चलो राजमाची (मुलांसाठी आणि मुलांबरोबर ट्रेक)

Submitted by कविन on 8 October, 2010 - 13:08

गेल्यावेळचा कँपचा अनुभव बघता अजून एका कँपची मागणी झालेली. पण तेव्हा लगेच नेणं शक्य झालं नव्हतं. आता ह्या दिवाळी सुट्टीत लहान मुलांना बरोबर घेऊन एक विकांत "राजमाची" ला जायचा प्लॅन केलाय. (नाणेघाट पुण्याहून येणार्‍यांसाठी गैरसोयीचा होईल म्हणून हा बदल केलाय. शिवाय गेल्या आठवड्यात आमच्या गृपच्या कॅप्टनने बरोबर ४-५ जणांना घेऊन फिनिक्स ह्या शारिरीक अपंगांच्या संस्थेच्या लोकांना घेऊन राजमाचीला ट्रेक केला आहे)

तारिख आहे १३-१४ नोव्हेंबर २०१०

मुंबईकरांसाठी बसची सोय असेल. पुणेकरांना लोणावळ्याजवळ बस पिक अप करेल.

पहिल्या दिवशी मनोरंजन फोर्ट आणि दुसर्‍या दिवशी श्रिवर्धन फोर्ट असा कार्यक्रम आहे.
( दोन दोन फोर्ट करायचे म्हणून दड्पून जायची अजिबात गरज नाही. तस दड्पण आलं तर फिनिक्स च्या जवानांना आठवायचं.) Happy

ज्यांना यायची इच्छा आहे त्यांनी कृपया मला संपर्कातून इमेल करा. किंवा इंद्राला draj598@gmail.com ह्या आयडीवर संपर्क केल्यास तो देखील माहिती अपडेट करु शकेल.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अम्या, एकदम फंडू वृतांत, अगदी तुझ्या ष्टाईलप्रमाणेच Happy
पुढचा भाग लवकर येऊ दे रे :०

कोणास ठाउक कश्या पण वेळेवर सुटल्या बश्या
लिडरला विचारल की "हे काय आलच" हे उत्तर दृपालकृपेसारख लगेच यायच.
अण्णांच्या डोक्याभोवती एक वलय आहे पण ते धुराचं असा अद्.भूतरम्य शोध लावणारे मालक>>>>:फिदी:

काळजी नसावी मामी "मीरा मामी" म्हणजे मीरा नावाची गोड मुलगी आणि तिची आई म्हणजे साना आणि सारा केळकर ह्या तितक्याच गोड बाहुल्याँची कांचन मामी Proud

कवीचा ट्रेकची दवंडी मायबोलीवर आली तेव्हापासून सुकी हात धुवून Sad माझ्या मागे लागला होता की 'तू येणारच आहेस'. शेवटचा दिवसापर्यंत 'हो' 'नाही' Angry असंच चालू राहिलं. कवीशी रात्री ११ वाजता कन्फर्म केलं अन ठरलं की मी, सुकी आणि प्राजू (पॅरी) येत आहोत आणी मग मी सुटकेचा निश्वास सोड्ला Wink . माझ्या आयुष्यातली "राजमाची" हा पहिला ट्रेक होता. जाण्याआधी वाटलेले कि हा पहिला आणि शेवटचा ट्रेक असेल Uhoh पण असं झाल नाही Proud त्याचा मला आनंद आहे. ट्रेक हा माझ्यासाठी फारच सुखद अनुभव ठरला. खरतर इतकी तंगडतोड झाल्यानंतर बराच त्रास झाला, पण जी काही धम्माल केली ती नक्कीच अविस्मरणीय होती.
मायबोलीकारांचा उत्साह, रुचकर जेवण, लिंबू सरबत, सोनटक्के,घारूआण्णा, आनंद केळकर, मामी, गिरी, असुदे , इंद्राधनुष्य , कट्ट्याचे मालक आणि सहकारी यांनी पदोपदी केलेले मार्गदर्शन आणि सहकार्य सर्वच एकदम भन्नाट.

IMG_7681.JPG

तब्बल दोन दिवस ह्या चिमुकल्यांचा सहवासात राहून मन अगदी भरून आलं. बालदिनानिमित्त जो पारितोषिक सोहळा ठेवण्यात अला त्यावेळी त्या चिमुकल्यांचा चेहर्‍यावरचा आनंद पाहून कुठेतरी त्यांचा हेवा वाटला. असं वाटलं की मी का इतक्या लवकर इतकी मोठ्ठी झाली. Rofl

पुन्हा कधी जर तुम्हा सर्वांसोबत कुठे अश्या ट्रेक्सला जाण्याची संधी मिळाली तर नक्की यायला आवडेल.

