चलो राजमाची (मुलांसाठी आणि मुलांबरोबर ट्रेक)

Submitted by कविन on 8 October, 2010 - 13:08

गेल्यावेळचा कँपचा अनुभव बघता अजून एका कँपची मागणी झालेली. पण तेव्हा लगेच नेणं शक्य झालं नव्हतं. आता ह्या दिवाळी सुट्टीत लहान मुलांना बरोबर घेऊन एक विकांत "राजमाची" ला जायचा प्लॅन केलाय. (नाणेघाट पुण्याहून येणार्‍यांसाठी गैरसोयीचा होईल म्हणून हा बदल केलाय. शिवाय गेल्या आठवड्यात आमच्या गृपच्या कॅप्टनने बरोबर ४-५ जणांना घेऊन फिनिक्स ह्या शारिरीक अपंगांच्या संस्थेच्या लोकांना घेऊन राजमाचीला ट्रेक केला आहे)

तारिख आहे १३-१४ नोव्हेंबर २०१०

मुंबईकरांसाठी बसची सोय असेल. पुणेकरांना लोणावळ्याजवळ बस पिक अप करेल.

पहिल्या दिवशी मनोरंजन फोर्ट आणि दुसर्‍या दिवशी श्रिवर्धन फोर्ट असा कार्यक्रम आहे.
( दोन दोन फोर्ट करायचे म्हणून दड्पून जायची अजिबात गरज नाही. तस दड्पण आलं तर फिनिक्स च्या जवानांना आठवायचं.) Happy

ज्यांना यायची इच्छा आहे त्यांनी कृपया मला संपर्कातून इमेल करा. किंवा इंद्राला draj598@gmail.com ह्या आयडीवर संपर्क केल्यास तो देखील माहिती अपडेट करु शकेल.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

पीसी अपग्रेड करतोय, ३-४ दिवसात पाठवतो <<< जल्ला इतक्या वेळात कॅमेरा आमच्यापर्यंत पोहचायचा.>>>>अरे फक्त ३+४=७ दिवसातच पाठवतो रे फोटो Wink

अरे गिरी इमेल कर ना हे फोटो.
रुचाने काढलेले फोटो मिळाले का? नसतील तर मी करते फॉर्वर्ड

बच्चा कंपनीचे फोटो फारच गोड आहेत. उत्साहात इतका मोठा ट्रेक पार पाडल्याबद्दल त्यांचं कौतुक आणि अभिनंदन!

मस्त फोटो! बच्चे कंपनी एकदम खुशीत दिसते आहे! Happy
मजा आली असेल ना? कधी जमेल तेह्वा सहभागी व्हायलाही आवडेल.

खरंच बच्चेकंपनीसहित मोठ्यांनीही खुपच धम्माल केली. Happy
काही बच्च्चा पार्टी तर "वादळ" होती Happy एका जागी स्थिर उभी राहिलेली पाहिलीच नाही Happy तर काहींना चालणं हा प्रकारच बहुदा माहित नसाव, नुसती इकडुन तिकडुन धावत होती, धडपड होती आणि उठुन न रडता पुन्हा पळत होती. :). धम्माल केली छोट्यांनी. Happy

गिरी.. मस्तच्या मस्त फोटोज !!!!
बच्चापार्टीचे कसले ते गोड नि फ्रेश चेहरे.. Happy नि जल्ला ते थकलेभागलेल्या माबोकरांचे चेहरे... Lol

नि आंद्या पण आला होता तर.. असुदे नि आंद्या गेला म्हणजे आता राजमाची गडावर जाउन पाहणी करायला हवी .. Wink

फार्फार मज्जा केलेली दिसतेय.
बाळं फारच स्मार्ट आहेत (कुणी कुणाला नेलं, असा प्रश्न पड्लाय )
सूर्यकिरण, हजारो ख्वाईशे .....
भारतात होतो त्यावेळी गोवा ते पुणे, तिथून दिवसभराचा ट्रेक परत पुणे ते गोवा आणि बसमधून उतरुन थेट ऑफिस, असले प्रकार केले, आहेत. आता त्यावेळची मुले मोठी झाली..

बच्चे कंपनी काय गोssड दिसतेय ! ती ३ बाळं झोपून हसतायत तो फोटो मस्त आलाय Happy

कविता, तुझा हा पहिलाच मायबोली बाळांचा ट्रेक छान सक्सेसफुल झाला, त्याबद्दल अभिनंदन Happy

कवे, तुझं, सहसंयोजकांच आणि समस्त माबोकर ज्यांनी ह्या ट्रेक सक्सेस्फुल करायला तुला सहकार्य दिले त्यांचही अभिनंदन (विन्या, अम्या, गिरी, सुक्या, मृ, इंद्रा, सोनटक्के, आंदु, आण्णा आणि बाकिचे सगळे).
कवे, आता आम्ही ववि किंवा इतर गटग मुलांना तुझ्याकडे सोपवुन एंजॉय करु शकतो ह्यासाठी तू इलिजिबल झालिस बरका Wink

