बेसनचे गूळातले लाडू

Submit to kanokani.com

मस्तच दिसतायत गं लाडु. करुन बघाय्ला पाहिजेत स्मित

मनुस्वीनी, मिश्रण थंड झाल्यावरच वळायचे ना लाडु? गरम गुळाचा चटका बसतो फार.
बाकी लाडु एकदम छान, करुन बघीन.

करून पहा. आवडतील तुला. थॅंक्स लाजो. स्मित

फिओना, मिश्रण कोमट झाल्यावर वळ. हाताला जरासे तूप लाव. नाही बसणार चटका. वाटल्यास बहिणाबाईचे गाणे म्हण नी वळ लाडू. स्मित

एकदम, अरे संसार संसार स्टाइल का? डोळा मारा

फिओना,
तुम्ही ना आजकालच्या मुली ना जरा म्हणून कष्ट व चटके नकोत. स्मित संसार संसार स्टाइलनेच कर ग नाहीतर कोणा खंद्या गड्यला बसव लाडू वळायला. डोळा मारा. ह. घे.

आमच्या खंद्यागड्याला सांगायचं म्हणजे "झक मारली आणी तुला सांगितलं" असं होइल. लाडवांच्या ऐवजी भलताच पदार्थ तयार व्ह्यायचा. मीच वळुन बघीन, केले कि कळवते तुला कसे झालेत ते.

LOL फिओना. इकडून पण फक्त खाणं होतं. ते लाडू काय पासून कोण समजावतेय. असो.

.

फिओना, कोमट झाल्यावरच वळ लाडु. मी दोनदा केले होते ह्या पद्धतीने. मस्त होतात एकदम. मनु, कृती पुन्हा एकदा टाकल्याबद्दल धन्यवाद स्मित

मनू- झक्कास दिसतायेत तुझे लाडू. तू, दिनेश आणि इतर सर्व सुगरण लोकांनी कॉम्प्लेक्स दिलाय.
तुझ्या सासुबाईंना सुद्धा तुझ्याएवढे पदार्थ येत नसणार गं. स्मित

धन्यवाद सर्वांना.
ही सर्व माझ्या आईची देण आहे. she is a great cook. स्मित

मी पण यंदा असेच लाडु करणार !! छान रेसीपी दिलीस मनु !

मी पण यंदा असेच लाडु करणार !! छान रेसीपी दिलीस मनु !

मिक्सर मध्ये दळली जाईल का चणाडाळ?
सिंडी यावेळेस पुन्हा करणार असशील लाडु तर सांग हो, आम्ही येतोच लगेच. डोळा मारा

तुझ्याकडे dry spice grinder आहे का? असेल तर लो वर ठेव नी रवाळ वाट. नाहीतर मॅजिक बुलेट आहे का? त्याच्यात वाट. नाहीतर साधा ओस्ट्रीज आहे का त्याच्यात वाटली जाते पण थोडी थोडी घेवून वाटावे लागेल्.(कटकट आहे ते). स्मित
फिओना, तू हे लाडू केलेस तर मला पाठवून दे ह्यावेळेला मी नाही करत आहे. स्मित

मस्त.यावेळी दिवाळीला हेच लाडु. स्मित मला हे बरेचसे शेंगुळ्याच्या लाडु सारखे लागत असावेत अस वाटतय. बरोबर का मनु?

माझ्याकडे प्रीतीचा इन्डियन मिक्सर आहे. त्यात होइल असं वाटतय. मी मागे साबुदाणा बारीक केला होता त्यात. मस्त पीठ झालं होतं.
लाडु केले की टेस्टिंगसाठी तुझ्याकडेच पाठवते. स्मित

सीमा,
शेंगूळा म्हणजे शेंगदाणा का?

फिओना, माझे लाडू अ‍ॅटलांटात गेलेत तसे. स्मित तेव्हा तिथून इथे यायला हरकत नसावी. स्मित

खाण्याची रिक्स घेणार असाल तर पाठवायला पण काही हरकत नाही माझी. डोळा मारा
तसा बरा करते मी स्वंयपाक!

साधे बेसन वापरुन केले हे लाडु तर चालतील का ? प्रमाण किती घ्यावे लागेल ? डाळ भाजण्यापासून सगळे करायचा फार कंटाळा आलाय डोळा मारा

आई वाटल्या डाळीचे लाडू करते. (चणा डाण भिजत घालून, वाटून ) त्याला बराच वेळ लागतो. त्यामानाने हे खुपच सोपे आहेत. उद्या करुन टाकेन !!!

सिन्ड्रेला, बाजारात बहुतेक लाडवासाठी खास रवाळ बेसन मिळायला हवे. ( भारतात मिळायचे )

सिंडे, देसि स्टोर ला चक्कर टाक आणि लड्डू बेसन आण.

मिनोती, दिनेश, देसी दुकानात गेले तर डाळच आणेन फिदीफिदी

मुगडाळीचे आवडत असेल तर मग ते वापरुन कर.

मी नेहमी चणाडाळ भाजूनच नेहमीचे बेसन लाडू करते. हे गूळातले पण.
पण बाहेरचे देसी दुकानातले बेसन काही हरकत नसावी.

दिनेश, ते मुखविलास लाडू ना चणाडाळ भिजत घालून .. अरे बाप रे. किती वेळ लागतो व तूप पण भरपूर लागते. पण चव काय असते.. अहाहा... मस्तच! त्यात थोडा खवा टाकून काय लागतात हे भिजवलेल्या चणाडाळचे लाडू. वेळ असता तर केले असते. रोज रात्रीचे जागरण झेपणार नाही.

आताच लाडू बेसनाचे - रवाळ बेसनाचे मायक्रोवेव्ह्मध्ये बेसनाचे लाडू केले. छानच झाले. पटकन, रंगाने चांगले, आणि जरा कमी तुपात. ह्यापुढे बेसनाचे लाडू मायक्रोवेव्हमध्येच करणार. उगाचच बेसन भाजून हात दुखवून घ्यायचे. स्मित

बजाजच्या फूड प्रोसेसर मध्ये डाळ वाटली जाते का?

अमि, मुंबईत आहेस ना? अगं हीरा बेसन आण ना विकत..

आर्च, सेम पिंच.. तूप कमी लागतं मावेमध्ये. मीही मावेमध्ये बेसन भाजलं आणि रंग पालटण्यापुरतं परत गॅसवर.. 'तो' रंग आला नाही, तर लाडू कच्चा नसला, तरी कच्चा आहे असंच म्हणणार सगळे.. पण वेळ किती वाचला आणि कष्टही!

मनू, नक्की करून बघणार हे लाडू.

बाकी ढीगभर पाकृ टाकल्यास पण मोहनथाळ ठार विसरून गेली आहेस ना?