टिम अन टिमवर्क सुपर्ब.

वाटेत झाडांवर रंगीत आणि माजलेले कोळी दिसत होते. ते बघून गिरीविहारला कोळीगीत गायची हुक्की आली. "स्पायडर म्यान, स्पायडर म्यान" हे त्याने गायलेल कोळीगीत ऐकताच जंगलातल्या समस्त कोळ्यांनी आत्महत्या केल्या.>>>>>> अम्या Proud

माझ्या दगडी पायांसारखे या ट्रेकर्स पाषाणहृदयी असावेत अस वाटायला लागल होत मला>>>>> मला पण Happy

आम्हाला गळे काढताना ऐकून यजमानांनी जेवण बनवायचा स्पीड वाढवला>>>>>>>> हे मात्र खर आहे

कवे, तुझ आणि सर्व संयोजकांच खरच खुप खुप कौतुक आहे. एव्हढ सगळ ऑर्गनाईज करायच आणि सुखरुप पार पाडायच.. खरच हॅट्स ऑफ टु यु>>
येस रिअल्लि Happy

असुदेराव... तुझ्याकडून अपेक्षित असा वृत्तांत... Rofl ज्याम हसलो नि तितकाच मिसलो.. !

पुढचा भाग लवकर येउदे... जल्ला गडावर ज्या स्पीडने चढला असशील तो स्पीड इथे लिहीताना नको रे.. Proud

अम्या पहिल्या दिवसाचा वृत्तांत अगदी धम्माल... Happy

रात्रीचा कट्टा तर कहर होता... अण्णांचा दोन कप चहा... त्या मागचे वलय :d

दुसर्‍या दिवशीचा मुसळधार वृत्तांतही लवकर येऊ दे...

या ट्रेक मधिल सगळ्याच मायबोलीकरांची मुलं पालकांना 'आई-बाबा' म्हणून हाका मारताना दिसत होती... अपवाद फक्त घारूअण्णांच्या निपुरचा... "माझे 'वडिल' कुठे गेले?" :d

ती पुर्वा आहे... वय वर्षे ३... श्रीशैल सोबत चांगलीच गट्टी जमली होती... पारितोषिक वितरणाच्या वेळी तिला बाल जिजाऊचा किताब देण्यात आला Happy

पूर्वाचा छोटा भाऊ रात्री माझ्याच बाजुला झोपला होता. गाढ झोपलेला हा पठ्ठ्या रात्री २ च्या दरम्यान (अचानक) त्याच्या वडिलांना "गोष्ट" सांगा ना म्हणत उठला :-). सकाळी त्याच्या वडिलांना विचारले असता ते म्हणाले रोज रात्री गोष्ट ऐकत झोपण्याची सवय आहे याला. Happy

जिप्स्या... जल्ला, आयडी पेप्सी सारखा वाटतो आहे Wink .. आवडला अन तुला शोभतो सुद्धा !

पुर्वाचा भाऊ म्हणजे बालशिवाजी, कट्टर मावळा आहे तो मूळचा मावळ प्रांतातलाच. वाडेश्वरचा आहे.

दिवसभराची मेहनत अखेर रात्रीच्या गाढ झोपेचं देणं देउन गेली. सकाळी जाग आली ती पक्ष्यांच्या किलबिलीने. एक मिनिट. थापा मारतोय मी. पक्षीही उठायच्या आधी कॅप्टनी आम्हाला उठवलं होतं. Happy तशीही निसर्गाशी जवळीक साधायची वेळ झालीच होती त्यामुळे आम्ही सगळे टोणगे निसर्गाच्या हाकेला ओ द्यायला निघालो. आकाशात चांदण्या अजूनही तेजस्वी होत्या. त्या ही इतक्या संख्येत की क्षणभर मला वाटून गेलं, की रात्रीच्या ड्यूटीच्या तारकांना रिलीव्ह करायला मॉर्निंग शिफ्ट्वाल्याही हजर आहेत की काय. अर्थात चांदण्यांनी नटलेलं आभाळ सुरेखच दिसतं, त्यावेळी तूम्ही काहिही करत असलात तरीही. Proud

शौचमुखमार्जनानंतर गरमागरम चहा भुरकून आम्ही श्रीवर्धन गडावर कूच केलं. वाट कालचीच असली तरी मार्गक्रमणा मात्र कालच्यापेक्षा खडतर होती. काल अजिबात उंच वाटत नसलेला किल्ला रात्रभरात बराच वर गेला होता. Wink गड सर झाल्यावर एक ट्रेकमेट गोवेकर यांनी त्यांच्या उमरकैदेच्या (लग्नाच्या) वाढदिवसानिमित्त पुरणपोळ्या खाउ घातल्या आणि आम्हाला त्या नीट पचाव्यात म्हणून कॅप्टननी गडाच्या तीनही माच्यांची परीक्रमा करुन घेतली.