सुरुवात तर बर्‍याच आधीपासून केली होती पण काहितरी राहिलय अस वाटत होत. परत परत चेक करुन बॅग भरली आणि सकाळचा गजर लावून झोपी गेलो. सक्काळी उठून आनंदसुजूच्या घरी निघणार तेव्हढ्यात अण्णांचा कॉल आला. सगळं कस ठरल्यासारख पार पडत होतं, अण्णा घरातून निघणार याची खात्री पटली आणि मी बाईकवर टांग टाकली. आश्चर्याचा धक्का म्हणजे आनंदी परिवार फुल्टू रेडी होता. अगदी 'मीरा - मामीं'सकट Proud

आनंदच्या घरून आम्ही निघणार तोच परत अण्णांचा फोन. "काय हे, किती उशीर ?" खरतर सगळ वेळापत्रकाबरहुकूम चाललेल होतं, पण वेळेआधी पोहोचायची अण्णांना सवय नसल्यामुळे ते बिथरले होते बहुत्येक. रिक्षावाल्यांच्या फारशा विनवण्या करायला न लागता आम्ही मुलुंडवरुन नाहूरला पोहोचलो.

आमच्यासमोरच बसही येउन टेकली आणि सामान लोड करायला सुरुवात झाली. बॅगा डिकीत ठेवल्या गेल्या न गेल्या तोच दुसरी बसही दाखल झाली. त्यात ईन्दधनुष्य सकुसप विराजमान होते, मालकही त्यातूनच अवतीर्ण झाले. माबोकरांचा कोरम पूर्ण झाला होता. अण्णा, आनंद, विनय, ईन्द्रा, यो२४, गिरीविहार, मी, मृदुला, पारीजातक आणि 'मीरा-मामी'. "नवरा नवरीला" Biggrin यात मुद्दामहूनच धरल नैये, कारण ते बर्‍याच दिवसांपासून संयोजक मोडमध्येच वावरत होते.

गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात कोणास ठाउक कश्या पण वेळेवर सुटल्या बश्या. संयोजक अक्षरशः आधी लग्न कोंढाण्याचं ष्टायलीत कामाला लागल्याचं क्षणोक्षणी जाणवत होत. ठरल्याप्रमाणे रबाले स्टेशनजवळ बस पोहोचताच नाश्ता तयार होता. सगळ्यांनी पोटभर प्लेटभर भरुन उपमा चेपल्यानंतर अण्णांना चहाची आठवण येणार हे आधीच माहिती असल्यासारखं चहाही रेडी होता.

उदरभरण झाल्यावर आम्ही जे सुटलो ते थेट लोणावळ्याला कामतसमोरच थांबलो. पूणेकर तिथेच जॉईन होणार होते. उरलेला कट्टेकर सुकी बशीत शिरला आणि बस कशी भरल्यासारखी वाटली. आधीच चालू असलेल्या दंग्याला उधाण आलं. आनंदला अर्थातच तोड नव्हती, मालकांच्या लावण्या जोशात सुरु होत्या, फड रंगायला फक्त कमी होती ती वैभवच्या ढोलकीची. सर्वानुमते हा बालट्रेक असल्यामुळे सुरुवात बालगीतांनी झाली पण बाललावण्या लिहील्याच गेल्या नसल्यामुळे आमचाही नाईलाज होता. दंगेखोरात दोन मेंबर नवीन होते ते प्रशांत आणि गिरीविहार. ते नवीन असल्याच कुठेही जाणवत मात्र नव्हतं. तसही सगळीच मंडळी लहानांहून लहान होउनच बागडत होती. अनुभवी संयोजक ट्रेकर्स मात्र शांत होते. एकतर त्यांच्या डोक्यात पुढचे प्लान चालू असावेत किंवा त्यांना नंतर आमचे होणारे हाल आधीपासून ठाउक असावेत. Wink

लोणावळ्यापासून बरेच पुढे, राजमाचीच्या शक्य तितक्या जवळ बसेस थांबल्या आणि डिकीत भरलेल्या सॅकस् पाठीवर चढल्या. शक्य तेव्हढ सामान सुमो आणि झायलोमधून पुढे पाठवण्यात आल. त्यात घुसण्याचा माझा प्रयत्न (बहुत्येक माझ्या वजनाला घाबरुन) गाडीवाल्यांनी हाणून पाडला. काउंटींग झालं, ग्रुप्स पाडण्यात आले, लिडर्स ठरवले आणि आम्ही क्वीक मार्चला लागलो. लहान मुलांचा ग्रुप तेव्हापासून जो सर्वात पुढे होता तो शेवटपर्यंत पुढेच राहिला. आमच्यासारख्या बॅकबेंचर्सनी इथेही आपली दिव्य परंपरा पुढे चालू ठेवली. रस्ता इतका दगडमय होता की मला माझे पायही दगडांपासूनच बनवलेले आहेत अस वाटायला लागू लागलं. हे काय आलच, पुढच्याच वळणावर आहे, हाकेच्या अंतरावर आहे, झालच, एव्हढच, संपलच आता अस करे करेपर्यंत ओढा आला. त्या थंडगार पाण्याने जरा फ्रेश झालो. अजून किती अंतर कापायच होत देव जाणे.

