चलो राजमाची (मुलांसाठी आणि मुलांबरोबर ट्रेक)

Submitted by कविन on 8 October, 2010 - 13:08

गेल्यावेळचा कँपचा अनुभव बघता अजून एका कँपची मागणी झालेली. पण तेव्हा लगेच नेणं शक्य झालं नव्हतं. आता ह्या दिवाळी सुट्टीत लहान मुलांना बरोबर घेऊन एक विकांत "राजमाची" ला जायचा प्लॅन केलाय. (नाणेघाट पुण्याहून येणार्‍यांसाठी गैरसोयीचा होईल म्हणून हा बदल केलाय. शिवाय गेल्या आठवड्यात आमच्या गृपच्या कॅप्टनने बरोबर ४-५ जणांना घेऊन फिनिक्स ह्या शारिरीक अपंगांच्या संस्थेच्या लोकांना घेऊन राजमाचीला ट्रेक केला आहे)

तारिख आहे १३-१४ नोव्हेंबर २०१०

मुंबईकरांसाठी बसची सोय असेल. पुणेकरांना लोणावळ्याजवळ बस पिक अप करेल.

पहिल्या दिवशी मनोरंजन फोर्ट आणि दुसर्‍या दिवशी श्रिवर्धन फोर्ट असा कार्यक्रम आहे.
( दोन दोन फोर्ट करायचे म्हणून दड्पून जायची अजिबात गरज नाही. तस दड्पण आलं तर फिनिक्स च्या जवानांना आठवायचं.) Happy

ज्यांना यायची इच्छा आहे त्यांनी कृपया मला संपर्कातून इमेल करा. किंवा इंद्राला draj598@gmail.com ह्या आयडीवर संपर्क केल्यास तो देखील माहिती अपडेट करु शकेल.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अरे व्वा कविता, मस्त प्लॅन. खरंच मुलं खूप एंजॉय करतात नाणेघाट ट्रेक आणि रिस्कीही नाही, त्यामुळे ज्यांना पाठवायची इच्छा असेल त्यांनी बिनघोर आपल्या मुलांना पाठवायला हरकत नाही.

नाणेघाट हे ठिकाण बदलून लोणावळा जवळील राजमाची हे ठिकाण ठरवले आहे... कृ.सं.नों.घ्यावी

पूनम ते विहंगम वर्णन वाचूनच तर इंद्रा ठिकाण बदललय म्हणतोय.. वरती अजून तरी नाणेघाटच दिसतय.. म्हणजे तेच असावं...

इंद्रा जरा डोमा जा..

जssssरा जास्त आहे या ट्रेकसाठी>>>>>>>>>>> लले, तुला लहान मुलात धरणार नाहियेत, किमान ४-५ पोरं सांभाळण्याची अपेक्षा आहे तुझ्याकडून कवी ला... Lol

इंद्रा जरा डोमा जा.. >>> हिम्या Wink

कवेला आत्ताच फोन केला होता... तिनेच हा बदल सांगितला... तिला वेळ मिळाला की मुळ पोष्टीत ती बदल करेल.

माझं वय....... जssssरा जास्त आहे या ट्रेकसाठी >>> खरयं... लं.घो. काय कामाची :p

होय, कविताचा मलाही फोन आला होता. पुणेस्थित लोकांसाठी सोयीचं जावं, म्हणून संयोजकांनी ठिकाण खरंच बदललंय. कविताला नेट अ‍ॅक्सेस नसल्यामुळे ती घरी जाऊन मग बदल करेल शीर्षकात.

चलो, राजमाची! Happy

कुठेही चला, आपण काय कधीही तयार...

तरीही राजमाचीला झुकतं माप, जेवणाची व राहण्याची चांगली व्यवस्था आहे....

कवे, लले.. माझ वय काय जास्ती नाहीये ह्या ट्रेकसाठी.. मला शिपापर्यंत न्यायचा अनुभव पुरेसा वाटत नस्ल्यास मला घेऊन चला.. Proud

डुआया, अरे २/४ लहान मुलं हवी असतील तर घाई करायला हवीस होतीस तू Proud

चलो, देर आये दुरुस्त आये.

मी पण यायला तयार आहे, मला उचलून घ्यायच हां पण पाय दुखले तर.

तारीख काय आहे कवे? जमलं तर मीही येईन आणि तुला २-४ पोरं सांभाळायला मदत करेन. लहान मुलीसारखी वागणार नाही. आय प्रॉमिस :स्वतःच्या गळ्याला हलकेच चिमकुटा घेणारी बाहुली:

कवे, सह्हीच आयडिया Happy

तुम्हाला खुप सार्‍या शुभेच्छा!

ट्रेकवर असलात तरी बालदिनाच्या दिवशी स्पेशल कार्यक्रम नक्की ठेवा बरका बालचमुंसाठी Happy

मी आले असते तर २-४ मुलांना नक्की सांभाळलं असत Happy पण क्या करे... मी डिसेंबरात येत्येय Sad

असो. माझा फोटु पाठव्ते, तो घेऊन जा बरोबर Proud मला नाही तर फोटुला तरी जायला मिळेल राजमाची Proud

Pages