तेव्हढ्यात कट्ट्याच्या भावी मालकांना गडावरच्या एका पाण्याच्या टाक्यात दिसलेले मासे पाळण्याची ईच्छा झाल्याने मी आणि भिडे, कुणाचीही भीड न बाळगता झक मारायला गेलो. बालहट्टही, राजहट्ट आणि स्त्रीहट्टासारखाच न टाळणेबल असतो बरं. आधी प्लास्टीकच्या पिशवीत मासे पकडण्याचे प्रयत्न फसल्यावर, आम्ही बाटलीत पाणि भरताना एखादा मासा येतो का ते बघितलं. तेही जमत नाही म्हंटल्यावर सरळ आडवे होउन हाताच्या ओंजळीत पकडायचा ट्राय केला आणि जिंकलो. पाण्याच्या एका बाटलीत काही माशे, त्यांच्या माश्या आणि त्यांची मासूबाळे भरुन अखेर आम्ही सगळ्यांबरोबर गड उतरायला सुरुवात केली. वाट खूप कठीण नसली तरी अगदीच सोपीही नव्हती.

मुक्कामी आल्यावर सगळ्यांबरोबर गावातल्या तळ्यावरच्या मंदिराच दर्शन घेण्यासाठी सुटलो. तळ्याच्या दिशेने निघालो तर खरे पण शेवटी आम्ही जातिवंत बॅकबेंचर्स होतो हे विसरता येत नव्हतं. तळ्याच्या वाटेवर सावली शोधून निवांत बसलो. नाक्यावरच्या उनाड मुलांनी अभ्यासूंच्या कुचाळक्या कराव्यात तशी इमानेइतबारे तळ आणि देउळ आटोपून येणार्‍यांची शाळा घेणं चालू होत. पण हाच टाईमपास मुक्कामी बसूनही करता येईल हे उशीराने का होईना पण ध्यानात आलं आणि आम्ही घराच्या पडवीत हवेशीर जागा पकडून बसलो. शरीरातली निकोटीन लेव्हल बॅलन्स करताना, धुराण्णा आणि अण्णा धुराई ही घारुची बारशी तिथेच पार पडली. श्रेयसला पडलेल्या "घरी जाई पर्यंत माशांना खायला काय द्यायच" ह्या प्रश्नाच उत्तर बूमर आणि श्रीखंड असं द्यायचे हे अनुक्रमे प्रशांत आणि मी ठरवताच, घाबरुन मालक आम्हाला शरण आले. Proud

दुपारच्या जेवणात श्रीखंड बघताच मालकांचा चेहरा आठवून आम्हाला हसू आवरत नव्हतं. भरपेट जेवण झाल्यानंतर मानपत्र वितरणाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. प्रत्येक बालसैनिकाला मानपत्र आणि छोटूशी गिफ्ट दिल्यावरती त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद बघण्यासारखा होता. त्या गोष्टी त्यांनी 'मिळवल्या' होत्या. कुठेही न रडता, हट्ट न करता, न थकता, न कंटाळता एखाद्या सैनिकाचा स्टॅमिना दाखवून. हॅटस् ऑफ टू एव्हरीवन ऑफ देम. शिकण्यासारख खूप होत त्यांच्याकडून, निदान मला तरी. Happy

मानपत्र, भाग घेणार्‍या प्रत्येकाला आठवणीत रहाण्यासाठी छोटीशी भेटवस्तू आणि नाश्त्यासाठी आणलेले पण न लागेलेले ठेपले वाटून झाल्यावर आम्ही आमचा गाशा गुंडाळला. अजून बरीच मजल मारायची होती आम्हाला. त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट म्हणजे मध्ये धबधब्यावर एक हॉल्ट होता. माझ्यासारख्या चुकारांसाठी ही खूपच आनंदाची बातमी होती, पण सुखात दु:ख एव्हढच की त्या धबधब्यावर पोहोचण्यासाठीही चालाव लागणारच होतं.