वाटेत झाडांवर रंगीत आणि माजलेले कोळी दिसत होते. ते बघून गिरीविहारला कोळीगीत गायची हुक्की आली. "स्पायडर म्यान, स्पायडर म्यान" हे त्याने गायलेल कोळीगीत ऐकताच जंगलातल्या समस्त कोळ्यांनी आत्महत्या केल्या. आम्ही आपले सदैव सैनिका म्हणत पुढे पुढे चालतच होतो. माझ्या दगडी पायांसारखे या ट्रेकर्स पाषाणहृदयी असावेत अस वाटायला लागल होत मला. लिडरला विचारल की "हे काय आलच" हे उत्तर दृपालकृपेसारख लगेच यायच.

जन्मठेपेच्या कैद्याने अखेर हेच आपल जीवन असल्याच स्वीकाराव तसं अखेर मी चालत रहाण्याची वस्तुस्थिती स्वीकारली, आणि शेवटी मुक्कामाच ठिकाण आलं. जवळपास अडीच (की अडीज ?) तास चालून दुखलेले पाय आवळत आम्ही फ्रेश झालो आणि जेवायच्या तयारीला लागलो. एव्हढ्या पायपीटीनंतर मिळालेल ते अप्रतिम जेवण आमचा मनापासूनचा (पोटापासूनचा म्हणा हव तर) आशीर्वाद घेउन गेलं.

अडीच तासाच्या तंगडतोडीनंतर छोटासा मनोरंजन गड आणि त्याच्या पायथ्याच देउळ मला सहज झेपलं. सूर्यास्त व्हायच्या आधी परत उतरण आवश्यक असल्याने गडावरच्या चढाई पेक्ष्या ऊतराईचा आवेश अंमळ जास्तच होता आमचा.

डे वन वॉज पर्फेक्टली अ‍ॅज पर शेड्यूल. माझ्या खात्यात ट्रेकची यशस्वी सुरुवात, पावले ठेचली जाण्याचा अनुभव आणि गुढगेदुखी जमा झाली होती.

मुक्कामी परतल्यावर अंताक्षरीचा खेळ रंगला. आम्हाला गळे काढताना ऐकून यजमानांनी जेवण बनवायचा स्पीड वाढवला. पिठलं भाकरी, कांदा, मिरच्या असा फर्मास गावरान मेन्यू असताना अंताक्षरीत वेळ फुकट घालवण परवडणारं नव्हतं.

जेवण लवकर आटोपल्याने रात्री काय कराव याचा प्रश्न कॅप्टननी सहज सोडवला. सकाळी पाच वाजता उठायचय हे कळताच सगळ्या सैन्याने सलामी न देताच अंथरुणांकडे कूच केलं. माबोकरांच्या टाईमटेबलात हे बसण शक्यच नव्हतं. आमच्या रात्री रंगतात ते गप्पांच्या फडानेच.

सतत ईमर्जन्सी लॅम्पला आदळणारा ईंद्रा, झोपताना पांघरुणाला बॅज लावणारे अण्णा, त्यांना आणि मालकांना मालीश करुन देणारे मी आणि सुकी, अण्णांच्या डोक्याभोवती एक वलय आहे पण ते धुराचं असा अद्.भूतरम्य शोध लावणारे मालक आणि आनंद ह्यांच्या दंगामस्तीत एक कधी वाजला तेही कळलं नाही. अशक्य हसवाहसवी करुन झाल्यावर आम्ही जे झोपलो ते थेट सकाळी कॅप्टननी उठवेपर्यंत.

क्रमश: Biggrin

क्रमशः

आण्णांचा बॅज, मालीश, वलय.. सहीच रे अम्या Happy मस्त वृत्तांत. क्रमशः ची वाट पाहणारी मोठी बाहूली. Lol असुदे, अगदी तूझ्या इश्टाईलमधला वृत्तांत रे.

हे हे हे मस्तच मजा केलेय जनू! सह्ही सह्ही!!!!! बच्चेकंपनी झिंदाबाद!

रच्याकने, या कोण बुवा एक आणखी मीरामामी????? - मीरामामींची एक सार्थ शंका.

सह्हीच झाला की तुमचा ट्रेक Happy

सगळे फोटु मस्त. बच्चेकंपनींनी धमाल केली की Happy बाकी आई, बाबा, काका, मावश्या, ताया यांनी पण खुप मज्जा केलिये अस दिसतय Happy छोट्यांपेक्षा मोठ्यांची संख्या जास्त दिसत्येय Wink बादवे किती लोक्स गेला होतात?

कवे, तुझ आणि सर्व संयोजकांच खरच खुप खुप कौतुक आहे. एव्हढ सगळ ऑर्गनाईज करायच आणि सुखरुप पार पाडायच.. खरच हॅट्स ऑफ टु यु !!! Happy

सगळ्या छोट्या दोस्तांचे खुप खुप कौतुक आणि अभिनंदन!!! Happy

अम्या, तुझा क्रमशः वृत्तांत येऊ दे लवकर Happy

Pages