चलो राजमाची (मुलांसाठी आणि मुलांबरोबर ट्रेक)

Submitted by कविन on 8 October, 2010 - 13:08

गेल्यावेळचा कँपचा अनुभव बघता अजून एका कँपची मागणी झालेली. पण तेव्हा लगेच नेणं शक्य झालं नव्हतं. आता ह्या दिवाळी सुट्टीत लहान मुलांना बरोबर घेऊन एक विकांत "राजमाची" ला जायचा प्लॅन केलाय. (नाणेघाट पुण्याहून येणार्‍यांसाठी गैरसोयीचा होईल म्हणून हा बदल केलाय. शिवाय गेल्या आठवड्यात आमच्या गृपच्या कॅप्टनने बरोबर ४-५ जणांना घेऊन फिनिक्स ह्या शारिरीक अपंगांच्या संस्थेच्या लोकांना घेऊन राजमाचीला ट्रेक केला आहे)

तारिख आहे १३-१४ नोव्हेंबर २०१०

मुंबईकरांसाठी बसची सोय असेल. पुणेकरांना लोणावळ्याजवळ बस पिक अप करेल.

पहिल्या दिवशी मनोरंजन फोर्ट आणि दुसर्‍या दिवशी श्रिवर्धन फोर्ट असा कार्यक्रम आहे.
( दोन दोन फोर्ट करायचे म्हणून दड्पून जायची अजिबात गरज नाही. तस दड्पण आलं तर फिनिक्स च्या जवानांना आठवायचं.) Happy

ज्यांना यायची इच्छा आहे त्यांनी कृपया मला संपर्कातून इमेल करा. किंवा इंद्राला draj598@gmail.com ह्या आयडीवर संपर्क केल्यास तो देखील माहिती अपडेट करु शकेल.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अरे अम्या गाढवा , मुलाला घेउन यायच लक्षात ठेव म्हणजे झाल...
नाहितर निघशील एकताच..
आणि लिस्ट बरोबर आहे पण प्रत्येक नग = २ कर , म्हणजे मला काही आणायला नको...:फिदी:

अरे लोक्सांनो पुण्याहुन कोण कोण येणारे मला सांगा म्हणजे माझ्या एका मुलिला सांभाळायची जबाबदारी सोपवता येइल त्यावर Happy

भिडे, पोर्गा गावाला उंडारतोय, मी तीथे उंडारणारे.

माझ्या लिस्ट मधल्या राहिलेल्या वस्तू

आरसा
फेस पावडर
कपडे धुण्याचा साबण
लिप स्टीक (थंडीने ओठ फूटू नयेत म्हणून)
Biggrin

Sad मी किती चुकचुकत आहे ह्याची कल्पनाच नाही तुम्हाला Sad कविता पुढचा ट्रेक ठरला की कळव नक्की. (असं मी किती वेळा म्हणणार आहे, देव जाणे :अओ:)

असो, मज्जा करा. नंतर अर्थातच फोटो आणि साग्रसंगीत वर्णन येऊदे.

असूदे, एवढंSSSSSSSSSSSSSSSSSS सामान कसं नेणार? ट्रंकेतून? Proud
मुलांच्या ट्रेकला मुलं आहेत ना, की सगळे मोठेच आहेत? Proud Light 1

हसून घे हसून घे, मोबाईल वरुन टायपायला इत्कच जमत Proud पल्लेदार निबंध टायपता येत नाहीत Proud

ट्रेक फिवर चढलाय. काऊंट डाऊन सुरु झालय.

लोक्सांनो उद्या भेटुयात Happy दोन दिवस राजमाचीला सगळे धम्माल करुयात Happy

मज्जा करा सगळे. Happy
पुढच्या वेळी यदाकदाचित अश्या ट्रेकच्या काळात तिकडे आलेली असेन तरच आमच्या अन आमच्या पिल्लाच्या नशिबात ट्रेक.

नीट जा रे.. स्वतःला नाही सांभाळले तरी चालेल.. बच्चापार्टीला सांभाळा.. धमाल करा.. नि तिथे फक्त पाउलखूणा सोडून या.. Happy

धन्स टु ऑल माबोकर्स. खुप छान कोऑपरेट केल सगळ्यांनी Happy
खुप छान वाटल सगळ्यांबरोबर ट्रेक करताना
बच्चे कंपनी तर एकदम फुल्ल टु धम्माल मूड मधे

श्रिशैल, श्रेयस, सारा, साना, सानिका, नुपूर, मीरा, सोहम, अथर्व ह्या सगळ्या यंग माबोकर्स ट्रेकर्स नी जान आणली ट्रेक मधे Happy

ट्रेकला यायची इच्छा होति पण आजपासून परीक्षा असल्याने जमल नाही. कविता, पुढच्या वेळेस नक्की यायचा प्रयत्न करेन. मला आवडेल मुलांना घेउन यायला.
तुम्ही खूप धमाल केलेली दिसतेय.

मी पण जरावेळ डोकावलो होतो, मस्त धम्माल चाललेली ऐकू येत होती. (फोनवर) आता वृत्तांताची वाट बघतोय.

फुल्ल टु धम्माल ट्रेक Happy

जबरदस्त ट्रेक तीन्ही ऋतू पाहीले एकाच दिवशी>>> अगदी, अगदी Happy

श्रीवर्धनगड उतरताना, गुहा बघतानाच दिनेशदांनी फोन केला होता. Happy

यो, Happy

फोटो कधी मीळतील योग्या>>>>>पीसी अपग्रेड करतोय, ३-४ दिवसात पाठवतो Happy

पीसी अपग्रेड करतोय, ३-४ दिवसात पाठवतो <<< जल्ला इतक्या वेळात कॅमेरा आमच्यापर्यंत पोहचायचा.

दिनेशदा, कधीतरी एकदा धम्मालीत सामील व्हा. प्रत्यक्ष.. फोनवरून नै काय. Happy

Pages