कंटाळा येण्याइतक आणि त्यापेक्षा थोड जास्त चालल्यावर धबधबा दिसला आणि तीथे आमचा तळीराम गार झाला. अनुभवी ट्रेकर्सनी अक्षरशः शिट्ट्या वाजवून वाजवून आम्हाला पाण्याबाहेर काढलं. त्यांच्यात म्हशींना चिखलातून बाहेर काढणार्‍या गुराख्यांची चिकाटी होती. (आणि आमच्यात म्हशींची) Proud

रेंगाळत रेंगाळत चालून अखेर बसपाशी पोहोचणार तेव्हढ्यात पावसाने गाठलच. धबधब्यातून बाहेर आल्यावर घातलेले सुके कपडे त्याने क्षणात नखशिखांत भिजवून टाकले. चिंब भिजून बसमध्ये बसलो आणि बशी सुरु झाल्या. वाटेतले दोन ओढे सुसाट वाहताना बघितले आणि बसेस त्यांना पार करत असताना, लीडर्स का घाई करत होते ते लक्षात आलं.

त्यातही आईच पत्र हरवलच्या स्टाईलवर अण्णांची नुपूर हरवली चा एक छोटेखानी खेळ झाला. नशीबाने ती अण्णा नसलेल्या बसमध्येच होती. मात्र त्यावेळी झालेली आमची अवस्था सांगण्यासारखी नक्कीच नव्हती. हाच अनुभव आधी भिडेंसह घेउन झाला होता आमचा. (मालकीण बाईंनी हे वाचलं तर मालकांना भांड्याबरोबर इतरही बरेच हिशेब द्यावे लागणारेत) Biggrin

वाटेत भिजलेले कपडे बदलण्यानिमित्त्ये थांबलो आणि एका मस्त चहाची प्राप्ती झाली. भिजून कुडकुडल्यावर सुके कपडे घालायला मिळणे आणि त्यावर गवती चहाचा फर्मास कप मिळणे हे घडायला पूर्वपूण्याई लागते महाराजा.

निघताना परत एकदा नुपूर इकडे आणि अण्णा तिकडे अशी परिस्थिती निर्माण झाली. मात्र यावेळी रडकुंडीला येण्याचा मान नुपूरला मिळाला. अखेर अण्णा आमच्या बशीत चढले आणि नुपूरने त्यांना दम देण्याचा कार्यक्रम घरीच उरकू असं ठरवून टाकलं.

रात्री थकून भागून आपापल्या घरी पोहोचल्यावर खुशालीची फोनाफोनी झाली. मी मात्र वेगळ्याच विचारात गढलो होतो. ह्या ट्रेकमध्ये आपण काय कमवल आणि काय गमवल ? वाढीव वजन, सुटलेल पोट, शेपलेस, व्यायामाचा सराव सुटलेल शरीर घेउन तंगड्या तुटेपर्यंत चालण्याच फलित काय ह्याचा विचार करताना एक लक्षात आल.

मी कमावला होता विश्वास, मला हे जमू शकेल ह्याचा. गमावली होती ती 'कस्काय ब्र झेपवणार हे ?' ची काल्पनिक भीती. शिकलो होतो बालचमूकडून 'एकच पाउल उचलायच असत, एकावेळी; रस्ता आपोआप संपतोच' हा अ‍ॅटिट्यूड. जेव्हढा वाटला होता तेव्हढा त्रास नाही झाला मला. आय जस्ट नीड टू टेक प्रॉपर फूटगियर अ‍ॅन्ड नीड स्लाईट प्रॅक्टीस. चालायला नाय घाबरत आता आपण. अब तो चले चलो.....

तळटीप : वरचे विचार हे निवांत सोफ्यावर बुड टेकून एसीची हवा खाताना आलेले आहेत. ह्याविरुद्ध असलेल्या प्रत्यक्ष अवस्थेला लेखक जबाबदार नाही.

असूदे.. सॉलिड वृत्तांत... Lol मस्तच लिहीले आहेस रे.. Happy

तळटीप : वरचे विचार हे निवांत सोफ्यावर बुड टेकून एसीची हवा खाताना आलेले आहेत. ह्याविरुद्ध असलेल्या प्रत्यक्ष अवस्थेला लेखक जबाबदार नाही. >> शेवट पण लै भारी Lol

अम्या, सह्ही वृत्तांत Lol

शिकलो होतो बालचमूकडून 'एकच पाउल उचलायच असत, एकावेळी; रस्ता आपोआप संपतोच' हा अ‍ॅटिट्यूड<<< एकदम पटेश Happy

अम्या :d

Pages