बेसन व कणीकेचे चुर्मा लाडू

Submitted by मनःस्विनी on 12 October, 2009 - 21:44
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

ladu 001.jpgladu 002.jpgladu 003.jpgladu 004.jpg
------------------------------------------------------------------------------------

थोडाश्या आठवणी: मी माबोवरील मैत्रीण नलीनीचे बेसनचे पुर्‍या तळून वगैरे पहिल्या वेळेस चुर्मा लाडू केले होते व माझ्या मारवाडी मैत्रीणीला दिले. तिला अर्थात आवडलेच मग तिने सागितले की ते कणीकेच्या मुथीया बनवून देसी घीत तळून त्याचे लाडू करतात व खसखस मध्ये घोळतात. ह्यावेळेला मला काहीही तळणी करायचे नाही.(सासर्‍यांचे कैच्याकै वाढलेले कोलेस्टेरॉल).
मग ह्याला उपाय काय म्हणून हे लाडू. त्यातल्या त्यात कमी कॅलरीज म्हणून हे केले. साखर आहेच्.(ती पाठ सोडत नाहीच अश्या पदार्थात). दोघींना थॅक्स कारण दोन्हीचे भेसळ करून आजच हे आता लाडू बनवले घरी आल्यावर दिवाळीचा पहिला पदार्थ. असो.

१ वाटी कणीक,
१ वाटी बेसन,
१/२ वाटी दूध,
१/२ वाटी तूप,
२ वाटी साखर(मी कमीच टाकते)
११/२ वाटी पाणी,
केसर्,वेलची,काजू वगैरे

क्रमवार पाककृती: 

१)कणीक व बेसन मिक्स करून त्यात दूध घालयचे कोमट करून. ४ लहान चमचे तूप्(उरलेले नंतर लागेलच). थोडा वेळ ठेवून द्यायचे.
२) मळून घ्यायचे मस्त. मग पातळ चपाती बनवून भाजून घ्यायच्या.(काळी होवु देवु नये. तळणी कॅन्सल करायला हे केले).
३) ह्या चपात्या मिक्सीत वाटून घ्यायच्या.वेलची व केसर टाकून.
४) आता साखरेचा पाक बनवायचा. १ वाटी साखरेला मी १ वाटी पाणी टाकून दोन तारी पाक केला. पा़ जसा दोन तार सुटायला लागली मी मिश्रण मिक्स करून ठेवले. मग कोमट असताना लाडू बांधले.
५) पाक वगैरे करून डोके खराब करायचे नसेल तर सरळ थोडेसे तूप गरम करून टाकून मळून, बारीक पिठीसाखर टाकून वळा. जरा जोर द्यावा लागतो, मसल पण छान होतील ह्या प्रकाराने. पण पाक खराब झाला म्हणून मा. का. चु. बीबीवर धाव नको.
६) डायबीटीस लोकांसाठी स्प्लेडा नाहीतर आयडियल साखरेचे प्रमाणः
१/४ पेक्षा किंचित कमी स्प्लेन्डा मुसती मिक्स करून मळून लाडू बांधणे. तर आयडियल शुगर १/४ घेवून नुसती मिक्स करून लाडू बांधणे. माझ्या मते आयडीयल शुगर जरा स्पेल्न्डा पेक्षा बरी आहे(mark the words, बरी आहे म्हणून). खरे तर स्प्लेन्डा वर बरेच रिसर्च एवढे सपोर्ट करत नाही.
त्यापेक्षा स्टीवीया(natural plant sugar) चांगली आहे. पण स्टीविया एकदम घशात वेगळी टेस्ट सोडते. असो.

वाढणी/प्रमाण: 
१४ झाले.
अधिक टिपा: 

१) दोन तारी पाक कसा करायचा हे नलीनी व दिनेश ह्यांनी आधी सांगितले आहे कुठेतरी. Happy
२) फक्त एकच करायचे पुर्ण गोळी पाक होइपर्यन्त थांबायचे नाही. जसा दोन तार सुटली की मिश्रण लगेच ताकून ढवळून घ्यायचे. ह्याने काय होते. मिश्रण कैच्याकै कोरडे होत नाही मागाहून. लाडू बांधता येतात. टिकतात सुद्धा.
पाकाविषयी अधिक टिपा हव्या असतील तर नलीनी व दिनेश ह्याना कॉन्टॅक्ट करा. मला एवढे नीट explain करायला जमणार नाही. टंकाळा पण येतो. Happy
३) ISKON मध्ये असेच फक्त कणीकेचे लाडू करतात्(इती मारवाडी मैत्रीण). तसेच राजस्थानात असेच लाडून "फक्त" कणीकेचे मुथीया तळून करतात.

माहितीचा स्रोत: 
नलीनी, मारवाडी मैत्रीण ह्याची भेसळ :)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनु, मी आजच असेच चुर्मा लाडु केलेत.. मी मात्र चपाती तुपावर भाजुन घेतली. मला देखील ही ट्रिक मैत्रीणीनेच सान्गीतली Happy

छान. coincidence एकदम. मला कोणी नाही सांगितली टिप पण म्हटले चपाती करून का नाही होणार. ते तूप किती घालणार तळायला..
आधी मी मुठीया करून ओवन मध्ये भाजायचा विचार केला. मग कॅन्सल केला.
तू बेसन कणीक मिक्स केले का?

टंकाळा पण येतो.>> छ्या भलतच! एवढे नविन नविन प्रयोग 'टंकाळ्या'/कंटाळावाल्या लोंकांचे काम नाही!
मने! उरकाची ग बाई तु..

हा असा असा पोळ्या भाजुन भाजलेले बेसन किंवा पंढरपुरी डाळे, खोबरे आणि गुळ घातलेले लाडू हुबळी-धारवाडकडे हमखास केले जातात. लाडू बांधयच्या ऐवजी कोरडे पीठासारखे ठेवुन त्यात दूध घालुन पण खातात.

मी हा प्रकार कोळश्याच्या शेगडीवर करतो. ( आफ्रिकेत हि कोळश्याच्या शेगडीची चैन करता येते, स्वाहिली भाषेत शेगडीला चिको आणि कोळश्याला मकारा म्हणतात !!! ) हे मूटके फॉईलमधे गुंडाळून भाजून घेतले कि झाले.

कराडकर, मला त्या लाडवाचीच आठवण झाली. मी सुट्टीला गेले की तारामावशी (माझ्या आईची मावशी) कायम करायची. Happy