्याल...

Pages